Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाऊस....तो ....

P — psajid, Mon, 03/02/2015 - 12:09
वैशाख वणवा मनांत माझ्या, दोन पावसाळे आले, येउनी त्यांनी जीवनी मला, अर्थी दोन्हीं भिजवले !! कोसळत्या सरीबरोबर रूप , सखये असे बरसत गेले, तुला स्वतःत सामावताना , आकाश हाती आले !! वैशाख वणवा मनांत माझ्या .............. कुंतलात मुख अवचित, मेघ दाटुनी आले स्वर्गसुखास करीत खुजे, तेंव्हा भूमिगंध बरसले !! त्या वर्षावास जसे मी , तुझ्याबरोबर अनुभवले, थांबता पाऊस ते दु:खही, मी मदिरेसवे रिचवले !! तळ्याकाठी रडे प्राजक्त, मुकी का सान झुले, बहारही मग सोडी धर्म, विषन्न पाने फुले !! वैशाख वणवा मनांत माझ्या .............. तोही बरसला पाऊस, मन ज्याला न विसरले, पहिल्यासवे त्याचेही , हृदयाने स्वागत जंगी केले !! पहिल्यासवे कोसळला परी, चिंब मन ना जाहले , वैशाखाचा ओतत बहार, त्याने वेगळेपण मात्र राखले !! घेताना निरोप सखे दोघांचे, होते नेत्रही ओले, दोघांच्याही नयनी अश्रूंस, सखे रुप सरींचे आले !! हसत होते ओठ फसवे, दिठी हात जेंव्हा सुटले, चालू लागलो वाट वेगळी, पापण्या पाऊसपण जपले !! ...............................पापण्या पाऊसपण जपले... वैशाख वणवा मनांत माझ्या ................... श्री. साजीद यासीन पठाण

प्रतिक्रिया द्या
678 वाचन

💬 प्रतिसाद (1)
स
सूड Mon, 03/02/2015 - 15:36 नवीन
समयोचित!! अजून लयीत आणता आली असती.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा