चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला
गर गर फिरणारा भोवरा.. बनुन बघायचय मला
भरारणारा तो पतंग- त्याची ती उंची;
वा-याशी दोस्ती काटाकाटीची मस्ती...
वेगळच जगण अनुभवायचय मला!
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
Born clerk... died clerk सगळेच असतात;
वेगळा option click फ़क्त थोडेच करतात;
त्या थोड्यांमद्धे रहायचय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
White color job आपला फंडा नाय...
कोप-यावरच्या पक्याचा रुबाबसुद्धा जमत नाय..
एक वेगळ आयुष्य जगायचय मला...
काय अन् कस कोणी सुचवतय का ज़रा?
I.A.S., I. P.S. किंवा एखादा BUSINESS,
10 वि, 12 वि च्या result मूळे आई बाबा expects...
यासर्व अपेक्षांपासून दूर जायचय मला...
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
झटपट यश... भरपूर प्रसिद्धि...
'डी' gang ची सर्वानाच भिती...
करू का try थोड? चाकोरीच्या बाहेर येण...
Visky अन् rum च्या सोबतित धुंद होण...
कुणाशीतरी हे सगळ discuss करायचय मला..
चाकोरिबद्ध आयुष्य नकोय मला!
नकोच जगुस चाकोरीबद्ध...
आयुष्य जगावच धुंद धुंद...
चल तुला करवते एक वेगळी सैर;
चाकोरीच्या बाहेर उजाडलेली जशी एकच तिमिर!
धुंद निसर्ग धुंद नशा...
Canvasवर उतरवून रंग.. बदलून टाक दिशा.
निशब्द गुंफा, बोलकी स्कल्पचर्स...
Archaeology मधे आहेत चाकोरी बाहेरची features...
जगाचा प्रवास कर; प्रवासाचा picture कर...
दिसणा-या प्रत्येक आश्चर्याचा
मनापासून आदर कर...
हे सुद्धा वेगळच आहे; चाकोरी बाहेरचच् आहे...
तू वेगळा विचार करतोयस; यातच आयुष्याच गमक आहे.
कळतिये ग आई मला तुझ्या विचारांची दिशा...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याच्या तिमिराची नशा...
माझ्यात सामावलेल्य़ा तुझ्या प्रतिबिम्बाला हलवणार नाही...
चाकोरी बाहेरच्या आयुष्याला
गालबोट लावणार नाही!!!
💬 प्रतिसाद
(63)
क
कंजूस
Sat, 02/28/2015 - 10:17
नवीन
आम्ही पाचगणीला गेलो होतो त्यावेळची आठवण झाली धाब्यावर पोहे खाताखाता थोडे चिमण्यांसाठी अंगणात टाकले चिमण्यांच्या डोक्यावरचे तुरे पाहून आश्चर्य वाटले. तिकडचा एक माणूस म्हणाला चिमण्या नाहीत या. हे आहेत कैप्टनजैकस्काइलार्क.
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 02/28/2015 - 10:24
नवीन
नवौन्मेषी साहित्यकांना भाकड प्रतिसादप्रभूंचा आणि मिपा लेखकूंचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या प्रतिसादप्रभूंचा, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर घराच्या उंबर्यापासून उसगावापर्यंत वाचकांना पोहचवून देऊ शकते. वाचकांच्या (का याचकांच्या) सवंग लोकप्रियतेची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे काढे नवौन्मेषी साहित्यकांना लोकभक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही नवौन्मेषी साहित्यकांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना दोन साहित्यप्रसवात (हो साहित्यच उगा गैरसमज नको) योग्य अंतर ठेवायला सांगतो , दुसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना अर्थपूर्ण आणी अ-पाल्हाळीक लिहायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना प्रतिसादावर चिंतन आणि जमले तरच मनन करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा नवौन्मेषी साहित्यकांना ललीत लेखन कसे करावे हे शिकवू पाहतो. त्यामुळे नवौन्मेषी साहित्यक गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने नवौन्मेषी साहित्यकांना ते वापरायचा प्रयत्न केल्यास नवौन्मेषी साहित्यकंची उर्मी आणि उर्जा दबली जाते. (त्या दबलेल्या साहित्याचा सर्वांनाच त्रास होतो ते वेगळे)
त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या प्रतीसदाखाली क्षुब्ध नवकविता टंकली पाहिजे जेणेकरून निदान प्रतीसाद तरी बंद होईल. साहित्य स्फुरत असेल तर स्फुरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. नवौन्मेषी साहित्यकांना तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त नवौन्मेषी साहित्यक विस्मृतीत जावा म्हणून मिपा वाचकीय पातळीवरून होणार्या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. नवौन्मेषी साहित्यक स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त नवौन्मेषी साहित्यकाचे धाग्यावरून उठा. तुम्ही साहित्यकाचे धाग्यावरून उठलात तर नवौन्मेषी साहित्यक स्वतःच स्वतःचा (बहिर्गमनाचा) मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.
सोप्पी सुचवणी
चिट(क्)वणीस भसभसा
भरताड
साहित्याचा
भरमार
साठा
नवौन्मेषी साहित्यकांच्या हिताची आभासी काळजी घेणारी एक्मेव संघटना
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 02/28/2015 - 10:54
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sat, 02/28/2015 - 11:04
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 02/28/2015 - 13:02
नवीन
काही लोकांनी लिहिलेल्या उत्तम साहित्यावर केवळ ५-१० प्रोत्साहनाच्या प्रतिक्रिया दिसतात पण काही प्रमाणात हुकलेल्या(आपापल्या मतांनुसार) कवितांवर मात्र प्रतिक्रियांचा पाऊस पडतो! काही लोक लिखाणात सुधारणा होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात हे सोडले तर बर्याच अंशी, साहित्यावर हर प्रकारे माराच होत असतो. थोडाफार विनोद असावा पण इतका कि त्यामुळे लेखक/कवीने खजील होऊन लिखाणच बंद करावे असे इथे कोणाचे मत नसेल…
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Sun, 03/01/2015 - 08:44
नवीन
अजाबात न्हायी, तसं मत अजाबात न्हायी...
पण मिपाच्या मेंबरानं सवताचं लिखान आसं रतीब घातल्यासारकं घालन्याबरोबरच इतरांचंपन कायतरी वाचावं, त्यावर आपलं कायतरी आधिक-उनं मत द्यावं आशीबी अपेक्षा आसतेय ना मालक?
त्ये नाय आन काय नाय वगीच आपलं येकापाठोपाट येक जिल्बी काढीत रायलं आनि ती बी आळ(व)नि तर मंग पब्लिक पन कावनार नाय तर काय! बाकीच्या सौस्थळांचं काय आसंल त्ये आसो पन मिपाकर च्यामारी हितं खुद्द मिपाच्या मालकांशी राडा घेत्यात त्ये काय हेंच्यासाटी फकस्त टाळ्या मारनार काय!!! :)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 03/01/2015 - 08:54
नवीन
१००% हाणु'मोदन :-)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 02/28/2015 - 13:17
नवीन
हा इशारा देखील शिग्रेट फुकल्यास आयुष्यास मुकल्यास तुपला तू जबाबदार अशा सारखा वैधानिक आहे की काय ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 02/28/2015 - 13:39
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 02/28/2015 - 12:48
नवीन
वारले वाचुन.पुढच्या जन्मी भसाभसाची मेंबर्शीप द्या बरं का _/\_
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 02/28/2015 - 12:50
नवीन
कवितेत मांडलेली मन:स्थिती हरेक तरुणाईची असते...पण पुढे व्यवहार इतका येतो, कि वेगळे काय अन कसे जगायचे हा प्रश्न छळत राहतो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 02/28/2015 - 15:09
नवीन
दुखणाइत हा जळे दिवा।
खोकत खोकत काजळ ओकत।
दुखणाइत हा जळे दिवा ॥
कोणाची बरं ही कविता ?
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 03/01/2015 - 08:26
नवीन
चला जुने दिवस परत आले म्हणायचे. मध्यंतरीच्या काळात काही मजा येत नव्हती.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2