Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....

ब
बाबा पाटील
Sat, 02/28/2015 - 15:37
🗣 73 प्रतिसाद
पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे. आजपर्यंत पुण्यात खासगी असे एकच आयुर्वेद रुग्नालय आहे,बाकी जी आहेत ती वेगवेगळ्या महाविद्यालयांना सल्लग्न आहेत. ज्यांच्या पिढ्यान पिढ्या आयुर्वेदात गेल्या आहेत अश्या लोकांनीही आजपर्यंत हा विचार केला नाही पण अंगात थोडे सुलेमानी किडे असल्याने हे धाडस करतो आहे,तरी यात काय काय सुधारणा करता येतिल ? किंवा ज्यांनी देशाबाहेर अथवा आपल्या केरळात आयुर्वेद रुग्नालये पाहिली आहेत त्यांनी त्यात काय काय करता येइल हे सुचवावे ही विनंती. कृपया धाग्याचा काश्मिर करु नये ही कळकळीची विनंती.

प्रतिक्रिया द्या
15422 वाचन

💬 प्रतिसाद (73)
अ
अजया Sat, 02/28/2015 - 16:06 नवीन
कुठे पाहिलेले नाही पण वाटलं म्हणून सुचवत आहे. -आयुर्वेदिक आहार मार्गदर्शन,तसंच निरनिराळ्या आजारांसाठी आयुर्वेदिक पथ्य पाकृंचे मार्गदर्शन.याबाबत मधेमधे व्याख्यानं देखिल ठेवता येतील.त्यासाठी सोय केल्यास उत्तम. -आयुर्वेदिक विशेषज्ञ डाॅक्टर्स उदा. कॅन्सर तज्ञ,मधुमेह तज्ञ असे असतील आयुर्वेदात तर त्या डाॅक्टर्ससाठी वेगळी ओपिडि रुम अजून सुचेल तसे लिहीनच.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 02/28/2015 - 16:11 नवीन
तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्याख्याने आहेतच त्याबरोबर आंतररुग्नांचा आहार देखिल देणार आहे. साधारणता योगा मेडीटेशन,व्याख्यान असे उपक्रम नक्की असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
स्पंदना Sun, 03/01/2015 - 22:42 नवीन
आंतर रुग्णांच्या आहारा बरोबरच रोज सकाळी घ्यायचे आरोग्यदायी न्याहरीचे पदार्थ जर तुम्ही उपल्ब्ध करुन दिले तर बरेचजण घेउन जातील. जे रुग्ण स्पेशल डायट्वर आहेत त्यांना एखाद्या व्हॅन मधुन घरपोच तयार आहार (डोअर सर्विस) पोहोचवण्याची सोय करता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ज
जेपी Sat, 02/28/2015 - 16:07 नवीन
पंतजली योगपीठ, हरिद्वार ला भेट द्यावी. बाकी केरळ सारखी व्यवस्था ईकडे देणे शक्य नाही. अवांतर-नळेगाव (लातुर) येथे आर्युवेदाचे वेगळे परिमाण भेटतील.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 02/28/2015 - 16:13 नवीन
या नळेगाव/लातुरची अधिक माहिती देव्य शकाल काय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
संदीप डांगे Sat, 02/28/2015 - 16:08 नवीन
सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा... :-) रूग्णालयात काय असावे हे जरा विचार करून सांगतो. बाकी तुम्हाला गरज असेल तर मार्केटींग कम्युनिकेशन आणि कोलॅटरल्स साठी मदत करू शकतो.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 02/28/2015 - 16:14 नवीन
मार्केटींग विषयी फारखी माहिती व जाणही नाही त्यामुळे तुम्हाला संपर्क नक्की करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ल
लॉरी टांगटूंगकर Sat, 02/28/2015 - 16:14 नवीन
सुलेमानी किडा अमर रहे! शुभेच्छा! केरळात एक चक्कर टाका (बंगळूरात भेटूच, रस्त्यातच आहे :) ), प्रत्यक्ष बघितल्यावर खूप चांगलं लक्षात यावे.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Sat, 02/28/2015 - 16:16 नवीन
भरघोस पाठींबा!!!!! भरघोस शुभेछा!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 02/28/2015 - 16:17 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा. कधी आलो तर, रुग्ण म्हणून, व्यवसायाला हातभार लावेन.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 02/28/2015 - 16:26 नवीन
काका तुम्ही नक्की या पण आजारी पडुन येवु नका ही परमेश्वरचरणी प्रार्थना,देव तुम्हाला निरोगी आयुष्य देवो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 02/28/2015 - 20:53 नवीन
श्री. बाबा पाटील, मधूमेह आणि उच्च रक्तदाब आधीच शरीर बळाकावून बसला आहे. त्यावर नियंत्रण ठेवले आहेच पण आयुर्वेदिक औषधपोचार करायची इच्छा आहे, म्हणून तसा प्रतिसाद दिला आहे. बाकी प्रकृती ठणठणीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
स
संदीप डांगे Sat, 02/28/2015 - 19:25 नवीन
एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाला त्याच्या व्यवसायास मदत व्हावी म्हणून एवढ्या टोकाला जायची तयारी दाखवतो हे कदाचित इतिहासातले एकमेव उदाहरण असेल. (स्व-अनुभवातून... कुठलीही टिप्पणी नाही.) पेठकर काका, जिओ (अगदी ठण्ठणीत रहा..) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 02/28/2015 - 20:57 नवीन
संदिप डांगे, मुद्दाम आजारी पडायची गरज नाही. मधूमेह आणि उच्च रक्तदाब माझे साथी आहेत. आहार आणि व्यायामाद्वारे अजून तरी नियंत्रण ठेवले आहे. अ‍ॅलोपॅथीच्या गोळ्या टाळता आल्या तर पाहावे हा विचार आणि आयुर्वेदावरील विश्वास ही भावना त्या प्रतिसादामागे आहे. तरीपण धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रन्गि पाउस Sat, 02/28/2015 - 17:34 नवीन
विचारपूर्वक पुढचा प्रतिसाद देतो...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 02/28/2015 - 17:48 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! आमचे शेजारी केरळात दर वर्षी जाऊन ट्यून अप करून येतात. तिथे रुग्णासोबत रहाणार्‍यांनाही पथ्यकर आहार देतात असे सांगत होते. निदान रुग्णाला तरी पथ्याचे जेवणखाण देता येईल का याचा विचार जरूर करा! म्हणजे तुमच्या उपचाराला अधिक यश मिळेल.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/28/2015 - 18:11 नवीन
खूप खूप शुभेच्छा :) जी काही औषधे सांगाल ती तिथल्या तिथे उपलब्ध करुन देता येइल का बघा... :)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 02/28/2015 - 18:12 नवीन
खुप शुभेच्छा
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sat, 02/28/2015 - 18:18 नवीन
खूप खूप शुभेच्छा.. मला तरी किमान पंचकर्म करुन घ्यायला तुमच्याइथे यायला नक्कीच आवडेल..
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Sat, 02/28/2015 - 18:22 नवीन
सर्वप्रथम किड्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा! गमतीचा भाग नव्हे पण रुग्णसेवेपलिकडे जाउन एक व्यवसाय म्हणुन तुम्ही विचार केला आहे काय? तुम्ही वर सांगितलेल्या गुंतवणुकीवर परतावा कसा, किती आणि कधी मिळणार याचा अपेक्षित आराखडा आखला आहे का? इतकी(च) गुंतवणुक का करावीशी वाटते - म्हणजे, ८ खोल्या का? २ किंवा २० का नको? पुण्यात एकच खासगी आर्युवेदिक रुग्णालय आहे असे म्हणालात पण पुण्यासारख्या इतर शहरात(म्हणजे, सामान्य राहणीमान, ढोबळ रुग्णसंख्या, आर्युवेदीक उपचारांबाबत माहिती/कुतुहल/विश्वास असलेला वर्ग) अशी रुग्णालये कशी चालतात? त्यांचे उत्पन्न किती असते? असो माझे २ पैसे!!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Sat, 02/28/2015 - 18:44 नवीन
नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा. रुग्णालयाबरोबरच निरोगी माणसांना अधिक सुदॄढ बनण्यासाठी लागणार्‍या सुविधा तुम्ही देत आहात असे वर्णनावरून जाणवत आहे. त्यामुळे नावात रुग्णालय ऐवजी सुदॄढ आरोग्य केंद्र किंवा त्या अर्थाचे काहीतरी वापरा अशी सूचना करतो. बाकी या उपक्रमातून सेवा घेणार्‍यांसाठी ऑनलाइन अकाउंट वेब व चतुरभ्रमणध्वनीच्या अ‍ॅपद्वारे स्वतःच्या तब्बेतीची व उपचारांची नोंद ठेवण्याची सुविधा असावी. उदा. ठराविक वेळी औषध घेण्याची आठवण देणारे संदेश इत्यादी. याखेरीज जसे सुचेल तसे लिहितो.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 02/28/2015 - 19:02 नवीन
आपल्याला नवीन बिझनेस साठी शुभेच्छा ! एक लक्षात ठेवा, रुग्णांना याचा फायदा व्हावा असे आपल्याला वाटत असावे हे गृहित धरले आहे. पण हे चालू राहिले तरच रुग्णांना व आपल्याला फायदा होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा व्यापारी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात अजिबात अपराधीपणाची भावना नको. हे एकदा मान्य केले की जे काही गृहित धरले आहे ते तपासून घेतले पाहिजे. त्यासाठी मी आपणास मदत करु शकतो. आपल्याला जर ही मदत पाहिजे असल्यास आपण मला व्यनि करु शकता. अर्थात हा सल्ला फुकट असेल. मी हा देऊ शकतो कारण माझ्या इतके अपयश कोणी पाहिले नसेल.... :-)
  • Log in or register to post comments
ट
टिवटिव Sat, 02/28/2015 - 19:23 नवीन
अत्यंत चांगली कल्पना.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 02/28/2015 - 19:37 नवीन
तुम्ही काहि विशिष्ट रोगोपचाराला प्राधान्य देणार आहात काय? असल्यास त्या प्रोसेसमधे सप्लाय चेन सुदृढ ठेवणे सर्वात महत्वाचे. औषधं, उपकरणं, त्यांची देखभाल, साठवण, क्वालीटी मेण्टेनन्स, रुग्णांचि आणि त्यांच्या सोबत येणार्‍या मदतनिसांची सर्व प्रकारची सुविधा, इन केस ऑफ इमर्जन्सी जर काहि बाह्य मदत लागली तर त्याची उपलब्धता वगैरे बाबी तुम्ही ध्यानात घ्यालच. आता सरकारी पातळीवर आयुर्वेद, युनानी थेरपी वगैरेसाठी काहि अच्छे दिन येणार म्हणतात. त्यातल्या सुविधा पदरी पाडुन घ्याच. आणि हितशत्रुंपासुन सावध रहा. आयुर्वेदीक इस्पीतळांच्या कायदेविषयक/न्यायवैद्यकीय काटेकोरपणा चॅलेंज करणं किती सोपं/कठीण आहे माहित नाहि, पण या क्षेत्रातला एखादा अगदी भरोशाचा वकील सुरुवातीपासुनच संपर्कात राहु देत... हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा डॉक्टर साहेब. मिपावर धागा टाका आपल्या अनुभवांचा.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 02/28/2015 - 19:41 नवीन
६ ते ८ स्पे. रुम्स जरा जास्त वाटत नाहीत का? म्हणजे आधीच इतका खर्च यायला नको म्हणून म्हणतिये. आमच्या आयु. डॉ. चा पुण्यात आल्याआल्या जो उपयोग होतो तो सांगू शकते. रात्री अपरात्री कधीही फोन केल्यास चालतो. आमच्या वेळा विचित्र, कमी असल्याने ते सकाळी लवकर पंचकर्मासाठी उपलब्ध होऊ शकतात. हामेरिकेतून कधीही फोन केल्यास ते औषधे कमी जास्त करणे. वेगळी देणे, पार्सलने पाठवणे (त्यांचे सर्टिफिकेट वगैरे) करतात. आता आमच्या घरी आमच्या तब्येतींनुसार औषधे आहेत. त्याची लिस्ट एक्सेल शीटमध्ये करून, किती गोळ्या, पुड्या, पावडरी शिल्लक आहेत ते त्यांना माहित असते. आम्ही आमच्या मनाने औषधे घेत, बदलत नाही व भारतात गेल्यावर त्यांचे पैसे देणे, ट्रान्सफर करणे, आमच्या तेथील नातेवाईकांकडून देववणे हे प्रमाणिकपणे चालू असते. तुम्हाला यातून काही आयडिया मिळावी म्हणून कळवले. एका दोन वेळा मुलाला आयुर्वेदिक औषधाने गुण उशिरा येणार होता व हे डॉ. शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करत असल्याने त्यांच्या ओळखीच्या रुग्णालयात एलोपॅथी ट्रीटमेंतसाठी पाठवले. आम्ही भारतवारीच्या आधीच दोन महिने त्यांना फोन करून ट्रीटमेंट, पंचकर्म प्लॅन करतो. त्यात फार कमीवेळा बदल होतात. एकदा प्रवासात मुलगा आजारी पडला तर डॉ. दर दोन, तीन तासांनी फोन करून तब्येतीचा आढावा घेत होते. आमच्यासाठी असे डॉ. देवच आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Sun, 03/01/2015 - 01:37 नवीन
रेवती ताई, तुमचा प्रतिसाद वाचून तुमच्या वैद्यांची माहिती घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे. पुढच्या पुणेवारीमध्ये त्यांना भेटून येण्याचा उद्देश आहे. कृपया माहिती सांगता का? इथे लिहिणे शक्य नसल्यास व्यक्तिगत निरोप पाठवला तरीही चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Sun, 03/01/2015 - 02:56 नवीन
हो. सांगते की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित खोजे
र
रेवती Sat, 02/28/2015 - 19:41 नवीन
तुमचे रुग्णालय सुरु होणे व रुग्णांच्या सेवेसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 02/28/2015 - 21:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
कंजूस Sun, 03/01/2015 - 00:39 नवीन
सर्वाँसारखा मीपण हितेच्छूक आहे आणि जो अर्धी वाट चालून गेलाय तो ते ध्येय गाठतोच. कार्य सिद्धी =श्री +निष्ठा. तुमच्या क्षेत्राबद्दल केरळपेक्षाही शीव रेल्वे स्टेशनजवळच्या आयुर्वेद महाविद्यालयातून चांगला सल्ला मिळेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Sun, 03/01/2015 - 02:41 नवीन
सर्वात आधी या चांगल्या कल्पनेबद्दल तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा. आमच्या सातार्याजवळ कास ला प्रकृती हेल्थ रिसॉर्ट नावाचं अशाच धर्तीचं आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. तिथल्या उपचार पद्धती बद्दल खुप खोल ज्ञान नाही पण दोन तीनदा फिरायला आणि एकदा औषध उपचारा करता गेले होते. http://www.prakrutiayur.com/english/index.php ही त्यांची वेबसाईट. तिथे गेलात तर तुम्हाला बरीच माहीती मिळु शकेल. तिथे पंचकर्मा बरोबरच इतर अनेक प्रॅक्टीस केल्या जातात. आता बराच जम बसवलाय त्यांनी. खुप लांबुन लांबुन लोकं उपचाराला येत असतात. त्यांची ओपीडी सातारा शहरात आहे, आणि इनडोअर पेशंट्स ना या कास च्या प्रॉपर्टी मध्ये ठेवलं जातं. त्याची कपॅसिटी सुद्धा भरपुर असावी, त्यात स्पेशल रुम वगैरे सारखे प्रकार ही आहेत. मागे तिथे पर्णकुट्या वगैरे पण होत्या. उपचाराची पद्धत म्हणुन त्या पर्णकुट्यांमध्ये लोकांना ठेवलं जाई. आता आहेत की नाही याची मला कल्पना नाही. मी तिथे जाउन ६-७ वर्षे होऊन गेलीत.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/01/2015 - 02:58 नवीन
हे वाचून लोणावळ्याच्या माधवबाग नावाच्या संस्थेची आठवण झाली. ते आयुर्वेदिक उपचारच करतात वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
अ
अजया Sun, 03/01/2015 - 04:05 नवीन
लोणावळा नाही रेवाक्का,आमच्या भागात आहे ते माधवबाग.फार बोलत नाही पण त्याचा आदर्श न ठेवल्यास बरे असे आहे.मार्केटिंगचे उत्तम उदाहरण म्हणता येईल!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/01/2015 - 13:12 नवीन
असे आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
त
तुषार काळभोर Sun, 03/01/2015 - 04:48 नवीन
पुण्याच्या पुर्वेला उरुळीकांचन येथील "निसर्गोपचार केंद्र" येथे भेट दिल्यास तेही उपयोगी ठरेल. आयपीडी/ओपीडी/रुग्णांचा विशेष आहार, जीवनपद्धती, हे सगळे पाहता येईल. शिवाय रोजचं 'व्यावहारिक'/प्रॅक्टिकल रुटीनही पाहता येईल. (अवांतरः नवी सांगवीमध्ये एक तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एक रुग्णालय आहे. नाव आठवत नाही, पण ते औषधे तयार करणॅ, रुग्णचिकित्सा, आयुर्वेदातील विविध उपचारांसाठी वेगळ्या रुम्स, असा साधारण सेटअप आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या तेथे यायच्या/येतात असे ऐकले आहे.)
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sun, 03/01/2015 - 07:40 नवीन
सर्व मिपाकरांनी सुचवलेल्या माहितीचा / सुचनांचा सदुपयोग करणाच्या नक्की प्रयत्न करेल.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 03/01/2015 - 07:59 नवीन
अ‍ॅलोपथीमध्ये अवघे आयुष्य गेल्यामुळे आयुर्वेदिक हॉस्पिटलबद्द्ल काही सूचना करण्याची पात्रता अंगी नाही याविषयी दिलगीर आहे. पण आयुर्वेद ही एक अतिशय परिणामकारक औषधप्रणाली आहे याची निश्चित जाणीव आहे. म्हणून, डॉ. बाबा पाटील तुम्हाला तुमच्या या उपक्रमात हार्दिक शुभेच्छा! न जानो, कधी वर पेठकरकाकांनी म्हंटल्याप्रमाणे तुमच्या दवाखान्यात हाजीर होऊ! :( :)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 03/01/2015 - 13:23 नवीन
रुग्णालय किंवा दवाखान्याच्या बिझनेस मॉडेलची कल्पना नाही. पण तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी अतिशय शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 03/01/2015 - 17:30 नवीन
आणि खूप खूप शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 03/01/2015 - 18:35 नवीन
सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईट काढा. तज्ञ मिपावर उपलब्ध होतीलच.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/02/2015 - 06:16 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बन्याबापू Sun, 03/01/2015 - 21:21 नवीन
प्रथम आपल्या कार्यासार्ठी खूप शुभेच्छा ! माझे वय २५ आहे..घरचे नोकरीच्या मागे लाग अस सांगत आहेत..पण तुमच्या सारखाच किडा आमच्यापण अंगात असल्याने स्वत:ची डिझाईन कंपनी सुरु करत आहे.सर ! कंपनी सुरुवात करतोय तर सुरुवातीला क्लायंट ला आपले वर्क कसे सगळ्यांहून हटके आहे आणि सर्विस कशी चांगली आहे हे महत्वाचे आहे.आपल्याला जर वेबसाईट बनवून पाहिजे असेल तर मला मेसेज करा.वेब होस्टिंग+डोमेन नेम चा खर्च सोडून आपल्याला मनापासून किती द्यायचे ते देवू शकता.मला फक्त चांगल काम करून दाखवायचं आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/02/2015 - 02:38 नवीन
तुम्हालाही शुभेच्छा!१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू
क
काळा पहाड Mon, 03/02/2015 - 10:10 नवीन
अहो तुम्ही आर्मी मध्ये होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बन्याबापू
थ
थॉर माणूस Mon, 03/02/2015 - 10:48 नवीन
त्ये बापू वायलं ह्ये वायलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/02/2015 - 02:38 नवीन
परदेशामधले नागरिक "मेडिकल टुरिझम" साठी येतात त्यांच्याकडेही लक्ष द्या. आंतरराष्ट्रीय फोरम्स वर जाहिरात करु शकता. ह्या लोकांना आयुर्वेदीक उपचारांविषयी उत्सुकता असल्याने त्यांना आकर्षित करु शकता.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 03/02/2015 - 02:46 नवीन
डॉ. बाबा पाटील यांना नव्या उपक्रमासाठी हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा...!! माझ्या भावाचे आरोंन्दा येथे असाच सेट्-अप आहे. त्याला विचारून त्याचा नंबर तुम्हाला व्यनि करतो.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Mon, 03/02/2015 - 04:32 नवीन
लायकी नाही तरी सांगतो, तरीही "गर्भसंस्कार"या विषयावर जे देऊ शकता ते बघा.. बाळ हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा खर्च... व या नऊ महिन्यात चांगले चांगले टोणगे आयुर्वेदाकडे धावतात.. :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/02/2015 - 06:20 नवीन
अग्दी अग्दी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू
क
काळा पहाड Mon, 03/02/2015 - 10:17 नवीन
अगदी अगदी हा वाघुळमानवाचा पेटंटेड वाक्प्रचार आहे याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा