Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंधार

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Fri, 02/20/2015 - 03:29
एकटाच आहे, असतो आणि राहणार तो त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब ना कसला डाग, ना कुठला बट्टा सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ . जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते, तिथे तो आपले हातपाय पसरतो.. मस्त राहतो.. . तोच त्याला घेरुन राहतो अन् तोच त्याच्यात भरुन राहतो पण शांत शांत, एकटा जरूर आहे पण एकाकी नाही तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी . तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा त्याला आमंत्रण नाही लागत आगत स्वागत नाही लागत तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा तोच येतो तुमच्याकडे तुम्हाला कुशीत घेतो त्याच्यातली शांतता जी अमर आहे, निर्व्याज, नि:स्वार्थी आहे ती तुमच्यासोबत वाटून घेतो, नि:संकोचपणे . अंधार एकटाच आहे, असतो आणि राहणार तो |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०२/२०१५)

प्रतिक्रिया द्या
3409 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/20/2015 - 03:51 नवीन
व्वाह! :HAPPY:
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 02/20/2015 - 04:10 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/20/2015 - 05:17 नवीन
छान आहे आवडली. Image removed. अंधेरा कायम रहे (फोटो अंजा वरुन साभार) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/20/2015 - 21:07 नवीन
घाबल्ले ना मी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/22/2015 - 08:33 नवीन
कोल्हापुरकर घाबरतात? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सूड Fri, 02/20/2015 - 14:20 नवीन
आवडली आणि पटली देखील!!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 02/20/2015 - 15:24 नवीन
कविता आवडली, पण परमेश्वर तर सर्वठिकाणी असल्यामुळे तो एकटा कसा राहणार ...
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 02/20/2015 - 15:32 नवीन
तात्या, जल्ला अंधाराबद्दल लिवलांय ओ!! आता परमेश्वर सगळीकडे असतो मग अंधार एकटा कसा राहील असा प्रश्न असेल तर मग कविच काय ते सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
च
चाणक्य Fri, 02/20/2015 - 15:24 नवीन
आमच्या मिकाची नाहीये ही
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 02/21/2015 - 16:56 नवीन
खवळलेल्या काप्रेची का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
प
पदकि Fri, 02/20/2015 - 18:41 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 02/22/2015 - 09:26 नवीन
वाह... वाह ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jiya Re... :- { Jab Tak Hai Jaan }
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा