Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रुसलेले शब्द

ज — ज्योति अळवणी, Mon, 02/23/2015 - 19:04
शब्द माझ्यावर रुसलेत... बहुतेक कोप-यात लपलेत. शोधून त्यांना दामले; मीच फ़ुरगटुन बसले! वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... वाट पाहून थकले; ते अजुनही लपले. लिहायची होती एक शायरी... निदान एक इटकुली नज्म तरी.. बहुतेक त्यांना वाटल... हिला जमणार कुठल? त्यांच ही बरोबरच आहे; नज्म-शायरी... अपना बस कुठे? नाद मी सोडून दिला... शब्दांनी परत हात दिला!

प्रतिक्रिया द्या
2824 वाचन

💬 प्रतिसाद (16)
आ
आनन्दिता Mon, 02/23/2015 - 19:11 नवीन
तुमची केकता कपुर झालिये हो... तीन तीनदा रुसलेले शब्द !!!! रुसलेले शब्द!! रुसलेले शब्द !!!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 02/23/2015 - 19:17 नवीन
माफ़ करा. अपलोड नव्हती होत कविता बराच वेळ. आणि मग काहीतरी गड़बड़ झाली.. अचानक 3 वेळा अपलोड झाली.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 02/23/2015 - 19:26 नवीन
दामले यांची कविता आवडली.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Mon, 02/23/2015 - 19:29 नवीन
फ़ुरगटुन
जीवन दामले का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
वेल्लाभट Tue, 02/24/2015 - 06:35 नवीन
शोधून त्यांना दामले;
हे दामले म्हणजे कोण? असो गंमत होती ही. कविता छान आहे, भाव आवडले. (कवितेतले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
य
यसवायजी Mon, 02/23/2015 - 19:54 नवीन
वाटल येतील सोबतीला... फुगा फोडतील मनातला... व्वा व्वा!! अतिशय सुंदर रचना. syg- नाद मी सोडून दिला... :))
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 02/24/2015 - 02:14 नवीन
हे राम ... नै नै ---- हेय राम *biggrin* शब्दांनी परत हात दिला का? का? *unknw* * *DONT_KNOW* :HZ: :hz:
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Tue, 02/24/2015 - 02:56 नवीन
तुमच्यावरा रुसलेले शब्द शोधायला दामले का आले ? इथंच अडलंय
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Tue, 02/24/2015 - 07:11 नवीन
इथेतिथे शब्दांनी एवढं दमवूनही तुमच्या अबाधित राहिलेल्या निर्मितीशीलतेचं खरंच कौतुक वाटतं!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/24/2015 - 07:19 नवीन
हल्ली दर दोन दिवसा आड होते का(कविता)?
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Tue, 02/24/2015 - 14:33 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मोहनराव Tue, 02/24/2015 - 15:43 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Tue, 02/24/2015 - 11:58 नवीन
लेले आणि दामले यांचं काहीतरी दिसतंय!!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Tue, 02/24/2015 - 15:49 नवीन
वाईट वाटले काही प्रतिसाद वाचून. मान्य आहे अनेक मेंबर्स एकमेकांना अगोदर पासून ओळखतात. पुणेकर असल्याने भेटी देखील होतात... चेष्टा होणारच नविन लेखक/कवी यांची आणि त्यांच्या लेखनाची. परंतु इथे काही प्रमाणात वैयक्तिक बोलले गेले. कदाचित यावर तुम्हा मी पा करांचे म्हणणे असेल की आम्ही तुम्हाला आमंत्रण दिले नव्हते. चालायचेच. फ़क्त इथले प्रतिसाद वाचून वाईट वाटले ते सांगावेसे वाटले.
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 02/24/2015 - 16:36 नवीन
लक्ष नका देऊ... पण म्हणजे हळुहळू मिपाकरांचा अंदाज येतोय तर.. ! चिकाटी सोडू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 02/24/2015 - 16:42 नवीन
@ज्योती अलवनि तुम्हाला वाईट वाटावं अश्या उद्देशानी एकही प्रतिसाद इथे लिहिलेला नाही. तुम्हास राग आला असल्यास क्षमस्व. आमची आमची अशीचं मस्ती नियमित चालते. त्यात तुम्हीही सगळे सं.मं,च्या डोक्याला त्रास नं देता सामिल झालात तरं आनंदचं होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा