Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आत्म"मुक्ति!

अ — अत्रुप्त आत्मा, Mon, 02/16/2015 - 17:30
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी??? प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा? मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा. मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे? पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे??? तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू. शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू! सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का? जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का? मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको.. निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको. अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता? तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता. मी म्हणालो याच वेळी तू मला मारू नको. मृत्यू म्हणतो , अरे चोरा तू मला तारू नको. जनन मरणी तूच आत्मा मुक्तं तू ही हो खरा. जगी माझे कार्यं करण्या जगू दे मजला जरा. मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! मूळं रूपी मुळं प्रवाही मुक्त मी ही जाहलो. अजुनी पुढचा जन्मं येण्या, अत्रुप्त आता राहिलो. ====================================

प्रतिक्रिया द्या
9697 वाचन

💬 प्रतिसाद (30)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/16/2015 - 17:30 नवीन
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस अत्रुप्तांची कविता =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/16/2015 - 17:40 नवीन
मी पहिला. आता वाचतो आत्मालेस अत्रुप्तांची कविता
=)) अरे...काय रे हे! __/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 03:31 नवीन
आयडीच्या बारश्यानिमित्त साभार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 02/16/2015 - 17:53 नवीन
क्लिष्ट!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 02/16/2015 - 18:11 नवीन
अत्यंत सहज सुंदर असे काव्य. आत्म"मुक्ति ची संकल्पना अतिशय सुरेखरित्या समजावून सांगितली आहे. कविता वाचून ह्या श्लोकाची आठवण आली. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समाहित:। शीतोष्णसुखदु:खेषु तथा मानापमानयो:।। खरोखरच आत्ममुक्ती म्हणजे आत्म्यावर एक प्रकारचा विजयच होय.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 02/16/2015 - 18:14 नवीन
चांगली आहे पण थोड़ी अवघड वाटली
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/16/2015 - 19:13 नवीन
छान कविता.. वर्याचदा आपण असेच प्रोफाईल नेम घेत असतो आणि नंतर त्या अनुषंगाने विचार ही करु लागतो. ही कविता अशीच झालेली आहे. आणि प्रोफाईल नावामुळे त्या निमत्ताने आत्म्याशी संवाद ही करुन आला तुम्ही
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/16/2015 - 19:40 नवीन
हही हही! :) असेच काहीसे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
प
पदकि Mon, 02/16/2015 - 23:30 नवीन
मस्तच मी हि त्यावरं दया केली सोडुनी गेलो दुरी. आत्म्याला मुक्त केले अतृप्तता धरुनी उरी! : या ओळी वृत्तात नीट बसवायला हव्या!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/17/2015 - 00:16 नवीन
परवा आत्मा राहिला होता, आता अतृप्त!! कम्मालाय!! बाकी कवितेबद्दल काय बोलावं. खिदळता खिदऴ्ता गंभीर होत जाते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/17/2015 - 02:20 नवीन
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/17/2015 - 02:53 नवीन
दूष्ष्ष्ष्ट! :-\
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सतिश गावडे Tue, 02/17/2015 - 04:10 नवीन
"दु दु कंजुस काका" असे हवे ना ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 05:49 नवीन
ते "दू...दू" आत्मा बोलत असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 11:57 नवीन
आत्मा यांना सोडून गेला अन हे गावभर कवितांचे फ्लेक्स वाटत सुटलेत मी आत्म्याला सोडलं. धूर आणि अत्तरांचा त्याला कंटाळा आला की काय?
अग्गाग्गा .. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अजया Tue, 02/17/2015 - 05:49 नवीन
अात्मालेस अत्रुप्त अजून सवयीचे नाही वाटत वाचायला!कविता छानच.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/17/2015 - 05:53 नवीन
सहमतं. म्हणुन तर ते नावं पाडलयं त्यांना =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ख
खटपट्या Tue, 02/17/2015 - 05:54 नवीन
आता अत्रुप्त चे त्रुप्त कधी होतायत ते बघू !! :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 06:05 नवीन
ते तृप्तीच्या प्राप्तीची प्रतिक्षा केव्हाची कर्तायत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कंजूस Tue, 02/17/2015 - 06:14 नवीन
आहे ती प्रतिक्षा वळणावर उभी। वाट पाहत आपल्या माणसाची॥
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/17/2015 - 08:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सस्नेह Tue, 02/17/2015 - 08:02 नवीन
आमचा सल्ला .. अतृप्ततेच्या संगतीने जगण्यास आहे माधुरी आत्म्याविना मरणाचीही आहे थरारी अधुरी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 02/17/2015 - 08:35 नवीन
अता ही माधुरी कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ट
टवाळ कार्टा Tue, 02/17/2015 - 08:45 नवीन
अता??? तुम्च्यात पण आत्मा घुस्ला??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/17/2015 - 08:58 नवीन
@अता ही माधुरी कोण? >>> आंsss :-\ हलकट हत्ती! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/17/2015 - 08:20 नवीन
समजायला थोडा वेळ लागला. तरीही आवडली. पैजारबुवा
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 11:55 नवीन
मस्त हो बुवा.. सोडलं म्हणून सुटत असतं आणि मुक्त केलं म्हणून मुक्ति मिळत असती तर काय. असो, प्रयत्न चालू द्या.. :) (अवांतर : त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ? अत्रुप्त की आत्मा ??)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 02/17/2015 - 12:02 नवीन
त्ये तांब्याधिपती मठाचे काम कोन बगनार मंग अता ?
त्यांचे शिष्य आहेत की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 13:26 नवीन
ह्म्म्म.. तुमाला अ‍ॅडमिशन मिळालेले दिंसतेंय हो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
न
नाखु Tue, 02/17/2015 - 13:03 नवीन
इतक्यात तुम्ही कुणाला म्हटलात काय? अता तशीही माझी सटकली ठळक शब्दांवर नजर ठेवा "आत्मज्ञान" होईल. बुवा पंखा संघ पिं.चि.शहर शाखा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा