Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाठोडं

न — निलरंजन, गुरुवार, 02/19/2015 - 18:58
अंथरूणावर पडताना जाणवते मला अपेक्षांचे ओझे तेवढेच जड झालेले चिंतेने भरलेले गाठोडे, चिंता असतात रोजच्या जगण्यातल्या. चिंता असतात न सुटलेल्या प्रश्नांच्या चिता राहून गेलेल्या महत्वाच्या कामाच्या, अपेक्षा असतात भविष्यातल्या प्रगतीच्या, अपेक्षा असतात स्वप्नपूर्तीच्या, अपेक्षा असतात उज्वल यशाच्या, आशा दरवेळेस असते की उदया या सार्या चिंता सुटतील स्वप्नातल्या वैभवावर प्रगतीचे इमले चढतील सुख आपल्या पुढ्यात पायघड्या घालतील वाटते देव दयावान होईल आणि चिंता माझ्या मिटतील लाॅटरीच्या तिकिटासारखे सर्व प्रश्न झटक्यात सुटतील पण असे काही होत नाही दिवस सुने जात नाही आजची कितीतरी कामे माझी उद्यावर जातात उद्याची माझी कामे परवावर जातात विनाकारण नकारघंटा वाजतच राहतात कामे करण्यासाठी माझी तगमग होत असते कामे टाळण्याची मनाची धडपड होत असते मनात असली तरी काही कामे अर्धवटच राहतात स्वप्नातल्या इमल्यांना सुरूंग लागत राहतात नसतो कधी पैसा तर नसतो कधी वेळ जुळवून आणतो दोन्ही तेव्हा माणसं करतात खेळ म्हणून मनात असले तरी कामे काही होत नाही भरवसा नसतो उद्याचा पण मन आशा सोडत नाही चिंताच्या गाठोडयांची आता झालीय मोठी उशी स्वप्नातल्या उद्याच्या त्या सार्याच आहेत साक्षी

प्रतिक्रिया द्या
811 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
पदकि गुरुवार, 02/19/2015 - 22:34 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 02/22/2015 - 13:27 नवीन
अंथरूणावर पडणे काय असते, हे मी भोगले आहे. पण परिवारासाठी हिम्मत करून उठावेच लागते, सर्व हेच करतात. आपले कर्तव्य पूर्ण करतात. बाकी मनासारखे हे फक्त स्वप्नात घडते, कारण आपले आयुष्य केवळ आपले नसते. इतरांचा ही त्यात सहभाग असतो. इतरांसाठी तडजोड तर करावीच लागणार. असो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा