Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अवेळी असे मेघ दाटून येता.....

च — चुकलामाकला, Sat, 02/28/2015 - 14:11
अवेळी असे मेघ दाटून येता जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे. जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे..... कितीदा पडावे, कितीदा वहावे धडे अनुभवांचे किती साठवावे. किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा किती चातकाने मना समजवावे .... पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... अवेळी असे मेघ दाटून येता मनाच्या नभाला जरा आवरावे....

प्रतिक्रिया द्या
4540 वाचन

💬 प्रतिसाद (21)
भ
भिंगरी Sat, 02/28/2015 - 14:22 नवीन
मनाच्या नभाला कसे आवरावे?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 02/28/2015 - 15:00 नवीन
तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि'प्त आठवणी दाटून आल्या... :-) (कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/28/2015 - 15:11 नवीन
कविता ज्याम आवडली... आताही बाहेर नभ दाटून आले आहेत आणि पाऊस सुरू आहे. कविता एकदम समयोचित झाली.)
>>> शत प्रतिशत सहमत! :Happy:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस Sat, 02/28/2015 - 15:00 नवीन
मस्त गेय आणि सुमधुर कविता.
  • Log in or register to post comments
प
पलाश Sun, 03/01/2015 - 08:09 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अजया Sat, 02/28/2015 - 16:31 नवीन
सुरेख कविता.बाहेर अवेळी पाऊस पडतोय आणि समोर तुमची कविता!जीयो!!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sat, 02/28/2015 - 16:49 नवीन
छान लयबद्ध झालीये. आजच लिहीलीत का? आजही अवेळी पाऊस आलाय म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 02/28/2015 - 17:54 नवीन
हो आजच लिहिलिय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
इ
इन्दुसुता Sat, 02/28/2015 - 19:47 नवीन
अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sat, 02/28/2015 - 21:40 नवीन
कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच! :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 03/01/2015 - 08:18 नवीन

कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच !

सहमत. आवडली कविता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
च
चलत मुसाफिर Sun, 03/01/2015 - 08:37 नवीन
फारच छान.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sun, 03/01/2015 - 13:07 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 03/01/2015 - 14:00 नवीन
मस्त रचना.. आवडली.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 03/02/2015 - 04:53 नवीन
मागील काही भू छत्रांच्या गर्दीत ही "शब्दवेल" लई भारी !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
अ
अनुप ढेरे Sun, 03/01/2015 - 15:30 नवीन
मस्तं आहे कविता!
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 03/01/2015 - 16:08 नवीन
पुरे ओढ वेडी घनांची अनावर दुरूनी अता पावसा न्याहळावे.. जपावा मनातील पाऊस थोडा परी भावनांच्या पुरा थोपवावे.... ह्या ओळी विशेष आवडल्या.
  • Log in or register to post comments
र
राशी Wed, 03/04/2015 - 11:56 नवीन
सुंदर रचना!!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 03/04/2015 - 15:13 नवीन
भावना अतिशय सुंदर उतरल्या आहेत.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 03/04/2015 - 17:28 नवीन
धन्यवाद मित्र हो!
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 03/04/2015 - 17:48 नवीन
ह्या ओळी विशेष...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा