Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संसद: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५

स
सव्यसाची
Sun, 02/22/2015 - 20:21
🗣 95 प्रतिसाद
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक २३ फेब्रुवारी ते ८ मे या दरम्यान असणार आहे. हे अधिवेशन २ टप्प्यात होईल. दि. २० मार्च ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये संसदेला सुट्टी असेल. या दरम्यान वेगवेगळ्या विभागाच्या स्थायी समित्या अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींचा अभ्यास करतील. पहिल्या ५ दिवसांचे वेळापत्रक असे : २३ फेब्रु: राष्ट्रपतींचे अभिभाषण २४ आणि २५ फेब्रु: अभिभाषणावर चर्चा आणि धन्यवाद प्रस्ताव २६ फेब्रु: रेल्वे अर्थसंकल्प २७ फेब्रु : आर्थिक सर्वे २८ फेब्रु: केंद्रीय अर्थसंकल्प रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प हे २ महत्वाची विधेयके असली तरी या अधिवेशनामध्ये तब्बल १७ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत. या १७ मध्ये ६ अध्यादेशही जमा आहेत. तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित असलेली १० विधेयकेही पारित करायचा सरकारचा प्रयत्न असेल. काही महत्वाची विधेयके: १. जी. एस. टी. संविधान दुरुस्ती विधेयक २. भूमीअधिग्रहण विधेयक ३. कोळसा खान विधेयक ४. मोटार वेहिकल दुरुस्ती विधेयक (इ रिक्षा) ५. कंपनी दुरुस्ती विधेयक ६. लोकपाल दुरुस्ती विधेयक इत्यादी.. हि सर्व विधेयके लोकसभेत पारित होतीलही पण राज्यसभेमध्ये सरकार अल्पमतात असल्याकारणाने तिथे या विधेयकांचे काय होते हे पाहणे रोचक ठरेल. विरोधी पक्षांनी हे अधिवेशन कसे असेल याचे संकेत आधीच दिले आहेत. भाजप सरकारचा खऱ्या अर्थाने हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. तो काय असू शकतो, काय असावा या सर्वांची चर्चा इथे या धाग्यावर व्हावी म्हणून हा धागा. जेव्हा शक्य होईल तेव्हा दररोजची माहिती देण्याचा जरूर प्रयत्न करेन. आपल्यापैकी जर कुणी संसद फॉलो करून इथे माहिती देणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे.

प्रतिक्रिया द्या
28233 वाचन

💬 प्रतिसाद (95)
स
सव्यसाची Mon, 02/23/2015 - 08:46 नवीन
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. ते अभिभाषण पूर्ण स्वरुपात खाली पाहता येईल. सरकारने आजपर्यंत केलेले काम आणि पुढे काय करू इच्छिते याचा समावेश आहे. http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=115678 काही गोष्टी पुढीलप्रमाणे: १. National Urban Development Mission २. २५ मेगा सोलर पार्क्स ३. कायद्यांमध्ये सुधारणा ४. काळा पैसा तयार करायचे थांबवण्यासाठीच्या उपाययोजना ५. focus on solid waste management and water in new urban development policy. लोकसभा: अभिभाषणानंतर लोकसभेचे कामकाज सुरु झाले. सचिवांनी अभिभाषण सभापटलावर मांडले. मंत्र्यांनी कागदपत्रे सभापटलावर मांडली. मृत माजी सदस्य यांच्याप्रती संवेदना व्यक्त करून सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. राज्यसभा: सुरुवातीला नवीन निवडून आलेल्या सदस्यांनी शपथ घेतली. मृत आजी आणि माजी सदस्य यांच्याप्रती संवेदना व्यक्त करून सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 02/23/2015 - 08:50 नवीन
स्वगतार्ह उपक्रम
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Mon, 02/23/2015 - 14:45 नवीन
सुंदर उपक्रम , बरीच नवीन माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे दर वेळी रुपया असा आला आणि रुपया असा गेला याचे मोठे मोठे पाई चार्ट पेपर च्या पहिल्या पानावर बघून कंटाळा येतो .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 02/23/2015 - 20:34 नवीन
यंदाचा अर्थसंकल्प अनेकांना इंट्रेस्टींग वाटत असेल. अच्छे दिनोत्सुक मंडळी डोळ्यात तेल घालुन वाट बघत असतील :)
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/24/2015 - 18:38 नवीन
अच्छे दिनोत्सुक मंडळी डोळ्यात तेल घालुन वाट बघत असतील खरे आहे! आणि तेल सध्या स्वस्त असल्याने, तसे करणे परवडेल देखील! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
H
hitesh Tue, 02/24/2015 - 07:20 नवीन
इन्कम ट्याक्स स्लॅब badalànaa r होते ना ?
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Tue, 02/24/2015 - 08:33 नवीन
अर्थसंकल्प २८ तारखेला येणार आहे. तेव्हा नक्की कळेल कि अशी फक्त बातमीच होती कि खरेच बदलल्या गेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सव्यसाची Tue, 02/24/2015 - 15:38 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासाने दिवसाला सुरुवात झाली. Blue Revolution, National Disaster Management Authority, युरिया आणि इतर खते, अंतरराष्ट्रीय सीमेवर होणारी घुसखोरी वगैरे विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वाना विविध मंत्रालयाकडून उत्तरे मिळाली.तसेच मुंबई चा काही भाग उपसागर (Bay) म्हणून घोषित करण्यात यावा यासंबंधीचा प्रश्न किरीट सोमय्या यांनी पर्यावरण मंत्र्यांना विचारला. त्यासंबंधी मीटिंग चे आश्वासन त्यांनी दिले. शुन्य प्रहारमध्ये विविध सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर आपली मते मांडली. दुपारच्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरुवात झाली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हि चर्चा चालूच राहिली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Tue, 02/24/2015 - 15:45 नवीन
शुन्यप्रहरात भूमीअधिग्रहण कायद्यावरून बराच गोंधळ झाला. शेवटी अर्थमंत्र्यांनी सगळ्यांशी सल्ला मसलत केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर १० मिनिटासाठी शुन्य प्रहर झाला. प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्य मंत्रालयासंबंधीचे विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात डॉक्टरांची संख्या कशी वाढवता येईल हाही एक प्रश्न होता. जी. एस.टीच्या अंमलबजावणीसंबंधी तसेच राज्यांना देण्यात येणाऱ्या पैश्याबद्दल पण प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर दोन विधेयकांवर चर्चा झाली. त्याबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल. The Constitution (Scheduled Castes) Orders (Amendment) Bill, 2014 The Public Premises (Eviction of Unauthorised Occupants) Amendment Bill, 2014
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
म
मदनबाण Tue, 02/24/2015 - 15:49 नवीन
छान धागा ! :) अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर-बाजार उघडा असणार आहे. अधिक इकडे :- Stock markets to be open on Budget day Indian stock markets riding for a fall unless Union Budget delivers

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 02/25/2015 - 20:10 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये विविध विषयावरचे प्रश्न सरकारला विचारण्यात आले. झोपडपट्टीतील लोकसंख्या वाढली आहे का या प्रश्नाला व्यंकय्या नायडू यांनी सविस्तर उत्तर दिले. National Optical Fiber Network (NOFN) वर पुढचा प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये बीएसएनएल वरच जास्त चर्चा झाली. भारतीय उपग्रह या विषयावरील पुढचे प्रश्नही सदस्यांनी बरेच अवांतर करत विचारले. मध्यान्ह भोजनावरील प्रश्नानंतर प्रश्नोत्तराचा तास समाप्त झाला. शुन्य प्रहरामध्ये अनेक सदस्यांनी त्यांच्या मतदार संघाशी संबंधित मुद्दे मांडले. या प्रहरामध्ये सरकारवर उत्तर देण्याचे बंधन नसते परंतु आज रबर च्या किमतीवरून जो विषय मांडला गेला त्याला संसदीय कार्य राज्यमंत्री यांनी उत्तर दिले. तसेच मनुष्यबळ विकास मंत्र्यांनीही काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर दिले. दुपारच्या सत्रात धन्यवाद प्रस्तावावरील चर्चा सुरूच राहिली. आज चर्चेमध्ये व्यंकय्या नायडू यांनी intervene केले. त्यांच्या या intervention च्या भाषणामध्ये कॉंग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये टोलेबाजी सुरु होती. काही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोधही दर्शवला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही चर्चा सुरु राहिली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 02/25/2015 - 20:11 नवीन
सकळी ११ वाजता स्वाईन फ्लू वरती काल आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्याला त्यांनी माहितीपूर्ण उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या काळात IPR वरील एका प्रश्नात पेटेंट कायद्यात कोणताही बदल करणार नाही असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. पेट्रोल आणि डीझेल च्या किमतीवरून बराच वेळ प्रश्नोत्तरे सुरु होती. सरकारने एक्साईज ड्युटी जास्त का लावली वगैरे असे प्रश्न सदस्यांनी सरकारला विचारले. शेवटी आम्ही समाधानी नाही आहोत असे विरोधी पक्षांनी सभापतींना सांगितले. दुपारच्या सत्रात धन्यवाद प्रस्ताव भूपेंद्र यादव यांनी मांडला आणि त्याला चंदन मित्र यांनी अनुमोदन दिले. गुलाम नबी आझाद यांनी त्यानंतर प्रस्तावावर भाषण केले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत हि चर्चा सुरूच राहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
व
विकास Wed, 02/25/2015 - 22:06 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 02/26/2015 - 05:16 नवीन
आज दुपारी १२ वाजता संसदेमध्ये रेल्वे बजेट सादर होईल. सुरेश प्रभू यांच्याकडून एक वास्तववादी बजेट सादर होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मागच्या वर्षीच्या बजेट भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे, बरेचसे प्रोजेक्ट हे नुसते घोषित केले गेले पण ते पूर्ण करण्यासाठी आता सरकारकडे पैसा नाही आणि या अपूर्ण प्रोजेक्टस ची संख्या बहुमतात नक्कीच आहे. हे सर्व पूर्ण करायचे असेल तर २ लाख कोटी रुपये लागतील असे काही वृत्तपत्रांनी सांगितले आहे. एवढा पैसा सरकार स्वतः गुंतवू शकणार नसेल तर मग खाजगी क्षेत्र आणि सरकार हे दोन्ही मिळून पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न करणार याचा पुढच्या काही वर्षामधील आराखडा आज सदर होण्याची अपेक्षा आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे तिकिटांचे दर कमी होण्याची शक्यता कमीच असून नवीन गाड्यांची घोषणाही कमीच होईल असे दिसते. पायाभूत सुविधांवर जास्त भर अपेक्षित आहे. बाकी अपडेटस बजेट सदर झाले कि इथे देईनच.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 02/26/2015 - 09:26 नवीन
काही मुद्दे: -- तिकीट दरवाढ नाही. -- नवीन गाड्यांची घोषणा नाही -- १२० दिवस आधी तिकीट बुक करू शकता -- प्रवाश्यांच्या सोयीसाठी असलेल्या पैश्यात ६७% वाढ -- plan expenditure of 1.1 lakh crore -- ट्रेनसेट्स ज्या बुलेट ट्रेन सारख्याच असतात त्याची सुरुवात करणार -- गाड्यांचा वेग ११०-१३० पासून १६०-२०० पर्यंत वाढवणार -- लोकल साठी एसी कोचेस -- ४०० स्टेशन वर वाय फाय -- स्टेशन च्या विकासाकरता बिडिंग -- ८०० किमी चे गेज कन्वर्झन -- इ केटरिंग, १०८ ट्रेन साठी सुरु करणार -- वेंडिंग मशीन वाढवणार -- मोबाईल चार्जिंग जनरल च्या डब्यात पण -- जनरल डब्यांची संख्या वाढवणार -- रुळाची लांबी १.३८ लाख किमी पर्यंत नेणार (१०% वाढ) -- बेस्ट operating ratio in nine years, of 88.5 per cent for 2015-16 -- Wagon-making schemeची खासगी गुंतवणुकीसाठी तपासणी करणार -- 7,000 toilet च्या बायो toilet बसवणार -- ६५० स्टेशन मध्ये नवे toilets -- ईशान्य भारतावर लक्ष देणार
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/26/2015 - 09:38 नवीन
रुळाची लांबी १.३८ लाख किमी पर्यंत नेणार (१०% वाढ)
हे कीती दिवसात होणार आहे कारण विकीपिडीआ प्रमाणे , २०११ पर्यंत ही लांबी ६४,४६० किमी होती.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/26/2015 - 10:02 नवीन
"फ्रीबी + त्याच कमी दर्जाच्या अधिक ट्रेन्स + अकाऊंटिग क्लर्कचा रिपोर्ट" या प्रकारचे रेल्वे न ऐकता "स्टेकहोल्डर्सच्या फायद्याचे + प्रवाश्यांना उत्तम सेवा देण्यासाठी ठोस विचार व रोडमॅप असलेले + सतत घाट्यात असलेली रेल्वे स्वयंपूर्ण होण्यासाठी कराव्या लागणार्‍या तरतूदींचा रोडमॅप असलेले" खाजगी क्षेत्रातल्या तज्ञ व्यावसायीक (प्रोफेशनल) मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे वाटावे असे बजेट प्रथमच पाहिले. मला या रेल्वे बजेटकडून ठोस जमिनी कामे होण्याच्या बर्‍याच अपेक्षा आहेत त्याची मुख्य कारणे अशी : १. सुरेश प्रभूंसारख्या मानल्या गेलेल्या तज्ञ रेल्वे मंत्र्याकडून माणसाकडून मांडले गेले. २. फक्त काय करणार याबरोबरच कसे करू याचे विश्वासू रोडमॅप आहे. ३. बजेटमधल्या तरतूदींना वित्त मंत्रालय व पंतप्रधान यांचा पूर्वीपासून जाहीर पाठींबा आहे. ४. विषेशत: उघडपणे इतर वाहतूक (रस्ते व जल) मंत्रालयांना जमेस व बरोबर घेऊन बनवलेले हे बजेट जास्त व्यवहारी आणि उपयोगी ठरण्याची जास्त शक्यता आहे. ५. तिकीटाची किंमत कमी करून (आणि ती नंतर त्यानेच भरलेल्या करातून वसूल करण्याची) वरवर ग्राहकाला खूष करण्याचे काम अनेकदा झालेले आहे. पण, "ग्राहकांचा प्रवास अनुभव" याबद्दलची कळकळ पूर्वी कधी ऐकली नव्हती. हे जेवढे जास्त व्यवहारात आणले जाईल तितके जास्त किंमत भरूनही रेल्वे प्रवास करणार्‍यांची संख्या वाढेल... अर्थात रेल्वेची मिळकत आणि ब्रँड इमेज वाढेल. ६. सर्व मोठ्या खर्चांची टेंडर्सची कारवाई ऑनलाईल ऑक्शनने होणार आहे. रेल्वे सद्या "उत्पन्न+सबसिडी (सरकारी मदत)" याचा ९६% भाग खर्च करते. या ऑक्शनमुळे रेल्वेचा खरेदीचा खर्च कमी होण्याबरोबरच रेल्वेतले सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे कुरण आपोआप बंद होईल आणि नविन सेवांच्या गुंतवणुकीस जास्त पैसा बाकी राहील... अर्थातच रेल्वेचे सबसिडी व कर्जांवंचे परावलंबित्व लक्षणियरित्या कमी होईल. सद्या इतकेच पुरे.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 02/26/2015 - 19:29 नवीन
आज प्रश्नोत्तराचा तास गोंधळात वाहून गेला. शेवटच्या १० मिनिटामध्ये पियुष गोयल यांनी राज्यांना वीज कशी दिली जाईल या प्रश्नावर उत्तरे दिली. १२ वाजता रेल्वेमंत्र्यांनी श्वेत पत्रिका आणि बजेट सादर केले. दुपारच्या सत्रात धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरूच राहिली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 02/26/2015 - 19:31 नवीन
११ वाजता शुन्य प्रहर सुरु झाला. तेव्हा मदर तेरेसा यांच्यासंबंधीच्या वक्तव्यावरून गोंधळ सुरु झाला. थोड्या वेळासाठी सभागृह तहकूब झाले. पुन्हा सुरु झाल्यावर वेगवेगळ्या मुद्द्यावर सदस्यांनी मते मांडली. १२ वाजता प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ब्रिक्स बँक आणि अणु करारावर सुषमा स्वराज यांना प्रश्न विचारण्यात आले. त्याला त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. राजीव गांधी आवास योजनेचे नाव का बदलले असा प्रश्न विचारत व्यंकय्या नायडू यांना घेरण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. हर्ष वर्धन आणि व्यंकय्या नायडू यांच्या अजून एका प्रश्नानंतर प्रश्नोत्तराचा तास संपला. दुपारच्या सत्राची सुरुवात अरुण जेटली यांनी केली. गुलाम नबी आझाद यांच्या धन्यवाद प्रस्तावावरील भाषणाला त्यांनी खणखणीत उत्तर दिले. कॉंग्रेस काही सल्ले देत, चिमटे काढत त्यांचे भाषण सुरु होते. जम्मू काश्मिर मधील निवडणूक, कोल ऑक्शन, फाईनांस कमिशन अश्या विविध मुद्द्यावर त्यांनी मुद्देसूद उत्तरे देऊन सरकारची बाजू मांडली. भूमीअधिग्रहण वटहुकुमावर त्यांनी कॉंग्रेसच्या काळात बनवल्या गेलेल्या कायद्यातील कुणीच आजपर्यंत समोर न आणलेल्या गोष्टी सांगितल्या. (म्हणजे आजपर्यंत च्या टीवी, पेपर मध्ये चालणाऱ्या वादांमध्ये हे मुद्दे मी पहिले नव्हते). त्याबद्दल मिपावर इथे लिहीले आहे. http://www.misalpav.com/comment/669598#comment-669598
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/26/2015 - 20:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सिद्धार्थ ४ गुरुवार, 02/26/2015 - 22:27 नवीन
+१ खरच छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सव्यसाची Fri, 02/27/2015 - 05:28 नवीन
अर्धवटराव आणि सिद्धार्थ ४ - धन्यवाद! काही दिवसांपूर्वी मिपावर ऋषिकेश हा उपक्रम राबवायचे. मागच्या अधिवेशनामध्ये मला हा धागा दिसला नाही म्हणून यावेळी मी इथे सुरु केला. संसद म्हणजे गोंधळ असे जे समीकरण जे झाले आहे ते तसे राहू नये हा एक प्रयत्न आहे. खुप विविध विषयांवरती अतिशय सविस्तर चर्चाही होतात. सरकारला अगदी घेरलेही जाते. बऱ्याच वेळी माध्यमांमधून आपल्याला गोंधळाच्या बातम्या येतात पण एखाद्या खासदाराने २०-२५ चांगले भाषण केले किंवा उत्तम प्रश्न विचारला तर त्याचे पडसाद कुठे दिसत नाहीत. संसद शांत असेल तर खूप चांगले काम करते हे मागच्या २-३ अधिवेशनातून आपण पाहू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रदीप Fri, 02/27/2015 - 10:48 नवीन
पुन्हा निगुतीने सुरू केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Fri, 02/27/2015 - 16:46 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नांची सुरुवात महिला आणि बाल कल्याण मंत्रालयापासून झाली. ट्रेनिंग आणि नोकरीचे कोणते कार्यक्रम राबवले जातात त्यासंबंधीचा प्रश्न होता. दुषित पाण्यासंबंधी सरकारने कोणती पावले उचलली आहेत यासंबंधी आरोग्य मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले. बर्याच ठिकाणी अर्सेनिक आणि फ्लूओराईड मुळे पाणी दुषित झाले असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. तसेच हे सर्व कमी करण्यासाठी पेयजल मंत्रालयाबरोबर काम करू असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. परदेशी कंपन्यांच्या संदर्भात अरुण जेटली उत्तरे दिली. स्वाइन फ्लू च्या संदर्भात आरोग्य मंत्र्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आले व त्याला त्यांनी उत्तरे दिली. वेगवेगळ्या बँकामध्ये असलेल्या रिक्त जागांसंबंधीच्या प्रश्नाला जयंत सिन्हा यांनी उत्तरे दिली. तो प्रश्न बराचसा जन धन वरच थांबून राहिला. १२ वाजता अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्वे सादर केला. त्यानंतर सरकारने आपला पुढच्या आठवड्याचा अजेंडा सदनासमोर ठेवला . सगळेच अध्यादेश पुढच्या आठवड्यामध्ये घेण्याचे सरकारने ठरवल्याचे दिसते आहे. रविशंकर प्रसाद यांनी एक वैयक्तिक निवेदन दिले. त्यांना चुकीचे पद्धतीने क्वोट केले असे म्हणत त्यांनी आपला पक्ष समोर ठेवला. त्यानंतर शुन्य प्रहराला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सदस्यांनी आपली मते, प्रश्न मांडले. विनायक राउत (सिंधुदुर्ग-रत्नागिरी चे खासदार) आणि अरविंद सावंत यांनी मराठी दिनामध्ये मराठी मध्ये भाषण केले. दुपारी २ वाजता काही सदस्यांनी धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला आणि त्याला पंतप्रधानांनी उत्तर दिले. याच्या बऱ्याच बातम्या पहिल्या असतीलच. त्याननंतर धन्यवाद प्रस्तावावर मतदान झाले आणि प्रस्ताव पारित झाला. दुपारच्या सत्रात खाजगी (खासदारांकडून येणारी) विधेयके सभागृहात मांडण्यात आली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sun, 03/01/2015 - 09:27 नवीन
शुन्य प्रहराने दिवसाची सुरुवात झाली. विविध सदस्यांनी आपल्या राज्यातील तसेच देशासमोरील काही प्रश्न मांडले. बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा विषयाला स्मृती इराणी यांनी उत्तरही दिले. TCS मधून लोकांना काढून टाकले जात तेव्हा सरकारने याची दाखल घ्यावी असा एक विषय मांडला गेला. असिड अटक च्या घटना वाढत आहेत आणि सरकारने याकडे लक्ष द्यावे हा मुद्दा जदयुचे सदस्य के. सी. त्यागी यांनी मांडला. रामदास आठवले यांनी स्त्रिया आणि मुलींवर होणार्या अत्याचारासंबंधी सरकारचे लक्ष वेधले. युरियाच्या मुद्द्यावरही सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. मदर तेरेसा यांच्याविषयीच्या वक्तव्याचे पडसादही उमटले. प्रश्नोत्तराच्या तासाची सुरुवात बोगस मतदारांच्या प्रश्नावरून झाली. सुरेश प्रभू यांना खाजगी क्षेत्रातून रेल्वेमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर प्रश्न विचारण्यात आहे. त्याची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. यात प्रश्नोत्तराचे रुपांतर चर्चेत झाले त्यामुळे सभापतींनी परत आठवण करून दिली कि प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा न करता प्रश्नाला फक्त उत्तरे दिली जावीत आणि प्रश्नांचा स्कोप ही वाढवण्यात येउ नये. त्यानंतर २-३ प्रश्न पश्चिम बंगाल आणि राज्यांच्या संदर्भात होते. दुपारच्या सत्रात private member's विधेयके मांडण्यात आली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Mon, 03/02/2015 - 16:28 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी रेल्वे मंत्री, पेट्रोलिअम मंत्री, श्रम मंत्री आणी सांस्कृतिक मंत्र्यांना प्रश्न विचारले गेले. सांस्कृतिक मंत्र्यांना पब्लिक रेकॉर्ड्स कायद्याबद्दल प्रश्न विचारले गेले. वेगवेगळ्या कागदांचे जतन कश्या प्रकारे सुरु आहे याची माहिती मंत्र्यांनी उत्तराच्या स्वरुपात दिली. रेल्वे इलेक्ट्रिफ़िकेशन वरचे प्रश्न हे मतदार संघ लेवल चे असल्यामुळे मंत्र्यांनी बर्याच प्रश्नांना परत उत्तर देतो असे सांगितले. कच्च्या तेलाची चोरी कशी रोखण्यात येईल तसेच पेट्रोलचे साठे शोधण्यासाठीचे संशोधन असे दोन प्रश्न पेट्रोलिअम मंत्र्यांना विचारण्यात आले. शुन्य प्रहारमध्ये मुफ्ती महम्मद सईद यांच्या वक्तव्यावरून बराच गोंधळ झाला. राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर नाखूष होत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे अशी मागणी विरोधी बाकांवरील सदस्यांनी लावून धरली. शेवटी विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्यानंतर शुन्य प्रहराला सुरुवात झाली. सदस्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. कालच झालेल्या अवकाळी पावसावर अध्यक्षांनी ३-४ सदस्यांना बोलण्याची अनुमती दिली. कोर्टांमध्ये हिंदी मध्ये बोलण्याचीही मुभा असावी या विषयावरही काही सदस्यांनी आपले मत मांडले. बरेचसे प्रश्न हे मतदारसंघाशी निगडीत होते. राजीव सातव यांनी गोविंद पानसरे यांच्या अपुर्या सुरक्षेचा मुद्दा उठवला. तो राज्य सरकारच्या अधिकारात येतो असे राजीव प्रताप रुडी यांनी सांगितले. त्यानंतर मोटार वेहिकल दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. कोळसा खाण विधेयक (दुसरा अध्यादेश) आज मांडण्यात आले. त्याच्या सादर करण्यालाच बिजू जनता दलाने विरोध केला. दुपारच्या सत्रात सिटीझनशिप दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली आणि विधेयक मंजूर करण्यात आले. खाण आणि खनिज विधेयकावर चर्चा सुरु झाली आणि ती संध्याकाळपर्यंत सुरूच राहिली.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 03/05/2015 - 07:47 नवीन
दिवसाची सुरुवात शुन्य प्रहराने झाली. जदयुच्या के. सी. त्यागी यांनी मिसिंग चिल्ड्रन या विषयावर मत मांडले. सभागृहातील अनेक सदस्यांनी त्यास अनुमोदन दिले. छत्तीसगड सरकारने रा. स्व. संघामध्ये भाग घेण्यास कर्मचाऱ्यांना मुभा दिली आहे. हा विषय सभागृहासमोर मांडण्यात आला. यावरून थोड्या काळासाठी सभागृहामध्ये गोंधळ माजला.अनिल देसाई यांनी डायलीसीस ची महाराष्ट्रात कशी कमी सोय आहे याबद्दल विचार मांडले. मुफी मोहम्मद सईद यांच्या वक्तव्यावरही सभागृहामध्ये क्रोध व्यक्त करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या तासात विजेच्या शॉर्टज बद्दल विचारण्यात आले त्याला पियुष गोयल यांनी उत्तर दिले. भूमीअधिग्रहणाच्या कायद्यातील 'पुनर्वसन' कमी करण्याचा प्रयत्न सरकारच आहे का असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. दुपारच्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 03/05/2015 - 08:13 नवीन
लोकसभेमध्ये आज पुन्हा एकदा मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या वक्तव्याने गोंधळ झाला. यात प्रश्नकाल वाहून गेला. शुन्यप्रहरामध्ये विविध विषयांवरती सदस्यांनी मते मांडली तसेच आपल्या मतदारसंघातील काही भेडसावणारे प्रश्नही उपस्थित केले. त्यानंतर खाण आणि खनिज विधेयकावर चर्चा पुढे सुरु राहिली. थोड्या वेळाने अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी विमा (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत मांडले. सरकारने अध्यादेश काढला होता त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारने विधेयक आणले. विरोधी सदस्यांनी विधेयक सदर करण्याला आपला विरोध नोंदवला. मुख्य विरोधाचा मुद्दा असा होता: राज्यसभेमध्ये अश्याच प्रकारचे एक विधेयक आधीपासून आहे. तेव्हा लोकसभेमध्ये तसे विधेयक सादर करता येणार नाही. हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी बरेच नियम सांगितले पण सरकारनेही अजून काही नियम सांगत हे करू शकतो असा पलटवार केला. शेवटी यावरती मतदान झाले तेव्हा १३१ विरुद्ध ४५ मतांनी हे विधेयक सभागृहात मांडले गेले. त्यानंतर खाण आणि खनिज विधेयकावरील उरलेली चर्चा व मंत्र्यांचा प्रतिसाद झाला. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनी दुरस्त्या सुचवल्या त्या मतदानाने नामंजूर करण्यात आल्या. शेवटी विधेयक आवजी मतदानाने मंजूर करण्यात आले. त्यानंतर मोटार वेहिकल दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. त्यावर चर्चा झाली आणि सर्वसंमतीने हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर कोळसा विधेयक चर्चेसाठी घेण्यात आले. त्यातील अर्धी चर्चा ३ तारखेला संपवण्यात आली तर उरलेली चर्चा ४ तारखेला करण्याचे ठरवण्यात आले. त्यानंतर शुन्य प्रहर घेण्यात आला. रात्री ८.३० पर्यंत सदनाची कार्यवाही सुरूच होती.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 03/05/2015 - 08:30 नवीन
लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेले विधेयक कसे काय मांडले जात आहे यावर बरीच चर्चा झाली. (ही चर्चा विमा विधेयाकासंबंधी असावी). उपसभापतींनी आपला निर्णय राखून ठेवला. तसेच दुसऱ्या सदनास हे विधेयक मांडण्यास विरोध करण्यासही नकार दिला . त्यानंतर शुन्य प्रहर सुरु झाला. दुपारच्या सत्रात पंतप्रधानांनी धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. प्रस्तावावर मतदान घेताना विरोधी पक्षांनी प्रस्तावात दुरुस्ती सुचवली व ती बहुमताने मंजूर करण्यात आली. ही दुरुस्ती उच्चपातळीवर चालणार्या भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्याबद्दल. खूप कमी वेळा धन्यवाद प्रस्तावावर दुरुस्त्या मंजूर झाल्या आहेत. या दुरुस्तीमुळे सरकारला कोणताही धोका नसला तरी पुढे येणाऱ्या प्रत्येक विधेयकाचा मार्ग राज्यसभेत खडतर असेल हे सरकारला अधिक प्रकर्षाने जाणवले असेल. त्यानंतर पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर चर्चा सुरु झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 03/05/2015 - 08:51 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात झाली. नगरविकास मंत्रालयाने दिलेल्या फंडचा उपयोग केला जातो कि नाही यावर पहिला प्रश्न विचारला गेला. बीएसएनल वर रविशंकर प्रसाद यांनी सविस्तर उत्तरे दिली. त्यानंतर २-३ प्रश्न विचारून प्रश्न काळ समाप्त झाला. १२ वाजता निर्भया माहितीपटावरून सभागृहामध्ये विविध सदस्यांनी आक्रोश व्यक्त केला. त्याला राजनाथ सिंग यांनी उत्तर दिले. ते उत्तर काय होते हे आपण सर्वांनी वाचले असेलच. त्यानंतर विविध सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघाबाबत आणि इतर मुद्द्यांबाबत आपली मते व्यक्त केली. त्यानंतर कोळसा विधेयकावरील चर्चा पुढे चालू झाली. या चर्चेला पियुष गोयल यांनी उत्तर दिले. सदस्यांनी ज्या दुरुस्त्या सुचवल्या त्या फेटाळल्या गेल्या. शेवटी विधेयक मंजूर झाले. त्यानंतर विमा विधेयक चर्चेस घेण्यात आले. २ तासाच्या चर्चेनंतर विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर शुन्य प्रहर घेण्यात आला व सभागृह सोमवार पर्यंत तहकूब करण्यात आले.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 03/05/2015 - 09:10 नवीन
निर्भया माहितीपटावरून वादंग झाला . त्याला राजनाथ सिंग यांनी उत्तर दिले. प्रश्नोत्तराचा तास शांततेत पार पडला. दुपारच्या सत्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा पुढे सुरु राहिली. त्याला कृषीमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यानंतर सिटीझनशिप दुरुस्ती विधेयक चर्चेला घेण्यात आले. त्यास सर्वांची संमती आधीपासूनच होती. तेव्हा ते विधेयक मंजूर करण्यात आले. स्पेशल मेन्शन्स नंतर सभागृह सोमवार पर्यंत तहकूब करण्यात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
श
शलभ गुरुवार, 03/05/2015 - 12:23 नवीन
खूप छान उपक्रम..
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Sun, 03/08/2015 - 06:01 नवीन
येता आठवडा संसदेमध्ये वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी लोकसभेमध्ये भुमिअधिग्रहण विधेयक चर्चेला येईल. यावरून आधीच सर्व पक्षांनी आपली शस्त्रे म्यानातून बाहेर काढली आहेत. विधेयक सादर होतानाच बऱ्याच विरोधी पक्षांनी विरोध केला होता. सोमवारी हे विधेयक चर्चेअंती लोकसभेमध्ये पास होईलही. सरकारने ज्या 'चांगल्या' सुधारणा असतील त्या स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत पण जी दुरुस्ती सरकारने केली आहे त्यावर सरकार किती मागे हटते हे पाहणे रोचक ठरेल. सरकारमधील विविध नेत्यांनी या विधेयकाचे आधीच जोरदार समर्थन केले आहे त्यामुळे सरकार मागे हटायच्या भूमिकेत तरी आहे का हा एक प्रश्नच आहे. याशिवाय अर्थसंकल्पांवरील चर्चा या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यसभेमध्ये खाण आणि खनिज, कोळसा, मोटार वेहिकल विधेयक, विमा इ. विधेयके लोकसभेने पास केलेल्या स्वरुपात येतील. हे सगळे अध्यादेश होते जे लोकसभेमध्ये विधेयकाच्या स्वरुपात मांडण्यात आले. यातील मोटार वेहिकल ला कुणाचा जास्ती विरोध असेल असे वाटत नाही. परंतु इतर विधेयकांवर मात्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सध्या तरी सहमती नाही. त्यातील कोळसा आणि विमा ही दोन विधेयके कश्याही पद्धतीने मतदानापर्यंत आली नाही पाहिजेत हा विरोधी पक्षाचा प्रयत्न असेल. जर मतदान झाले आणि हे विधेयक पास झाले तर सरकारसाठी उत्तमच.पण १. विधेयक पूर्णपणे नाकारले गेले २. विधेयक राज्यसभेत दुरुस्त्यांसकट मंजूर झाले तर क्र. १ मध्ये सरकार ला संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा मार्ग मोकळा आहे. तर क्र. २ मध्ये परत एकदा लोकसभेत जाऊन त्या दुरुस्त्यांवर लोकसभा राजी आहे का हे पाहणे. जर लोकसभेने राज्यसभेत केलेल्या दुरुस्त्या नामंजूर केल्या तर परत एकदा हा पेच संयुक्त अधिवेशनातून सोडवण्याचा मार्ग आहे. संयुक्त अधिवेशनामध्ये सरकारचे लोकसभेत बहुमत असल्याने त्यांना फायदा नक्कीच आहे. हे सर्व होते, जर राज्यसभेत विधेयकावर मतदान झाले तर काय होईल? विरोधी पक्षांना हेच नको आहे. सरकारचे कोणतेही विधेयक बारगळत राहावे अशी त्यांची इच्छा दिसते. त्यामुळे पुन्हा एकवार हि विधेयके राज्यसभेतील समिती कडे सोपवावीत आणि अजून काही दृष्टीकोन जाणून घ्यावेत असा आग्रह विरोधी पक्ष करू शकेल. सरकारला तो नाकारता येणार नाही. जर तो नाकारला तर विरोधी पक्ष असा प्रस्ताव आणून त्यावर मतदान घेऊन ते विधेयक समिती कडे पाठवू शकतात. जोपर्यंत हे विधेयक समितीकडे आहे तोपर्यंत ते राज्यसभेतच आहे आणि त्यामुळे सरकारला संयुक्त अधिवेशनाचा मार्ग मोकळा नाही. सरकार सर्व पक्षांना कमीत कमी विधेयकावरती मतदान करायला तरी कसे आग्रह करते हे पाहायला हवे. त्या मतदानाचा निकाल काहीही असला तरी सरकारला पुढचे मार्ग चोखाळणे सोपे पडेल. याच आठवड्यात राज्यसभेतही अर्थसंकल्पांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. (वरील माहितीमध्ये काही चूक असेल तर कृपया दुरुस्त करा. )
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/09/2015 - 14:41 नवीन
संयुक्त अधिवेशन बोलवण्याबाबतची पद्धती /नियम फारच रोचक आहेत. जरी ते या सरकारसाठी अडचणीचे असले तरी लोकशाही म्हणून ते योग्यच वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Mon, 03/09/2015 - 15:44 नवीन
नक्कीच. संविधानकर्त्यांनी कोणतेही एक सदन अजेंडा रोखून ठेवणार नाही याची तरतूद केली आहे. एखाद्या सदनामध्ये विधेयक ६ महिन्यापेक्षा अधिक काळ राहिले तरीही संयुक्त अधिवेशन घेता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुनील Tue, 03/10/2015 - 03:35 नवीन
एखाद्या सदनामध्ये विधेयक ६ महिन्यापेक्षा अधिक काळ राहिले तरीही संयुक्त अधिवेशन घेता येते.
घेता येते हे ठीकच. पण ते तसे घेण्याची सुचना फक्त सरकारकडूनच यावी लागते की विरोधी पक्षियांनादेखिल करता येते? की, घेता येते म्हणजे घेतले नाही तरी चालते? थोडक्यात, संयुक्त अधिवेशनाचे निकष समजले पण ते घेण्याची पद्धत समजली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Tue, 03/10/2015 - 05:33 नवीन
विकी वर ही पद्धती मला सापडली.
In case of a deadlock between the two houses or in a case where more than six months lapse in the other house, the President may summon, though is not bound to, a joint session of the two houses which is presided over by the Speaker of the Lok Sabha and the deadlock is resolved by simple majority.
राष्ट्रपती हे अधिवेशन बोलावतात. राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करत असल्याने सरकारच हे अधिवेशन बोलावते असे आपण म्हणू शकतो. मला वाटत नाही कि यामध्ये विरोधी पक्षांसी काही सल्लामसलत केली जाते. शिवाय, संयुक्त अधिवेशनामध्ये कोणतेही दुरुस्ती सभासद सुचवू शकत नाहीत. ज्या दुरुस्त्यांमुळे दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले आहेत त्यावर मतदान होते. संयुक्त अधिवेशनात चर्चा होते कि नाही यावर पण शंकाच आहे कारण विधेयक आधीच दोन्ही सभागृहामध्ये चर्चिले गेले आहे आणि कोणतीही दुरुस्तीची शक्यता नाही. असे अधिवेशन घ्यावेच असे बंधन नाही. लोकपाल विधेयकाच्या संदर्भातील टाईमलाइन: (विकी वरून साभार)
The bill was tabled in the Lok Sabha on 22 December 2011 and was passed by the house on 27 December 2011 as The Lokpal and Lokayuktas Bill, 2011. The bill was subsequently tabled in the Rajya Sabha on 29 December 2011. After a marathon debate that stretched until midnight of the following day, the vote failed to take place for lack of time.[13] On 21 May 2012, the bill was referred to a Select Committee of the Rajya Sabha for consideration. The bill was passed in the Rajya Sabha on 17 December 2013 after making certain amendments to the earlier Bill and in the Lok Sabha on 18 December 2013.[11] The Bill received assent from President Pranab Mukherjee on 1 January 2014 and came into force from 16 January 2014.
इथे ६ महिने होऊन सुद्धा संयुक्त अधिवेशन घेतले गेले नाही. माझ्याही बऱ्याच शंका आहेत या ६ महिने कालावधीविषयी: १. जर हे विधेयक एका सदनाने पारित केले आणि दुसर्या सदनात गेल्यावर तिथल्या स्थायी समिती कडे ते विधेयक गेले ज्याचा अहवाल येण्यास ६ महिने अवधी लागला तर तेव्हा संयुक्त अधिवेशन घेता येईल का? २. ६ महिने म्हणजे कॅलेंडर प्रमाणे ६ महिने कि त्या सदनाचे वर्किंग ६ महिने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
साती Tue, 03/10/2015 - 05:54 नवीन
अश्या प्रयत्नांतूनच 'सजग लोकशाही' निर्माण होऊ शकते. विकसित देशांत आपला लोकप्रतिनिधी किती दिवस संसदेत हजर होता, त्याने कुठले प्रश्नं विचारले , काय प्रतिसाद/ भाषणे दिली हे सगळे जाणून घ्यायची सोय असते. त्यावरून आपला प्रतिनिधी 'वर्थ' आहे की नाही हे लोकांना समजते. आपल्या देशातही हे सगळे पाहिजे असल्यास उपलब्धं असते आणि लोकसभा टिव्ही चॅनेलवत तर दिवसभर दिसतेच. पण त्याप्रमाणे विचार करून मतदान करण्याचा, प्रतिनिधी योग्य काम करत नसेल तर मतदारसंघात दबावगट स्थापन करून प्रतिनिधीस जाब विचारण्याचा सजगपणा शक्यतो दिसत नाही. त्यामुळे सगळ्यांना समजेल अश्या शब्दात संसदेची या अधिवेशनातील कार्यवाही मांडण्याचा हा प्रकार खूपच आवडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सुधीर Wed, 03/11/2015 - 13:14 नवीन
धागा आणि जवळजवळ सर्वच प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
सव्यसाची Tue, 03/10/2015 - 10:08 नवीन
प्रश्नोत्तराच्या काळात जम्मू काश्मीर मध्ये एका सेपरेटिस्ट ला सोडण्यावरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सभागृह थोड्या वेळासाठी तहकूब करण्यात आले. जेव्हा सभागृह पुन्हा सुरु झाले तेव्हा १२ वाजता गृहमंत्री निवेदन देतील असे ठरले व प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. रेल्वेच्या विविध प्रोजेक्ट्स संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना सुरेश प्रभू यांनी समर्पक उत्तरे दिली. १२ वाजता काही सदस्यांनी जम्मू काश्मीर मधील परिस्थितीवर मत मांडले आणि गृहमंत्र्यांनी त्यास उत्तर दिले. पंतप्रधानांनीही चर्चेत इंटरवेन केले. त्यानंतर शुन्य काळ सुरु झाला. दुपारच्या सत्रात भुमिअधिग्रहण विधेयकावर चर्चा सुरु झाली. काँग्रेस ने हे विधेयक एकतर बदलूच नये किंवा बदलायचे असेल तर स्थायी समितीपुढे जाऊन बदलावे अशी विनंती केली. तृणमूल च्या सदस्यांनी यास विरोध केला. व्यंकय्या नायडू यांनी या चर्चेत सरकारतर्फे बाजू मांडली. संध्याकाळी ६ नंतरही चर्चा सुरूच होती.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Tue, 03/10/2015 - 10:08 नवीन
राज्यसभेत पहिला तास दोन मुद्द्यांनी गाजला. जम्मू काश्मीर मधील परिस्थिती आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी दिलेली मुलाखत. पूर्ण दिवसाचे कामकाज रद्द करत हा विषय चर्चेला घ्यावा अशी मागणी केली गेली. जवळजवळ पूर्ण तास गोंधळाच्या परीस्थितीत गेला. शेवटी गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री उत्तर देतील असे सांगण्यात आले. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. दुपारच्या सत्रात गृहमंत्र्यांनी आणि परराष्ट्रमंत्र्यांनी उत्तर दिले. राज्यसभेमध्ये मंत्र्यांनी निवेदन दिल्याबद्दल त्याबद्दल स्पष्टीकरण विचारण्यात येतात. यावेळीही बऱ्याच सदस्यांनी बरेच प्रश्न विचारले. त्याला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. सुषमा स्वराज यांनाही प्रश्न विचारले. त्यांनी यथायोग्य उत्तरे दिली. राज्यसभेत पंतप्रधान का बोलले नाहीत म्हणून विरोधकांनी गोंधळ सुरु केला. शेवटी सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
क
कपिलमुनी Tue, 03/10/2015 - 15:07 नवीन
आपले मा. पंप्र तीन दिवसांच्या परदेशी दौ-यावर रवाना झाले आहेत म्हणून विचारले .
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Tue, 03/10/2015 - 15:49 नवीन
अधिवेशन ८ मे ला संपणार आहे. मला वाटते , बरेच मंत्री विविध दौऱ्यावरती जात असतात कारण ते दौरे बरेच आधीपासून ठरलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Tue, 03/10/2015 - 15:07 नवीन
आपले मा. पंप्र तीन दिवसांच्या परदेशी दौ-यावर रवाना झाले आहेत म्हणून विचारले .
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 03/10/2015 - 16:00 नवीन
अतिशय चांगला उपक्रम. आभार!
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 03/11/2015 - 08:06 नवीन
प्रश्नोत्तराच्या तासात मंत्र्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. प्रिझन रीफॉर्म बद्दल च्या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी उत्तरे दिली. नागालँड मधील जमावाने केलेल्या हिंसाचाराचाही मुद्दा मांडण्यात आला. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी कोणती कारवाई केली जात आहे याबद्दल सरकारला विचारण्यात आले. वेगवेगळ्या पीएसयु कंपन्यांना रिवाईव कसे करण्यात येईल या संबंधीचे प्रश्न अनंत गीते यांना विचारण्यात आले. कृषी मेला आणि शेतीसाठीची योजना याबद्दलचे प्रश्न कृषिमंत्र्यांना विचारण्यात आले. शुन्य प्रहरामध्ये सदस्यांनी आपल्या मतदार संघाशी तसेच देशातील इतर घडामोडींशी संबंधित मुद्दे मांडले. दुपारच्या सत्रात भूमीअधिग्रहण विधेयकावर चर्चा सुरु झाली. संध्याकाळी यावरती मतदान झाले. सरकारतर्फे ९ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. त्या आवजी मतदानाने मंजूर झाल्या. शिवेसेनेने तटस्थता स्वीकारली तर बिजू जनता दल, अण्णा द्रमुक तसेच शिरोमणी अकाली दल यांनी सरकारसोबत मतदान केले. काही वेळानंतर बिजू जनता दलाने सभात्याग केला. शेवटी काँग्रेसनेही सभात्याग केला व विधेयक मंजूर झाले.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 03/11/2015 - 08:28 नवीन
संपादकांना विनंती: तारीख १०-३-२०१५ करू शकता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची Wed, 03/11/2015 - 08:59 नवीन
वेगवेगळ्या नियामांवरून कसे वाद आणि प्रतिवाद केले जातात हे पहायचे असेल तर या दिवसाच्या राज्यसभेचे कामकाज पाहावे लागेल. सरकारच्या कामकाजामध्ये ३ विधेयके मंजूर करायचे होते. तेव्हा विरोधी सदस्यांनी मुद्दा काढला कि विधेयकाला वेळ अ‍ॅलॉट केला गेला नाही आणि विधेयक आज चर्चेला येत आहे. पॉइंट ऑफ ऑर्डर नुसार हा मुद्दा मांडला. बराच वेळ चर्चा झाली विधेयक चर्चेला आले कि पाहू असे ठरले. त्यानंतर एका नोटीस वर चर्चा सुरु झाली. ही नोटीस होती आजचे कामकाज रद्द करून जम्मू काश्मीर चा मुद्दा चर्चिण्याची. परंतु कालच हा मुद्दा चर्चिला गेला आहे असे सांगत सरकारने विरोध केला. त्यानंतर शरद यादव यांची अशीच एक नोटीस सभापतींनी शुन्य प्रहराच्या नोटीस मध्ये बदलली. तर असा कोणता नियम आहे ज्यानुसार हे झाले यावर पण थोडा वेळ चर्चा झाली. शेवटी शुन्य प्रहर सुरु झाला. १२ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरु झाला. दुपारच्या सत्रात खाण आणि खनिज विधेयक चर्चेला येणार होते. परंतु स्थायी समिती कडे हे विधेयक गेले नाही तेव्हा आता सिलेक्ट कमिटी कडे जावे अशी मागणी बऱ्याच पक्षांनी केली. त्याला अरुण जेटली यांनी उत्तर दिले. ही विधेयके अध्यादेश असल्याने लवकरात लवकर पास केली नाहीत तर काही परिणाम होतील. कोळसा विधेयकाच्या संदर्भात त्यांच्या मते राज्यांना पैसा देण्याचे प्रावधान याच अध्यादेशात आहे. जर हा अध्यादेश मंजूर नाही केला तर राज्यांना पैसा जाणार नाही. तसेच लाखो कामगार ३१ मार्चला खाणी बंद होतील तेव्हा बेरोजगार होतील. तेव्हा हे अध्यादेश सिलेक्ट समिती कडे पाठवू नयेत. आनंद शर्मा यांनी विचारले कि २०१० च्या कायद्यामध्ये पण लीलाव होताच तेव्हा या अध्यादेशाची गरज काय. तेव्हा अरुण जेटली यांनी गरज सांगताना दिलेले उत्तर:
I am very grateful to Mr. Anand Sharma, and I will just point out the inadequacy in the 2010 Act, and the situation which was created. It can’t be anybody’s intentions, certainly not yours or your party’s, that electricity production in this country suffers. Nobody can have a vested interest in keeping India backward, and, therefore, this procedure has to be expedited. Now, the fallacy in your argument is this. The auctions could have gone on. But how does the land beneath which the mineral is located gets vested in the new person who succeeds in the auction? The 2010 Act had no provision
पण सिलेक्ट कमिटीकडे जायाचेच आहे असे विरोधी पक्षांना वाटत होते. सिलेक्ट कमिटी कडे जायचे असेल तर एका दुरुस्तीच्या माध्यमातून हे केले जाते. हि दुरुस्ती काल विरोधी पक्षांनी सुचवली. त्यानंतर वाद सुरु झाला कि ही दुरुस्ती चर्चेआधी मतदानाला घ्यायची की चर्चेनंतर. विरोधी पक्षांच्या मते, ही दुरुस्ती पहिल्यांदा मतदानाला घेतली पाहिजे कारण जर ही दुरुस्ती मंजूर झाली तर चर्चा सिलेक्ट समिती मध्ये होईल आणि इथल्या चर्चेला अर्थ राहणार नाही. तर सरकारच्या मते, कुठल्याही अश्या दुरुस्तीवर चर्चा झाल्याशिवाय मतदान करता येणार नाही कारण चर्चेमधून आम्ही इतर सदस्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. या सगळ्या आदानप्रदानामध्ये २ तास गेले. शेवटी असे ठरले कि अर्धा तास विधेयकाच्या उद्देशावर चर्चा होईल त्याला मंत्री उत्तर देतील आणि हि दुरुस्ती मतदानाला टाकली जाईल. तेव्हा विरोधीपक्षनेते असे म्हणाले कि आम्ही काही यावर भाषण देणार नाही जोपर्यंत यावर मतदान होत नाही. तेव्हा भाजपा आणि त्यांच्या मित्रांनी चर्चेला सुरुवात केली. हळू हळू सगळ्याच सदनाने चर्चेत भाग घेतला. भाजपच्या सदस्यांनी बराच वेळ भाषणे दिली. शेवटी मतदानाची वेळ आली. अरुण जेटली यांनी अजून एक मुद्दा मांडला. १९५२ ते १९५५ च्या मधील एक रुलिंग त्यांनी वाचून दाखवले. त्यानुसार ज्या सदस्यांचे नाव सिलेक्ट समितीवर सुचवले आहे, त्या सदस्यांना या दुरुस्तीवर बोलता येत नाही. डॉ. आंबेडकर यांना,त्या वेळी, समिती कि भाषण असा पर्याय देण्यात आला. आजच्या दुरुस्तीवर काही सदस्य बोलले ज्यांचे नाव त्या दुरुस्तीमध्ये सिलेक्ट समितीचे सभासद म्हणून सुचवले आहे. तेव्हा हि दुरुस्ती infructuous आहे. तेव्हा सरळ विधेयक मतदानाला घेण्यात यावे. त्याला व्यंकय्या नायडू यांनी पुस्ती जोडली कि ज्या सदस्यांची नावे देण्यात आली आहेत त्यात सरकारी पक्षाचे प्रतिनिधी नाही. जर ही दुरुस्ती पारित झाली तर bad precedent तयार होईल. विरोधी पक्षांनी आजच मतदान घ्या असे सांगितले. शेवटी व्यंकय्या नायडू यांनी सिलेक्ट कमिटी मध्ये जाऊन वेळेचे बंधन राखत या विधेयकावर चर्चा व्हावी असे मत मांडले. त्याची वेळमर्यादा आणि सदस्य कोण असावेत यावर उद्या चर्चा करू असे सांगत सभागृह तहकूब झाले.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 03/11/2015 - 12:41 नवीन
कोळसा विधेयक आणि खाण व खनिज विधेयक सीलेक्ट समितीकडे पाठवण्यात आले आहे आणि याची वेळमर्यादा ७ दिवस ठेवली गेली आहे. (१८ मार्च पर्यंत रीपोर्ट सादर केला जाईल).
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची गुरुवार, 03/12/2015 - 15:15 नवीन
साक्षरतेवरतीच्या प्रश्नाने सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे कट्टरपंथी होणे यावर दुसरा प्रश्न विचारला गेला. हे दोन्ही प्रश्न सुरु असताना अध्यक्षांनी हस्तक्षेप करत प्रश्नाची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करणारे प्रश्न रोखण्याचा प्रयत्न केला. अणुभट्ट्यामधील कचरा या संबंधीचे काही प्रश्न विचारले गेले. जितेंद्र सिंह यांनी त्यांना सविस्तर उत्तरे दिली. गरिबांसाठीची घरे यावरही प्रश्न विचारण्यात आले. आपल्या राजदूतांशी होत असलेल्या वाईट व्यवहाराबद्दल परराष्ट्र मंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले. सुषमा स्वराज यांनी सविस्तर उत्तरे दिली. त्यानंतर शुन्य प्रहर सुरु झाला. शुन्य प्रहरानंतर रेल्वेच्या बजेट वर चर्चा सुरु झाली. ती संध्याकाळपर्यंत सुरुच होती.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा