Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?

म
माझीही शॅम्पेन
Sun, 02/15/2015 - 18:02
🗣 68 प्रतिसाद
स्त्री वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ? मुलाखत आणि नोकरी वरून कमी करणे हे विषय आणि त्या वरील प्रतिक्रिया वाचून बरेच दिवस मनात रेगन्ळेल्या विषयाला हात घालू पाहतोय. ध्याग्याचा उद्देश एकांगी टीका करण्याचा नाही तर अनेक जुन्या आणि जाण्यात्या मित्रांशी चर्चा करताना हा विषय नेहमी चर्चेत येतो आणि उलट-सुलट वाद होतात , माझे अनुभव सांगतोय ह्या अनुषंगाने तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता. १. पहिला अनुभव - आय टी क्षेत्रात एकदम नवीन होतो , प्रोजेक्ट मध्ये काम केल्या केल्या सोबतच्या सहकार्यांने सावध केले कारण माझ रेपोर्टिंग सलग दोन थरांतील महिला वर्गातील होत्या , सुरुवातील एकदम छान वाटायचं कारण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या नवीन फंडे ऐकायला मिळायचे. काही दिवसांनी लक्षात आल कि त्या दोघांपैकी जी वरिष्ठ महिला होती ती निव्वळ टाईम पास करायची ऑफिस मध्ये बसल्या बसल्या सर्व स्वत:ची खाजगी काम करायची. अगदी दर तासाने फोन स्पीकर वर ठेवून मुलगा आणि नवरा काय करतो चेक करत रहायची हळू हळू लक्षात आले त्यांची पोच वर पर्यंत होती त्यामुळे सर्व जण टरकून असायचे. केवळ ह्याच कारण्यासाठी मी पण मी बरा माझ काम बर अस चालू ठेवलं. एक दिवशी त्यांनी त्यंची टाईम शिट भरण्याच काम माझे मागे लावून दिल (हे अजून एक , आधीच बरीच काम करायचो) . त्यानंतर एक महिन्यांनी फ्लोर मिट होती त्यात त्यांनी सरळ ठोकुन दिल जशी मी टाईम शिट वेळे वर भरते तशी तुम्ही सर्वांनी भरा ... मी आवाक झालो. नंतर काही दिवसांनी ऑन साईट हवी म्हणून सरळ ऑन साईट ला निघून गेलो. नंतर हळू-हळू त्रास कमी झाला. २. दुसरा अनुभव : उत्तरे कडील खास करून बंगाली + महिला हे समीकरण खूप त्रासदायक असते असे ऐकून होतो पण अनुभव नव्हता , एका प्रोजेक्ट साठी कन्सलटनट म्हणून निवड झाली होती. मी माझ काम सुरु करून एक दिवस झाला नव्हता तर अशीच एक सहकारी सरळ इमेल वर ५७ काम दिली , त्यातील बरीचशी माझ्या कार्य-कक्षेच्या बाहेरील होती. वरून दर ४ तासाने फोलो अप. मीटिंग अगोदर फैलावर घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित समजावलं तर दुर्लक्ष्य करण अस चालू होत. नंतर काही सहकार्यांशी चर्चा केली तर ते पण फुल-टू टरकून होते. एकाने तर सरळ सांगितले बाबा तिच्या बरोबर एकटा मीटिंग करून नको. . . तुझ्या अगोदर एक जण होता त्याच्या बद्दल तिने sexual harassment ची तक्रार केली होती आणि HR ने त्याला उचलला होता. नंतर ज्याला काढल होतो त्याच्याशी फोन वरून बोललो त्याने अपेक्षित असेच सांगितले , त्याने वरिष्ठ अधिकार्यांना ह्या अकार्यक्षम सहकारयाची तक्रार केली होती. कुठून तरी हिला कुण -कुण लागली होती. नंतर काही दिवस शांत पणे दिवस-रात्र काम चालू ठेवलं नंतर सरळ कस्टमरने तिच्या बद्दल जोरदार तक्रार केली आणि प्रोजेक्ट बंद केला. ३. तिसरा अनुभव :- महिला सहकारी manage करत असलेल्या जवळच्या प्रोग्राम मध्ये एकाच महिन्यात सहा राजीनामे आले , बर सर्वांनी ही महिला वरिष्ठ नको अस HR ला स्पष्ट पणे सांगितले अधिक खोलात गेल्या वर कळले हा micromanagement चा असह्य त्रास होता. नवल म्हणजे राजीनामा दिलेल्या पैकी दोन मुली होत्या , त्यांना पण विचारले कि खरच अस आहे का ? त्याचं पण तेच म्हणण होत सतत भुणभुण ह्याचा त्यांना कंटाळा आला होता. शेवटी हाता पाया पडून चौघांना थांबवलं , Program Manager बदलला मग पुढे अस काही झाल नाही Disclaimer : असो कदाचित हे सर्व one off (दूर्मिळ) अनुभव असतील , तसे बरेच अनुभव आहेत , बरोबर च्या काही महिलांनी पण हे सांगितलाय कि त्यांना पण महिला वरिष्ठ म्हणून नकोय , दुसर्या बाजूने पुरुष वरिष्ठ असतील तर स्त्री सहकाऱ्यांना भयंकर अनुभव असतील पण अस काही असू शकत हे मांडण्य्साठी हा प्रपंच

प्रतिक्रिया द्या
17862 वाचन

💬 प्रतिसाद (68)
व
वेल्लाभट Tue, 02/17/2015 - 02:52 नवीन
असं सरसकटीकरण योग्य आहे की नाही हा एक मुद्दा. परंतु माझा संबंध आजवर ज्या महिला वरिष्ठाशी आला आहे, तिच्याबद्दल मला अतिशय चांगला अअनुभव आहे.
  • Log in or register to post comments
च
चिकित्सक Tue, 02/17/2015 - 04:52 नवीन
आमची सध्या ची ऑनसाइट कोवोर्डिनेटर कडून त्रास होतो. तिला कुठली क्लाइंट मीटिंग जॉइन करायची असली तर रात्री २-३ वाजता फोन करून कुठले ही अजेंडा न देता मीटिंग जॉइन करायला लावते. आणि अश्या वेळेस क्लाइंट समोर पोपट होतो . एक दोन दा तिला सांगून बघितल तर म्हणते -ही टेक्नालजी माझ्या स्कोप मधे बसत नाही तुलाच काय ते बघाव लागेल. मॅनेजर ला म्हणून पाहिल तर त्याने चक्क सांगितल कि ऑनसाइट ला जाताना तिन हे काम शिकेन म्हणून कमिट केल होत आणि आता तिला ह्या नव्या टेक्नालजी वर काम करणे जमत नाही कारण तो तिचा बॅकग्राउंड नाही आणि तो ह्या वर काही तोडगा काढू शकत नाही वर मला म्हणाला तिला सपोर्ट करायला.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 05:21 नवीन
O_o च्यामारी....आय.टी. भारी फिल्ड आहे की. येतं नसलेली गोष्ट शिकीन म्हणलं की डायरेक्ट ऑनसाईट. सालं आमच्या इकडे येतं असलेल्या गोष्टीत चांगलं असल्याशिवाय जॉबपण नै मिळत...ऑफशोअर मधली गोष्टचं सोडा... :( (ई.सी.यु. प्रोग्रॅमिंगची माहिती नसल्यानी एका मोठ्ठ्या ऑटोमोबाईल कंपनी मधे संधी नं मिळालेला) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/17/2015 - 07:01 नवीन
लय गमती जमती अस्त्यात .. काय काय लोकस जातात धकून ...काय काय फसतात नैतर कुणाची तरी वाट लावतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
संदीप डांगे Tue, 02/17/2015 - 07:30 नवीन
कुणाची तरी वाट लावतात >>> कुणाशी तरी पाट लावतात... असे वाचले... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/17/2015 - 08:15 नवीन
ते सुद्धा होतेच कि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
असंका Tue, 02/17/2015 - 07:29 नवीन
'ऑनसाइट कोऑर्डीनेटर' ही आपली वरीष्ठ अधिकारी असते का? ती महिला असल्यामुळे प्रस्तुत प्रश्न उद्भवला आहे, असे आपले वस्तुस्थितीनिदर्शक मत आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/17/2015 - 08:15 नवीन
पण कष्टम्बर च्या ऑफिसात बसलेली व्यक्ती असल्यामुळे तिचा शब्द बहुतांश वेळा कस्टमरचाच शब्द धरला जातो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
क
काळा पहाड Tue, 02/17/2015 - 11:05 नवीन
बाकी ऑनसाईट वर बसलेली व्यक्ती (किंवा ऑफशोअर ला बसलेली व्यक्ती) एकमेकांना ते जर त्यांच्या विषयात स्वतः ज्ञानी असतील तर नक्की अडचणीत आणू शकतात. फक्त त्यासाठी एका वेगळ्या पातळीवरून बोलण्याची कला अवगत हवी. ओसी नं जर जेटूईई आणि स्ट्रट्स वापरायची सूचना क्लायंटला केली असेल तर प्रोजेक्ट मध्यावर आला असताना "बीहाईव्ह वापरली असती तर रिसोर्स युटीलाय्झेशन कमी होवून प्रोजेक्ट वरचा खर्च कमी झाला असता" असं क्लायंट मीटींग मध्ये बोलावं. अर्थातच हे पत्रामध्ये टाकू नये. नाहीतर तुमच्या कंपनीला तुमच्या विरुद्ध प्रूफ मिळेल. बीहाईव्ह काय आहे अर्थातच बोलू नये. शोधू दे तिला. कायम आपण टेक्निकल एक्स्पर्ट बरोबर बोलत आहोत अशा रितिनं बोलावं. खास डोमेन आणि टेक्निकल शब्द वापरा जे फक्त त्यातल्या एक्स्पर्ट लाच माहिती असतील. जर त्याचं स्पष्टीकरण विचारलं तर ते सुद्धा अशाच वाक्य रचनेनं द्या जे नवीन असेच शब्द वापरेल. बाकी तिला अडचणीत कसं आणायचं हे शिकायचं असेल तर आमची शिकवणी लावा. ५९९ डॉलर फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/17/2015 - 15:28 नवीन
*YES* असे अजून काही नुस्खे आहेत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
च
चिकित्सक Tue, 02/17/2015 - 05:34 नवीन
ती टेक्नालजी त्यावेळेस नवीन होती सहजा सहजी त्यावर काम करणारे लोक मिळत नव्हते . ऑनसाइट ला ही दुसर्या प्रॉजेक्ट वर जाणार होती पण तो प्रोजेक्टच गेला. हिन रडा-रड केली हिला चान्स देण्यात आल , सुरवातीचे थोडे दिवस हिला काम नव्हत, पण टीम मधे नवे लोक आले आणि हिन ऑफशोर कडून काम करवून घेण सुरू केल. बाई साहेबानची आता वर्ष भर तरी येण्या ची चिन्ह दिसत नाहीत असोत , आमचा स्लॉट वाया गेला ह्याच वाईट वाटत.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 02/17/2015 - 07:31 नवीन
आपल्याला इंग्रजी फारच आवडतं नै? आपल्यासाठी एक खास इंग्रजी म्हण : क्राइंग बेबी गेट्स द मिल्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिकित्सक
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 11:32 नवीन
क्राइंग बेबी गेट्स द मिल्क.
ह्या ह्या ह्या .. म्हणून हे पण इथं रडायलाच येतात असं वाटतं. कायम कोणीतरी यांच्यावर नायतर यांच्या मित्रमंडळींवर गेम केलेली असते. यांच्या भोवतीची नालायक माणसे मॅनेजर आणि ऑनसाईट कोऑर्डिनेटर होऊन बसलेली असतात आणि चांगली माणसे फायर होत असतात. एखादा परदेशी भारतात काम करायला यायचा विचार करत असेल आणि यांचे प्रतिसाद वाचेल तर पळूनच जाईल. (बादवे एक अवांतर : याचा अर्थ भारत हा नालायक लोकांनी भरला असून त्यांनाच बढत्या (म्हणजे प्रमोशन हो) बक्षीसे मिळतात आणि प्रामाणिक पणे काम करणार्‍यांना बाबाजींचा ठुल्लू मिळतो असे काही आहे काय ? मग अशाने नालायक आणि कामचुकार बनू इच्छिणार्‍यांचीच वाढ होणार नाही काय? हेच सगळीकडे लागू होते काय ? भारतातल्या कंपन्या आणि तिथल्या कामकाजाच्या सद्यस्थितीबद्दल काहीही कल्पना नसल्याने खरोखर हे प्रश्न विचारतोय. जमल्यास कोणीही उत्तरे द्यावीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
अत्रन्गि पाउस Tue, 02/17/2015 - 15:31 नवीन
एखादा वेगळाच धागा काढा त्यापेक्षा ..अतिशय गंभीर विषय ...आणि लैच लोकांच्या जिव्हाळ्याचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/17/2015 - 07:25 नवीन
महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ? हापिस सुध्दा घर असल्यासारख वाटत. (घरी आणि हापिसात कनिष्ठ पदावर काम करणारा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/17/2015 - 07:32 नवीन
वरिष्ठ पदप्राप्तीसाठी शुभेच्छा +))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/17/2015 - 08:29 नवीन
ते या जन्मी तरी शक्य नाही. पुढचा जन्म बाईचा दे रे देवा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
श
शलभ Tue, 02/17/2015 - 07:51 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा