पाककृती

प्रेमदिन स्पेशल - व्हेरी बेरी चॉकलेट कप्स

Primary tabs

प्रेमदिनानिमित्त चला एक सोपी डिझर्ट पाककृती करुया :)

.

साहित्यः

कुकिंग चॉकलेट (आवडीनुसार प्रमाण घ्यावे)
फ्रेश क्रीम (आवडीनुसार प्रमाण घ्यावे)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
Confetti सजावटीकरता
ब्ल्युबेरीज (आवडीनुसार प्रमाण घ्यावे किंवा आवडीनुसार कुठल्याही बेरीज घेऊ शकता)

.

पाककृती:

चॉकलेटला थोडे बारीक चॉप करुन घ्या.
मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये तुकडे केलेले चॉकलेट घालून मिडियम पॉवर वर २०-३० सेकंद गरम करुन घ्या (हलके गरम झाले असताना बाहेर काढून मिक्स करा म्हणजे ते वितळायला लागेल).
गरज वाटल्यास आणखीन १० सेकंद गरम करुन घ्या.
चॉकलेट २ मिनिटे गार होऊ द्या म्हणजे ते चांगले पसरेल.
आता २ चमचे वितळलेले चॉकलेट सिलिकॉन मफिन कपमध्ये घालून कप सगळीकढून फिरवून घ्या,म्हणजे चॉकलेट सारखे लागेल.
असे सगळे कप्स तयार करुन घ्यावे व फ्रिजमध्ये ३० मिनिटे सेट होण्यासाठी ठेवावे.

.

एका भांड्यात बर्फाचे पाणी घ्यावे व त्यावर मिक्सींग बाऊल ठेवावा.
त्यात गार असलेले फ्रेश क्रीम ओतावे व बीटरने २-३ मिनिटे फेटावे. (असे केल्याने क्रीम लवकर फेटले जाते)
आता त्यात चवीपूरती साखर व १ टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालावे.
पुन्हा २-३ मिनिटे क्रीम सॉफ्ट पिक्स तयार होईपर्यंत फेटावे.

सेट झालेले चॉकलेट कप्स हलक्या हाताने सोडवून घ्यावे.
व्हिप्ड क्रीम एका पायपींग बॅगमध्ये घालून घ्यावे व चॉकलेट कप्समध्ये पाईप करावे.
त्यावर ब्ल्युबेरीज लावून Confetti ने सजावट करावी.
वरून थोडी पिठीसाखर भरभूरून घ्यावी.

.

हे डिझर्ट गारच सर्व्ह करावे.
लगेच सर्व्ह करणार नसलात तर बेरी चॉकलेट कप्स तयार करून फ्रिजमध्ये ठेवावे.

.

सगळ्यांना व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा !!

काय झक्कास सादरीकरण. सुंदरच. ही बर्फाच्या पाण्याची टीप नवीनच कळली. पुढच्या वेळी तसेच करण्यात येइल.

रेवती

मस्त दिसतीये पाकृ! सोपीही आहे. अनेक नवर्‍यांना ही संधी चालून आलीये, (आपापल्या) बायकोला खूष करण्याची! ;)

अजया

अहाहा!सुंदर.हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सानिकास्वप्निल!!

सानिकाताय्ना ,आधी १ कडकडित श्याल्युट ठोकुन शलाम करून,
.
.
.
.
.
.
.
आम्ही शेवटच्या फ़ोटुत उडी टाकायला जात हाओत!

ऑनलाईन शॉपी काढाच. मिपाकरांना सवलत द्या.
अहो, हातात कला आहे, तर फायदा घ्याच.

सेंट व्हेलेंटाईन डेची परंपरा राखणार्‍या तमाम मित्र मैत्रिणींना
माझ्याकडून मनभरुन शुभेच्छा आणि हीच बेरी चॉकलेट्स. :)

-दिलीप बिरुटे

आदूबाळ

खरेक्ट.

त्यात अजून एक सर्विस ऐडवा - "तुमच्या घरच्या (कशाही दिसणाऱ्या) पदार्थांचे चिकने फोटो काढून मिळतील.

जब्री पाकृ. केल्या जाईल.

आरोही

मस्त मस्त !!नक्की करण्यात येईल !!मागच्या वर्षीच्या प्रेम दिनानिमित्त दिलेल्या केक च्या recipe नुसार आज तो केक हि केलाय ,आणि खूप प्रशंसा मिळवलिये बर का !!

Mrunalini

सुपर awesome पाकृ.. Loved it. Happy valentines day. :)

hitesh

छान

साती

एकदम प्रोफेशनल दिसतायत.
हॅटस ऑफ!

michmadhura

अप्रतिम!. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सानिका.

स्वाती२

शेवटचा फोटो फार सुरेख! एकदम प्रोफेशनल झालेत कप्स!

स्पंदना

सुरवात काय म्हणे " सोपी पाक्कृती" ऑ? हे सोप्प्प्प्पी पाककृती?

असेल बाई तुझ्यासाठी. माझे तर डोळेच पांढरे झालेत.

+११११
सोप्पी????

काय ते जीवघेणे फोटो.. चुकुन नवर्‍याला दाखवलं तर.. जौ दे...

तू का नाही मास्टरशेफ मधे भाग घेत ग सानिका? आम्ही करु ना वोटींग वगैरे!!!