Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आम आदमी पक्षातील दुही......

न
निनाद जोशी
Tue, 03/03/2015 - 09:30
🗣 69 प्रतिसाद
आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल. आणि असे घडलेच तर दिल्लीमधील जनतेचा लोकशाही वरील विश्वास उडेल एवढे नक्की......

प्रतिक्रिया द्या
23970 वाचन

💬 प्रतिसाद (69)
ह
होबासराव Fri, 03/13/2015 - 08:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/13/2015 - 11:06 नवीन
आआपमध्ये ही काय सुंदोपसुंदी सुरू आहे ते समजत नाही. विधानसभेत तिकीट न मिळाल्याने किंवा नंतर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी आता ही जुनी स्टिंग बाहेर काढलेली दिसताहेत. इतकं प्रचंड बहुमत मिळूनसुद्धा आआपच्या नेत्यांना ही काय अवदसा सुचली आहे? आआपमध्ये सध्या जी भांडणे सुरू आहेत त्यावरून जुन्या गोष्टी आठविल्या. १९७७ मध्ये जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा जनता पक्षात विलीन झालेल्या तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने मधू लिमये, राजनारायण, जॉर्ज फर्नांडीस इ. नी दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून पक्षात यादवी सुरू केली आणि परिणामी १९७९ मध्ये जनता पक्ष फुटुन सत्ता घालविली. नंतर १९८९ मध्ये जनता दलाचे वि.प्र.सिंग पंतप्रधान झाले असताना आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने सुरवातीला त्यांनी देवीलाल यांना हाताशी धरून गुपचूप योजना आखून चंद्रशेखर यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर जायला लावले आणि नंतर काही महिन्यातच देवीलालांचे खच्चीकरण करायला सुरूवात केली. शेवटी ११ महिन्यानंतर सरकार तर गेलेच पण पक्षाचेही तुकडे झाले. १९९६ मध्ये पुन्हा एकदा जनता दलाला सत्तेची संधी मिळून देवेगौडा पंतप्रधान झाल्यावर नशीबाने मिळालेले पंतप्रधानपद उपभोगायचे सोडून सर्वात प्रथम त्यांनी आपला राजकीय शत्रू असलेल्या रामकृष्ण हेगडेंना पक्षाबाहेर काढले व नंतर पवारांशी जवळीक साधून काँग्रेस फोडायचा प्रयत्न केल्यावर त्यांना आपली खुर्ची गमवावी लागली. आता आआप त्याच मार्गावर जातोय का अशी शंका येतेय. सत्ता मिळाल्यावर ती टिकविण्याऐवजी आपल्या पक्षातील हितशत्रूंना बाहेर काढणे व पक्षातल्या नेत्यांची आपापसातली भांडणे यामुळे आआपसुद्धा जनता पक्ष, जनता दल यांच्याच मार्गावर जाणार का अशी शंका येऊ लागली आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/13/2015 - 15:41 नवीन
आत्ताच एक मार्क व्टेनचे वाक्य वाचनात आले... असो. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 03/13/2015 - 18:31 नवीन
सध्या गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन्सबद्दल कुमार विश्वास यांचे मत. https://www.youtube.com/watch?v=05rsIalrPNU
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/13/2015 - 21:57 नवीन
मला वाटते कुमार विश्वास यांना मार्क व्टेनचे वरचे वाक्य, " 'It's easier to fool people than to convince them that they have been fooled," चांगले माहीत आहे. त्यामुळे ते त्यात सांगितलेली सोपी गोष्ट करत आहेत. काय योगायोग आहे बाकी, योगेन्द्र यादव, प्रशांत भूषण यांच्या विरोधात कारवाई होत असताना, ते एकेंच्या विरोध्त बोलत असताना, ही सगळी एकेंच्या पद्धतीने केलेली स्टींग ऑपरेशन्स जाहीर होत असताना आणि त्याला त्यांचे समर्थक तोंड देत असताना, कथानायक, अर्थात केजरीवाल मात्र बंगलोरला नॅचरोपथी मधे व्यस्त आहेत. किमान अंतर्गत भांडणे उकीरड्यावर आणण्याआधी नेत्याशी तरी बोलणी करणे महत्वाचे नाही का? त्यांना बरे वाटल्यावर हे सगळे करता आले नसते का? का एकीकडे नेता म्हणायचे आणि दुसरीकडे आम्ही काही करायला स्वतंत्र आहोत याचा अतिरेक करायचा का (कदाचीत हेच जास्त) नेत्याला गोत्यात यावे लागू नये म्हणून तो नसतानाच सगळा धुराळा उडवून खाली बसवण्याची व्यवस्था करायची? अजून एक विनोदी बातमी...

'स्टिंग'विरोधात 'आप' कोर्टात जाणार?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
अ
अर्धवटराव Fri, 03/13/2015 - 22:16 नवीन
अर्थात 'जुल्म कि हुकुमत' बघितला का तुम्ही? -- एक तरफ प्रताप कोली शादी कर रहा था और उसी वक्त उसका भाई शहरमे अपने दुश्मनोको मौत के घाट उतार रहा था... ढेण्ट ढेण्ण्ण...इति इन्पेक्टर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नांदेडीअन Sat, 03/14/2015 - 04:30 नवीन
काय योगायोग आहे बाकी, योगेन्द्र यादव, प्रशांत भूषण यांच्या विरोधात कारवाई होत असताना, ते एकेंच्या विरोध्त बोलत असताना....
Image removed. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव अरविंद केजरीवाल यांच्या‘विरूद्ध’ कधी आणि काय बोलले ?

मला वाटते कुमार विश्वास यांना मार्क व्टेनचे वरचे वाक्य, " 'It's easier to fool people than to convince them that they have been fooled," चांगले माहीत आहे. त्यामुळे ते त्यात सांगितलेली सोपी गोष्ट करत आहेत.
त्याचं काय झालंय ना, काही लोक फक्त वाट बघत असतात की केजरीवाल कधी शिंकतोय, कुमार विश्वास कधी एकदा कविता म्हणतोय, किंवा आपचा इतर एखादा नेता कधी एकदा हॉटेलमध्ये जेवायला जातोय वगैरे.. एकदा त्यांनी असे केली की आपल्याला त्यांच्या या देशद्रोही आणि समाजविघातक कृत्याचा विरोध करता येतो ना ! पक्षांतर्गत कलहाचा दिल्लीतील लोकांवर काहीही फरक पडत नाहीये. त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तितक्याच तत्परतेने सोडवल्या जात आहेत. त्यांचे आमदार त्यांच्यासाठी आजही सहज उपलब्ध असतात. त्यांचे आमदार आजही त्यांनाच विचारून पैसे खर्च करत आहेत. अहो तुम्ही बघितलात तरी का वरचा व्हिडिओ ? त्यात कुमार विश्वास यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का ? पटले नसतील तर का पटले नाहीत यावर बोला ना. तुम्ही लोक ठरवून आल्यासारखे आपवर टिका करत असता. इतरांची बाजू ऎकून घ्यायची नाही, पुढे दिसत असलेले सत्य साफ नाकारायचे, आपवाल्यांना नौटंकीबाजच म्हणायचे (भलेही जनतेची सगळी कामं करत असतील तरी.) हे असे सगळे तुम्ही ठरवूनच येणार असाल तर पुढच्या व्यक्तीने काहीही लिहिले तरी ते वायाच जाणार. त्यामुळे मी सध्या आपबद्दलच्या चर्चांमध्ये भाग घेत नाहीये. फक्त तुम्हा सगळ्यांसोबत माहिती ‘शेअर’ करतोय. तुम्ही लोक आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतच राहीन. थोडेसेच अवांतर : ’तुम्ही लोक’ हे कृपया वैयक्तिक घेऊ नये. मिपावर बहुतांश लोक आपचा अंधविरोध करतात करताना दिसून आले, त्यांच्यासाठी आहे हे. फक्त तुमच्या प्रतिसादाला Quote करावे लागले म्हणून इथे वापरले ’तुम्ही लोक’. हे वैयक्तिक घेऊन यावरून वाद घालणार असाल तर त्याला मी रिप्लाय करणार नाही, पण त्यासाठी अगोदरच तुमची माफी मागून घेतो. हा तुम्हाला ‘पर्सनल अटॅक’ वाटला असेल तर कृपया मला माफ करा, माझा हेतू तसा नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अर्धवटराव Sat, 03/14/2015 - 08:01 नवीन
तुम्ही लोक आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, मी मात्र आप करत असलेल्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतच राहीन.
हे आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
सव्यसाची Sun, 03/15/2015 - 10:50 नवीन
तुमचा हा प्रतिसाद मॉडेल प्रतिसाद म्हणून प्रत्येक पक्षाच्या समर्थकाला वापरता येण्याजोगा आहे. आपच्या जागी भाजप किंवा कॉंग्रेस किंवा दुसरी कोणतीही पार्टी तसेच त्या त्या पक्षातील नेत्यांची नावे टाकली हा प्रतिसाद सगळ्याच पक्षांना लागू होईल. असो.
अहो तुम्ही बघितलात तरी का वरचा व्हिडिओ ? त्यात कुमार विश्वास यांनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटले का ? पटले नसतील तर का पटले नाहीत यावर बोला ना.
मी तो व्हीडीओ पूर्ण पाहिला. कुमार विश्वास चांगले बोलतात हे म्हटलेच पाहिजे. या मुलाखतीतील काही मुद्दे पटले नाहीत. उदाहरण म्हणून काही देतो आहे. १) स्टिंग केलेल्या माणसाचा मोटीव ध्यानात घेऊन स्टिंग बरोबर कि चूक असे ठरवायचे आहे का? समजा मोटीव चांगला नसेल म्हणून जे स्टिंग मध्ये बोलले गेले आहे ते तर खरे आहे ना? २) त्यांच्यामते जिंकून आल्यावर कथा नाही करायची आहे सरकार बनवायचे आहे तर सगळ्या गोष्टींची शोधाशोध केली पाहिजे. मला एवढेच कळले कि ते स्टिंग खोटे आहे असे मानत नाहीत पण त्यात काही चुकीचे आहे असे मानत नाहीत (चू. भू. द्या. घ्या). म्हणजे सरकार बनवण्यासाठी दुसरा पक्ष तोडला तर त्यात चूक काही नाही? म्हणजे जो काही घोडेबाजार आजपर्यंत चालायचा तो बरोबर? कि फक्त त्यात पैसा, पदाचे आमिष आला कि भ्रष्टाचार पण इतर वेळी मात्र political realignment? जर तुम्ही असे मानत असाल तर मी थांबतो. पुढे बोलण्यात तसा अर्थ नाही. सध्या तरी, चित्रफीत पाहिल्यावर, हे प्रकर्षाने समोर आलेले मुद्दे मला वाटले. बाकी अजून मुद्द्यावर बोलता येईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Mon, 03/16/2015 - 06:14 नवीन
तुमचा हा प्रतिसाद मॉडेल प्रतिसाद म्हणून प्रत्येक पक्षाच्या समर्थकाला वापरता येण्याजोगा आहे. आपच्या जागी भाजप किंवा कॉंग्रेस किंवा दुसरी कोणतीही पार्टी तसेच त्या त्या पक्षातील नेत्यांची नावे टाकली हा प्रतिसाद सगळ्याच पक्षांना लागू होईल. असो.
कॉंग्रेस-भाजपचा मी आजवर एकही असा समर्थक पाहिला नाही, जो कॉंग्रेस-भाजपने ‘केलेल्या कामांची’ माहिती शेअर करतो. कॉंग्रेस समर्थक भाजपला शिव्या घालतात. भाजप समर्थक आपवर बिनबुडाचे आरोप लावत असतात, किंवा आपवरचे पांचट जोक्स फॉर्वर्ड करत असतात. माझ्यासारखे आपचे समर्थक आप करत असलेल्या कामाची माहिती दिल्लीबाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचावी याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. भाजपने आत्तापर्यंत १७६० U-Turns घेतलेत, तरीही त्यांचे भक्त त्या U-Turns चे केविलवाणे समर्थन करत असतात. आपकडून एखादी चूक झाली, किंवा आपसुद्धा एखाद्या विषयावर इतर पक्षांसारखे वागत असेल, तर माझ्यासारखे आप समर्थक जमेल तसा, जमेल तिथे त्याचा विरोध करतात. याचे साधे उदाहरण पाहायचे असेल, तर हा ग्रूप जॉईन करा. https://www.facebook.com/groups/AamAadmiParty/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
य
यश राज Mon, 03/16/2015 - 07:03 नवीन
तुमचा हा प्रतिसाद पुर्णतः हास्यास्पद आहे. हे म्हणजे आम्ही म्हणतो तीच पुर्व दिशा.
कॉंग्रेस-भाजपचा मी आजवर एकही असा समर्थक पाहिला नाही, जो कॉंग्रेस-भाजपने ‘केलेल्या कामांची’ माहिती शेअर करतो..
अहो तुम्ही जे 'सो कॉलड्' रीपोर्ट कार्ड शेअर केले आहे त्याची वैधता काय आहे.? ते पुर्णपणे आप ने तयार केलेले रीपोर्ट कार्ड आहे हेवेसांनल. त्याच रीपोर्ट कार्ड वर तुम्ही भाजपा बरोबरच कंपेअर केलेले आहे ज्याची काही गरज नव्हती.
कॉंग्रेस समर्थक भाजपला शिव्या घालतात. भाजप समर्थक आपवर बिनबुडाचे आरोप लावत असतात, किंवा आपवरचे पांचट जोक्स फॉर्वर्ड करत असतात.
अगदि हेच माझ्या माहीतेतले आप वाले करत असतात. त्यामूळे 'आप'ण कोणी वेगळे आहोत हा गैरसमज नसावा.
भाजपने आत्तापर्यंत १७६० U-Turns घेतलेत, तरीही त्यांचे भक्त त्या U-Turns चे केविलवाणे समर्थन करत असतात.
U-Turns बद्द्ल आप वाले न बोलले तेवढे उत्तम कारण सगळा ईतिहास सर्वश्रुत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
सव्यसाची Mon, 03/16/2015 - 07:23 नवीन
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. तुम्हाला द्यायचे नसेल तर माझे काहीच म्हणणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Mon, 03/16/2015 - 08:36 नवीन
>>> माझ्यासारखे आपचे समर्थक आप करत असलेल्या कामाची माहिती दिल्लीबाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचावी याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. >>> आपकडून एखादी चूक झाली, किंवा आपसुद्धा एखाद्या विषयावर इतर पक्षांसारखे वागत असेल, तर माझ्यासारखे आप समर्थक जमेल तसा, जमेल तिथे त्याचा विरोध करतात. मी भाजपचा पेड समर्थक असून सोशल मिडीयात भाजपच्या बाजूने आणि इतरांच्या विरूद्ध लिहिण्यासाठी मला प्रत्येक लेखामागे, लेखातील प्रत्येक वाक्यामागे, प्रत्येक वाक्यातील प्रत्येक शब्दामागे मला भाजपकडून पैसे मिळतात असा जावईशोध मिपावर एका महाभागाने लावला होता. तुमची वरील वाक्ये आणि तुम्ही सातत्याने करत असलेले 'आआप'चे समर्थन आणि इतर पक्षांवरील टीका पाहून इथले एक महाभाग तुमच्याबाबतीतही असाच जावईशोध लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
विकास Mon, 03/16/2015 - 18:16 नवीन
सध्या गाजत असलेल्या स्टिंग ऑपरेशन्सबद्दल कुमार विश्वास "यांच्याबद्दलचे" मत... AAP's Kumar Vishwas Gets Defamation Notice on Leaked Tapes
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Mon, 03/16/2015 - 06:26 नवीन
माझ्यासारख्या आप समर्थकांचा अर्ध्याहून जास्त वेळ भक्तांच्या बिनबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यातच निघून जातो. मी : आपचे हे रिपोर्ट कार्ड बघा. इतर पक्षांना ५ वर्षं कमी पडतात, ते यांनी ३० दिवसात करून दाखवले. काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. भक्त : ‘आप’ला फोर्ड फाऊंडेशन पैसा मिळतो. ही संस्था आतंकवाद्यांना पैसा पुरवते. मी : ‘आप’ने यांच्याकडून एकही पैसा घेतलेला नाहीये. उलट गुजरात सरकारच्याच काही संस्थांना फोर्ड फाऊंडेशनकडून मदत मिळते. भक्त : आपच्या संस्थापकांपैकी एक आणि सिनिअर लिडर असलेले आश्विनी उपाध्याय यांचा इंटरव्ह्यू बघितला नाही का ? त्यात त्यांनी सांगितले आहे की आपच्या दिल्ली ऑफिसमध्ये आतंकवादी केजरीवालला भेटायला यायचे आणि काहीतरी प्लॅनिंग करायचे. मी : एक तर अश्विनी उपाध्याय सिनिअर लिडर वगैरे काहीही नव्हते, आपच्या लिगल सेलमध्ये एक साधे स्वयंसेवक होते. आणि केजरीवाल जेव्हा आतंकवाद्यांसोबत प्लॅनिंग करायचा तेव्हा हे महाशय झोपले होते का ? यांनी पोलीसांना का कळवले नाही ? बरं, आत्ता हे महाशय भाजपमध्ये गेले आहेत. केंद्रामध्ये यांचे सरकार आले आहे. यांनी सरकारला सगळे पुरावे देऊन केजरीवालला फासावर लटकवल्या जाईल अशी व्यवस्था करावी. कारण त्यांनी लावलेला आरोप साधासुधा नाहीये, देशाचा प्रश्न आहे आपल्या. भक्त : अरे पण केजरीवाल तर भगोडा आहे ना. मी: अरे, आप आणि केजरीवालने आत्तापर्यंत हजारवेळा माफी मागितली आहे याबद्दल. तो भगोडा असता तर दिल्लीच्या जनतेने दुसर्‍यांदा कशाला निवडून दिले असते त्याला ? तेसुद्धा ७० पैकी ६७ सिट्स देऊन ? भक्त : दिल्लीची जनता फुकटी आहे, सगळे फुकटचे पाहिजे त्यांना. मी : फुकट फक्त पाणीच देत आहे आप सरकार. कर्नाटकमध्ये भाजपवाले फ्री लॅपटॉप आणि १ रूपयाला २५ किलो तांदळाचे आश्वासन देत होते तेव्हा कर्नाटकी लोक फुकटे होते का ? भक्त : चल, नंतर बोलू. काम आहे थोडे. मी : अरे, सगळे प्रश्न तर तूच विचारले. आता मला चान्स दे ना. मी विचारतो भाजपबद्दल थोडेसे. उत्तर देशील अशी अपेक्षा आहे. काळजी करू नको. राम मंदिर, अडवाणी, PDP बद्दल काही विचारणार नाही. भक्त : ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग पडली आहेत, माझ्याकडे वेळ नाहीये आत्ता. मी : निरूत्तर ! थोड्या वेळानंतर...... भक्त : अरे, नवीन स्टिंग ऑपरेशन पाहिले का केजरीवालचे ? मुस्लिमांबद्दल काय काय बोलतोय, कसले घाणेरडे राजकारण करतोय. मी : नाही रे, पाहिले नाही. काय झाले ? नेमके काय बोलला तो ? भक्त : नेमके माहित नाही रे. मी फक्त हेडलाईन तेव्हढी पाहिली. पण बघ, हेसुद्धा निघाले की नाही इतरांसारखेच ! मी : मी अजून पाहिले नाही हे स्टिंग. माहिती घ्यावी लागेल. मी (स्टिंग ऑपरेशन आणि संबंधित इतर बातम्या पाहिल्यानंतर) : "लोकसंखेच्या आधारावर मुस्लिमांना जास्त सिट्स देण्याची गरज नाही. आपण कोणत्याही सिटकडे मुस्लिम सिट वगैरे म्हणून का बघतोय ? कॉंग्रेस दिल्लीतून संपली आहे आणि मुस्लिम भाजपला मत देणार नाहीत. त्यांच्यासाठी आम आदमी पार्टी एक आशेचा किरण आहे." केजरीवाल हे बोलला आहे ^^ त्या टेपमध्ये. यात काय चुकीचे आहे ? किंवा हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज आहे का ? आणि केजरीवाल हे ३०० लोकांच्या सभेमध्ये बोलला होता, याला स्टिंग ऑपरेशन कसे म्हणता येईल ? तूसुद्धा सांग मिडियाला, ’केजरीवाल मला हॉटेलमध्ये जेवतांना दिसला होता आणि त्याने शेवटी वेटरला ५० रूपयांची टिप दिली.’ ’केजरीवाल का नया स्टिंग ऑपरेशन’ सारख्या हेडलाईन्स येतील सगळ्या न्यूज चॅनल्सवर आणि तू फेमस होशील. भक्त : पण केजरीवाल भगोडा आहे. मी : परत तेच ? मी : अच्छा, आता तुला वेळ असेल तर मी भाजपबद्दल काही विचारू का ? भक्त : खूप काम आहे यार मला. नंतर बोलूया का आपण ? मी : परत एकदा निरूत्तर ! ------------------------------------ नेहमीचेच आहे हे. मी भक्तांसोबत आप करत असलेल्या कामांची माहिती शेअर करत असतो, आणि ते विषयाची अशी वाट लावत असतात. यांना याचा आनंद नाहीये की पहिल्यांदाच आपल्या भारताच्या एका राज्यामध्ये असे सरकार आले आहे जे जनतेसाठी काम करत आहे. यांना याचे दुःख आहे की आमचा भाजप एक वर्ष होत आले तरी जनतेची अशी कामं का करत नाहीये, किंवा आमच्या कॉंग्रेसने कधी जनतेप्रती उत्तरदायित्व का दाखवले नाही. चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणणे खरेच इतके अवघड असते का हो ?
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Mon, 03/30/2015 - 12:08 नवीन
आप अथवा मोदी यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती परंतु खूप सार्‍या मित्रांच्या यांच्याकडून असलेल्या आशा आणि विश्वास पाहून उत्सुकता होती. सध्या जे काही चालले आहे ते पाहून एवढेच म्हणावेसे वाटते की माझ्या पिढीच्या लोकांचा भ्रमनिरास आणि विश्वासघात करायचे सुरु आहे (जे माझ्या वडिलांच्या पिढीत कदाचित व्हिपी सिंग आणि तत्समांनी केले असावे). आता पुढची पिढी आम्हाला विचारत येईल की तुम्ही एवढे उदासीन का तेव्हा कमीत कमी हे घटनाक्रम दाखवता तरी येतील.. असो.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/30/2015 - 17:43 नवीन
आधी जनता पार्टी मग जनता दल (व्हि पि सिंग) आता आप समान धागा - प्रमुख नेते समाजवादी, स-माज (जहाजातला "ज") आणि वाद घालत बसणारे. त्यामुळे त्यातील चांगल्या लोकांचे देखील नुकसान झाले आणि ज्यांना आशा वाटली अशा सामान्य मतदारांचा भ्रमनिरास. अर्थात आप मधे आत्ता नक्की कोण चांगले आहे हा एक संशोधनाचा मुद्दा ठरू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
व
वेताळ Mon, 03/30/2015 - 13:32 नवीन
ही एक फुकटच्या पैश्यावर जगणारी जमात आहे. ह्याचा खरा चेहरा लक्षात आलेले एक एक जण आप मधुन बाहेर पडत आहेत. लोकपाल सारख्या क्रांतीकारी मुद्द्यावर जनतेत वाढलेल्या आप ने आपले स्वःताचे लोकपाल अ‍ॅड.रामदास ह्याची केलेली हकालपट्टी सर्व काही सांगुन जाते. खेतान,आशुतोष,कुमार विश्वास किंवा सिसोदिया हे सर्व एन्जिओ चालवुन घर भरणारी माणसे,ह्याच्यावर किती विश्वास टाकायचा हे लोकांनी ठरवायला पाहिजे होते. ह्या आपच्या नादात भारावल्यामुळे मात्र चांगले असणारे मित्र दुरावले ह्याचे दु:ख वाटते.त्यांना हे आपचे नेमके स्वरुप लौकर लक्षात यावे.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 03/31/2015 - 18:18 नवीन
अब्राहम लिंकन यांनी म्हटले आहे-- You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा