Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....

च
चुकलामाकला
Wed, 03/04/2015 - 10:15
🗣 183 प्रतिसाद
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे …… डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे … दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे … आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे (कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )

प्रतिक्रिया द्या
39912 वाचन

💬 प्रतिसाद (183)
प
पिलीयन रायडर Wed, 03/04/2015 - 11:26 नवीन
स्त्री-पुरुषांना एकमेकांची शाररिक ओढ वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यातही पुरुषांना ती अजुनच तीव्रतेनी जाववणं ही त्यांची नैसर्गिक जडण-घडण आहे. सभ्य वा असभ्य.. सरवच पुरुषांना तशी जाणवत असावी. त्यामुळे पॉर्न बघतो किंवा "तसल्या" कल्पना करतो म्हणुन कुणी असभ्य ठरवावा का? पॉर्न बघतो आणि वर "असल्या नराधमांना फाशी दिली पाहिजे" म्हणतो तो दुतोंडी असेल का? स्त्रियाही पॉर्न बघतात.. त्यांना तरीही रेप वगैरे गोष्टींचा त्रास होतोच, त्याही तीव्रतेने प्रतिक्रिया देतात.. त्याही दुतोंडी असतात का? माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो.. असा माणुस केवळ तिला तसं कल्पत नाही तर समोर दिसणार्‍या आणि आवाक्यातल्या प्रत्येक स्त्रि शरीरावर त्याचा जणु जन्मसिद्ध हक्क आहे असं वागतो.. आपाप्ल्या कुवती प्रमाणे तिला जाता येता मुद्दाम सहेतुक स्पर्श करतो.. किंवा बसमध्ये उलट्या दिशेने चढुन-उतरुन नको तिथे हात लावतो.. गर्दीचा फायदा घेऊन त्रास देतो.. एकटी सापडली तर बळजबरी करतो.. चौघांना मिळुन उचलता आली तर मेंदुतल्या प्रत्येक विकृत भावना ट्राय करुन पहातो.. जमल्यास मारुन टाकतो.. प्रत्येक पॉर्न बघणारा पुरुष हे करत नाही.. आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो.. त्यासाठी त्याची कारणं काहीही असतील.. ती चुक आहेत का बरोबर.. असं करावं की करु नये हे मला माहित नाही.. पण तरी अनेक (बहुतांश म्हणायचा मोह होतोय..पण दुर्दैवानी तसं नाहीये..) पुरुषांच्या मनात सीमारेषा पक्की असावी.. त्यामुळे मला नाही वाटत की "तसल्या" गोष्टी बघुनही पुन्हा आरोपींना शिव्या घालणारे, दुतोंडीच असतात.. सरसकट सगळ्या पुरुषांना झोडपण्यात अर्थ नाही..
  • Log in or register to post comments
M
Madhavi_Bhave Wed, 03/04/2015 - 12:21 नवीन
सह्मत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 12:34 नवीन
माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो..
अगदी नेमके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 03/05/2015 - 07:55 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाखु गुरुवार, 03/05/2015 - 08:29 नवीन
खंप्लिट अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/06/2015 - 18:10 नवीन
+++१११ बाकी कवितेत/मुक्तकात, चुकल्या पेक्षा माकल्यातच जास्त भावना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाप्पू Wed, 03/04/2015 - 13:55 नवीन
आपल्याशी पूर्णपणे सहमत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सांगलीचा भडंग Wed, 03/04/2015 - 14:09 नवीन
सहमत . उत्तम प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोहनराव Wed, 03/04/2015 - 14:16 नवीन
उत्तम प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चुकलामाकला Wed, 03/04/2015 - 15:33 नवीन
प्रतिसाद आवडला आणि विचार पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
स्वाती२ Wed, 03/04/2015 - 15:33 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पलाश गुरुवार, 03/05/2015 - 04:28 नवीन
सरसकट सगळ्या पुरुषांना झोडपण्यात अर्थ नाही.. माझ्या मते असभ्य माणुस तो असावा ज्याला स्त्रीची केवळ शाररिक ओढच आहे.. त्याशिवाय तिला काही मन आहे.. तिचं तिला काही स्वातंत्र्य आहे, अधिकार आहेत हे ज्याला मान्य नाही तो. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बाळ सप्रे गुरुवार, 03/05/2015 - 07:47 नवीन
नेमका प्रतिसाद.. आपल्या भावनांना वाट करुन देताना दुसरे कोणी त्यामुळे ऑफेन्ड होउ नये यासाठी ब्राउजिंग हिस्ट्री डिलीट करणे वगैरे तर खरा सभ्यपणा.. मानवी मनात प्रचंड विचार चालू असतात... त्यातले नेमके काय प्रकट करायचे आणि काय मनातच ठेवायचे की ज्यायोगे दुसर्‍याच्या वैयक्तिक कक्षेत प्रवेश होणार नाही हे ज्याला समजते तो सभ्य ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/05/2015 - 07:58 नवीन
पिराच्या एका प्रतिसादातच धागा संपला आहे खरे म्हणजे. बाकिच्यांनी फक्त +१ केले तरी चालेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
च
चिगो गुरुवार, 03/05/2015 - 13:27 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुधीर गुरुवार, 03/05/2015 - 12:35 नवीन
http://m.youtube.com/watch?v=fLg131SZk1o विषय नाजूक आहे. बर्याच प्रश्नांना स्पर्ष करतो. आणि तो योग्य पद्धतीने हाताळला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
स
सौंदाळा गुरुवार, 03/05/2015 - 13:07 नवीन
आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो
हे कसे समजले? मला किमान एक तरी माणुस माहित आहे की जो पॉर्न बघत नाही. बाकी प्रतिसाद +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 13:47 नवीन
मीही आजवर अजिबात पॉर्न पाहिले नाहीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 03/05/2015 - 13:48 नवीन
बघा २ जण इथेच झाले. उगा आपले काहीतरीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 13:57 नवीन
मीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/05/2015 - 14:01 नवीन
पॉर्न म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 14:05 नवीन
हाच प्रश्न मलाही पडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 14:10 नवीन
+२ हेच विचारतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हाडक्या गुरुवार, 03/05/2015 - 16:40 नवीन
पॉर्न म्हणजे काय?
बाळाला द्या पॉर्न पॉर्न, बाळ होईल गुटगुटीत छान.. :))) (वि.सू. : पहिल्या ओळीतले बाळ १८+ असावे असे कायदा सांगतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/06/2015 - 09:21 नवीन
पॉर्न म्हणजे काय?
बहुदा पॉपकॉर्न चा अपभ्रंश का काय म्हणतात ते असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/05/2015 - 14:01 नवीन
१. तुम्हाला बघणारे किती माहित आहेत आणि न बघणारे किती? मी बघणारे असंख्य लोक सांगु शकते, तुम्ही न बघणारे दोनच सांगु शकला आहात. त्यामुळे अपवादाने नियम सिद्ध होतो वगैरे... २. बघा.. न बघा.. मला काही फरक पडत नाही.. मी कुणाला जज सुद्धा करत नाहीये. मी फक्त मुद्दा मांडला की पॉर्न बघणे हा सभ्यतेचा निकष असु शकत नाही. ३. ते जे दुर्मिळ २ लोक (किंवा अजुनही) आहेत जे पॉर्न बघत नाहीत, त्यांचे माझ्यातर्फे मनापासुन अभिनंदन..! वैयक्तिक पातळीवर मलाही ती गोष्ट आवडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 03/05/2015 - 14:28 नवीन
कहर आहे दोनच सांगु शकला म्हणजे माझ्या जवळाच्या ५-६ मित्रांपैकी जे आहेत ते मी सांगितले मी प्रत्येक ओळखीच्या विचारत नाही बाबारे तु पॉर्न बघतोस का आता इथेच तीन झाले प्रगो, बॅट्मॅन, मृत्युंजय असे बरेच असतील.
मी बघणारे असंख्य लोक सांगु शकते
टाळ्या, इतक्यातच प्रत्येकवरुन असंख्यवर आला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/05/2015 - 14:58 नवीन
भाऊ.. मुद्दा "प्रत्येक पुरुष पॉर्न बघतो" हा आहे की "पॉर्न बघणे सभ्य की असभ्य" हा आहे? मला काय म्हणायचय ते मी पहिल्या प्रतिसादातच नीट लिहीलय. तुम्ही फाटे फोडत आहात, मुद्द्याला धरुन चर्चा असती तर मी वेळ दिला सुद्धा असता. शिवाय मी पॉर्न बघणे / न बघणे ह्यावरुन कुणाला दुखावेल असं काहिही विधान केलेले नाही. त्यामुळे तुम्ही का किस पाडताय ते कळायला मार्ग नाही. (किस पाडायला तर मी सुद्धा "कशावरुन तुम्ही खरं बोलताय? तुमच्या माहितीची पडताळणी कुणी न कशी करावी?" वगैरे वगैरे काहिही मुद्दे काढु शकतेच.. फक्त अजुन मला तरी धाग्याचा विषय काय आहे ह्याचे भान आहे..) ह्याउप्पर.. मी जे लिहीते ते मी प्रुव्ह करावच असं कुठे लिहीलय? मला जे वाटतं ते मी लिहीलं. त्याला बरोबर मानाच असा काही आग्रह केला नाहीये.. तस्मात.. तुमच्याशी अजुन ह्या मुद्द्यावर बोलायची इच्छा आणि वेळ तर त्याहुनही नाही... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 03/05/2015 - 15:09 नवीन
मुद्दा पटला त्यासाठी +१ आधीच लिहीले होते आक्षेप एकाच वाक्याला
प्रत्येक पुरुष हा निश्चितच पॉर्न बघतो या एकाच वाक्याला आहे
हे ही स्प्ष्ट लिहिले होते. आणि हे निश्चितच दुखावणारे विधान असु शकते. हेच विधान बहुतांश पुरुष पॉर्न बघतात / बघत असावेत असे लिहिले असतेत तर प्रश्नच नव्हता.
कशावरुन तुम्ही खरं बोलताय? तुमच्या माहितीची पडताळणी कुणी न कशी करावी?"
तुम्ही तर प्रत्येक पुरुष बघतो असे लिहिले आहे याची पडताळणी / पाहणी तुम्ही कशी केली? हे विचारले तर तुम्ही लगेच
ह्याउप्पर.. मी जे लिहीते ते मी प्रुव्ह करावच असं कुठे लिहीलय? मला जे वाटतं ते मी लिहीलं. त्याला बरोबर मानाच असा काही आग्रह केला नाहीये..
त्यामुळे तुम्ही किती सिरियली आणि मुद्देसुद लिहिता हे कळुन चुकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/05/2015 - 15:16 नवीन
"बहुतांश पुरुष पॉर्न बघतात" - असे माझ्या प्रतिसादात वाचावे.. मझ्यामते आता कुणाच्या भावना दुखावल्या जाउ नयेत. मुळात मी पोर्न बघणे ह्या गोष्टीला चांगलं वाईट काहीच म्हणत नसल्याने मी "प्रत्येक" म्हणलं तरी माझ्याकडुन मी कुणावर चांगलं वाईट असण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठलाच आरोप करत नाहीये. पण तुम्हाला ते आक्षेपार्ह वाटत असेल तर ठिके.. मी माझं वाक्य "बहुतांश" करायला तयार आहे (मला ते मान्य नाही तरीही..)
त्यामुळे तुम्ही किती सिरियली आणि मुद्देसुद लिहिता हे कळुन चुकले.
बरं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
सौंदाळा गुरुवार, 03/05/2015 - 15:24 नवीन
धन्यवाद खरच सांगतो माझ्या ५-६ जवळच्या मित्रांपैकी एकजण अजिबात पॉर्न बघायचा नाही, बाकीचे बघायचे तेव्हा हा यायचा नाही. खुपच देवभोळा आणि अत्यंत हुशार मुलगा. पण त्याच्या अशा सवयींमुळे त्याला बाकीची मुलेच विक्षिप्त समजायची (आम्ही ५/६ मित्र सोडुन) अजुन एक पॉर्न बघण्यामुळे अशा (बलात्करी) लोकांच्या वि़कृत मानसिक भावनांचा निचरा होत असेल असे म्हणावे तर ते ही नाही. उलट पॉर्न सहज उपलब्ध झाल्यापासुन बलात्काराच्या प्रमाणात वाढ झालीय (विदा नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 15:24 नवीन
पण पॉर्न म्हणजे नक्की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रदीप गुरुवार, 03/05/2015 - 16:46 नवीन
पॉपकॉर्नचा शॉर्टफॉर्म आहे तो. :) पॉपकॉर्न म्हणजे काय? अनेकवेळा विशीष्ट विषयांवरील चर्चा इथे कुणी सुरू केली (उदा. पुणे- मुंबई) की जे घेऊन अनेकजण झाडांवर चढून बसतात, ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
हाडक्या गुरुवार, 03/05/2015 - 16:45 नवीन
आता इथेच तीन झाले प्रगो, बॅट्मॅन, मृत्युंजय असे बरेच असतील
अरारा.. तुमाला वरचे पर्तिसाद कल्लेच नाय म्हनायचे मग. खासकरून बॅट्याची "किर्तू" तर बरीच प्रसिद्ध आहे.. (हो हो "किर्तू"च) :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बॅटमॅन Fri, 03/06/2015 - 07:18 नवीन
किर्तू आमची न्हवे. तुमची आहे काय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Fri, 03/06/2015 - 10:23 नवीन
आमची असती तर काय.. तुमाला मुक्त संचार दिला असता सगळीकडे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कानडाऊ योगेशु Fri, 03/06/2015 - 09:26 नवीन
आणि प्रत्येक पुरुष निश्चितपणे पॉर्न बघतो
हे जर विवादास्पद विधान असेल तर त्यात असा बदल करतो.
प्रत्येक पुरुषाच्या मनाता पॉर्न बघायची इच्छा असतेच असते.
आणि ज्या पुरुषाच्या मनात अशी इच्छाही असत नाही तर मै कहता हूं कि वोह पुरुष पुरुष ही नही है बल्की......... महापुरुष है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/04/2015 - 11:31 नवीन
एकतर हे टोक, नाहीतर दुसरं, हे काही बरोबर नाही... काळ्या-पांढर्‍या टोकांच्या मध्ये अख्खा वर्णपट पडला आहे, चुकलामाकला !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/04/2015 - 14:42 नवीन
पिरांना +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सस्नेह Wed, 03/04/2015 - 12:59 नवीन
सरसकटीकरण पटले नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 03/04/2015 - 14:08 नवीन
मला पैसे मिळावेत असे वाटणे चुक नाही, पण ते मिळवण्यासाठी चोरी किंवा खून करणे चुक आहे. उगाचच काहीतरी लिहीले आहे असे दिसतय. खरे तर अगदी निरर्थक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 03/04/2015 - 14:30 नवीन
उगाच ताज्या विषयाचा वापर करून टिआरपी मिळवण्यासाठी केलेली कविता आहे. मुळ विषयाचे गांभीर्यच कळले नाही हे स्पष्टपणे जाणवते आहे.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 03/04/2015 - 14:58 नवीन
उगाचच काहीतरी लिहीले आहे असे दिसतय. खरे तर अगदी निरर्थक आहे.
उगाच ताज्या विषयाचा वापर करून टिआरपी मिळवण्यासाठी केलेली कविता आहे.
असहमत.
मुळ विषयाचे गांभीर्यच कळले नाही हे स्पष्टपणे जाणवते आहे.
अंशतः सहमत. त्यांनी कळकळीने लिहिलंय असं वाटतय ( मी चूक असेन तरी ही) पण बेसिकमध्ये लोचा आहे आणि पिराने वरती स्प्ष्ट केलाय.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 03/04/2015 - 17:26 नवीन
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद! मला काही प्रश्न अस्वस्थ करतात आजकाल खाजगी आणि जाहीर यातील फरक पुसट होत चाललाय . फु बाई फु वगैरे विनोदी मालिकांमधले विनोद हे नवीन नाहीत , आम्हीही एका वयात हे करायचो पण आतासारखे ते सर्वमान्य झाले नव्हते. आज ऑफीस मधील ट्रेनमधील सहकारी, वगैरे जेव्हा सरळ सरळ बरोबरीने काम करणाऱ्या मुलींच्या बद्दल जे बोलतात, ते बरयाचदा सभ्य नसतेच . पण पूर्वीपेक्षा अलीकडे त्याचे प्रमाण खूप वाढलेय . वयात आलेल्या माझ्या मुलीला आज ट्रेन मधून बसधून एकटी पाठवताना भीती वाटते हे सत्य आहे, आधी विचार जन्मतात आणि मग कृती होते. पोर्न बघणे म्हणजे असभ्य मुळीच नाही पण याचे वाढते प्रमाण ( सहज ऊपलब्ध असल्यामुळे आणि आता ते सर्वमान्य झाल्यामुळे) पुढे अशा अनेक मुकेशाना जन्म तर देणार नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ब
बाबा पाटील Wed, 03/04/2015 - 16:09 नवीन
आजच दवाखान्यातला रिसेप्शन मुलीला एक मुलगा बरेच दिवस त्रास देतोय म्हणुन पोलिस कंप्लेंट करावी लागली, इन्सपेक्टर मॅडमने जेंव्हा त्याला धुतला तेंव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की साहेबांना फक्त ती फिरवण्यासाठी हवी होती,बाकी काही नाही. ही विकृत मानसिकता वेळीच थांबवणे गरजेचे आहे.नव्हे प्रत्येक सुजान नागरिकाने यात पुढाकार घेवुन हे थांबवले पाहिजे.चुका स्त्री आणी पुरुष दोन्ही बाजुने होतात पण त्या वेळीच आटोक्यात आणल्या गेल्याच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड गुरुवार, 03/05/2015 - 14:30 नवीन
तुमच्याकडे दंबूक आहे ना डॉक्टर! कशाला पोलीस कंप्लेंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बाबा पाटील Fri, 03/06/2015 - 16:17 नवीन
पुलिस की मार से पुलिस का डर सबसे बडा होता. अस कुठ तरी ऐकल होत बुवा. दुसरे घटना क्लिनिकच्या परिसरातील होती,अशा वेळी कायदाचा बांबुच बरा असतो नाही का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नाखु गुरुवार, 03/05/2015 - 05:08 नवीन
तरी सरसकटीकरण करणे पटणारे नाही.. जी गोष्ट्/कृती आपल्या मुली/बहिण्/आई/मैत्रीण बाबत बोललेली वा कल्पना केलेली सुद्दा आपल्याला तिरस्कृत्/निंदनीय वाटते ती मी इतरांबाबतही करणार नाही. हा दृष्टीकोण दोन्ही बाजूंनी ठेवणे हितावह आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 10:08 नवीन
चुकलामाकला यांच्या कवितेशी सहमत आणि पिराताईंच्या प्रतिसादाशी सहमत. दोन सर्वस्वी वेगवेगळे मुद्दे आहेत हे आपण समजून घेतले पाहीजे असे मला वाटते. कवितेमधे मांडलेली वस्तुस्थिती आहे आणि प्रतिसादामधे मांडलेला आदर्शवाद आहे. 'असे आहे' आणि 'असे असावे' या दोन मुद्द्यांमधे फक्त वाद होऊ शकतात, कुठलेही परिणामकारक निष्कर्ष निघू शकत नाहीत. कवितेतल्या परिस्थितीतून प्रत्येक पुरुष जातोच जातो, हे प्रत्यक्ष सत्य आहे. कुणी पुरूष हे नाकारत असेल तर तो ढोंगी आहे. स्त्रियांचे कपडे, मुक्त फिरणे वैगेरे गोष्टी फक्त एक साधन आहे स्त्रियांवर सत्ता गाजवायला उत्सुक पुरुषांचे. उद्या सगळे नागडे फिरायला लागले तरी स्त्रियांवर मालकीहक्क दाखवायला पुरुष आणखी काही शोधून काढतील. हा प्रश्न आजचा नाही आहे. पुराणकाळापासून परस्त्री मातेसमान मानण्याची शिकवण द्यावी लागावी यातूनच परस्त्रीकडे बघायची नैसर्गिक उर्मी आणि त्याचा स्पष्ट हेतू दर्शवते. मनातला निसर्ग स्त्रीकडे खेचतो तर समाजाचे लादलेले नियम, संस्कार तसे करण्यापासून रोखतात. याच दोलायमान अनैसर्गिक स्थितीतून स्त्रियांसाठीचे जाचक नियम तयार केले जातात. तिने हे घालू नये, असे बोलू नये, तसे फिरू नये. कारण काय तर त्यामुळे आमच्यातला निसर्ग उडी मारून बाहेर येइल मग आमचा काय दोष? असा बाळबोध प्रश्न पुरुष विचारतात. पुरुषसत्ताक समाजामधे स्त्रियांना एक स्वतंत्र माणूस म्हणून मान्यता देणे हे खरंच जड जाते. त्यांच्याकडे लिंगविरहीत नजरेने बघणे कुणालाच शक्य होत नाही. स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून. लैंगिक शिक्षणाचा येथे काहीही उपयोग नाही. ते म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी प्रकार आहे. लैंगिक संबंधांबाबत मुक्त विचार असणार्‍या समाजातही बलात्कार होतातच. स्त्रियांकडे फक्त लैंगिक सुख देणारी वस्तू म्हणून पाहणे हेच समस्यांचे मूळ आहे. तिची संमती असल्याशिवाय संबंध करू नये असा विचारही याच धारणेतून येतो. गायीचा मूड बघून गवळी दूध काढतात म्हणजे ते गायीला एक स्वतंत्र प्राणी म्हणून मान्यता देतात असा अर्थ होत नाही. ज्या दिवशी स्त्रिया समागमाचा निर्णय स्वत:चा स्वतः कुठल्याही आदेशाशिवाय, सामाजिक संकेताशिवाय, दडपणाशिवाय घेतील त्या दिवशी स्त्रीला एक स्वतंत्र माणूस म्हणून मान्यता मिळाली असे मानता येइल. बागेतले प्रत्येक फूल हे आपण हुंगावे म्हणून फुलले आहे असे विचार समस्त पुरुष सोडून देतील तो सुदिन. दुसरा विचार: बलात्काराच्या घटनांना विरोध करणारे पुरूष. यांचा नेमका कशाला विरोध असतो ही एक वेगळीच बाब आहे. बहुतेक पुरूष बलात्कारी इसमास निर्मम शिक्षा व्हाव्यात अशा तिव्र भावना व्यक्त करतात. त्यामागे स्त्रियांना माणूस म्हणून वागणूक मिळावी हा स्पष्ट हेतू दिसत नाही. बर्‍याचदा असे बघण्यात आले आहे की उच्चवर्गीय स्त्रीवर निम्नवर्गीय पुरुषाचा बलात्कार समाजास जास्त त्रास देणारा ठरतो. निर्भया प्रकरण एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माध्यमांमधे चर्चिल्या जाणार्‍या आणि लक्षात राहणार्‍या प्रकरणांमधे बलात्काराच्या मूळ प्रेरणेपेक्षा वर्गीय संघर्ष जास्त दिसून येतो. (जाणकारांनी काही वेगळे मत मांडल्यास स्वागत आहे.) याच प्रकरणात समान वर्गीय परिस्थिती असती तर खरेच हे प्रकरण एवढे चघळले गेले असते का किंवा भूतकाळात एखादे उदाहरण आहे का? बलात्कारास विरोध होत नाही तो फक्त त्यातल्या अमानुषपणास होत आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. तिसरा विचारः बलात्काराच्या घटना रो़खण्यासाठी सरकार किंवा समाज ज्या काही सुधारणा सुचवत आहे त्या खरंच हास्यास्पद आहेत असे माझे व्यक्तिगत मत आहे. तुर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 12:51 नवीन
स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच.
अहो विकृत , बहुसंख्य शब्द काढा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा