Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे

म
माहितगार
गुरुवार, 02/19/2015 - 12:21
🗣 80 प्रतिसाद
* मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावे गावांच्या नावांच्या अभ्यासाला टोपोनिमी मराठीत स्थलनाम अभ्यास असे म्हणतात. गावांच्या नावांच्या भेंड्या खेळण्या पलिकडे जाऊन विशीष्ट भौगोलीक परिसरातील भाषेचा आणि मानवी स्थलांतराचा ढोबळ अंदाज येण्यास स्थलनाम अभ्यास उपयूक्त ठरू शकतो. अर्थात असे अंदाज ढोबळच असू शकतात त्यावरून अंतीम स्वरूपाचे निष्कर्ष काढणे सयुक्तीक असेलच असे नाही. * आता पर्यंत या धाग्यावर झालेल्या चर्चा ** अणसूर, पनस, फणस , कणस , सणस, अनासपुरे ** कुडाळ / कुडाल / कुटाल आणि चेन्नई / मद्रास ** थिर': थिरूपती, थिरूअनंतपूरम आणि कोविल : नागरकोविल - (मिपा सदस्य मार्गी) ** होसा, आणि उर - पेट्टे, हळे (मिपा सदस्य कंजूस, शेखरमोघे) उर ** मालेगाव - (मिपा सदस्य टोपी) ** मुंगी-पैठण ** आबाद, ग्राद, ग्राम, गाव - (मिपा सदस्य हुप्प्या) ** हिंग्लजा माता आणि स्थळनामे ** वट/वड / वाडी / वादी / वडूज ** बुरुज-बुर्ज-बर्ग-बर्ख - (मिपा सदस्य आदूबाळ) ** रावळपींडी ** प्रत्यत : मळा , मळी किंवा मळा; उदा मालवण, मलावन, करमळी, उसगाळीमाळ, करमळ, हरमळ, पनसामाळ अफगाणीस्तानातील Mala, Gholmala, Karmalay, Kamal Khel, *** सर्वांच्याच चर्चा सहभागाचे आभार. जिथे कमी जागेत सहज शक्य आहे तेथे उपचर्चा चालू करणारे किंवा महत्वपूर्ण माहिती विश्लेषणात योगदान करणार्‍या सदस्यांचा संदर्भाच्या दृष्टीने युक्त जावे म्हणून सदस्य नामोल्लेख कंसात करण्याचा प्रयत्न केला आहे पण प्रत्येक चर्चा सहभागीचे नाम नमुद करणे पूर्ण जागा त्यातच व्यापली जाऊ नये म्हणून टाळले आहे. सर्वांच्याच चर्चा सहभागाचे पुनश्च्च आभार. अलिकडेच आंतरजालावर वाचन करताना श्री लंके मध्ये महारागाम नावाचे तर आझरबैजान देशात लंकारन अशी नावे योगा योगाने वाचण्यात आली. भारतात ur, ner, palli, , veli, cheri, pat, kuppam, padi, , vayal, vani (wani), vali, wadi इत्यादी प्रत्यय असणार्‍या ग्रामनामांची मोठीच संख्या आहे. यातील 'उर', 'नेर', 'पत/पात/पाट', 'वट' हे प्रत्यय असलेली ग्राम नामे इराण मध्येही आढळत असावीत नगर हे प्रत्यय असलेली ग्राम नामे अफगाणीस्तानातही असावीत. यातील बरेच प्रत्यय आपल्या वापरात वाचनात एवढे सरावलेले असतात की सहज जाणवतही नाहीत पण आजकाल आंतरजाल आणि सोप्या संगणकीय सुविधांनी ग्रामनामातील एकसारख्या प्रत्ययांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. *भारतातील ग्राम नामे ऑनलाईन शोधण्यायोग्य सुविधा **सेंसस इंडीया **पोस्टल पिनकोड **लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी * अफगाणीस्तानातील गावांची यादी या दुव्यावर उपलब्ध असलेली आढळली * United Nations Group of Experts on Geographical Names यांच्या वेब पेजवर इतर काही देशांसोबतच इराणमधील गावांची नावांची यादीचा दुवा आहे. * युके मधील गावांच्या नावांच्या प्रत्ययांची यादी इंग्रजी विकिपीडियावरील लेखात उपलब्ध आहे. (हा धागा लेख मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांची नावांशी संबधीत असला तरी संदर्भा साठी म्हणून हा दुवा नमूद केला आहे. मला स्वतःला मुख्यत्वे मध्य आणि दक्षीण आशिया खंडातील गावांच्या नावातील साधर्म्याची माहिती शोधण्यास आवडते. खासकरून अझरबैजान आणि अर्मेनिया या देशातील ग्रामनामांमध्ये मला सध्या बर्‍या पैकी रस आहे पण अफगाणिस्तान इराणच्या ग्रामनामांच्या सविस्तर याद्या जेवढ्या सहजतेने आंतरजालावर शोधता आल्या तेवढ्या सहजतेने मध्य आशियातील इतर देशांच्या माझ्या शोधात मला मिळाल्या नाहीत. कुणाला त्या उपलब्ध होऊ शकल्यास अथवा मध्य आशियातील नोंद घेण्याजोगी ग्रामनामाची साधर्म्ये आढळल्यास या धागा प्रतिसादातून नोंदवावीत अशी विनंती आहे. * शोधगंगावरील शोध प्रबंध दुवे ** Cultural history of the konkan based on silahara inscriptions Researcher: Paranjape, Binda चॅप्टर ९ पिडीएफ दुवा * माझे स्थलनाम विषयक उप धागे * अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश * कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव * आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी * माझे शब्द व्युत्पत्ती विषयक ईतर धागे * शोध स्तूप आणि स्तव शब्दांचा * मंदिर या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? * पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः * गुढी उभारनी * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * स्थलनाम आणि शब्द व्युत्पत्तीशी संबधीत ईतर धागे * येल्ला आणि तीच्या दासी * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * टवळी आणि सटवी * मिसळपाव बाह्य शब्द व्युत्पत्ती धागे (माझे) * झक मारणे: झक, झक्कू आणि झकास

प्रतिक्रिया द्या
35986 वाचन

💬 प्रतिसाद (80)
म
माहितगार Wed, 06/06/2018 - 10:24 नवीन
रोचक आहे हा संबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
म
माहितगार Wed, 06/06/2018 - 10:26 नवीन
अनुषंगिक अवांतर : आता बर्‍याच आबाद्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागते , हा भाग निराळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
म
माहितगार Mon, 07/27/2015 - 19:12 नवीन
विभीन्न ऐतिहासीक काळातील मुंगी-पैठण गावाचे बरेच दाखले दिसताहेत पण मुंगी-पैठण हे गाव कोणते अथवा कुठे आहे. मुंगी-पैठण हे एकच गाव आहे का मुंगी-पैठण नावाची अधीक गावे आहेत ? कृ. कुणास काही कल्पना मिळाल्यास अवश्य द्यावी.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 07/30/2015 - 00:40 नवीन
जदुनाथ सरकारांनी अनुवादीत केलेल्या औरंगजेबाच्या इतिहासात २४ जाने १६७८ ला शिवाजी महाराजांनी मुंगी पाटन वर हल्ला केल्याची बातमी औरंगजेबास मिळते असा उल्लेख आहे. संदर्भ अर्काईव्ह्ज डॉट ऑर्ग. या उल्लेखातील मुंगी पाटन कोणते असण्याची शक्यता आहे. पैठण जवळील का गुजराथ मधील का अजून कुठले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 07/30/2015 - 00:51 नवीन
अर्काईव्ह डॉट ऑर्गचा दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 08:30 नवीन
होस (होसूर, होसपेट होसनगर मधील) चा अर्थ काय असेल ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 08:36 नवीन
होसा (हल्ली/बळे/कोट/दुर्ग) अशी पण कर्नाटकात बरीच नावे दिसताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कंजूस Sat, 04/28/2018 - 08:47 नवीन
होसा = नवीन पेट्टे = बाजार मंडई ( हळे = जुना, हळेबिडू)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 04/28/2018 - 09:48 नवीन
अरेवा नेमकी महिती, सांगितलीत एक कोडे सहज सुटले. अनेक आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
श
शेखरमोघे Mon, 04/30/2018 - 00:43 नवीन
तसेच कानडीत "ऊरू" म्हणजे गाव - होसा (द) ऊरू म्हणजे (कधीतरी) नवे असलेले, वसलेले गाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
म
माहितगार Mon, 04/30/2018 - 06:48 नवीन
रोचक माहिती , उर हा शब्द भारतभर असंख्य स्थलनाम प्रत्ययात आहे म्हणजे उर शब्द गाव या अर्थाने सर्वच भारतीय भाषांत वापरला गेला असणार , कन्नड सारखी काही भाषा व्यतिरिक्त उर शब्दाचा गाव हा अर्थ विस्मृतीत गेला असणार . पा +उर पूर हा नगर शब्द तयार होऊन अधिक लोकप्रिय झाल्यामुळे उर म्हणजे गाव हे मराठी सारख्या भाषेतून विसरले गेले असू शकते . माझ्या अंदाजाने पूर प्रत्यय असलेल्या ग्राम नामापेक्षा केवळ उर प्रत्यय असलेली ग्रामनामे जुनी असण्याची खात्रीपूर्वक सांगता आले नाही तरी शक्यता अधिक असावी . मला वाटते पूर हा प्रत्यय काही काळ विचारात न घेता केवळ उर हा प्रत्यय असलेल्या ग्रामनामातील उपसर्ग कोणकोणत्या अर्थाने येतात हे अभ्यासाने रोचक ठरावे . या निमित्ताने सुरवातीस महाराष्ट्रातील २० एका स्थलनामांचा विचार करून पाहूया असे वाटते . म्हणजे उर हा शब्द महाराष्ट्रात प्रचलित असताना तात्कालीन मराठीत इतर कोणते शब्द प्रचलित होते ते ग्रामनामातील उपसर्गांवरुन लक्षात येऊ शकेल शब्द फोड दाखवताना विविध शक्यता अभ्यासणे हा उद्देश आहे ( अचूकतेचे दावे नाहीत आणि दुखावण्याचा उद्देश नाही त्यामुळे आपल्या गावाचे नावाची अनपेक्षित फोड दिसल्यास हलकेच घ्यावे हि विनंती . उर हा प्रत्यय गाव या अर्थाने धरला आहे लातूर - लात + उर - लात शब्द कोणत्या अर्थाने आला असेल ? लाथ या अर्थाने येण्याची शक्यता कमी असावी लाटसाहेब वाल्या अर्थाने तर येत नाही कि अजून काही अर्थ असेल ? राहूर - राह + उर - उर हा शब्द प्रयोग प्राचीन आहे , राह शब्दाचा रस्ता हा अर्था पेक्षा राहणे ह्या अर्थाची शक्यता अधिक वाटते . माहूर - माह + उर - माह शब्द कोणत्या अर्थाने आला असेल ? तीन शक्यता वाटतात १) तेथे रेणुका मंदिर असल्या मुळे आई शब्दाचे मा हे रूप मा उर _ माहूर २) दुसरे महाउर ते माहूर हि शक्यता ३) माह शब्दास अजून काही वेगळा अर्थ होता राजूर - राज + उर सर्व नाही पण राजूर नावाची काही गावे छोट्या मोठ्या राजधानीचे आव अथवा राजाचे प्रतिनिधित्व करणारी गावे राहिली असू शकतील साकुर - साक + उर साक = ? सेलूर - सेल + उर ; सेल = ? सेंदूर - सेंद ; सेंद = ? सिंध मधून आला असेल ? परतूर - परत + उर ; परत = ? रिधुर - रिध + उर ; रिध = ? साहूर - साह + उर ; साह = ? वेंगूर - वेंग = ? विंचुर - विंच = ? ( विंचु प्राणी वाचक ?) वारुर - वार = ? ( ठराविक दिवशी जाण्याचे गाव कि अजून काही ?) मसूर - मस + उर ; मस = ? ( मसोळ , मसोड अशी सुद्धा गावे आहेत म्हणजे डाळीच्या मसूर वनस्पती वरून थेट आले असण्याची शक्यता ) भालुर - भाल = ? बेलूर - बेल + उर - बेल (बहुतेक वनस्पती नाम ) येलूर - येल = ? थेऊर - थे = ते ? जेजुर - जेज = ? जांबूर - जांब = (बहुतेक वनस्पती नाम ?) चाकूर - चाक + उर चांदुर चांद कुसूर - कूस + उर काटसुर - काटस + उर ; काटस = ? इंदुर - इंद + उर ; इंद = ? ( देवता नाव ?) आडूर - आड + उर = आड = ? अतनूर - अतन =उर ? मदनूर - मदन + उर अणदूर - अणद = ? अणसूर - अणस = ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे
T
Topi Sun, 04/29/2018 - 11:08 नवीन
मालेगाव हे मल्लग्राम पासून झाले असावे कारण मणी आणि मल्ल नामकदैत्यांचा संहार खंडोबा नी केला अशी आख्यायिका सांगितली जाते, मालेगाव पासून चंदनपुरी नावाचं खंडेरायाच्या क्षेत्र अती निकट आहे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/29/2018 - 12:18 नवीन
' माले' शब्द संस्कृत आणि पाली साहित्यात स्थानवाचक आला आहे का पहावे लागेल . भारतीय पिनकोड डाटाबेस मध्ये बन्गाल, आसाम, पुर्वोत्तर वगळतात हिमाचल उत्तराखन्ड ते खाली तामीळनाडू केरळ पर्यन्त माले शब्दापासूनची गावे दिसताहेत. आपल्या प्रतिसादामुळे माले शब्दाच्या संदर्भाबद्दल उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
T
Topi Sun, 04/29/2018 - 11:11 नवीन
पूर पुरम ह्यातील प नाहीसा होवून ऊर प्रत्यय फक्त गांवचे नावापुढे राहिला असावा
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/29/2018 - 12:31 नवीन
माझे व्यक्तीगत मत हे कदाचित उलटे असावे . 'पा' अक्ष्रोच्छार नुसता सुद्धा प्राचीन भारतीय संभाषणात पुरेसा असावा . पा + उर पासून पौर आणि नंतर पूर अशी शक्यता मला अधिक वाटते. दुसरे महत्वाचे कारण वसती या अर्थाने उर हा प्रतय लागून येणार्‍या गावांची संख्या पूर पेक्षा कितीतरी पटीने भारतात आहेच पण त्या शिवाय उर प्रत्यय असलेली गावे इराक पर्यंत तरी नक्कीच सापडतात त्या शिवाय हडप्पा मोहोंजदाडो समकालीन इराक मधील समकालीन सुमेरीयन संस्कृतीचे उर नावाचे गाव / शहर प्रमूख ठाणे होते . इजिप्त आणि सुमेरीअन सन्स्कृतीतील लिपीचा बोध झाल्यामुळे त्यांच्या इतिहासावरही अधिक प्रकाश पडतो आणि उर मुळचा सुमेरीअन संस्कृतीतील शब्द असल्याचे वाटत रहाते. अर्थात उर या शब्दावर मला वाटते तमीळांना ही अधिकार सांगावा वाटतो पण त्यान्च्या पाशी इराक प्रमाणे काही आधार नाही . पण इन एनी केस उर नावाच्या गावाच्या दक्षिणेतील एकुण प्रसारा मुळे दक्षिण आनी उत्तर भारताचा सांस्कृतीक संगम अती प्राचिन आहे हे अधोरेखीत होते असे वाटते. असो . * Ur इंग्रज विकिपीडिया लेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
म
मार्गी Tue, 05/01/2018 - 10:40 नवीन
खूप सुंदर माहिती येते आहे! माझ्याकडून थोडी भर- दक्षिण भारतात अनेक गावांमध्ये 'थिर' आहे- थिरूपती, थिरूअनंतपूरम इ. तिथे 'थिर' शब्दाचा अर्थ 'महान' 'स्थिर' असा काहीसा होतो. तसेच, तमिळ नाडूमध्ये अनेक कोविल आहेत. उदा., नागरकोविल. कोविलचा अर्थ वस्ती असा होतो. कोविल- कबिला- कुळ- सिव्हिल! असे अनेक शब्द अनेक भाषांमध्ये समान आहेत. इंग्रजी ट्रूथ शब्द संस्कृत ऋत् च्या जवळचा आहे! पण ह्याचं कारण एकच भाषा सगळ्या भाषांची जननी आहे, हे नाही; तर पुरातन काळापासून मानव खूप मिसळून राहात आला आहे हे आहे. शिवाय काही शब्द हे स्थितीवाचक आहेत. म्हणजे जगातलं कोणतंही बाळ शक्यतो निसर्गत: अम्, म असे स्वर पहिले शिकतं. म्हणून आईसाठी मदर, माता, माँ, मेर्, मुटर असे शब्द त्यातून येऊ शकले असावेत, असं म्हंटलं जातं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 06/01/2018 - 17:16 नवीन
खर म्हणजे ईंग्रजी विकिपीडियावर चेन्नई गावाची व्युत्पत्ती बघत होतो, कुणा चेन्नप्पा नावाच्या नायकाची सत्ता १४ व्याशतकात तिथे राहीली असल्यामुळे त्याच्या नावावरुन चेन्नई नाव आले असल्याचे ईंग्रजी विकिपीडिया तील उल्लेखावरुन लक्षात येते पण माझ्या मते तेवढ्यावरुन ई या प्रत्ययाचा पुरेसा उलगडा होत नाही . मुंबई मध्ये ई हा प्रत्यय आई शब्दावरुन आल्याचे मुंबा + आई हि व्य्त्पत्ती आपण सर्वसाधारणपणे स्विकारतो . गावाचे नाव चेन्नप्पा वरुन आले असते तर प्पा गळाले तरी प्रत्य वेगळा काही लाअला असता पण ई ची शक्यता कमी राहीली असती. चेन्न म्हणजे तेलगुत लहान असा अर्थ होतो, चेन्नम्मा (चेन्न+अम्मा म्हणजे लहान आई या अर्थाने ) सारखा शब्द बहुधा तेलगुत बर्‍या पैकी वापरला जात असावा. चेन्नम असलेली बर्‍यापैकी गावे आंध्र तेलंगाणा कर्नातकात आणि तामीळनाडूतही दिसतात त्या सर्व ठिकाणि ती चेन्न अप्पा वरुन गेली नसावीत. अम्मा च्या एवजी आई सहज होऊ शकत असावे. आई प्रत्यय येणारे तामीळ नाडूतील एकमेव गाव नसावे मदुराई शब्दातही आई प्रत्य राहण्याची शक्यता असू शकते अजून अशी गावे तामीळनाडुत आहेत पहावे लागेल. अशीच दुर्दशा तामीळी लोकांनी मद्रास शब्दाच्या व्युत्पत्तीची केली असावी. मद्रास शब्द पोर्तीगीज भाषेतून व्युत्पत्ती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तीन वर्षांपुर्वी अशात मद्रासपट्टणम असा उल्लेख असलेला १४व्या शतकातला शिलालेख मिळाला (आणि वास्को दा गामा आलाच मुळी पंधराव्या शतकाच्या शेवटी) आणि पिनकोडान्चा डाटाबेस बघीतला तर मद्र आणि मद्र शब्दावरुन ची गावे उत्तर प्रदेश ते केरळ तामीळनाडू सर्वत्र दिसतात. मदुराईचे दुसरे नाव कुडाल आहे म्हणे ! आता ऐतिहासिक काळात तामीळ साहित्याच्या तीन संगम सभा तिथे झाल्या त्यावरुन त्यांनी कुडाल शब्दाचा अर्थ सभा शब्दावर पोहोचवलेला दिसतो. पण kudal koodal हि दोन्ही स्पेलीन्ग्ची अनेक गावे मध्यप्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र ते दक्षिणेतील राज्ये आहेतच मध्ये दिसतात. स्पेलिन्ग मध्ये जरासा बदल kutal करा आणि मग काश्मीर ते आसाम पर्यंत कुटाल गाव नावे सापडते ते खाली महाराष्ट्रा पर्यंत . महाराष्ट्रात कोकणातले कुडाळ प्रसिद्ध आहेच पण सातारा नांदेड हिंगोली जिल्ह्यातही कुडाळ ग्राम नाम दिसते तर अशा असंख्य कुडाळ नावाच्या गावी तामीळ संगम सभा झाल्या असण्याची शक्यता कमी असावी. कुडाळ नावाचे अर्थाचे काही तर्क कुणाला माहित आहेत का ? गुडी कुडी कुटी हे शब्द पाल / तंबू वजा निवासस्थान शब्द म्हणून वापरले गेले असावे . दक्षिण भारतीय भाषा विशेषतः तमीळ क चा ग ग चा क असा फेरफार करताना दिसते . गुडा हा प्रत्यय असलेली अनेक गावे दक्षिणेत आहेतच. गुढी या शब्दाचा शोध घेताना या उच्चाराचा एक अर्थ उंचवटा उंचीची जागा असू शकेल अशा अर्थाची चर्चा मागे मी या वेगळ्या लेखात केली आहे. कुट हा शब्द डोंगर अर्थाने येतो हे आपण सर्व जण जाणतोच . त्यामुळे कुडाल आणि कुटाल आणि गुडा एकमेकांचीच रुपे असू शकण्याची शक्यता मला व्यक्तीशः वाटते. पण तरीही कुडाल/ कुटाल नाकाची काही वनस्पती नावे असण्याची किंवा कुडाळ शब्दास इतर व्युत्पत्तीची शक्यता असल्यास माहित नाही . पण माझे सध्याचे मत नंतर उंच जागा असा अर्थ निघून पडला तरी सुरवातील कुडाल शब्द उंचावरची जागा असा होऊ शकेल का, माझा तर्क चुकही असू शकेल . कुडाल हा शब्द ग्रामनामात क्वचित प्रत्यय अथवा उपसर्गातही येताना दिसतोय.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/01/2018 - 17:52 नवीन
मस्त धागा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 06/01/2018 - 18:07 नवीन
जिथेजिथे वेदोक्त काथ्याकुट झाला /काथ्या कुटला/ बहुधा द्वैत -अद्वैत यावरच कुटायचे / घरच्या लक्ष्म्या वारंवार निरोप पाठवायच्या जेवण गार होतय लवकर या तरीही कुटायचेच ती गावे कुडल. विजापुराजवळ आहे एक संगमाचे ठिकाण ते झाले कुडलासंगमा. इथे धर्मशाळा आणि अन्नछत्रे असतात. वाद करकरून घसा सुकतो भूक लागते मग छत्रात चापायचे. अभिप्राय विनोदी वाटल्यास योगायोग समजावा. कारण शिलालेख पुरावा नाय.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Mon, 06/04/2018 - 04:50 नवीन
असाच प्रश्न नेल्लुर , वेल्लुर , येल्लुर या नावांबाबत पडतो .
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/04/2018 - 05:42 नवीन
उर या प्रत्ययाबाबत वर चर्चा झाली आहेच, उर प्रत्ययासोबत येणारी ग्राम नामे बर्‍यापैकी जुनी असावीत त्यामुळे त्यांच्या अर्थांचा विचार करणे रोचक ठरु शकते. * येल्लुर हे देवी नावावरुन येते त्या बद्दल अधिक चर्चा येल्ला आणि तीच्या दासी लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. * वेल्लुर मधील वेल वनस्पती नावावरुन असण्याची शक्यता वाटते . व चा ब असा उच्चार बदलही होतो आणि बेल्लूर नावाची गावेही सापडतात . ** वेरुळ हे वेलुर - वेरुल - वेरुळ असे झाले नसेल ना असे कधी कधी वाटते , वेरु शब्दाला अजून काही अर्थ असेल तर माहीत नाही * नेलुर / नल्लुर नल आणि नेल या शब्दांना काही विशीष्ट अर्थ असेल तर माहित नाही . दक्षिण भारतीय भाषा बोलताना /उच्चारताना बर्‍याच ग्रामनामान्चा उच्चारण शेवट नल / नेल असा होऊन नन्तर उर प्रत्यय लागताना दिसतो जसे कन्नेलुर , उदा चीन्नालुर , **नल्लुरु ( एक नल्लुरपालम ही आहे गंमत म्हणजे वस्तिस्थान प्रत्ययाला पुन्हा अजून एक वस्तीस्थान प्रत्यय लागण्याचेही प्रकार होतात ) ** काटमनल्लुर कर्नाटकातील या उदाहरणात नल्लुर हा पुर्ण शब्दच प्रत्यय झाल्याचे दिसते आहे 'काटम' कानडीत काही अर्थ असेल ** Muthanallur आहे याचा समास कसा सोडवणार Mutha+nallur की Muthan+allur की Muthanall + ur nallur येणारी दक्षिणेत आणखी बरीच गावे आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
म
माहितगार Mon, 06/04/2018 - 06:08 नवीन
अणसूर मधील अणस शब्दावर anas अक्षरांवर महाराष्त्रातील गावांच्या डाटाबेस मध्ये शोध घेतला तर कणस आणि फणस हे शब्द असलेली गाव नावे आहेत . अननस नावाचेही फळ आहे , (हिंदीत अनाज हा शब्द आहे तो अनस -अनास - अनाज असा तयार झाला असू शकतो असे वाटले अर्थात या सर्वाचे मूळ अन्न शब्द आहेच) पण पनस panas नावाची गावे सातारा अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात दिसतात . पपनस आणि फणस बहुधा केवळ कोकणात होतात, नुसते पनस अथवा पणस नावाचे वेगळे काही फळ असू शकेल का अशी शंका वाटून गेली. सणस वाडी नावाची गावे आहेत सणस नावाचीही काही वनस्पती आहे का कि सणस शब्दाचा अजून वेगळा काही अर्थ होतो ? सण शब्द स + अन असा आला असेल का म्हणजे स म्हणजे चांगले अन म्हणजे अन्न असे काही ? की व्युत्पत्ती काही वेगळी आहे ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 06/04/2018 - 07:13 नवीन
कोकणात अनासपुरे नावाचे गावही दिसते आणि मला वाटते असे आडनावही आहे, या नावांच्या व्युत्पत्तीचा या निमीत्ताने उलगडा होताना दिसतोय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 06/04/2018 - 11:16 नवीन
वेंगसर, वेंगणी , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
T
Topi Wed, 06/06/2018 - 19:59 नवीन
नंदीग्राम, नांदगाव, राजनांदगाव ह्यात नंद हा प्रत्यय नंद घराण्यातील राजा किंवा भगवान श्रीकृष्ण ह्यांचा पालक नंदबाबा ह्यांच्याशी तर नसावा? मराठीत नांदने या क्रियापदाशी संबंध नसावा कारण तिन्ही गावे बंगाल,महाराष्ट्र, आणि बिहारमधील आहेत
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 06/07/2018 - 06:42 नवीन
अन म्हणजे अन्न मिळाल्यावर होणारी भावना म्हणून आनंद शब्द विकसीत झाला असू शकेल किंवा नंदाच्या घरातील सुख समाधान आनंदाची काल्पनिक प्रतिमा असू शकेल. पण शब्दाचा प्रभाव हा नंद कुळ आणि त्याची साहित्यिक आणि सांस्कृतिक दखल झाल्या नंतरचा असावा असे वाटते. आनंदी घरात रहाणे म्हणजे नांदणे हा शब्द विकास स्वतंत्र असावा - आनंद आणि नंद वरुन विकसीत इतरही बर्‍यापैकी शब्द भारतीय भाषात आहेत - त्यावरुन ग्राम नावे विकसीत होण्याची सहसा गरज नसावी . १) स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. जिथपर्यंत ग्राम नामांचा संबंध आहे नंद हा उपसर्ग असलेल्या ग्रामनावांची संख्या भारतात आपल्या अंदाजा पेक्षा खूप मोठी असावी. डाटाबेस मधून काही उदाहरणे देतो आणि आणखी पण आहेत पण त्यासाठी वेगळा प्रतिसाद देतो . नंदपूर हे नाव सर्वाधीक दिसतय वर जम्मू पासून सुरवात होताना दिसते आहे. हिमाचल, पंजाब, हरीयाणा , उत्तरा खंड , उत्तर प्रदेश ,बिहार , झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश,, महाराष्ट्र, यादी पूर्ण नसल्याने ईतर राज्याची नावे आंतर्भूत झाली नसावीत , जशी मिळतील तशी देतो. Nand Garh (118) Nand karan Nandal(94) nandawala Nandgaon (1) Nandgarh Nandha(34) Nandha(53) Nandhuwali Nandi Khalsa (16) Nandiali Nandnaur (23) Nandpur Nandpur Ka Dera Nandrampur Bas(304) Nandsinghwala (8) Nanduki(22) Nanduwali (128)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
म
माहितगार गुरुवार, 06/07/2018 - 09:18 नवीन
महाराष्ट्रात नंद , नांना, नांद्र हिं अक्षरे असलेल्या गाव नावांचे प्रकारच अदमासे पाऊणे दोनशेच्या आसपास होताहेत त्यात असंख्य गावांना एकच नाव असेल अशी अनेक गृहीत धरा म्हणजे एकुण प्रभाव लक्षात येईल. मध्येच व्यत्यय आल्यामुळे खालील प्रकारचे विश्लेषण पुर्ण होऊ शकले नाही पण अंदाजा येण्यासाठी पुरेसे असावे * ऊपसर्ग (म्हणजे शब्दाच्या आधी) प्रत्यय म्हणजे शब्दा नंतर * नंद ऊपसर्ग : केस, पाच; प्रत्यय: ई , खेड , गाव , गुर * नंदा प्रत्यय : ई, * नांद प्रत्यय : गाव * नांदा प्रत्यय : पूर * नंदूर प्रत्यय : बार * नांदूर उपसर्ग : घाट , जाट * जु-नांदुर्खी * नांद्रा / नांद्रे उपसर्ग : कोट, घाट , देव , * नांदेड * आंनंद प्रत्यत गाव, नगर, ग्राम, वली, वन, व्हाळ, वाडी ; ऊपसर्ग समास : का ,खा, परमा, ** नंदन प्रत्यय : पाडा,वन,वाड,शिवणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
T
Topi गुरुवार, 06/07/2018 - 08:37 नवीन
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 06/07/2018 - 09:21 नवीन
...परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी. ऑब्झर्वेशन बरोबर आहे पण आडनावे काळाच्या ओघात बर्‍याच मोठ्या प्रमाणावर बदलू सुद्धा शकतात म्हणुन त्याबद्दल निश्चित निष्कर्ष काढणे कठीण जाते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Topi
T
Topi गुरुवार, 06/07/2018 - 08:37 नवीन
स्वतः नंदकुळातील , २ स्वतः नंद कुळातील समजून घेणारे यांचे स्थलांतर किंवा आनंददायी परिवार हा अर्थ होत असल्याने वस्तीस्थानास नंद उपसर्ग असलेली नावे ठेवली गेली असावीत. परंतु नंदा आडनावे असणारी लोकसंख्या भारतात जास्त नसावी दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचे नंद कुळातच समावेश करण्याची प्रवृत्ती नंद घराणे बलवान असण्याची वेळची असावी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा