Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विशेष वागणूक

न
नितीन पाठक
Fri, 02/13/2015 - 09:14
🗣 19 प्रतिसाद
नुकतेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले. जगभरातील १४ संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. आपला भारतीय संघ अँडलेड येथे आपल्या होणा-या सामन्यासाठी उतरला आहे. या हॉटेलपासून ३००-४०० मी अंतरावरच अँडलेड ओव्हल स्टेडियम आहे. आपले खेळाडू विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे स्टेडियम वर जाण्यासाठी चालतच निघाले. परंतु या दोघांकडे फारसे कोणीही लक्ष दिले नाही. हे दोघे रस्ता ओलांडत असतांना नेहमीप्रमाणे पादचा-यांसाठी काही क्षण मोटारी थांबत आणि लगेचच पुन्हा वेग घेत होते. या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही. इकडे भारतात क्रिकेटपटूंना "प्रति-परमेश्वर" असल्यासारखी वागणूक मिळत असतांना ऑस्ट्रेलियातील ही परिस्थिती किती वेगळी आहे !!

प्रतिक्रिया द्या
4983 वाचन

💬 प्रतिसाद (19)
त
तिमा Fri, 02/13/2015 - 09:18 नवीन
बरं मग ? वाचनखूण साठवू का ?
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Fri, 02/13/2015 - 09:21 नवीन
म काय करायचं म्हणता?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/13/2015 - 09:51 नवीन
खर आहे तुमच म्हणणं. दुसर्‍या देशात आपल्या माणसाला काही किम्मत नसते. तो बराक ओबामा का कोण तो भारतात आला होता म्हणे काही दिवसांपूर्वी, मी देखील त्याला पहायला अजिबात फिरकलो नाही दिल्लीला. पैजार बुवा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/13/2015 - 10:03 नवीन
म्हणून असे धागे पण इथेच निघतात =))
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 02/13/2015 - 10:28 नवीन
या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही.
बाबारे नितिन, अनेक बाबतीत गोरे लोक आपल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे सत्य आहे.त्यांच्यातला कुणी मुंबई, दिल्लीत येऊ देत, 'ही' भाउगर्दी गोळा होईल. आपले क्रिकेट फॅन्स ताबडतोब आपले मोबाईल्स काढून हळूच फोटो काढतील...,सह्या घेतील..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/13/2015 - 18:51 नवीन
याबाबतीत तुमच्या 'ह्यां'चं मत काय आहे? पूर्वी भारतात पंचम जॉर्ज आला होता तेव्हा तुमच्या 'ह्यां'नी त्याची सही घेतली होती म्हणे. आणि त्याची जी मिरवणूक निघाली त्यात तुमचे 'हे' लेझीम आणि दांडपट्टा असे मर्दानी खेळ खेळत होते असा तत्कालीन ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे म्हणे. :YAHOO:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
नाखु Fri, 02/13/2015 - 12:30 नवीन
आत्ताची संघ परवड पाह्ता "या दोघांकडे एकाही नागरिकाने + वळूने ही पाहिले नाही म्हणून शिव्या शाप यातून वाचले. *stop* वळू - क्रिकेट अतिरेकाचा चळवळू *fool*
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 02/13/2015 - 13:19 नवीन
ज्यादिवशी हि परिस्थिती भारतात येईल तोच खरा सुदिन.. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. वेड लागलेय देशाला याचे. इंग्रज गेले.. पण जाताना भारताची कधीच प्रगती होणार नाही आश्या प्रथा येथेच ठेवून गेले. आणि क्रिकेट चा नंबर त्यात पहिला आहे. ऑस्ट्रेलिया मधील त्या प्रसंगाबद्दल बोलायचे झाले तर ... तिथे क्रिकेट ला इतक डोक्यावर नाही घेतलेलं. तिथे इतर खेळांना पण समान संधी.. किंबहुना ज्यादा महत्व दिले जाते. म्हणून तर ते ओलम्पिक सारख्या जगतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये वरच्या स्थानावर असतात आणि आपण तिथे वासालापण नसतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 02/16/2015 - 07:52 नवीन
सहमत. काल तर टीव्हीच्या जवळ जवळ सर्व न्युज चॅनेल्स वर फक्त क्रिकेटच गळत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
ज
जेपी Fri, 02/13/2015 - 13:56 नवीन
क्रिकेट... 11 येडे मैदानावर असतात. बाकी 111 कोटी येड्यासारखे पहात राहतात.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/13/2015 - 14:10 नवीन
इकडे भारतात क्रिकेटपटूंना "प्रति-परमेश्वर" असल्यासारखी वागणूक मिळत असतांना ऑस्ट्रेलियातील ही परिस्थिती किती वेगळी आहे !!
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Fri, 02/13/2015 - 14:12 नवीन
हे काय है? तुमि आश्ट्रेलियात असल्याची झैरात हाय काय?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 02/13/2015 - 14:18 नवीन
रामपुर्या, अरे तू ही जा की. तरूण पिढीने जग पाहून अनुभव घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
ख
खटपट्या Fri, 02/13/2015 - 18:38 नवीन
माईसाहेब, तुम्ही कुठे असता ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/13/2015 - 18:42 नवीन
अहो त्या "जा" म्हणाल्यायत... "ये" नाही ;) +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 02/16/2015 - 08:15 नवीन
मी कशाला जातोय माईंकडे, उगा आपलं इचारलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
वगिश Fri, 02/13/2015 - 14:18 नवीन
व्यक्तिपुजा हा भारतीयांचा स्वभाव आहे. क्रिकेट कसे त्याला अपवाद असेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/13/2015 - 14:59 नवीन
भारतात क्रिकेटर्स तर इतर अनेक देशांत सॉकर/फुटबॉलपटू !!! चालायचंच !
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 02/13/2015 - 18:47 नवीन
घ्या मिटींग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा