रुसवा
बरं नाई हे रुसनं
मुकं मुकाट बसनं
डोया भिळूनं डोयातं
थोळं गालात हासनं
असा कसा हा रुसवा
होटं टाकला शिऊनं
नको धरुस अबोला
देतं काऊनं भिऊनं ?
लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?
अशी लाळा ची तू मैंना
तयं हातावर्ला फोळं
लाऊ जीवं मी कितीकं
सांगं कायं तुले थोळं ?
बस्सं झालं पुरं झालं
चाल्ला जीवं खोलं खोलं
देनं सोळूनं रुसवा
आता बोलनं गोळ गोळं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }