पराभव नक्की कोणाचा ?
आजच्या सकाळ मध्ये एक बातमी आली आहे. दुवा खाली दिलेला आहे.
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4806917519386850610&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150211&Provider=-%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%20%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87,%20%E0%A4%AE%E0%A4%97%20%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3?-%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE
सकाळ ने सामन्या त आलेल्या अग्र लेखाची बातमी छापली आहे. ह्या बातमी वर मी माझे विचार मांडत अहे. ह्यावर मत मांडतान मी हे सांगू इच्छितो कि मी कोणत्याही राजकारणी पार्टीचा पुरस्कार करणार नाही आहे. मला वाटत जे सामन्यात येते ते शिवसेनेच मत असत. ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे, की राजकारणात कधीच काही चिरंतन नसते. देश जिंकला, पण दिल्ली हातातून निसटली. ‘केजरीवाल पाच साल’ हा नारा दिल्लीने स्वीकारला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने शिकावे. जमल्यास चिंतनही करावे आणि पुढे जावे असा दिल्लीचा निकाल आहे.
पण इथे शिवसेना म्हणते आहे कि महाराष्ट्रच्या जनतेने चिंतन करावे , पण मला असे वाटते कि शिवसेनेने स्वतः चिंतन करावे. आम आदमी दिल्लित जिंकले कारण जनतेला एक चांगला पर्याय मिळाला. जातीधर्माच्या राजकारणा पलीकडे जाऊन जनतेने इथे मतदान केलेले दिसत आहे. शिवसेना अजूनही जनतेवर आणि भाजप वाट टीका करण्यात धन्यता मानते अहे. पण आप सारखा पर्याय जर सगळ्या राज्यांना मिळाला तर सर्व जनता ह्या बद्दल
नक्कीच विचार करेल.
मला वाटत हा पराभव ह्या सर्व राजकारणी पक्षांचा आहे जे फक्त जनतेची दिशाभूल करतात आणि खोटी आश्वासने देतात, जातीपातीचे राजकारण करण्यातच धन्यता मानतात. आप चा हा विजय सगळ्या राजकीय पक्षांना एक मोठा धडा आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
-सहमत! मला वाटतं आणीबाणीनंतर खूप वर्षांनी 'राजकीय पक्षां'पेक्षा 'सजग मतदार' जिंकायला सुरूवात झाली आहे. १९७७ साली जयप्रकाश नारायण यांनी पटण्यात केलेलं विधान आठवलं: "This is a revolution, friends! We are not here merely to see the Vidhan Sabha dissolved. That is only one milestone on our journey. But we have a long way to go... After 27 years of freedom, people of this country are wracked by hunger, rising prices, corruption... oppressed by every kind of injustice... it is a Total Revolution we want, nothing less!" वरच्या विधानात After 27 years of freedom, ऐवजी After 67 years of freedom,इतकाच बदल केला तर जवळजवळ सगळी विधानं आहे तशी आजच्या दिल्लीतल्या (आणि बहुधा भारतातल्या) मतदारांना लागू पडतात. इथे केजरीवालांची जेपींशी तुलना करण्याचा हेतू नाही [तशी लोकनायक म्हणून करायचीच झाली तर कदाचित अण्णा हजारेंची करता येईल], पण तेंव्हा आणीबाणीच्या वेळी जशी जनता कंटाळून जागृत झाली होती, तशीच परिस्थिती इतक्या वर्षांनी अखेर आली आहे, त्यामुळे Total Revolution व्ह्यायला पोषक वातावरण आहे असं वाटतं.हा राजकीय पक्षांच्या विजय-पराभवापेक्षा लोकशाही प्रक्रीयेचा विजय आहे.