लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स
"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का... असा विचार करून आई-वडिलांनी 12वी नंतर पैथोलॉजीचा कोर्स करायला लाउन मग लग्न उरकुन टाकले होते. लग्नानंतर जसा इतरांचा सर्व साधारण संसार होतो तसा तिचाही चालला होता. सासु अधुन मधून टॉन्ट्स मारायची. नवरा-बायको दोघे कामावरून दमुन आलेले असायचे... मग एखाद्या विषयावारुन दोघांची जुंपायची. मग सगळी पुढची-मागची उणी दूणी काढली जायची.... आणि मग त्या वीकएंडला आमच दोघींच भेटण ठरलेल; आणि तिच स्वतः च्या आयुश्याबद्दल रडणं आणि मी कशी सुखी आहे याच कौतुक क़रण ठरलेल.
माझी गोष्ट थोड़ी वेगळी होती. म्हणजे मीच ती ठरवून वेगळी घडवली होती. मी काही अभ्यासात हुशार नव्हते. पण खूप बड़बड़ी होते. प्रचंड मोठा मित्र परिवार. सर्वसाधारणपणे जसे अनेक जण फ़ार करिअरचा विचार न करता ग्रेजुएट होतात तशी मी देखिल झाले होते. पण अजुन नोकरिच जमत नव्हतं. मला इटक्यात लग्न नव्हतं करायच. बाबा माझ्या बाजूनि होत... म्हणून ठिक होत. एकदा बाबांचे एक मित्र घरी आले होते. म्हणाले तू इतकी बोल्ड आहेस, स्मार्ट आहेस मग मिडीयामधे ट्राय कर न. उद्या या पत्यावर जा. माझा मित्रच आहे. मी बोलून ठेवतो. मी दुस-या दिवशी गेले... आणि माझ नशिब अस जोरदार की मला त्या चॅनेलमधे चांगला चान्स मिळाला. आणि मग मी कधीच मागे वळून बघितल नाही. मला लग्नाबद्धल फ़ार उत्सुकता नव्हती. आणि मग करियर करताना राहून गेल. आई मागे लागली काही वर्ष आणि मग तिनेही नाद सोडला. आता मी मस्त कमवून आणि माझा स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होते. एक मित्र होता... आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. तसे एकत्र होतोही आणि नव्हतोही आम्ही. पण अलीकडे मात्र आमचे खटके उडायला लागले होते. मी कधी कुठे जाते... काय करते ते तो सतत मला विचारायचा. आणि जर मी विचारल तर तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. समोर असला तरच माझा... अस वागायचा. मला हे अस राहाण खटकत होत....आवडत नव्हतं. मी सुरुचिला हे माझ्या मनातल अलीकडे एक-दोनदा बोलले देखिल होते.
एकदा सुरुचि आणि मी असच एका मॉलमधे बसून गप्पा मारत होतो. अचानक मला सविता दिसली. आमची तिसरी पार्टनर. मला आश्चर्य वाटल. तिला मी हाक मारली. "सविता... अग... तू इथे?" तिने आम्हाला बघितल आणि कड़कडून मिठी मारली. "अग मी इथेच असते आता. कधीच परत आले U. S. हुन. अग मी डिवोर्स घेतला." तिने सहज एखादी सामान्य घटना सांगावी तस सांगितल. आम्ही दोघी अवाक् झालो. कारण तिच्या आवडीच शिक्षण तिने घेतल होत.सविता स्वतः C. A. होती. लग्न सुद्धा प्रेम करून मग केल होत. आणि आज ती घटस्फोट घेऊन परत इथे आली होती. "नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल. सारखी भांडण... वाद... शेवटी आम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला. म्यूच्यूअली झाला. त्यामुळे त्रास नाही झाला. And now here I am back ti u both beautiful girls." अस म्हणून सविता हसली.
💬 प्रतिसाद
(91)
स
सूड
Mon, 02/23/2015 - 10:13
नवीन
त्या अशाच बोलल्या असतील, कोणाला उद्देशून नव्हे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 02/23/2015 - 13:34
नवीन
बहुधा "चांगल्या दिसणार्या मेव्हण्या असलेल्या ठिकाणी लग्न करा " असा बोध असेल
- Log in or register to post comments
म
मनीषा
Mon, 02/23/2015 - 13:23
नवीन
तरिहि आयुष्यात एकदा का होइना लिव्ह इन रिलेशन चा अनुभव घ्यावा. ( ते हि लग्नच्या आधि आणि ते हि हिंमत असेल तरच ) त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो त्याचि तुम्हि आयुष्यात कोण्त्याहि नात्याबरोबर तुलना करु शकनर नाहि.
क्या बात है ! हे अस्सं पाहिजे .
मग तीन नंतर तुम्ही लग्नं केले की चौथ्याच्या प्रतिक्षेत ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 02/20/2015 - 15:18
नवीन
शादी का लड्डू, खाए वो पछताए, ना खाए वो भी पछताए.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Fri, 02/20/2015 - 19:48
नवीन
खोळंबा होतोय हे मीही मान्य करतो . पण येथे वैयक्तीक सोय गैरसोय बघून चालणार नाही .
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Wed, 10/26/2016 - 20:10
नवीन
तंबाखू वाल्या मलूष्ट्याचा काय रे तो ?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 02/22/2015 - 04:25
नवीन
"लिव इन रिलेशन करून मग पटलं तर लग्न करायचं" अशी काही कल्पना काही लोकांनी करून त्यावर चर्चा घडत असेल तर वेळ वाया घालवत आहेत असं मला वाटतं. इकडे मोठ्या शहरांत नोकरीनिमित्ताने आलेले तरुण खोलीत एकत्र राहतात तसे परदेशात मुलं मुली राहतात. त्यांचा लग्न करायचा हेतू असतोच असं नाही अथवा आपले स्वभाव जमले तरच नंतर लग्न करू असंही नसावे ते कोणत्या कारणाने एकत्र राहतात हे कसं कळणार?
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 02/22/2015 - 10:34
नवीन
कंजूस काका स्वतः पाहिलेले आहे म्हणुन सांगते.
अतिशय चांगले आणि एकमेकाला जपून रहातात भारतातली पोर आणि पोरी सुद्धा. स्वयंपाक बनवताना भात लावणे डाळ लावने, कांदा कापणे ही कामे मुलांची, फोडण्या टाकणे आणि पोळ्या लाटने मुली. प्रत्येकजण आपापली प्लेट घेउन धुवुन तर ठेवतओच, पण साफसफाईसुद्धा वयवस्थीत करतात. मुलींना बेडरुम झोपायला देउन मुले हॉल मध्ये रहातात. रोज एकाने असे वॉशींग मशीन वापरतात. आणी एकमेकाबद्द्ला भरपूर आदर सुद्धा ठेवतात. मी पाहिलेल्या मुली त्या मुलांवर आरामात विशवास ठेवुन होत्या. ऑफीसला सगळ्यांनाच पळायचे असते. त्यानुसार तयार होणे आणि होउ देणे, अडीअडचणीला मदत करणे. निदान मी जे पाहिल तेव्हढ्याने मला भारतिअय मुल चांगली असतील तर चांगलीच रहातात हे कळल.
वाईट म्हणाल तर माझ्या नवर्याबरोअबर एक सरदारजी होता तो जरा ऑफीसातल्या पोरी आणणार आहे रुमवर जरा वेळाने या वगैरे म्हणायचा. (ही नेदरलँडस्ची गोष्ट) बाकी सिंगापुरात नुसत्या प्रोजेकट साठी आणलेली आणी एकाच फ्लॅट मध्ये कोंबलेली ही मुलं मुली अगदी व्यवस्थीत राह्यलेली पाह्यली आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 10:24
नवीन
पोरी अन सरदारजी यांचा राजीखुशीचा मामला असेल तर यात वाईट नक्की काय आहे ते कळालं नाही. असो.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 10:56
नवीन
असे नस्ते विचारायचे...आप्ली महान भारतीय संस्कृती वगैरे वगैरे आठव बरे आणि भले राजीखुशीचा मामला असो...भारतीय म्हैलांच्या मते ते एका अबलेचे शोषण"च" अस्ते
पुर्षांचे सुख जर्रा म्हणून बघ्वत नै या म्हैलांना
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/23/2015 - 10:59
नवीन
म्हणजे नक्की कोणती? वि का राजवाड्यांनी पुस्तकांत मांडलेली, मंदिरांवर चितारलेली की ब्रिटीश राजवट आल्यानंतर सोवळ्यात नेऊन ठेवलेली?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 11:06
नवीन
भारतीय संस्कृती म्हणजे संस्कृतीच्या नावाखाली गाळ खपवणार्यांच्या मनात असते ती. भारतीय संस्कृती म्हणजे डेली सोप वगैरेंमध्ये दिसते ती.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 11:08
नवीन
तुला हवी ती घे :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 11:07
नवीन
ते बरीक खरंच म्हणा.
बाकी अधोरेखित भागाच्या अंशतः अर्थनिर्णयनाबद्दल काही अतिरोचक शक्यता मनात येऊन डोळे पाणावले.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 11:10
नवीन
अधोरेखित भागाच्या अंशतः अर्थनिर्णयनाबद्दल काही अतिरोचक शक्यता >> व्यनीतून सांग बरे कसें :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 11:11
नवीन
जल्ला सम्ज्ला मला =))
पण तिकडे असे कर्णे म्हणजे लंगरमध्ये पैसे देउन जेव्णे ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 11:17
नवीन
=))
त्यामुळे "**क शोषणाबद्दल तक्रार" वगैरेबद्दल अंमळ कन्फूजनच व्हायचं अगोदर, पुढे मग कळालं काय ते. =))
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/23/2015 - 11:18
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Mon, 02/23/2015 - 12:23
नवीन
बट्टमणास लगाम (कसला ते समजून घेणे) लावण्याची तीव्रतेने गरज आहे असे नमूद करतो..
सुटला म्हणजे काय बिरेकच नाय अजाबात.. :))))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 13:30
नवीन
काय राव, सुटल्यावर थांबावे म्हटले तर तुम्हीच लोकं रस्त्यावर तेल ओतू र्हायला. कस्सा राव थांबू??????????
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 02/23/2015 - 11:23
नवीन
कंजूस काकांच्या पोर पोरी एकत्र रहातेत या प्रतिसादाला दिलेला उपप्रतिसाद होता तो.
अन सरदारजीला पोरी पटत होत्या, अन माझ्या नवर्याला नव्हत्या पटत याचा निव्वळ राग हो तो. त्यात अबलेचे शोषण वगैरे काऽऽऽही नाही बघा!! निव्वळ जेलसी बघा की वो सरदारजीमे क्या है जो मेरे नवरे मे नही है॥।
*crazy*
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 11:27
नवीन
अच्चं जालं तल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 11:34
नवीन
तुम्हारे नव्रे के पास तुम हय
येईच भोत ज्यादा हय =))
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/23/2015 - 12:14
नवीन
हा प्रतिसाद वाचून आमच्या स्पाला इतकी प्रगत विचारांची आंतरजालीय सासू मिळालेली पाहून जीव भांड्यात पडला. पोरगं घाटावर पाठवायचं कसं हा प्रश्न पडला होता, हा प्रतिसाद वाचून मी डोळे मिटले तरी चालेल असं वाटतंय!!
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Mon, 02/23/2015 - 12:30
नवीन
हापिसात डोळे मिटूनच असतोस म्हणे बहुतेक वेळ.. ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 12:35
नवीन
ते कोणाचा सूड कधी, कसा, कितीवेळ घ्यायचा याचे चिंतन-मनन करत अस्तील :)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Mon, 02/23/2015 - 12:39
नवीन
म्या घरजावाय करुन घिन आस कदी म्हनलो?
काय आटवत न्हाय गा!!
म्या आपली मनात सोडे, करंदी तोडतेय. पोरगी दीन, आन निवांत सा सा म्हयने मास्ळी, काजू खाईन.
शेवटी चिक्काट कोकणी ती कोकणीच. माझ्याच गळ्यात बांधुन रिकामी, ल्येक ती ल्येक, वर आणि येक!१
न्हाय बा. काय जमल आस वाटत न्हाय बा.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/23/2015 - 12:57
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 02/23/2015 - 16:19
नवीन
ह्या निर्णयावर आता ठाम राह्यचं, नो चीटींग !! *mosking*
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/24/2015 - 03:26
नवीन
आस कस? आस कस?
कोकण्यांनीच कोकण्यांच्यी सासवा पळवुन लावल्या तर कस व्हायच?
तशीही मी हटले की पैजारबुवा धामणी घेउन तयार आहेतच. त्या बांधायच्या का गळ्यात?
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 02/24/2015 - 15:21
नवीन
पैजारबुवा, ते दोन पर्वचनाच्या क्याशेटी लावून दिल्या तं गप बसत्याल. पर कोल्लापूरी सासू? नगं!! तिची क्याशेट कोन आयकायचं आनी!! ;)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 02/23/2015 - 14:06
नवीन
पोरी अन सरदारजी यांचा राजीखुशीचा मामला असेल तर यात वाईट नक्की काय आहे ते कळालं नाही. असो.
खरय. आणि सरदारजी स्वतःचाच बेड आणि बाथरुम (आणी अजुन काय काय) वापरत असेल तर. ;)
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Tue, 02/24/2015 - 03:24
नवीन
बाथरुम वरुन आठवलं. हा सरदारजी आठवड्यातुन एकदा केस ते बुचडं सोडून धुवायचा. आख्खा टब भरायचा म्हणे केसाने. :(
अक्षरशः ब्रशने केस गोळा करुन टाकायचा डस्ट्बिन मध्ये. मग ते केस सुकवणे आणि त्याची परत ती बुचडी, आणि मग रुम पार्टनरला (हो. नवराच. माझाच ;) ) दुअसर टोक धरायला लावुन रोज ती पगडी बांधणे!!
आणी बेड जरी बेगळा असला तरी रुम वरुन फोन येइस्तो नवर्याला बाहेर कुडकुडत रहावं लागायच ना?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 02/24/2015 - 05:34
नवीन
अगदी अगदी.
गेले वर्षभर सरदारा बरोबर रहात होतो. :)
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
Mon, 02/23/2015 - 07:15
नवीन
हे "अलग" सहसा पचनी पडत नाही पण "अलग"चं अस्तित्व नकारता हि येत नाहि.
बाकी उपकार मधले प्राण मुखी मन्ना दा आठवले.
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Tue, 02/24/2015 - 02:28
नवीन
हे बघा, झोड्पणार नसाल तर आमचं अमूल्य मत इथे मांडायला आमची तयारी आहे.
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 10/26/2016 - 21:57
नवीन
लिव्ह इन हि कल्पना काही काळ ठीक असली तरी स्त्रीच्या कमी फायद्याची आणि पुरुषाच्या जास्त फायद्याची आहे असे स्वानुभवाने सहज सांगू शकते. किमान काही तरी लेखी करार असणे महत्वाचे आहे. २०-२५ वर्षे पर्यंत निव्वळ सौन्दर्य आणि तारुण्याचा जोरावर कुठलीही स्त्री रिलेशनशिप मध्ये वर्चस्व गाजवू शकते पण ३० वर्षे झाली कि स्त्रीची शेल्फ value झपाट्याने कमी होत जाते. बायॉलॉजिकल क्लॉक झपाट्याने "मूल" ह्या गोष्टीसाठी अडॅप्ट होऊ लागते. अशा काळांत पुरुषाची साथ असणे महत्वाचे आहे पण लिव्ह इन मध्ये ३० वर्षे उलटून गेलेल्या पुरुषाने त्या संबंधात राहणे माझ्या दृष्टीकोनातून तरी फार इरेशनल आहे. ३५ वर्षे उलटून गेली कि मॅरेज मार्केट मधील स्त्रीची किंमत शून्य.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 10/27/2016 - 07:05
नवीन
अहो ताई
सत्य इतकं उघड आणि ढळढळीतपणे लिहू नका.
परंपरा विच्छेदक स्त्रीत्ववादी आणि स्त्रीमुक्तीवाद्यांची इ इ ची गोची होते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 10/27/2016 - 07:15
नवीन
=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/27/2016 - 07:37
नवीन
तुमच्यावर पण आता शिक्के मारायची तयारी सुरु झाली असेल ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 10/27/2016 - 07:43
नवीन
पण वास्तवता आणि समाजाची आज (इतरांकडे)पाहण्याची वस्तुस्थीती (पुस्तकी आदरश्वाद बाजूला ठेऊ) ध्यानात ठेऊन दिलेला प्रतिसाद आवडला आणि त्या प्रांजळपणाबद्दल अभिनंदन.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2