Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

PMPL ने प्रवास का करावा?

स
सह्यमित्र
गुरुवार, 02/12/2015 - 09:04
🗣 56 प्रतिसाद
PMPL चे वाढते दर आणि खालावत /जाणारा सेवेचा दर्जा ह्या कडे बघता असा प्रश्न मनात येतो. तसेही पुण्यातील बहुतांश लोक PMPL च्या वाटेला जात नाहीतच . तरीही एक गणित मनात आले ते येथे मांडत आहे : १. उदाहरण दाखल धायरी ते राजाराम पूल / स्वारगेट / पुणे स्टेशन / हे तीन दर बघू २. हे तीन दर अनुक्रमे १०/ २० / २५ असे आहेत. अंतर अनुक्रमे (साधारण ) ५/१०/१२ किमी आहे. म्हणजे प्रती किमी २ रुपये दर पडतो आता हेच जर स्वतःच्या दुचाकीने जायचे असेल तर गणित काहीसे असे येईल : १. बजाज डिस्कवर सारखी चांगले मायलेज देणारी गाडी साधारण ५०००० रुपयांना पडते २. पेट्रोल cost : ६५ च्या मायलेज ने १ रुपया प्रती किमी ३. देखभाल खर्च: साधारण ०. ३ रुपये प्रती किमी (३००० किमी नंतर servicing गृहीत धरून ) ४. वाहन विमा ०. १ रुपये प्रती किमी (वार्षिक ८०० रुपये ) ५. वाहनाची किंमत : ५ वर्षे साधारण ४०,००० किमी चालविल्या नंतर येणारी पुनर्विक्री किंमत २००००. म्हणजे ४०,००० किमी साठी रुपये ३०००० खर्च . व्याज गृहीत धरत हा खर्च किमी ला १ रुपया असा गृहीत धरायला हरकत नाही . एकूण प्रती किमी खर्च (१+२+३+४+५): २.४ प्रती किमी म्हणजे PMPL च्या सेवे साठी प्रती किमी २ रुपये तर स्वतःची दुचाकी वापरल्यास २.४ रुपये असे गणित आहे. म्हणजे दुचाकी वापरण्याचा खर्च PMPL च्या तुलनेत २०% जास्त आहे. त्यातून दोघांनी प्रवास केल्यास तो PMPL च्या तुलनेत स्वस्तच आहे. त्यातून वेळेची बचत, flexiblity हे इतर फायदे आहेतच. तसेच PMPL हि काही घराच्या दारात मिळत नाही म्हणजे ते चालणे अधिक वेळेवर न धावणाऱ्या स्वछ नसलेल्या कुठेही बंद पडू शकणाऱ्या गाड्या हे मुद्दे गृहीत धरता PMPL ने प्रवास का करावा ? असेच प्रश्न चिन्ह उभे राहते . ह्यात जेष्ठ नागरिक, लहान मुले, किंवा दुचाकी विकत घेणे न परवडणारे लोक ह्यांची अवस्था बिकट होते. त्यांना PMPML वापरण्या वाचून दुसरा पर्याय नाही आणि PMPL चा दर्जा आणि खर्च ह्याचे कधीच न जुळणारे गणित, ह्या कात्रीत सापडायला होते. टीप : ह्यातील गणित ढोबळ मानाने सध्याचे इंधन भाव लक्षात घेऊन मांडले आहे. गाडी चा प्रकार, नवीन / जुनी , वापर ह्यानुसार ह्यात थोडेफार फरक शकतात .

प्रतिक्रिया द्या
9871 वाचन

💬 प्रतिसाद (56)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/16/2015 - 13:35 नवीन
मी टोर्टुगामधुन विकली असती तर परत जौन ढापली असती ओ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 02/16/2015 - 13:38 नवीन
हा हा हा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अमोल देशपांडे Sat, 02/14/2015 - 17:39 नवीन
डॉ. श्रीकर परदेशी नक्कीच हि परिस्थिती बदलवून दाखवतील असा विश्वास वाटतो. बाकी इथल्या प्रतिक्रिया लय भारी! समस्त मिसळपाव मंडळींना आमच्या प्रवासी कट्ट्याला भेट देण्याचे निमंत्रण. www(dot)facebook(dot)com(slash)groups(slash)pmpml Ab Bus Hi Karo! Help improve Pune's only bus service Call PMPML Helpline No. 020 24503355 (get routes , can suggest, compliment or complain) or mail pmpcomplaint@gmail.com
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 02/15/2015 - 07:31 नवीन
दुसरा चांगला पर्याय नाही पण पूर्वीपेक्षा आताच्या गाड्या तकलादू आहेत. सीटे तुटलेली असतात. वरती धरायचा बार प्रचंड वर असतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/16/2015 - 15:48 नवीन
मुंबईच्या बेस्टच्या व्यवस्थापनाशी (६० ,७० दशकातील हो) तुलना केल्याशिवाय राहवत नाही. कर्मचाऱ्यांस कामं नेमून दिल्यावर निर्णयाचे अधिकारही दिले होते आणि त्यात कोणाही वरिष्ठांस ढवळाढवळ करता येत नसे. त्यामुळे चांगली सेवा दिली जात होती. घंटेची दोरी ओढल्यावर तुटली अथवा कोणी वमन केले की वाहक त्याच ठिकाणी बसफेरी रद्द करत असे आणि प्रवाशांना मागच्या बसमध्ये बसवून दिले जायचे. एक दुरुस्ती करणारी गाडी येऊन त्या बसला डेपोत नेले जायचे. चिंध्या, सुतळ्या (Recycle)जोडून घंटा तात्पुरती चालू करत नसत. डेपोत बस पाण्याने धुतली जायची.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Sun, 02/22/2015 - 08:15 नवीन
डॉ श्रीकर परदेशी उत्तम प्रशासक आहेत. सध्या ते इनचार्ज असताना त्यांनी अनेक बिघडलेल्या बस रस्त्यावर दुरुस्त करुन आणल्या आहेत. बेशीस्त कर्मचारी त्यांचा पगार थांबवुन ताळ्यावर आणले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मते तांत्रिक बाजु पहाता किमान अजुन एक वर्ष डॉ परदेशी पी एम पी एम एल चा कारभार सांभाळुन काही काळ प्रवाशांना सुख देऊ शकतात. पुढे ..... पुणेकरांच नशीब. राज ठाकरे यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकात एकदा आरोप केला होता की सार्वजनीक वहातुक दुचाकी / चारचाकीची विक्री वाढवण्यासाठी मुद्दाम खराब ठेवली जाते. पुण्यात याचा प्रत्यय अनेक वर्ष येत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा