नाटक
आयुष्याचे माझ्या | जाले जे नाटक
त्याचे हे फाटक | उघडितो
होतो (आणि आहे)| तसा मी सावळा
जनही बावळा | म्हणताती
रूप-हीन मुख| नसे मी देखणा
डोळ्याने चकणा/ थोडाफार
ऐसे कैसे रूप| कॉर्पोरेटी न्यावे
जनां न साहवे| माझी चिंता
अरे जरा शर्ट| पॅंटीमघ्ये खोच
कशी नाही बोच | तुला मुळी?
केसही जरासे | बारीक कापावे
तेलही लावावे | स्नानोत्तर
पायी असू द्यावे| चामड्याचे बूट
घ्यावयास सूट| पैसा देतो
वगैरे इत्यादि | ठोकून ती मूर्ती
थोडीफार कीर्ती | मिळविली
कंपनीत झालो | थोडासा साहेब
लटका रुबाब | दिनरात्री
नोकर धावती | हुकुमात आज
मनामाजी लाज | वाटतसे
उचलली जर| माझी मीच बॅग
वरिष्ठांना राग | मनामाजी
असावा हा साला | मनाने मार्क्सिस्ट
आतून उद्दिष्ट | काय याचे?
कसे हा साधेल| कंपनीचे "गोल"
खुर्ची एक फोल| अडवितो
विद्यापीठे केला | विद्या-वाचस्पती
नसे त्याची क्षिती | मुळी आम्हा
कंपनीचे येथे| "पॉवर स्ट्रक्चर"
त्याची थरथर | वाढतसे
लठ्ठ पगाराची | सोडून नोकरी
बसणेही घरी | शक्य नसे
ऐसे चालतसे| आयुष्य-नाटक
मनाने काटक| झालो आता!
xxx
💬 प्रतिसाद
(3)
ज
ज्योति अळवणी
Fri, 02/20/2015 - 04:18
नवीन
स्वतःला बावळट म्हणण्याची पद्धत आवडली
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Sat, 02/21/2015 - 05:37
नवीन
.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Tue, 02/24/2015 - 06:58
नवीन
छान!
- Log in or register to post comments