Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मले माईतच नाई...

ऊ — ऊध्दव गावंडे, Sat, 02/14/2015 - 08:04
असं कसं होते मालं मले कयतच नाई तसं झालं तरी काई मले माईतच नाई नेतो नाल्या वरं ढोरं मी पानी दाखोयाले धुनं धूते तथी कशी मले माईतच नाई डाबडुबली खेयाले म्हून आंब्या खाली जातो तिची रखवाली तथी मले माईतच नाई गुळं फोळला दुपारी ढोरं हकल्याले जातो ढोरं हायेतं तिचेचं मले माईतच नाई संद्याकाई ईरीवरं पानी भर्यासाठी जातो नस्ते तिच्या जोळं दोरं मले माईतचं नाई यकं दिसं बुडा म्हने तुयं लगन जुळलं माई नौंरी केलं तिले मले माईतचं नाई तसं झालं काई तरी मले माईतचं नाई शब्दार्थः नालाः नदी पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ रखवालीः watch गुळः वैरणा चा ढीग इरः विहीर दोरः roap नौरीः नवरी

प्रतिक्रिया द्या
3142 वाचन

💬 प्रतिसाद (19)
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/14/2015 - 08:43 नवीन
हाव!!! आपल्या गावा च्या इकळे अश्शेच लगन होते!!! ४ मैने पैले मले बी बुड्या न अशीच आणून देलती हो!!!
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 02/14/2015 - 09:02 नवीन
लग्नकथा आवडली :-) 'फोळला' म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/14/2015 - 09:16 नवीन
"गुळ फ़ोळला" म्हणजे वैरणी चा मोठा ढिग उपसुन एक लहान पेंडी चारा वैरण (कड़बा उर्फ़ ज्वारी मक्याची ताट वगैरे) जनावरा पुढल्या गव्हाणित टाकणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/14/2015 - 09:16 नवीन
फ़ोळला = फोडला
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/14/2015 - 17:31 नवीन
कविता आवडली. बाकी
दोरः roap
हे
दोरः rope
असे हवे होते. दोर या शब्दाचा अर्थ लिहिला नसता तरी चालले असते.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 02/14/2015 - 18:23 नवीन
कविता आवडली.. पण त्या पेक्षाही ही भाषा मला जास्त आवडली. लोकभाषेतील शब्द शुद्ध नसतील पण त्यांच्यातील गोडवा अवीट असतो .. मला तर प्रत्येकाची आपली लोकभाषा गावाकडं राहणारी आपली आई वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/14/2015 - 23:45 नवीन
+++१११ गणेशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
आ
आदूबाळ Sat, 02/14/2015 - 20:59 नवीन
मस्त भाषा! बुडा म्हणजे वडील का?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/14/2015 - 23:22 नवीन
महाराष्ट्रातील इतर भागांतील ग्रामीण शैलीत आईवडिलांना म्हातारी-म्हातारा म्हणण्याची पद्धत आहे तशीच वर्‍हाडीमध्ये बुढी, बुढा असे म्हणण्याची पद्धत आहे. शाळा कॉलेजमध्ये असे संवाद कानावर पडू शकतात. अबे... काय सांगू तुले, काल कलास बुडवून थेट पिच्चर पाहयले गेलो अन नेमकं बुढ्याले मालूम पडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मधुरा देशपांडे Sun, 02/15/2015 - 00:46 नवीन
आवडली. तुमच्या कवितांमुळे ही अस्सल बोली भाषा वाचायला मिळते आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 02/15/2015 - 11:35 नवीन
भाषा फारच छान
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Wed, 02/18/2015 - 14:59 नवीन
मित्रांनो... धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 02/18/2015 - 18:29 नवीन
कविता छानच.. तरीही एक उगी अवांतर शंका : हे उ.गा. त्या स.गा. चे कोणी आहेत काय ?
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे गुरुवार, 02/19/2015 - 13:06 नवीन
धन्यवाद ! सगा चा कोणीही नाही मी ऊगा च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
प
पदकि Wed, 02/18/2015 - 19:00 नवीन
उत्कृष्ट , अस्सल कविता! मानतो!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे गुरुवार, 02/19/2015 - 13:07 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पदकि
प
पद्मश्री चित्रे गुरुवार, 02/19/2015 - 13:10 नवीन
काय सुंदर भाषा आहे ही!
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे गुरुवार, 02/19/2015 - 17:21 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
प
पैसा Sun, 03/01/2015 - 18:17 नवीन
आवडली! सोन्याबापू, तुमच्या बोलीत लग्नाची कहाणी फर्मास लिवा बघू! वाट बघते!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा