Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रेल्वे अर्थसंकल्प

व
वेल्लाभट
गुरुवार, 02/26/2015 - 09:58
🗣 55 प्रतिसाद
आज श्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री, यांनी २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्वाच्या तरतूदी इथे टाकत आहे. - प्रवासी भाड्यांमधे कुठलीही वाढ नाही. (अर्थात अंतरिम अर्थसंकल्पात केली होती.) - १७००० शौचालये बायो-शौचालयांत रुपांतरित होणार - १३८ नंबरची रेल्वे चौकशीची दूरध्वनी सेवा १ मार्च पासून पुनरुज्जिवित होणार - प्रवाशांच्या तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप बनविणार - ऑपरेशन ५ मिनिट्स. अनारक्षित तिकीट मोबाईलद्वारे ५ मिनिटात काढता येणार. - टीटीईंकडे हँडहेल्ड उपकरण. इ-तिकीट पेपरलेस होणार. - गाडीच्या वेळेसंदर्भात प्रवाशांना एसएमएस अलर्ट येणार. (ही अतिशय स्वागतार्ह सेवा असेल माझ्यामते) - अपंग, वृद्ध यांसाठी अद्ययावत सेवा. - ठराविक गाड्यांमधे २४ ते २६ डबे. अनारक्षित डब्यांची संख्या वाढवणार. - ४०० स्थानकांवर वाय-फाय - पुढच्या ५ वर्षांत रेल्वेमधे ८.५ लक्ष कोटींची गुंतवणूक - नवीन भागीदारी करारांतून दूरगामी आर्थिक परिस्थितीचं बळकटीकरण तसेच, आधुनिक मूलभूत सेवा - ठराविक मार्गांवर महिला डब्यांत सीसीटीव्ही - ए१ वर्गाच्या स्थानकांना वायफाय - प्रवासी सुविधांना ६७% अधिक निधी - १० प्रमुख शहरात सॅटेलाईट रेल्वे टर्मिनल - गेल्या वर्षात रेल्वेच्या विधुतीकरणामधे १३३०% वाढ. - स्वच्छ रेल स्वच्छ भारत - स्वच्छतेला प्राधान्य - मुंबई - दिल्ली व मुंबई - कोलकाता प्रवास एका रात्रीत होणार - इस्रो च्या सहभागातून ३४३८ रेल्वे क्रॉसिंग काढून टाकणार - तांत्रिक क्रांतीसाठी 'कायाकल्प' ची घोषणा - २००० कोटींचा कोस्टल कनेक्टिविटी प्रोग्रॅम - कुठल्याही नवीन गाड्यांची घोषणा नाही. माझ्या मते तरी हे एक अतिशय संतुलित रेल्वे बजेट आहे आणि ठरावं. उगाच एवढ्या नवीन ट्रेन तेवढे नवीन मार्ग पेक्षा यात पायाभूत सुविधांकडे संपूर्ण लक्ष दिलेलं आहे. आपले विचार काय?

प्रतिक्रिया द्या
14609 वाचन

💬 प्रतिसाद (55)
स
सुधीर Fri, 02/27/2015 - 17:10 नवीन
येत्या पाच वर्षात ८ ट्रिलिअन रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकी १ ट्रिलिअन हे येत्या आर्थिक वर्षात खर्च होणार आहेत. या १ ट्रिलिअन मधल्या ४०% रकमेची बजेट मधून तर १७% रकमेची रेल्वे अंतर्गत व्यवहारातून तजवीज होईल. बाकी पैशांपैकी १७% EBR (Extra-Budgetary Resources) मधून आणि ५% पीपीपी मधून उभे केले जातील तर उरलेले १७% तूट (Shortage) असेल. पण ते नेमके कसे उभे केले जातील यावरच्या ठोस प्लानची अनभिज्ञता आहे. दुसरं म्हणजे प्रवासी भाडेवाड न करता प्रवासी भाड्यातून मिळणार्‍या उत्पन्नात १७% वाढ होईल असं गृहीत धरले आहे. कदाचित त्यामुळे मार्केटने निगेटीव्ह सिग्नल दिला असावा असं काही तज्ञांना वाटतं.
  • Log in or register to post comments
स
साधा मुलगा Fri, 02/27/2015 - 17:28 नवीन
तिकीट आरक्षण आता २ वरून चार महिन्यांवर नेले आहे. हे जरा अति वाटते. दोन महिने संतुलित काळ होता. आता गणपतीचे तिकीट मे महिन्यातच फुल होणार.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 02/27/2015 - 17:35 नवीन
मी आत्ताच रिमांयडर मॉडिफाईड केला.. गणपतीत आम्हा चाकरमान्यांची सेकंदाची लढाई होते तिकीट बुक करताना. मे महिन्यात बुक करावी लागेल. १५-१७ दरम्यान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा
र
रॉजरमूर Fri, 02/27/2015 - 19:08 नवीन
हेच जर सांगायचे होते तर बजेट चा सरंजाम कशाला मांडला ? सरळ प्रेस नोट रिलीज केली असती ना कशाला उगीच लोकांचा आणि मिडिया चा वेळ वाया घातला . नव्या गाड्यांची घोषणा ह्याच अधिवेशन सत्रात करू म्हणाले मग आताच करायला काय हरकत होती पोस्ट बजेट interview मध्ये प्रभू म्हणतात की नवीन गाड्या , नवीन प्रोजेक्ट, नवीन मार्ग , सर्वे या सगळ्याची माहिती देत बसलो असतो तर सदनाचा एक दीड तास वाया गेला असता शेवटी लोकांना उत्सुकता याच गोष्टींची असते ना . मग लागले त्यासाठी २-३ तास तर हरकत काय ? आणि ते लागणार हे गृहीत धरूनच लोकं आणि मिडिया तयारीनिशी बसलेले असतात ना ? मग हे ह्या बाकीच्या टेक्निकल आणि मेंटेनन्स च्या गोष्टी सांगण्यात एक दिड तास का वाया घातला ? प्रेस नोट दिली असती दुसऱ्या दिवशी वाचली असती पेपर मध्ये . यात वाय फाय , biotoilet या घोषणा जुन्याच आहेत . सगळ्यात जास्त कहर म्हणजे ARP (advance reservation period ) ६० वरून १२० दिवसापर्यंत नेला . दलालांचे काळा बाजारीचे हास्यास्पद कारण दिले गेले . बरं ह्याच कारणाकरिता मागील बजेट मध्ये ARP १२० वरून ६० दिवसापर्यंत आणला होता . म्हणजे दरवर्षी यांचे नॉर्म्स बदलतात कि काय . ? किती लोक ४ महिने आधी प्रवासाचे नियोजन करतात ? आता सगळे दलाल हि तिकिटे आधीच दाबणार आणि सरतेशेवटी लोकांना महागडी तत्काळ तिकिटे प्रिमिअम रेट ने घ्यावी लागतील त्यामुळे रेट न वाढवता सगळ्या गाड्यांची तत्काळ तिकिटे प्रिमिअम करण्याचा डाव रेल्वे ने आखला आहे. ह्या तिकिटांची किंमत तत्काळ पेक्षा तीन चार पटीने महाग असतात म्हणजेच हि वेगळी लूट आता सुरु केली आहे . इतके नीरस बजेट आयुष्यात पहिल्यांदाच बघितले आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 02/28/2015 - 09:01 नवीन
शेवटी ब्रिटीश सिक्रेट एजंट म्हणतोय म्हणजे बरोबरच असणार. असा पण ह्या रेल्वे बजेटात आमचा धुळे-मनमाड का काय्तो त्याला एकबी रेल्वे नाय घोषली. सुरेश ने तोंडाला कापसाची/ऊसाची पाने पुसली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रॉजरमूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा