Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृत्युषडाष्टक

न
नितीनचंद्र
गुरुवार, 02/19/2015 - 18:59
🗣 110 प्रतिसाद
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही. यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते. गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते. दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती. जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही. मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते. मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे. दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते. यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही. शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.

प्रतिक्रिया द्या
49531 वाचन

💬 प्रतिसाद (110)
क
कंजूस Sat, 02/21/2015 - 02:32 नवीन
मूळ मुद्दा कुंडली लग्नासाठी जुळवणे हा आहे. हे करणेच चुकीचे आहे. नितीनचंद्र अथवा दुसरे अचुक सल्ला देतात का हे गौण आहे. वरच्या उदाहरणात त्या मुलीला असे सांगणार का या तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुंडलीत संतति योग नाही दुसऱ्याशी व्यवहाराने लग्न कर आणि प्रेमाखातर अधूनमधून याच्याशी पत्रे भेटीगाठी कर? अजूनही काही जोडपी सायन्स पुढे गेले तरी अपत्यहीन राहतात अथवा दत्तक घेतात अथवा टेस्ट ट्युब काय ते करवतात सरोगेट करवतात तरी संततियोग नाही हे भाकित खरं ठरतंच. आपल्या मुलालाच स्पष्टपणे संततियोग नाही हे सांगणे याला म्हणतात शास्त्रावर विश्वास. यातूनच ज्योतिष हे शास्त्र आहे याची खात्री पटते. ड्रायविंगची नोकरीला वाहनयोग नसतो. गाडी स्वत:ची चालवणे हा निश्चितच वाहनसुखयोग आहे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 02/21/2015 - 09:30 नवीन
नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी काढलेला नाहीये. त्यांनी त्यांचा अनुभव, त्या शास्त्रातले ज्ञान, प्रॅक्टिकली कसे वापरता येते, हे सांगण्यासाठी काढलेला आहे. त्यामुळे ज्यांना या विषयांत रस आहे त्यांनीच थांबावे, बाकीच्यांनी चपला घालाव्या, (तात्याचे वाक्य, तात्या म्हणजे ओरिजिनल मालक), असा प्रस्ताव मांडत आहे.
  • Log in or register to post comments
प
परिंदा Sat, 02/21/2015 - 10:42 नवीन
+१ ज्योतिष ह्या विषयावर लिहीले की असा धुरळा उडतोच. मग कोणी इथे ज्योतिषावर काही लिहु नयेच का? तसे असेल तर स्पष्ट सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
क
कंजूस Sat, 02/21/2015 - 11:42 नवीन
थोडा अत्रंगि पाऊस पाडलाय मी. थांबलोय. उगाच मिथुन राशिकरांचा मोर्चा यायला नको घरावर.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 02/22/2015 - 12:02 नवीन
का वो आमाले ओढता ह्यात *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
न
नितीनचंद्र Sat, 02/21/2015 - 18:12 नवीन
नितीनचंद्र यांनी हा धागा ज्योतिषशास्त्र खरे की खोटे? यासाठी काढलेला नाहीये. जो पर्यंत तांत्रीक चर्चा चालु आहे तो पर्यंत मला काही अडचण नाही. चर्चा करण्याऐवजी जेव्हा वैयक्तीक चिखलफेक होते तेव्हा जरा मन खट्टु होत इतकच. सावित्रीबाई फुले विद्यापिठात ज्योतिष विषयाच अध्यासन सुरु करायला काही तथाकथीत पुरोगामी वाद्यांनी झारीतल्या शुक्राचार्याची भुमिका बजावत खोडा घातला. अध्यासनाच्या माध्यमातुन ज्योतिषविषयक नियम पुन्हा संशोधनातुन तपासता आले असते. पण असे घडले नाही. आज तथाकथीत पुरोगामी ज्योतिषाला शास्त्र मानायला तयार नाहीत. संशोधनातुन जर काही नियम सिध्द झाले असते तर ज्योतिषशास्त्राला मानावे लागले असते. काही नियम आपोआपच सिध्द न झाल्याने ज्योतिषशास्त्रातुन बाजुला निघाले असते. पण स्वतः विज्ञाननिष्ठ मानणारे लोक सुध्दा ज्योतिषशास्त्राला आणि ज्योतिषाला झुरळासारखे झटकु पहातात. गेल्या वीस वर्षात परिस्थीती बदलली आहे. जनमानसात ज्योतिषशास्त्राला मान्यता मिळत आहे त्यामुळे अश्या टीकात्मक विचाराला फारसे महत्व मी देत नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 02/21/2015 - 19:46 नवीन
माझ्या पहाण्यात असे अनेक जातक आहेत ज्यांच्या पत्रीकेत संतती योग कठीण असताना " नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.
बहुधा तुकोबांच्या पाहण्यात नसावेत. नाहीतर 'नवससायासे कन्यापुत्र होती, तरी का लागती पती?' असला कैच्याकै प्रश्न त्या काळात विचारण्यास त्यांची लेखणी धजावली नसती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
स
साती Sun, 02/22/2015 - 08:51 नवीन
तुकोबांच्या काळात सायन्स इतकं पुढे गेलं नव्हतं म्हणून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/22/2015 - 09:37 नवीन
कुठलं, कुठलं सायन्स... नवसाचं सायन्स ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
सूड Mon, 02/23/2015 - 10:09 नवीन
" नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.
ओह्ह ओके, त्याला नवस म्हणतात तर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 10:57 नवीन
नवस नावाची एखादी नोक्री असेल तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 02/23/2015 - 11:00 नवीन
तर तुझ्याइतकं मन लावून काम करणारं दुसरं कोणी नसेल मला वाटतं !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 11:09 नवीन
=)) लाईन लागेल उमेदवारांची...तुला विंट्रेष्ट नै वाट्टे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 02/23/2015 - 11:17 नवीन
माझी लेखनसीमा यापुढे नसल्याने गप्प बसत आहे. व्यनि किंवा प्रत्यक्ष भेटीत उत्तर देण्यात येईल. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/23/2015 - 11:22 नवीन
समदा वात्रटपणा व्यणि केलात तरी चालेलं दोघांनी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 11:39 नवीन
त्यापेक्षा जौन भेट त्येला...बहुसंख्य बिगर-पुणेकर पुणे म्हणून ज्या भागाला ओळखतात तिथेच कुठेतरी र्हातो तो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Mon, 02/23/2015 - 11:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या Mon, 02/23/2015 - 15:50 नवीन
बिझनेस असतोय मग.. कर्तो क्का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 13:40 नवीन
सावित्रीबाई फुले विद्यापिठात ज्योतिष विषयाच अध्यासन सुरु करायला काही तथाकथीत पुरोगामी वाद्यांनी झारीतल्या शुक्राचार्याची भुमिका बजावत खोडा घातला.
अगदी योग्य काम केले. नाणेफेकीपेक्षा किंवा द्राक्षासवमत्त गृहस्थांच्या कोलांटीच्या दिशाबदलापेक्षाही कमी अचूकतेच्या या ज्योतिषास शास्त्र म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
प
प्रकाश घाटपांडे Sun, 02/22/2015 - 11:39 नवीन
नितिनचंद्र जी योग्य सल्ला दिलात.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 02/22/2015 - 18:22 नवीन
ज्योतिष, कुंडली, ग्रहयोग वगैरे वगैरे बाजूला ठेवून पाहिलंत तर समुपदेशनाच्या दृष्टीने आपण योग्य तेच केलंत याबद्दल मात्र आपलं कौतुकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ब
बॅटमॅन Mon, 02/23/2015 - 13:42 नवीन
अगदी अगदी....योग्य सल्ला. तरीही पत्रिकेचे एक स्थान असते, विशेषतः लग्नबाजारात. एखादे स्थळ आवडले नसल्यास नाही म्हणून सांगायला पत्रिकेचा चांगला उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
न
नितीनचंद्र Sun, 02/22/2015 - 14:20 नवीन
प्रकाशजी धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 02/23/2015 - 05:25 नवीन
ज्योतिष्य हा विश्वासाचा भाग आहे. प्रेम केल तर ज्योतिष्य बघू नये. जर आपला जोड़ीदार आपण निवडला आहे तर मग कोणत्याही परिस्थितीत एकत्र रहाणे महत्वाचे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/23/2015 - 06:56 नवीन
हाच मुद्दा मी मांडलाय.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Mon, 02/23/2015 - 09:49 नवीन
वा खुप छान अमोल केळकर मला इथे भेटा
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 02/23/2015 - 13:33 नवीन
मला स्वतः गाडी (दुचाकी, चारचाकी) चालवायला बिलकुल आवडत नाही. स्वतः गाडी चालवायची वेळ शक्यतोवर येऊ न देण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाची मात्र आवड आणि हौस आहे. बोटीपासून लाल डब्ब्यापर्यंत कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा त्रास होत नाही. मग मला वाहनसुखाचा योग आहे की नाही? कंडीशनल योग असतात का? खराखुरा प्रश्न आहे, खवचटपणा नाही.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Mon, 02/23/2015 - 15:35 नवीन
आपणांस बहुदा सार्वजनिक वाहनसुखाचा योग आहे! आम्हाला हा योग अर्धवट मिळालेला आहे. या योगाची लक्षणे म्हणजे मुख्यत: सीट बेल्ट लावणे आवडत नाही. हेल्मेट घालणे आवडत नाही. हेल्मेट घेतांना चष्मा न घालून गेल्याने नंतर चष्मा-हेल्मेट एकत्र घालता येत नाही हे नंतर लक्षात येते आणि अजून एखादे हेल्मेट आणावे लागते. पीएमटीच्या बस स्टॉपवर कंटाळून तुम्ही रिक्षात बसला रे बसला की लगेच पाहीजे ती बस येते. जर कर्म धर्म संयोगाने हवी असलेली बस मिळाल्यास हव्या त्या चेहर्‍याशेजारी बसण्यासाठी तुम्ही पोहोचेपर्यंत ती सीट कोणी तरी हडपतो किंवा तो चेहरा बसमधून उतरतो. एखाद्या वेळेस नशीबाच्या जोरावर आपण तिथे पोहोचलो, आसनस्थ झालो की दुसर्‍या क्षणाला भोXXXXXXX!!, भेटत नाय बे इथेच असून... असं कोकलणारा दोस्त त्याच ठिकाणी बसमध्ये चढतो. आपल्याला विशिष्ट प्रकारचा असा एक स्पेशल वास्तू योग असतो. यात घर फार उत्तम मिळते पण तिकडे जाणारा रस्ता फार खराब मिळतो. गावची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितीही उत्तम असली तरी हवे तिथे जाण्यासाठी बस आपल्या ठिकाणाहून किमान दोनदा बदलावी लागते. या वास्तू योगात "जमत नाय, तिकडून रिटन भेटत नाय सायेsssब" म्हणणारे रिक्षावाले खच्चून सापडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आयुर्हित Mon, 02/23/2015 - 20:15 नवीन
असे असू शकते व त्याची काही ठराविक कारणे ही आहेत/असतात. कृपया व्यनी करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
ब
बॅटमॅन Tue, 02/24/2015 - 06:08 नवीन
काहो होमियोहित साहेब, प्रत्येक वेळी ते 'व्यनि करा' चे शेपूट लावल्याशिवाय चैन नाय का हो पडत तुम्हांला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 09:08 नवीन
होमियोहित
व्युत्पत्ती व्य.नि. कर की रे शब्दाची जरा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Tue, 02/24/2015 - 09:24 नवीन
सामासिक विग्रह म्हणायचंय का चिमणराव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 09:28 नवीन
नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Tue, 02/24/2015 - 12:59 नवीन
समासविग्रह केला की अर्थ वा व्युत्पत्ती एकदम स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
आ
आदूबाळ Tue, 02/24/2015 - 13:14 नवीन
ते जौदे. (गंभीर आवाज सुरू) त्यांना व्यनि करा. (गंभीर आवाज समाप्त)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 13:52 नवीन
मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ करायला) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सूड Tue, 02/24/2015 - 14:16 नवीन
लोकांच्या मोडांच्या भारी रे चवकश्या तुला, रुजत घालायचेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
आ
आदूबाळ Tue, 02/24/2015 - 14:22 नवीन
बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Tue, 02/24/2015 - 14:29 नवीन
मोडावरून एका अज्ञात मोरोपंतकालीन कवीची ही धमाल आर्या आठवली. यतिनें न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/24/2015 - 18:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/24/2015 - 14:19 नवीन
का हो? मोड टोर्टुगाच्या बंदरात खारवून वाळवून दूरदेशी विकणार आहात की काय =)) (मोड आलेला मोड) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 14:52 नवीन
येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे खास खारवलेले वाळवलेले मोड =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 02/24/2015 - 15:29 नवीन
आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या एकेक अत्रंगी सवयी आहेत. वेन टावरातून किती लोकांवर लक्ष ठेवणार म्हणा. तरी टोर्टुगातून येणार्‍या मालाकडे आमचे खास लक्ष असते. कृष्णमौक्तिकनौकेकडे तर अजूनच विशेष ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 15:32 नवीन
कृष्णमौक्तिकनौका
=)) लक्ष नै दिलतं तरी चालेलं. एक्पोर्ट क्वालिटीचं पाठवतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या Tue, 02/24/2015 - 17:29 नवीन
विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ, हे बेणं या बोटावरची त्या बोटावर करण्यात लै तरबेज है.. पायरेट जमात है शेवटी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 17:48 नवीन
ओ कैच्या कै कवटीला येईल ते बोलु नका...ह्या बोटीवरची त्या बोटीवर म्हणा....हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Tue, 02/24/2015 - 18:03 नवीन
हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है..
ए धंदा तुम बोट से करते है की बडे इमान से वो पयले बतावो बाबा. नै तो बोट की वाट बघेगा आन तुम इमान पाठवेगा, ऐसा नही चलेंगा रे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 18:06 नवीन
विचएव्हर रिसोर्स ब्रिंग्ज गोल्ड कॉईन्स =))...इमान काय आणि बोट काय.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
श
श्रीगुरुजी Tue, 02/24/2015 - 19:34 नवीन
मोड हवेत ना. हा घ्या माईसाहेब मोड. माईसाहेब मोड ऑन - ज्योतिष, पत्रिका वगैरे सगळं खूळ आहे असे हे म्हणतात. आमच्या लग्नाच्या वेळी आमच्या दोघांच्या पत्रिकेत काळसर्पयोग होता म्हणे. मग तो टाळण्यासाठी नाशकात गोदातीरी जाऊन नागबळी का कसलं तरी होमहवन केलं होतं आणि मगच लग्न लावलं. तेव्हा भटजींनी खूपच दक्षिणा उकळली होती. त्या विधीची तर मला बाई भीतिच वाटली. जिवंत नागाचा बळी देतात की काय आणि तो सुद्धा आपल्यासमोर या कल्पनेनीच मी घाबरले होते. आता हे मला चेष्टेने म्हणतात की नागबळीवर पैसे घालवण्याऐवजी तू दुसर्‍याच वराशी लग्न केलं असतंस तर तू सुखी झाली असतीस आणि मी पण सुखी झालो असतो. मी बरी ऐकून घेईन? मी लगेच ह्यांना टोला हाणला की तुमचं नशीब बलवत्तर म्हणून देवाने तुमची माझ्याशी गाठ बांधली, पण माझं मेलीचं नशीबच खोटं. परवाच ह्यांनी मला संध्यानंदमधला नागबळीवरचा एक लेख वाचून दाखविला आणि सांगितलं की बघ आता हे फॅड किती वाढलंय ते. ह्यांचा आता कशाकश्शावर म्हणून विश्वास राहिलेला नाही. माईसाहेब मोड ऑफ -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कंजूस Mon, 02/23/2015 - 14:46 नवीन
या योगाला प्रवास धार्जिणा असणे {अथवा नसणे} योग म्हणतात. घरचेच वाहन असले तरी हा योग असतोच असं नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा