अस्वस्थ!!
कुणी असं कुणासाठी का वेडं व्हावं ??
कुणासाठी कुणाचं जगणं अस थोडं व्हावं ….
धरणीने पावसाची इतकी वाट पहावी
भरभरून कोसळण्याची त्यालासुद्धा इच्छा व्हावी …
एकटं आकाश पसरत जातं निळ्याशार पाण्यावर
तुझी आठवण वाहत येते कातरवेळी वाऱ्यावर …।
तू म्हणतेस कोण आहे असं आयुष्याला पुरणारं
आहे कुणीतरी तुझ्यासाठी जळून पुन्हा उरणारं
💬 प्रतिसाद
(1)
श
शब्दबम्बाळ
Sat, 02/28/2015 - 21:35
नवीन
मनापासून लिहिलीये! :)
- Log in or register to post comments