नये
इतके गप्पिष्ट असू नये, माझ्यापाशी बसू नये
हातामध्ये हात घेउनी , नशीब माझे पाहू नये
इतके वेल्हाळ असू नये, माझ्यादारी येऊ नये
नजरेमध्ये नजर मिसळून, ठाव माझा घेऊ नये
इतके जिवलग असू नये, माझ्याठायी वसू नये
श्वासामध्ये श्वास रोधून, अंत माझा पाहू नये
इतके मैत्र असू नये, माझ्याइथे उरू नये
आज आहे, उद्या नाही, नाते माझे जोखू नये !
💬 प्रतिसाद
(4)
ए
एस
Sat, 02/28/2015 - 15:03
नवीन
खूप छान कविता!
फक्त कळाली नाही.
- Log in or register to post comments
श
शिव कन्या
Sat, 02/28/2015 - 15:38
नवीन
न कळूनही छान ?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 02/28/2015 - 15:11
नवीन
ठिक.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 02/28/2015 - 17:30
नवीन
शब्दांची जरा गुंतागुंत झालीय
नाहीतर मस्त आहे
- Log in or register to post comments