Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नेमक काय चुकतंय?

श — शब्दबम्बाळ, Wed, 02/11/2015 - 13:52
काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय, तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय, पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो, अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो, जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या, नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो, तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो, जेव्हा ती हि हसते गालात हळूच, नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो, कुठेतरी फिरवावं हिला म्हणून ठिकाण शोधतो, जेव्हा एकदाच ठरत असतं ठिकाण आमचं, नेमकं तेव्हाच कोणीतरी घरी कडमडतय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… मग मात्र मी वैतागून जातो, काहीच न करता बसून राहतो, तर हि म्हणे तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, अहो! कोणीतरी सांगेल का, नेमक काय चुकतंय??

प्रतिक्रिया द्या
945 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा