Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मौनात दडले क्रौर्य

ग — गणेशा, Wed, 02/11/2015 - 15:36
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
3975 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रचेतस Wed, 02/11/2015 - 16:45 नवीन
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/11/2015 - 19:25 नवीन
नेहमी प्रमाणेच तुझा पहिला रिप्लाय धन्यवाद. बाकी आज काल विडंबन नाय रे करत तु मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 02/12/2015 - 02:28 नवीन
:) विडंबने करणे कधीच सोडून दिले रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/12/2015 - 05:37 नवीन
+++१११ टू हत्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पंदना Wed, 02/11/2015 - 22:23 नवीन
मस्तच आहे कविता.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/12/2015 - 05:18 नवीन
जबरदस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 02/12/2015 - 05:42 नवीन
खर सांगायच तर नाही आवडली कविता. सगळे शब्द जागेवरच आहेत. पण दोन शब्दांच्या मधला अर्थ विस्कळीत वाटतो. दोन तीन वेळा वाचल्यावर सुध्दा नेमके काय म्हणायचे आहे तेच समजले नाही. कदाचीत हा माझा सुध्दा दोश असु शकतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 09:49 नवीन
सर्वांचे आभार ! पैजारबुवा जी नाही आवडली कविता तरी हरकत नाही आपला रिप्लाय हाच मोठा आहे.
  • Log in or register to post comments
श
शिवमुद्रा गुरुवार, 02/12/2015 - 08:54 नवीन
http://marathikavita-com.blogspot.in/2011/08/blog-post_3559.html http://nirajdhane.blogspot.in/2011/08/blog-post_9661.html http://mazijidda.blogspot.in/2011/11/blog-post_9228.htm २०११ चि आहे, तुमची तारिख आत्ताची ,कोन खरे कवि?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/12/2015 - 09:03 नवीन
मिपावर मी एकदा ही कविता दिली होती २०११ मध्ये असे वाटले आणि लिंक मिळाली सुदैवाने http://www.misalpav.com/node/17377 तरीही ही कविता मी २००७-८ मध्ये पहिल्यांदा ऑर्कुट वर टाकली होती. कम्युनिटी चे नाव : मराठी कविता आणि काव्यांजली. तसेच २००७-८ मध्ये एका स्टेज प्रोग्रॅम मध्ये ( The Creative bytes) ही कविता सादर केली होती. याउपर मध्यतंत्री १-२ वर्षे नेट वरती नसल्याने ऑर्कुट च्या लिंक माझ्याकडे नाहीत. तरी गीमेल ला २०११ आधी मी मेल केली होती का ही कविता दाखवतो. -- बाकी वाटरमार्क आणि नोंद करण्याची कवितेची मला गरज कधी वाटली नाही. जो कविता किंवा इतर चोरुन आपल्या ब्लॉग वर टाकतो त्याला ते माहीती असते. क्रियेटीव्हीटी ही महत्वाची, त्या क्रीयेटीव्हीटेचे नंतर काय होते हे पहात राहिले तर बाकीच्या नविन गोष्टींकडे लक्ष देता कसे येइल. आणि आपण या जगात कोणाकोणाला म्हणुन जाब विचारत फिरणार हा ही एक प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवमुद्रा
ग
गणेशा गुरुवार, 02/12/2015 - 09:17 नवीन
तुम्ही दिलेल्या पहिल्या लिंक मध्ये माझ्या अनेक कविता आहेत आणि आई या धाग्याची कविता पाहुन खुप वाईट वाटले. http://marathikavita-com.blogspot.in/2011/08/blog-post_6471.html ह्या कविता मी दिल्लीत असताना २००७-८ साली लिहिल्या होत्या. त्या नंतर कवी ग्रेस यांनी त्या डायरीवर साईन केली होती, जेंव्हा माझी भेट त्यांच्याशी वार्‍याने हालते रान या पुस्तक प्रकाशनावेळी दादर ला झाली होती. मी माझ्या कोण येतेह गुरुवर्य ची लिंक २०११ मार्च ची मिसळपावरील दिली आहे, बघुतेक ह्या सर्व कविता मिपावरुन घेतलेलया आहेत. कारण जेव्हद्या मी येथे कविता दिल्या त्यानंतरची तेथे डेट आहे. स्वपानंचे पान मुंबई.. ही माझी आवडती कविता पण तेथे आहे, ती येथे दिली होती २०१० ला , http://www.misalpav.com/node/14296 मुल कविता २००७ ला लिहिलेली होती. आकाशातील मी घन काळा, माझी मुलगी.. या सर्व कविता माझ्या आहेत. आता लिंका देत बसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवमुद्रा
ग
गणेशा गुरुवार, 02/12/2015 - 09:29 नवीन
माझ्या आई नावाची कविता तेथे आहे, त्या सर्व कवितेंची हि लिंक, तेथे फक्य ३ रीच कविता आहे. ( २०११) आणि त्या आधीही त्या कविता २००७-८ ला ऑर्कुट वर होत्या. तरीही तुम्ही दिलेली कविता ह्या मी मिपावर दिलेल्या कविते नंतरच्याच आहेत. आणि त्या मिपावरुनच घेतल्या आहेत , कारण आई कवितेला प्रस्थावना मी फक्त मिपावरच दिलेल्या होतय अआणि ती तशीच तिकडे ही आहे. आई मिटलेला श्वास : संपुर्ण http://www.misalpav.com/node/17166 -- आता रिप्लाय देणे थांबवतो.. काही शंका असल्यास डायर्‍या आहेत [:)] .. या चहा प्यायला. आणि घाबरु नका, मी कविता कधीच ऐकुन दाखवत नाही.. मिपा सदश्यांना माहीती असेल, कविता ऐकवणार्‍यांचा मला खुप तिरस्कार आहे. त्यामुळॅ बिंधास्त रहा. अवांतर : शिवमुद्रा नाव छान वाटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवमुद्रा
ग
गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 09:47 नवीन
माझ्या लक्षात नव्हते पुन्हा विचारायचे.. पाण "शिवमुद्रा" जी, आपण फक्त या एकाच धाग्याला मिपावर आता पर्यंत् प्रतिसाद दिला आहे, अआणि माझ्या खुलाशा नंतर ही काहीच बोललेला नाही.. असे का ? अवांतर : नाविन्यपुर्ण कलाकृती हा एक शिलालेखच असतो त्या कलाकाराचा.. असंख्य घाव सहन करुनही तो कधीच दुसर्‍यांच्या दिमतीला जवु शकत नाही.. नेटवर सर्रास चोरी चालते म्हणुन खरेपणा थोडाच लपवता येतो.. शेवटचाच रिप्लाय हा माझा .. कारण माझ्यच कवितेला माझेच येव्हदे रिप्लाय योग्य वाटत नाही.. काही अजुन अएन तर संदेशामध्ये बोलु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवमुद्रा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा