Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निर्भया डॉक्युमेंटरी वगैरे ....

च
चुकलामाकला
Wed, 03/04/2015 - 10:15
🗣 183 प्रतिसाद
मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे माझे आदर्श गांधी, सावरकर , मार्क्स वगैरे मला मनापासून पटतो स्त्रियांचा सन्मान , त्यांचे स्वातंत्र्य वगैरे मी मानतो हवे ते कपडे घालण्याचा ,कुठल्याही वेळी , कठेही एकटीने फिरण्याचा त्यांचा हक्क वगैरे बलात्कार , स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील गुन्हे ई .वर मी चिडतो वगैरे त्यावर तावातावाने बोलतो ,चर्चा करतो , फेसबुक वर लिहितो वगैरे …… डिलीट करतो न चुकता मी कॉम्प्युटर वरची ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे लॉक असतो माझा मोबाईल, अश्लील मेसेज, फोटो मी वाचतो, फोरवर्ड करतो , उडवतो वगैरे मित्रांमध्ये खाजगीतले माझे विनोद ऐकून लाजतील दादा कोंडके, सचिन यार्दी वगैरे … दिसली समोर बाई की चवीने बघतो तिचा खोल गळा, लो वेस्ट फाशन वगैरे आणि काढतो तिची मापे, मनातल्या मनात दाबतो वगैरे मिळाला एकांत की डोळ्यासमोर आणतो दिवसभरात दिसलेल्या बाया , सनी लिओन वगैरे … आजची बातमी ऐकून मुठी वळवून म्हणतो मी ,भे****,मा*** फाशी दिली पाहिजे या मुकेशला वगैरे मी सुशिक्षित, सुजाण , सभ्य वगैरे (कवितेपेक्षा चर्चेसाठी जास्त योग्य वाटले )

प्रतिक्रिया द्या
39912 वाचन

💬 प्रतिसाद (183)
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 13:29 नवीन
मुनीवर, माझ्या वाक्याला व्यक्तिगत घेण्याची काही गरज नाही. मानसशास्त्राच्या या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांकडून खात्री करून घ्या. तुम्ही असे तज्ञ असाल तर तुमचा अभ्यास मांडा. सत्य त्रासदायक आहे म्हणून मला विकृत म्हणण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 13:32 नवीन
विदा द्या की. एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज तुमची मजा केली नसेल कशावरून? स्वतःच्या आईबहिणीबरोबर संभोगाची इच्छा होणारे किती % पुरुष असतात समाजात याचा काय विदा आहे ते बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 13:40 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Oedipus_complex Sigmund Freud, who coined the term "Oedipus complex" believed that the Oedipus complex is a desire for the parent in both males and females; Freud deprecated the term "Electra complex", which was introduced by Carl Gustav Jung in regard to the Oedipus complex manifested in young girls. -- विकिपेदिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 13:42 नवीन
फ्रॉईडच्या थेर्‍या जशाच्या तश्या अलीकडे कोणीच स्वीकारत नाहीत हो. हा लै जुना माल झाला आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 13:45 नवीन
अ‍ॅग्रीड इन्डीड ! ( मी हेच खालच्या प्रतिसादात टाईपत होतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 13:44 नवीन
सिग्मंडराव भलताच यड*वा महान मानसशास्त्रज्ञ होता ... त्याची कित्येक मते आजच्या काळात आधुनिक मासशास्त्रज्ञांनी चुकीची ठरवली आहेत . हे ही त्यातील एक असु शकेल . २०० वर्षांपुर्वी त्याने जेव्हा हे मत मांडले असेल तेव्हा काय गदारोळ झाला असेल ह्याची कल्पना करवत नाही . पण काही म्हणा सिग्मनड खत्रुड होता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 13:45 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 13:56 नवीन
एखाद्या मानसशास्त्रज्ञाने सहज तुमची मजा केली नसेल कशावरून
असेही असेल... कदाचित. विदा मिळाल्यास जरूर देइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कपिलमुनी गुरुवार, 03/05/2015 - 13:37 नवीन
व्यक्तिगत घेणारच नाही . या विधानाचा निषेध मिपाकर करतीलच . आणि तुम्ही ते विधान केले आहे त्यामुळे कोणत्या तज्ञ लोकांकडून तुम्ही ही माहिती मिळवलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वगिश Sat, 03/07/2015 - 18:04 नवीन
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन-भाऊ यांच्या विषयीचे विडीओ आनी कथा यांना जास्त मागनी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अत्रन्गि पाउस Sun, 03/08/2015 - 03:31 नवीन
पोर्न फिल्म्स मधे आधी जाहीर करतात का ? आता समोरील जोडी अमुक तमुक नात्यातली आहे ...वगैरे ? किंवा प्रेक्षकांना पोर्न 'कथा' आवश्यक असते ?? नै काये कि मी पोर्न बघत नाही म्हणून विचारले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश Sun, 03/08/2015 - 12:17 नवीन
पॉर्न फिल्म मधे काम करनारे हे कलाकार असतात.खरे नाते नसते. स्टोरी असते.नाते जाहिर करतात. शेवट ठरलेला असतो .बरेच दिवस वडील - मुलगी यांची फिल्म टॉप व्हीवड लिस्ट मधे होती. पॉर्न च सोडा,सॉंग ऑफ आईस अॅड फायर ह्या जगप्रसीद्द पुस्तकावर बेतलेल्या गेम ओफ्फ थ्रोनस ह्यामलिकेत दाखवलेले बहीन भावाचे संबंध आनी लोकांना त्याविशयी असलेली उत्सुकता हेही वाढलेल्या टीआरपी चे एक कारण आहे.(एकमेव नव्हे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 03/08/2015 - 18:39 नवीन
गेम ऑफ थ्रोन्स ची तुलना पॉर्न शी करु नका. धन्यवाद. ती कथा ज्या काळामधे आणि रेल्म मधे घडतीये त्या काळामधे सर्रास बहिण भावाचही लग्न लाउन देत असतं. त्या संबंधांमागे जी काही "पॉवर कॉन्संट्रेशन" ची कारणं आहेत ती आणि सरसी लॅनिस्टरचा स्वभावही लक्षात घ्या. एका उत्कृष्ट कथेला अश्या खालच्या पातळीवर नेउ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश Mon, 03/09/2015 - 03:38 नवीन
विषय पॉर्न चा नसुन रक्तातील नात्यातील संबंधाबद्दल आहे. डांगे यांनी वापरलेला बहुसंख्य शब्द भारतीय संस्कृतित वाढलेल्या लोकांना नक्कीच चूकीचा वाटेल, तो चूकीचा आहेच. परंतु तसे नसतेच,किंवा दुर्मीळ असते असे बोलुन जी आगपाखड चालू आहे ती चुक वाटते. इतर सस्तन प्रान्यांमधे असे संबंध असतात. मानवाने आपल्या विचारांनी उत्तम सामाजिक व्यवस्था निर्माण केली. त्यात बेसिक इन्सींक्ट वर मर्यादा घालन्यात आल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/05/2015 - 13:25 नवीन
स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून.
शी! ही वाक्ये अत्यंत विकृत मानसिकतेची आणि पराकोटीच्या अज्ञानाची परमावधी असलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 13:43 नवीन
वा वा गुरूजी, झेपले नाही म्हणून सरळ विकृत आणि अज्ञानी? 'काय आहे' आणि 'काय असावे' यावर इथे परत फ्रेंच हत्याकांडासारखा वादविवाद करण्यात अर्थ नाही. पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. होणारे बलात्कार आणि प्रत्यक्ष नोंदवले जाणारे बलात्कार यात प्रचंड तफावत आहे हे तर उघड सत्य आहे. त्यानुसार होणारे बलात्कार आणि होऊ शकणारे बलात्कार यांच्यातही तेवढीच तफावत आहे. तरी मी 'बहूसंख्य' असा शब्द वापरला आहे. सिग्मंड फ्रायडसारखं सरसकटीकरण केले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे गुरुवार, 03/05/2015 - 14:23 नवीन
"पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात". प्रत्यक्ष नात्यातले म्हणजे बाप, सख्खा भाऊ किंवा मुलगा नव्हेत. तर मावस चुलत ई भाऊ किंवा मामा काका ई असतात. यात संस्काराचा मोठा भाग आहे. आपण दिलेले उदाहरण हे बलात्कारी पुरुषांचे आहेत. मुळात सर्वसामान्य लोकांत बलात्कारी किती आहेत आणी त्यातील बापकिंवा सख्खा भाऊ किती? म्हणजे आपल्या मुलीवर किंवा बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष ६२ कोटी मध्ये किती असतील काही शे ? याच्या १०० पट माणसे तशी इच्छा मनात बाळगणारे असतील तरीही हे प्रमाण नगण्यच असेल. बहुसंख्य म्हणजे निदान ५१% हवेत या न्यायाने ३२ कोटी पुरुष आपल्या आई मुली किंवा बहिणीवर एकदा तरी बलात्काराची इच्छा बाळगून आहेत/ होते हे म्हणणे फारच अतिशयोक्ती आहे. कोणत्य स्त्रीशी संभोग करावा आणि कोणाबरोबर नाही यात संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. काही संस्कृती मध्ये सख्ख्या बहिणीबरोबर लग्न करणे मान्य आहे. परंतु भारतीय संस्कृती मध्ये हे निषिद्धच आहे यात आई किंवा मुलगी येणे अर्थात शक्यच नाही. मग जर आपल्या म्हणण्याप्रमाणे ३२ कोटी पुरुष अशी इच्छा बाळगून असतील तर आपले संस्कार अगदी प्राण्यांपेक्षाही खालच्या थराचे मानायला पाहिजेत. कारण वन्य प्राण्यांमध्ये हि सख्ख्या भाऊ बहिणीत/ आई मुलात संकर होताना दिसत नाही. सिंह वाघ किंवा कोल्हे कुत्रे यात आपल्या कळपापासून नर दुसर्या कळपात जातो /हाकलला जातो. तेंव्हा आपले म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही असे वाटते. मनोविकार शास्त्रात असे वाचल्याचे आठवत नाही. फ्रोईडची गृहीतके कालबाह्य आणि चुकीची मानलेली असून आता फक्त मनोविकाराचा इतिहास म्हणून शिकवली जातात हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 19:30 नवीन
माझ्या प्रतिसादात मी 'भारतीय' पुरूष असे विशेषण वापरलेले नाही आणि ते मला अध्याह्रतही नाही. विषय भारतीय संस्कृतीचा नाही. आपल्या संस्कृतीत मान्य नाही म्हणून ते सत्य नाही असे नाही ना? वाघ-सिंहाचे कळप नसतात. कोल्हे-कुत्रे यांचे कळप असले तरी बरेच नर एकाच कळपात असतात. मादीसाठी त्यांच्यात लढाया होतात. त्यांच्यात संकर होत नाही असे आपले म्हणणे चुकीचे आहे असे वाटते. कारण कळप हे कुटंबासारखे असतात पण त्यांच्यात माणसांप्रमाणे स्थळ सांगून येत नाही. एका कळपातून दुसर्‍या कळपात जाणे इतके सहज नसते. मनुष्यप्राण्याची मूळ नैसर्गिक अवस्था आणि सद्य सामाजिक परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे. कालमानानुसार बर्‍याच समजुतींमधे फरक पडत आलेला आहे. तो पडत राहीन. त्यामुळे मान्यता बदलतात पण नैसर्गिक सत्य बदलत नाही. सामाजिक संस्कार तर वरून लादलेले आहेत. तसे नसते तर बलात्कार वाईट संस्काराचा भाग आहे असे मानल्या गेले नसते. (बलात्कार हा वेगवेगळ्या मानसिक, शारिरीक भावभावनांचा परिणाम आहे. चांगल्या-वाईट संस्कारांशी त्याचे काही घेणे-देणे नाही असे माझे वैयक्तिक मत आहे.) स्त्रियांकडे बघणार्‍या पुरुषांच्या नजरा बघणे हा माझा फार जुना छंद. त्यांच्या नजरा आपण पकडल्यावर होणारे त्यांचे चेहरे बघून मजेदार करमणूक होते. सगळ्याच नाही पण बहुसंख्य पुरुषांच्या वखवखलेल्या नजरा स्त्रियांकडे भक्ष्य म्हणून बघत असतात. इतके की नजरेनेच मनातल्या मनात काम उरकून घेतात. ते नैसर्गिक आहे असे स्वतःपुरते ते मानतात त्यावर एकमेकांची भलामण सुद्धा करतात. ते सगळे बलात्कारी आहेत किंवा करू शकतात असे काहीच नाही. म्हणून त्यांच्यात तशी इच्छाच नाही असे नाही. (थोडक्यात, कुणाचाही काहीही भरवसा देता येत नाही.) मुळात बलात्कार आणि अंतर्मनातले शारिरीक आकर्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यांची गल्लत होऊ नये. बादवे, सिग्मंड फ्रायड नंतर समाजाच्या प्रचलित जाणीवा हलवून सोडणारे काही कुणी मांडले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/05/2015 - 16:06 नवीन
>>> झेपले नाही म्हणून सरळ विकृत आणि अज्ञानी? तुमच्या निराधार आणि विकृत कल्पना इतरांना झेपाव्या अशी तुमची अपेक्षा दिसतेय. एकतर तुम्ही जी विकृत विधाने केली आहेत ती निराधार आहेत कारण तुम्हीच कबूल केलंय की तुमच्याकडे कोणतीही आकडेवारी नाही. तरीसुद्धा तुम्ही "बहुसंख्य" पुरूषांना तुमच्या निराधार विकृत कल्पनेत बसवून मोकळे झालात आणि चक्क त्याचे समर्थन करीत आहात. >>> पोलिसांच्या अहवालाप्रमाणे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. होणारे बलात्कार आणि प्रत्यक्ष नोंदवले जाणारे बलात्कार यात प्रचंड तफावत आहे हे तर उघड सत्य आहे. त्यानुसार होणारे बलात्कार आणि होऊ शकणारे बलात्कार यांच्यातही तेवढीच तफावत आहे. यातले किती टक्के बलात्कार मुलाने स्वतःच्या आईवर, सख्ख्या बहिणीवर, स्वतःच्या सख्ख्या मुलीवर केले आहेत? याची आकडवारी आहे का? का मनाला येईल ते फेकायचं आणि त्याचं समर्थन करत बसायचं? खाली डॉ. सुबोध खरे यांनी मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. तो तुम्हाला समजला असावा अशी फक्त आशाच करू शकतो. नसेल समजला तर फक्त सहानुभूती व्यक्त करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/05/2015 - 16:11 नवीन
वरील प्रतिसाद समजला असावा अशी इच्छा आहे. नसेल समजला किंवा समजून उमजून परत स्वतःच्या विकृत समजूतीचे समर्थन करत रहाल, तर मात्र तुम्हाला तुमच्याच निष्कर्षांवर आधारीत एक अत्यंत असभ्य व अवघड प्रश्न विचारीन. तो प्रश्न विचारायची खरोखरच इच्छा नाही, परंतु स्वतःच्या वाक्यांचे समर्थन सुरूच ठेवलेत तर तो प्रश्न असभ्य असला तरी विचारावाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 17:33 नवीन
सुखी राहा... तुम्हाला नेहमीच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक आणि व्यक्तिगत केल्याशिवाय चैन पडत नाही असे दिसते. त्यामुळे आपल्याला काही वाद घालायचा नाही बुवा. कारण मी बीफ खाणार्‍यांची बाजू घेतली तर 'तुम्हाला' असे 'वाटते' की मीपण बीफ खाणाराच आहे म्हणून त्यांची बाजू घेतो आहे. आम्ही दिलेले कुठलेही पुरावे तुम्हाला चालत नाहीत. स्वत:ला पाहिजे तो निष्कर्ष काढून तुम्ही न्यायाधिशाच्या भुमिकेत शिरता असा अनुभव आहे. अशा चर्चांना आणि असे निष्कर्ष काढणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो. तुमच्या संस्कारी मनाला 'बहुसंख्य' शब्द खटकला असेल, भावना दुखावल्या असतील तर मागे घेतो. पण तुम्हाला पटत नाही म्हणून जगात असे काही नसतेच असे मात्र म्हणू नका. आणि मी ते इथे मिपावर मांडले म्हणजे त्याचे समर्थन करतो असेही म्हणू नका. जर्मन सरकारचा निर्णय अमेरिका भारत इथे वाचा भारत आणखी भरपूर काही आहे. जेपींनी सांगितल्याप्रमाणे गूगलून बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आजानुकर्ण गुरुवार, 03/05/2015 - 17:56 नवीन
ब्रम्हदेव आणि सरस्वतीचे उदाहरण दिले तर गुरुजींना कदाचित समजेल असे वाटते. (आपल्या महान संस्कृतीतील त्यांना ते लगेच पटेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 03/06/2015 - 07:02 नवीन
>>> तुम्हाला नेहमीच प्रत्येक गोष्ट वैयक्तिक आणि व्यक्तिगत केल्याशिवाय चैन पडत नाही असे दिसते. त्यामुळे आपल्याला काही वाद घालायचा नाही बुवा. इथे व्यक्तिगत काहीही नाही. आकडेवारी आणि पुरावा नसताना सुद्धा तुमचा विकृत निष्कर्ष तुम्ही जनरलाईज केलात त्याला माझा आक्षेप आहे. >>> कारण मी बीफ खाणार्‍यांची बाजू घेतली तर 'तुम्हाला' असे 'वाटते' की मीपण बीफ खाणाराच आहे म्हणून त्यांची बाजू घेतो आहे. आम्ही दिलेले कुठलेही पुरावे तुम्हाला चालत नाहीत. कधी दिलेत पुरावे? आपला विकृत निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही आकडेवारी नाही असं तुम्हीच लिहिलं आहे. >>> स्वत:ला पाहिजे तो निष्कर्ष काढून तुम्ही न्यायाधिशाच्या भुमिकेत शिरता असा अनुभव आहे. अशा चर्चांना आणि असे निष्कर्ष काढणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो. मी पुराव्यांशिवाय निष्कर्ष काढत नाही. तुमचं एकदम उलटं आहे. तुम्ही कोणताही पुरावा/आकडेवारी नसताना स्वतःला पाहिजे तो निष्कर्ष काढून मोकळे होता. तुम्ही इतरांना फाट्यावर मारा किंवा अजून कोठेही मारा, पुराव्याशिवाय निष्कर्ष काढणे आणि त्याचे अट्टाहासाने समर्थन करीत राहणे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण आहे ही वस्तुस्थिती आहे. >>> तुमच्या संस्कारी मनाला 'बहुसंख्य' शब्द खटकला असेल, भावना दुखावल्या असतील तर मागे घेतो. तुमच्या विकृत मनोवृत्तीला 'बहुसंख्य' शब्द योग्य वाटला असेल. >>> पण तुम्हाला पटत नाही म्हणून जगात असे काही नसतेच असे मात्र म्हणू नका. आणि मी ते इथे मिपावर मांडले म्हणजे त्याचे समर्थन करतो असेही म्हणू नका. तुम्हाला जे असावंसं किंवा व्हावंसं वाटतं ते जगात असतंच किंवा होतंच असं नाही. तुम्ही आपल्या कविकल्पनेतून जे काही निष्कर्ष काढता ते आकडेवारीनिशी किंवा पुराव्यानिशी सिद्ध करा एवढंच आमचं म्हणणं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 03/07/2015 - 04:23 नवीन
तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास उत्तर द्यायची अजिबात गरज नाही पण माझं विकृत मन काही केल्या आवरत नाही. म्हणून ओकतो. व्यक्तिगत नाही म्हणता वरून वैयक्तिक शेरेबाजीही करता हे बाकी खास. असे काही नसेल तर मज पामराला तुमचे दिव्य मराठी कळत नाही असे मान्य करतो. (इथला 'मान्य करतो' हा शब्द उचलून डांगेंनी चूक मान्य केली अशी बोंबाबोंब करत फिरू नका. पीलीज.) तुम्हाला जे असावंसं किंवा व्हावंसं वाटतं ते जगात असतंच किंवा होतंच असं नाही.>> गुरुजी, तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडता आहात असे तुम्हाला वाटत नाही काय? मी दिलेल्या लिंका तपासून बघितल्या नसतीलच याची खात्री आहे. बघितल्या असतील तर त्या मी दिल्या आहेत म्हणून तुमच्या न्यायालयात रद्द्बातल ठरतात हेही चांगलेच ठावूक आहे. इंसेस्ट हा प्रकार जगात अस्तित्वातच नाही असे तुमच्या न्यायालयात सिद्ध होईल. तुम्हाला एवढी आग लागण्यासारखं काय आहे माझ्या प्रतिसादात? तो तुमचा सुसंस्कृत छंद असेल पण म्हणून संपूर्ण प्रतिसाद न वाचता, न विचार करता एका वाक्यावर - तेही एका शब्दावर - धुमाकुळ घालायला मिळतो म्हणून किती सुटायचे याला काही मर्यादा? आपल्या कविकल्पनेतून जे काही निष्कर्ष काढता ते आकडेवारीनिशी किंवा पुराव्यानिशी सिद्ध करा एवढंच आमचं म्हणणं.>> माझ्या काही सिद्ध करण्याने तुमच्या मान्यता बदलणार आहेत का? कुणाच्यातरी काहीतरी सिद्ध करण्याने काही महत्त्वाच्या विषयांमधल्या तुमच्या मान्यता बदलल्या, तुम्ही आपलं अज्ञान मान्य केले, माघार घेतली, माफी मागितली याचा काही पुरावा देता काय? तरच तुमच्यासारख्या विद्वान मंडळींसोबत वाद घालण्यात काही अर्थ. बरं, मी म्हणतोय ते खोटं आहे असे म्हणून मोकळे व्हा ना? दुसर्‍यास हीन, विकृत ठरवल्याशिवाय तुमच्या परमसंस्कारी आत्म्याला परमसंस्कारी असल्याची खात्री पटत नाही का? की चुकून मी म्हणतो ते खरं निघेल याची भीती वाटते? तसे काही नसेल तर मग एवढं खालच्या पातळीवर येऊन दुसर्‍यास हिणकस ठरवून तुम्हाला काय आसुरी आनंद होतो तो तुम्हालाच माहीत. ३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात मी लिहिलेले सारेच्या सारे माझ्या कवीकल्पना असून मी एक विकृत विचारांचा माणूस आहे ही सिद्ध करण्याची कोण ही धडपड? मी इतका महत्त्वाचा माणूस आहे की मिपासारख्या लाखो संकेतस्थळापैकी एकावर असणार्‍या हजारो धाग्यांपैकी एका धाग्यावरच्या शेकडो प्रतिसादापैकी नेमका माझाच प्रतिसाद आणि त्यातला एकच शब्द अखंड ब्रह्मांड हलवण्यास कारणीभूत ठरावा हे माझ्या आजच लक्षात आले. तसे होऊ नये म्हणून गुरुजी रणांगणावर लढायीला निघाल्यासारखे षड्डू ठोकून आव्हानं देतायत. अशा बाष्कळ आव्हानांना मी काडीचीही किंमत देत नाही कारण मी म्हणेल तेच सत्य, मलाच सारे कळते, माझे तेच खरे, इतर सर्व अज्ञानी मूर्ख अशी स्वतःची सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी समजूत करून घेतलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाला, आकलनाला, माहीतीला, मताला काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही ती देताय हे माझे अहोभाग्य. मी आधीच बॅटमॅन यांना उत्तर देतांना माझ्या विधानाच्या सत्यतेची खात्री नाही असे सुचित केले होते. मुद्दा 'बहुसंख्य' ह्या शब्दावरच्या आक्षेपाचा होता. तो शब्द मीच व्यवस्थित आकडेवारी मांडून मागेही घेतला आहे. याचा अर्थ असा होत नाही की जगात असे काही घडतच नाही. वर्तमानपत्रांतून पित्यापासून मुली गर्भवती राहल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. भावांनी बहीणींवर केलेल्या बळजबरीच्या बातम्या वाचल्या आहेत. हे प्रकार ऐकून विश्वास बसत नाही पण तुमचा विश्वास नाही म्हणून हे घडतच नाही असे नाही. भले प्रमाण ०.०१% असले तरीही. त्या विधानाचा अर्थ पुरुषांना सरसकट बलात्कारी ठरवणे कधीच नव्हता. मूळ नैसर्गिक प्रवृत्तींचा मागोवा घेणे हा होता. प्रत्येक सजिवाचे ध्येय वंशवृद्धी हेच आहे. नर किंवा मादी न मिळाल्यास स्वतःमधे जनुकिय बदल घडवून प्रजनन करणार्‍या प्रजाती आहेत. तेव्हा विशिष्ट परिस्थितीमधे आई-वडीलांपासून अपत्य होणे फार आश्चर्याची बाब नाही. आजचा मानव हा कधीकाळी इतर प्राण्यांप्रमाणे व्यवहार करत होता. ते नेमके कसे होते हे कळणे अशक्य आहे. पण म्ह्णून आजच्या सामाजिक संकेतांना प्रमाण ठरवून त्याच्याकडे बघणे चुकीचे आहे. काळानुसार सामजिक बदल होत आजचा सुसंस्कृत मानव तयार झाला आहे. पण मूळ प्राणीय प्रवृत्ती बदलल्या नाहीत तर सामाजिक संकेताखाली दाबून टाकल्या आहेत. टॉयलेट मॅनर्स हे त्याचे साधे उदाहरण. आजचा मानव नर मादी मिळवण्यासाठी दुसर्‍या नराशी भांडून आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून मादीला जिंकत नाही. मादीला जिंकण्यासाठी शिक्षण, पैसा, संपत्ती, प्रभाव, कला, बुद्धी याचा वापर करतो. म्हणजेच हिंसेचा वापर न करता श्रेष्ठत्वाची लढाई करतोच. संकेत बदलले पण मूळ वृत्ती तीच आहे. समाजाच्या मान्यता आणि मूळ प्राणिय प्रवृत्ती यांचे कायम द्वंद्व माणसाच्या मनात सुरु असते. प्राण्यांमधे असलेला फाईट ऑर फ्लाईट हा पवित्रा त्याला फक्त सामाजिक संकेतांमुळे घेता येत नाही. चित्र-विचित्र सामाजिक संकेत डोक्यात बाळगून प्रत्येक गोष्ट निसर्गनियमाविरूद्ध करायला लागत असल्याने प्रचंड दडपणाखाली असलेला माणूस कधीही कशाही पद्धतीने व्यक्त होऊ शकणारा भयंकर प्राणी झाला आहे. जिथे संकेत बलवान ठरतात तिथे माणूस संस्कारी आणि सभ्य मानला जातो. जिथे निसर्ग बलवान ठरतो तिथे विकृत आणि असभ्य. आपल्या डीएनए मधे हाच आदिमानव कायम असतो, लोक त्याला नाकारतात. नाकारू देत. निर्भया सारख्या घटनांमधून तो बाहेर पडतो. लोक तर्क लावत बसतात असे कसे झाले. दमन हीच संस्कृती असल्यावर अजून काय अपेक्षीत आहे? बाकी तुमच्यासारखे मिपाकर खुद्द डार्विन इथे काही सांगायला आलातर त्यालाही भंडावून सोडतील. जगात तर त्यालाही विरोध करणारे भरपूर आहेत. म्हणून काय कुणी विचार मांडूच नये काय? विचार मांडणार्‍यालाच विकृत ठरवणारे वादविवादपटू प्रथमच पाहिले. (मी स्वतःला डार्वीनच्या पंक्तीला बसवले आहे. विश्वाला अजून एक हादरा, धावा धावा, वाचवा जगाला.) ता.क.: जगातल्या तमाम सुसंस्कृत मानवांना नर-मादी असे संबोधून विकृत सरसकटीकरण केल्याच्या आरोपाखाली आता नवी केस टाका कोर्टात. त्याचाही तुम्ही पुरावा खचितच मागाल आणि नाकाराल याचे पुरेपुर खात्री आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/07/2015 - 08:32 नवीन
एक तर तुम्ही अत्यंत चुकीचा, असत्य आणि विकृत प्रकारचा दावा केलात आणि नंतर अनेकांनी मुद्देसूदपणे तुमचा प्रतिवाद करून तुमचा दावा खोटा ठरविल्यानंतर सुद्धा अजूनही तुम्ही त्याचे रेटून समर्थन करीत आहात. धन्य आहे! >>> तुमच्या सुसंस्कृत प्रतिसादास उत्तर द्यायची अजिबात गरज नाही पण माझं विकृत मन काही केल्या आवरत नाही. म्हणून ओकतो. हे अगदी खरं >>> व्यक्तिगत नाही म्हणता वरून वैयक्तिक शेरेबाजीही करता हे बाकी खास. असे काही नसेल तर मज पामराला तुमचे दिव्य मराठी कळत नाही असे मान्य करतो. (इथला 'मान्य करतो' हा शब्द उचलून डांगेंनी चूक मान्य केली अशी बोंबाबोंब करत फिरू नका. पीलीज.) कोठेही वैयक्तिक शेरेबाजी केलेली नाही. तुमचा दिव्य शोध हा अत्यंत विकृत स्वरूपाचा असून पूर्ण खोटा आहे हेच मी लिहिले आहे. शोध तुमचाच आहे, इतरांचा नाही. त्यामुळे टीका तुम्हालाच सहन करावी लागणार, इतरांना नाही. 'बोंबाबोंब' या शब्दावरून तुम्ही अजूनही शिमग्याच्या आनंदातच मग्न आहात असं दिसतंय. >>> तुम्हाला एवढी आग लागण्यासारखं काय आहे माझ्या प्रतिसादात? तो तुमचा सुसंस्कृत छंद असेल पण म्हणून संपूर्ण प्रतिसाद न वाचता, न विचार करता एका वाक्यावर - तेही एका शब्दावर - धुमाकुळ घालायला मिळतो म्हणून किती सुटायचे याला काही मर्यादा? मला एकट्याला तो प्रतिसाद खटकलेला नाही. इतर अनेकांना तो खटकला आहे. एकानेही तुम्हाला अनुमोदन दिलेले नाही यातच काय ते समजा. फक्त 'बहुसंख्य' हा शब्द न वाचता आपला संपूर्ण प्रतिसाद वाचा. एकदा वाचून नाही समजला तर पुन्हा एकदा वाचा. आपल्या पत्नीला, भावाबहिणींना, मित्रांना वाचायला द्या आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया बघा. असले भीषण प्रतिसाद लिहिणे हा तुमचा असंस्कृत छंद असेल, पण म्हणून किती खालची पातळी गाठायची याचा विचार करा. >>> माझ्या काही सिद्ध करण्याने तुमच्या मान्यता बदलणार आहेत का? कुणाच्यातरी काहीतरी सिद्ध करण्याने काही महत्त्वाच्या विषयांमधल्या तुमच्या मान्यता बदलल्या, तुम्ही आपलं अज्ञान मान्य केले, माघार घेतली, माफी मागितली याचा काही पुरावा देता काय? तरच तुमच्यासारख्या विद्वान मंडळींसोबत वाद घालण्यात काही अर्थ. वाद घाला नाही तर घालू नका. पण तुम्ही कोण मला पुरावा मागणारे? >>> बरं, मी म्हणतोय ते खोटं आहे असे म्हणून मोकळे व्हा ना? दुसर्‍यास हीन, विकृत ठरवल्याशिवाय तुमच्या परमसंस्कारी आत्म्याला परमसंस्कारी असल्याची खात्री पटत नाही का? तुम्ही जे लिहिलं आहे ते निव्वळ खोटं नसून अत्यंत बीभत्स आहे. हे आधीच लिहिलं आहे. वाचलं नाहीत वाट्टं? >>> की चुकून मी म्हणतो ते खरं निघेल याची भीती वाटते? तसे काही नसेल तर मग एवढं खालच्या पातळीवर येऊन दुसर्‍यास हिणकस ठरवून तुम्हाला काय आसुरी आनंद होतो तो तुम्हालाच माहीत. अजूनही अट्टाहास कायम दिसतोय. >>> ३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात मी लिहिलेले सारेच्या सारे माझ्या कवीकल्पना असून मी एक विकृत विचारांचा माणूस आहे ही सिद्ध करण्याची कोण ही धडपड? मी त्या एका परिच्छेदावरच प्रतिक्रिया दिली आहे. त्या परिच्छेदातील दावा नक्कीच विकृत स्वरूपाचा होता. >>> मी इतका महत्त्वाचा माणूस आहे की मिपासारख्या लाखो संकेतस्थळापैकी एकावर असणार्‍या हजारो धाग्यांपैकी एका धाग्यावरच्या शेकडो प्रतिसादापैकी नेमका माझाच प्रतिसाद आणि त्यातला एकच शब्द अखंड ब्रह्मांड हलवण्यास कारणीभूत ठरावा हे माझ्या आजच लक्षात आले. कोणीही काहीही घाण लिहिलं तर मी विरोध करणारच. >>> तसे होऊ नये म्हणून गुरुजी रणांगणावर लढायीला निघाल्यासारखे षड्डू ठोकून आव्हानं देतायत. अशा बाष्कळ आव्हानांना मी काडीचीही किंमत देत नाही नका देऊ. >>> कारण मी म्हणेल तेच सत्य, मलाच सारे कळते, माझे तेच खरे, इतर सर्व अज्ञानी मूर्ख अशी स्वतःची सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञानी समजूत करून घेतलेली नाही. मी माझ्या स्वतःच्या ज्ञानाला, आकलनाला, माहीतीला, मताला काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही ती देताय हे माझे अहोभाग्य. मी तुमच्या मताला अजिबात किंमत देत नाहीय्ये. तुम्ही जी निराधार बेछूट विधाने केली आहेत ती खोडून काढतोय. >>> मी आधीच बॅटमॅन यांना उत्तर देतांना माझ्या विधानाच्या सत्यतेची खात्री नाही असे सुचित केले होते. मुद्दा 'बहुसंख्य' ह्या शब्दावरच्या आक्षेपाचा होता. तो शब्द मीच व्यवस्थित आकडेवारी मांडून मागेही घेतला आहे. तुम्ही हा शब्द ज्या प्रतिसादात मागे घेतला तो प्रतिसाद ०६/०३/२०१५ १४:३२ या वेळी दिलेला आहे. माझा प्रतिसाद त्यापुर्वीच ०६/०३/२०१५ ११:३२ या वेळी दिलेला होता. इतर सर्वांनी टीकेची झोड उठविल्यावर तुम्हाला उपरती झाली. >>> याचा अर्थ असा होत नाही की जगात असे काही घडतच नाही. वर्तमानपत्रांतून पित्यापासून मुली गर्भवती राहल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. भावांनी बहीणींवर केलेल्या बळजबरीच्या बातम्या वाचल्या आहेत. हे प्रकार ऐकून विश्वास बसत नाही पण तुमचा विश्वास नाही म्हणून हे घडतच नाही असे नाही. भले प्रमाण ०.०१% असले तरीही. आधी तावातावाने म्हणत होता की बहुसंख्य पुरूष (म्हणजे किमान ५१%) असे करतात. आता हेच प्रमाण ०.०१% पर्यंत खाली आणलेलं दिसतंय. प्रगती आहे. >>> त्या विधानाचा अर्थ पुरुषांना सरसकट बलात्कारी ठरवणे कधीच नव्हता. मूळ नैसर्गिक प्रवृत्तींचा मागोवा घेणे हा होता. कसली आली आहे डोंबलाची नैसर्गिक प्रवृत्ती आणि कसला डोंबलाचा मागोवा ! काहीही बेछूट विधानं करायची आणि त्याचं रेटून समर्थन करत बसायचं. >>> प्रत्येक सजिवाचे ध्येय वंशवृद्धी हेच आहे. नर किंवा मादी न मिळाल्यास स्वतःमधे जनुकिय बदल घडवून प्रजनन करणार्‍या प्रजाती आहेत. तेव्हा विशिष्ट परिस्थितीमधे आई-वडीलांपासून अपत्य होणे फार आश्चर्याची बाब नाही. आजचा मानव हा कधीकाळी इतर प्राण्यांप्रमाणे व्यवहार करत होता. ते नेमके कसे होते हे कळणे अशक्य आहे. पण म्ह्णून आजच्या सामाजिक संकेतांना प्रमाण ठरवून त्याच्याकडे बघणे चुकीचे आहे. बरं, मग त्याकाळचे सामाजिक संकेत प्रमाण माना. यापुढे लिहिलेले प्रवचन वाचता वाचता झोप आली, त्यामुळे उत्तर देत नाही. तुमचे महनीय विचार, तुमचं आकलन, तुमच्या चुकीच्या असल्या तरी ठाम असलेल्या समजूती इ. इ. तुम्हालाच लखलाभ होवोत. परंतु काही घाण लिहिलंत तर नक्कीच इथले सदस्य विरोध करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 03/07/2015 - 10:56 नवीन
फक्त 'बहुसंख्य' हा शब्द न वाचता आपला संपूर्ण प्रतिसाद वाचा. एकदा वाचून नाही समजला तर पुन्हा एकदा वाचा. आपल्या पत्नीला, भावाबहिणींना, मित्रांना वाचायला द्या आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया बघा. असले भीषण प्रतिसाद लिहिणे ते 'बहुसंख्य' वालं विधान वगळूनही संपूर्ण प्रतिसाद 'भीषण' आहे? काय भीषण आहे आणि कसे ते जरा सांगाल का? म्हणजे इथून पुढे 'लोकांना आवडेल तेच लिहावं' याबद्दल निर्णय घेता येइल. स्त्रियांना एक 'स्वतंत्र माणूस' म्हणून समाजाने वागवावं अशी अपेक्षा करणे पुरूषी-वर्चस्ववादी मानसिकतेसाठी भीषण आहेच. तुम्हालाही तसंच वाटतं? लोकानुयासाठी लिहायची मला काही गरज नाही. पटलं तर घ्या नाहीतर सोडा पण माझे प्रतिसाद विकृत व घाण आहेत की नाहीत याचे मॉरल पोलिसींग करायची तुम्हास काही एक आवश्यकता नाही. माननीय संपादक आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/07/2015 - 17:37 नवीन
>>> ते 'बहुसंख्य' वालं विधान वगळूनही संपूर्ण प्रतिसाद 'भीषण' आहे? काय भीषण आहे आणि कसे ते जरा सांगाल का? म्हणजे इथून पुढे 'लोकांना आवडेल तेच लिहावं' याबद्दल निर्णय घेता येइल. स्त्रियांना एक 'स्वतंत्र माणूस' म्हणून समाजाने वागवावं अशी अपेक्षा करणे पुरूषी-वर्चस्ववादी मानसिकतेसाठी भीषण आहेच. तुम्हालाही तसंच वाटतं? तुमच्या प्रतिसादातील इतर फाफटपसार्‍याबद्दल मी लिहिलंच नव्हतं. 'बहुसंख्य' पुरूषांना कोणताही पुरावा किंवा आकडेवारी नसताना तुम्ही ज्या प्रकारात ढकलून दिलं होतं (का तर तुम्हाला तसं वाटतं म्हणून, पुरावा आहे म्हणून नाही), त्या घाणेरड्या वाक्यांना मी विरोध केला होता. निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केले आहे हे लक्षात आले असेलच. जे काय लिहायचं ते खरं असेल तर लिहा, लोकांना आवडेल किंवा नावडेल याचा विचार करू नका. परंतु, स्वतःच्या घाण कविकल्पना सत्य म्हणून खपवू नका. >>> लोकानुयासाठी लिहायची मला काही गरज नाही. पटलं तर घ्या नाहीतर सोडा पण माझे प्रतिसाद विकृत व घाण आहेत की नाहीत याचे मॉरल पोलिसींग करायची तुम्हास काही एक आवश्यकता नाही. माननीय संपादक आपली जबाबदारी व्यवस्थित निभावतात. असं असेल तर स्वतःचे घाण विचार स्वत:च्या दैनंदिनीत लिहून रोज रात्री झोपताना पारायणे करा. असले किळसवाणे विचार सार्वजनिक करू नका. सार्वजनिक ठिकाणी असलं काही लिहिल्यावर प्रतिक्रिया येणारच. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चव्हाट्यावर मांडता तेव्हा त्याचा सार्वजनिक पंचनामा होणारच. त्याची तयारी ठेवा किंवा आपले विचार सार्वजनिक करूच नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sat, 03/07/2015 - 17:38 नवीन
>>> निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केले आहे हे लक्षात आले असेलच. हे वाक्य असे वाचावे. निव्वळ मी विरोध केलेला नसून इतर अनेकांनी तुमच्या त्या घाण विधानांचा विरोध केलेला आहे व एकानेही समर्थन केलेले नाही हे लक्षात आले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Sun, 03/08/2015 - 11:02 नवीन
सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे जेव्हा आपण चर्चा कराल तेव्हा कायम खालील वाक्य लक्षात ठेवा. 'मला तुझ्या म्हणण्यांतला एक शब्दही पटत नाही, पण तुला तुझे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते मांडण्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचेशी मी प्राणपणाने लढेन.' दुसरे असे: वादविवादात सभ्य लोक खालचा नियम पाळतात. “It is not allowable to arraign the motives of a member, but the nature or consequences of a measure may be condemned in strong terms. It is not the man, but the measure, that is the subject of debate.” प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्यास तुम्हाला कुणीही बंदी घातली नाही. पण प्रतिसादकर्त्यास सरळ विकृत आणि असभ्य म्हणणे मिपाच्या सांसदिय धोरणात बसते का? तुमच्या एकूण प्रतिसादांवरून तुम्ही किती सभ्यतेचे निकष पाळत आहात ते दिसत आहेच. तुमच्या मते आपल्या चित्रांमधून नग्न स्त्री-देहाचे चित्रण करणारे चित्रकार विकृत असले पाहिजेत. शारिरिक रचनेच्या अभ्यासासाठी देहाची चिरफाड करणारे डॉक्टर्सही विकृत असले पाहिजेत. बहुसंख्य शब्द मागे घेऊनही तुम्हाला माझा प्रतिसाद खटकतोच आहे याचा अर्थ तुम्हाला सत्य समोर आलेले चालत नाही. तेव्हा इतरांना काय लिहावे याचे सल्ले देण्यापेक्षा आपण काय वाचावे यावर तुम्हीच विचार केलेला बरा. ज्यापद्धतीने तुम्ही प्रतिवाद करत आहात तो सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छीतो. त्यास माझा प्रखर आक्षेप आहे. डॉ. खरेंनी संतुलीत आणि अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला आहे. त्यातून सभ्य सुसंसकृत लोकांमधे वादविवाद कसा करावा हे तुम्हाला शिकता येइल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. बाकी आकडेवारी आणि पुरावा याबद्दलच्या विदाभ्रमिष्टांच्या सततच्या आग्रहाचं विश्लेषण करणारा लेख लिहितो आहेच. तो वाचाल तेव्हा चर्चा करू. धन्यवाद! माझ्यापुरता हा वादविवाद इथे संपला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/08/2015 - 14:07 नवीन
मा. संपादक, माझ्या खालील प्रतिसादात काहीही असभ्य, मिसळपाव संस्थळाच्या धोरणांच्या अथवा नियमांच्या विरूद्ध लिहिलं असेल तर तातडीने प्रतिसाद काढून टाकावा ही विनंती. ________________________________________________________________________________ >>> सभ्य आणि सुसंस्कृत लोकांमधे जेव्हा आपण चर्चा कराल तेव्हा कायम खालील वाक्य लक्षात ठेवा. 'मला तुझ्या म्हणण्यांतला एक शब्दही पटत नाही, पण तुला तुझे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ते मांडण्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचेशी मी प्राणपणाने लढेन.' मी तेच करतोय. तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्यासाठी मी किंवा संकेतस्थळाच्या प्रशासकांनी किंवा इतर कोणीही अजिबात प्रतिबंध केलेला नाही. सभ्य आणि सुसंस्कृत लोकांशी चर्चा असो वा असभ्य आणि असुसंस्कृत लोकांशी चर्चा असो, हे तत्व मी नेहमीच पाळतो. >>> दुसरे असे: वादविवादात सभ्य लोक खालचा नियम पाळतात. “It is not allowable to arraign the motives of a member, but the nature or consequences of a measure may be condemned in strong terms. It is not the man, but the measure, that is the subject of debate.” मी तेच केले आहे. तुमच्या अत्यंत निराधार आणि घृणास्पद विधानांचा मी विरोध केलेला आहे. तुमचा व्यक्तिगत विरोध केलेला नाही. >>> प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्यास तुम्हाला कुणीही बंदी घातली नाही. पण प्रतिसादकर्त्यास सरळ विकृत आणि असभ्य म्हणणे मिपाच्या सांसदिय धोरणात बसते का? तुमच्या एकूण प्रतिसादांवरून तुम्ही किती सभ्यतेचे निकष पाळत आहात ते दिसत आहेच. तुमची ती विशिष्ट विधाने विकृत आणि असभ्य आहेतच, पण ती निराधार व असत्य सुद्धा आहेत. तुमची खालील विधाने पुन्हा एकदा वाचूया.
स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात. कारण सामाजिक मान्यता नाही म्हणून.
विशिष्ट वयात स्वतःची आई, मुलगी, बहीण इ. बरोबर समागम करावा अशी "बहुसंख्य" पुरूषांची इच्छा असते हे कोणत्या महाभागाने सांगितलं तुम्हाला? तुम्हाला अशी इच्छा निर्माण झाली होती का कधी? आता तुम्ही पुरूष असल्याने आणि तुमच्या दाव्यानुसार "बहुसंख्य" पुरूषांना अशी इच्छा निर्माण होत असल्याने तुम्हालाही अशी इच्छा निर्माण झाली असणारच. अशी इच्छा निर्माण झाली नसल्यास तुम्ही खोटे बोलत आहात किंवा अशी इच्छा निर्माण झाली असल्यास तुमची विचारसरणी असभ्य आहे हा निष्कर्ष नक्कीच काढता येतो. एकतर तुम्ही अत्यंत प्रक्षोभक आणि असभ्य विधाने केलीत आणि दुसरं म्हणजे या विधानांच्या सत्यतेचा कोणताही आधार/पुरावा तुमच्याकडे नाही हेही कबूल केलंत. ज्या ज्या सदस्यांनी तुमच्या विधानांचा विरोध केला त्यांना उलट प्रतिसाद देऊन आपल्या असत्य विधानांचे समर्थन करायचा आटोकाट प्रयत्न तुम्ही केलात. नंतर आपल्या विधानांचे समर्थन करणे अशक्य झाले तेव्हा शहाजोगपणे "मी बहुसंख्य हा शब्द मागे घेतो" असे संभावितपणे लिहिले. मुळात ज्या दाव्यामागे कोणतीही आकडेवारी नाही, पुरावे नाहीत, जी केवळ तुमची कविकल्पना आहे असे घृणास्पद दावे करावेच का? आणि अशा दाव्यांना इतरांनी विरोध केला तर त्यांच्यावरच आगपाखड करताय. कदाचित मी असभ्य असेन. कदाचित ज्या सदस्यांनी तुम्हाला विरोध केला आहे त्यांना सत्याला सामोरे जायची हिंमत नसेल किंवा त्यांने तुमचे महनीय, क्रांतिकारक विचार समजलेले नसतील. मी एक सोपा उपाय सुचविलेला आहे. तुमची वरील वाक्ये तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना ऐकवा आणि त्यांची प्रतिक्रिया बघा. >>> तुमच्या मते आपल्या चित्रांमधून नग्न स्त्री-देहाचे चित्रण करणारे चित्रकार विकृत असले पाहिजेत. आहेतच. >>> शारिरिक रचनेच्या अभ्यासासाठी देहाची चिरफाड करणारे डॉक्टर्सही विकृत असले पाहिजेत. नाही. कारण मानवी आरोग्यासाठी ते अशी चिरफाड करतात. >>> बहुसंख्य शब्द मागे घेऊनही तुम्हाला माझा प्रतिसाद खटकतोच आहे याचा अर्थ तुम्हाला सत्य समोर आलेले चालत नाही. तेव्हा इतरांना काय लिहावे याचे सल्ले देण्यापेक्षा आपण काय वाचावे यावर तुम्हीच विचार केलेला बरा. ज्या विधानांना कोणताही आधार नाही, कोणतीही आकडेवारी नाही अशी विधाने सत्य कशी? तुम्ही काहीही फेकावं आणि मी त्याला सत्य समजून त्याचा स्वीकार करावा अशी तुमची अपेक्षा दिसतेय. तुम्ही जेव्हा सार्वजनिक संस्थळावर लिहिता तेव्हा तुमची इच्छा असली किंवा नसली तरी ते वाचलं जाणारच आणि त्याच्यावर प्रतिक्रिया येणारच. इतरांनी आपले लेखन वाचू नये अशी इच्छा असल्यास लिहू तरी नये किंवा स्वतःच्या खाजगी दैनंदिनीत लिहावे. >>> ज्यापद्धतीने तुम्ही प्रतिवाद करत आहात तो सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छीतो. त्यास माझा प्रखर आक्षेप आहे. तुम्ही जे लिहिलं आहे ते सभ्य नाही हे मी नमूद करू इच्छितो. >> डॉ. खरेंनी संतुलीत आणि अभ्यासपूर्ण प्रतिवाद केला आहे. त्यातून सभ्य सुसंसकृत लोकांमधे वादविवाद कसा करावा हे तुम्हाला शिकता येइल. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. कोणाकडून काय शिकायचं हे तुम्ही मला शिकविण्याची आवश्यकता नाही. याबाबतीत मी तुम्हाला सल्ला विचारलेला नाही. >>> बाकी आकडेवारी आणि पुरावा याबद्दलच्या विदाभ्रमिष्टांच्या सततच्या आग्रहाचं विश्लेषण करणारा लेख लिहितो आहेच. तो वाचाल तेव्हा चर्चा करू. धन्यवाद! माझ्यापुरता हा वादविवाद इथे संपला आहे. जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 03/08/2015 - 14:33 नवीन
आपली पात्रता दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/08/2015 - 17:45 नवीन
माझी पात्रता समजण्याची पात्रता तुमच्यात आल्याबद्दल अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मृत्युन्जय Fri, 03/06/2015 - 09:08 नवीन
९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. हा विदा इथे अतिशय अयोग्य आहे असे नमूद करु इच्छितो. तुम्ही म्हणता " बहुसंख्य" म्हणजे १०० तले ५१ असे धरुयात. बलात्कार करणारे १ लाखात एक असतात असे धरुयात (ढोबळमानाने एकुण लोकसंख्येच्या ५०% म्हणजे ६० करोड पुरुष धरले आणि त्यातील ५०% सज्ञान धरले तर ३० करोड पुरुष धरुयात. तुम्ही म्हणता यातले १५.५ करोड तशी अपेक्षा धरतात) आता रेप बद्दल बोलुयात. भारतात दर वर्षी २५००० बलात्काराच्या घटना घडतात. असे मानुयात की १० पैकी एकच मुलगी पुढे येते. म्हणजे २५०००० बलात्कार होतात. म्हणजे ३० करोड लोकांपैकी केवळ अडीच लाख लोक बलात्कारी असताना (हे प्रमाण ०.०८% होते). तुम्ही हे सरसकटीकरण करत आहात हे नक्कीच विचित्र वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 03/06/2015 - 10:02 नवीन
९५ टक्क्यांपेक्षा जास्त बलात्कारी पुरुष हे प्रत्यक्ष नात्यातले, अतिशय जवळचे नातलग आणि रोजच्या ओळखीतले असतात. हे मी नाही म्हणत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल आहे. http://ncrb.nic.in/CD-CII2012/cii-2012/Table%205.4.pdf TOTAL (ALL INDIA) 24470 parents: 393 Relatives: 1585 Neighbours: 8484 Other Known Persons: 14008 A rapist creates an opportunity that allows for a situation where there is privacy so that his control over the victim is complete. Figures point to the fact that most rapists are married. Experts believe that two prime reasons for rape, which have little to do with the marital status, are uncontrolled urge to enact sexual fantasies and to dominate. Therefore, it is not a crime of opportunity that is carried out in the spur of the moment, as rapists depose in their defence or make it sound to be a consensual act, but in most cases rape is well-planned and a considered act. The rapist actually enacts the rape in his mind for many times before he actually carries it out; the opportunity in most of the cases is created by manipulating situation carefully. That is why as many as 90 per cent cases are of 'Date Rape' where the victim is known to the rapist. It is worrying that the crime against women is growing as percentage of total Indian Penal Code crimes, with about 21,000 cases of rape reported in India in 2007, growing at the rate of 7 per cent. Of this, 405 cases were that of incest. Read more at: http://indiatoday.intoday.in/story/The+iceberg+of+rape/1/46911.html बलात्कार करणारे आणि अजाणतेपणी शारिरीक आकर्षण मनात उद्भवणारे यात गल्लत करू नये. "बहुसंख्य" शब्दाला आक्षेप घेतला आहे. त्यामुळे तो मागे घेत आहे. कुठलेही सरसकटीकरण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 03/06/2015 - 10:11 नवीन
माझा आक्षेप केवळ बहुसंख्य शब्दाला होता. तो तुम्ही मागे घेतलात, बाकीच्या गोष्टींबद्दल मला फारसे ज्ञान नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Fri, 03/06/2015 - 10:28 नवीन
डांगे साहेब आपल्या सांख्यिकीनुसार बलात्कारात parents म्हणजे बाप फक्त ३९३/२४४७० म्हणजेच ०.०१६% इतके कमी आहेत. यात सख्खाच नव्हे तर सावत्र बाप सुद्धा येतो. बर्याच वेळेस सावत्र बाप सख्ख्या बापापेक्षा जबाबदार असलेला आढळलेला आहे. तेंव्हा आपण कितीहि विदा देण्याचा प्रयत्न केलात तरीही सख्खा बाप आणि मुलगा हे आपल्या आई आणि मुलीवर बलात्कार करण्याची इच्छा बाळगून असतील हे मान्य करणे अशक्य आहे. सख्खा भाऊ असण्याची शक्यता थोडीशी जास्त असेल ४०५/२१०००= ०. ०१९ पण तरीही "बहुसंख्य" हा अतिशयोक्तीपूर्ण आहे यात शंका नाही. साहेब बलात्कारीत स्त्रीवर उपचार किंवा सोनोग्राफी करण्याचे काही प्रसंग माझ्यावर आलेले आहेत. कारण बर्याच वेळेस त्या स्त्रीला अंतर्गत अवयवांना काही इजा झाली आहे का हे पाहावे लागते त्यामुळे या विषयावर माझे थोडे फार वाचनही होते. बहुसंख्य पुरुष पोर्न बघतात याशी मी सहमत आहे परंतु "स्वतःच्या आईवर, मुलीवर, बहिणीवर बलात्कार करणारे पुरुष याची स्पष्ट उदाहरणे आहेत. यांचे प्रमाण लाखात एक असले तरी बहुसंख्य पुरुष विशिष्ट वयात निदान अशा समागमाची इच्छा बाळगणारे तरी असतातच. पण या इच्छा खूप खूप व्यक्तिगत आणि लपवलेल्या असतात " हे विधान फारच अतिरंजित आहे यात मला तिळमात्र शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 03/08/2015 - 14:14 नवीन
भारतात दर वर्षी २५००० बलात्काराच्या घटना घडतात. असे मानुयात की १० पैकी एकच मुलगी पुढे येते. म्हणजे २५०००० बलात्कार होतात. म्हणजे ३० करोड लोकांपैकी केवळ अडीच लाख लोक बलात्कारी असताना (हे प्रमाण ०.०८% होते)
तुमच्या गणिताबद्दल काही चुकीचे नाही. पण गणित कसे मांडता यावरही बरेच अवलंबून आहे. १. १० पैकी १ मुलगी पुढे येते असे इथे मानले आहे. याचा खात्रीलायक विदा नाही. नोंदवले जाणारे बलात्कार २ पैकी १ असेही असू शकतात आणि १०० पैकी १ असेही असू शकतात्, १००० पैकी १ असेही असू शकतात. न नोंदवले जाणार्‍या गोष्टींचा विदा कसा काय असू शकतो? फक्त अंदाज असू शकतो. हा अंदाज लावणार्‍याच्या पुर्वग्रहाने प्रभावित होऊ शकतो. सरकारचा अंदाज ३०-४५% आहे. एनजीओंचा अंदाज ९०% वैगेरे आहे. विदा आहे म्हणजे फक्त नोंदवले आहे. प्रत्यक्ष आकडेवारीचा तो पुरावा नव्हे. २. दर वर्षी २५०००: दर वर्षी हा शब्द फार महत्वाचा आहे. ३० करोड मधून २०१२ या वर्षी 24,923 हजार गुन्हे दाखल झाले. २०१३ मधे 33,707 गुन्हे दाखल झालेत. ३० करोड पुरुष २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षात तेच होते. मागच्या ५ वर्षाचा विचार करता १,२६,४०५ गुन्हे नोंद झाले आहेत. ह्या ५ वर्षातही ३० करोड पुरुष तसेच आहेत हे लक्षात घ्या. २००१ ते २०१४ या १५ वर्षांचा विचार करता सुमारे ३ लाखापेक्षा जास्त प्रत्यक्ष बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता इथे तुमचे गणित लावले तर ३ लाख गुणिले १० = ३० लाख एवढे गुन्हे झालेत ज्याची नोंद झाली नाही. ३. प्रत्यक्ष बलात्कार च्या सोबतच बळजबरी करणे, अतिप्रसंग, लैंगिक इच्छेचं प्रत्यक्ष प्रदर्शन, सूचक प्रदर्शन ह्या घटना नोंदवल्या जातात. आयपीसी धारा ३५४ आणि ५०९ नुसार २००९-२००१३ मधे २,८९,६८४ गुन्हे नोंदवले आहेत. २००१ ते २०१४ या १५ वर्षांचा विचार करता सुमारे ९ लाख अतिप्रसंग, विनयभंग हे गुन्हे नोंदवले गेले आहेत. आता इथे तुमचे गणित लावले तर ९ लाख गुणिले १० = ९० लाख एवढे गुन्हे झालेत ज्याची नोंद झाली नाही. तरी यात सहेतुक स्पर्श, कामांध नजरेने बघणे (ज्याचा पिडीत स्त्री पुरावा देऊ शकत नाही पण तिने ते अनुभवलेले असते) याचा समावेश नाही. म्हणजे तुमच्या गणिता नुसार ९० लाख + ३० लाख = १ करोड २० लाख गुन्ह्यांची नोंद झाली नाही असा फक्त अंदाज आहे. यात ९५% पेक्षा जास्त ओळखीचे लोक आहेत. लक्षात असू द्या या १५ वर्षात कुठल्याही वेळेला भारतात किमान २५ करोड पुरुष उपस्थित आहेत. ४. कुठलाही लैंगिक गुन्हा करणे आणि लैंगिक इच्छा असणे यात खूप फरक आहे. ढोबळ अंदाजाने, झालेल्या एका लैंगिक गुन्ह्यामागे होऊ शकणारे १० गुन्हे जरी मानले तरी ही संख्या १२ करोड होऊ शकते. किंवा जास्तही होऊ शकते. पण कमी निश्चितच होणार नाही. निश्चितच ही संख्या कुठल्याही वेळेस भारतात उपलब्ध पुरुषांच्या ५१% पेक्षा जास्त असू शकते. परस्पर संमतीने होणार्‍या पण समाजमान्यता नसणार्‍या लैंगिक संबंधांचीही कुठे नोंद होत नाही. त्यांचीही संख्या वरच्या आकड्यात धरली नाही आहे. याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीच असे नाही. लोकसंख्येच्या बाबतीत मांडल्या जाणार्‍या टक्केवारीच्या खेळाचा मला सर्वस्वी तिरस्कार आहे. याच मुर्ख टक्केवारीच्या आधारावर सरकार नागरिकास जगण्यास दिवसाला ३५ रुपये पुरे असे माणुसकीहिन विधान करू शकते. नुकसानभरपाई म्हणून संकटग्रस्त शेतकर्‍याच्या हातावर रु. २ फक्त चा धनादेश ठेवू शकते. १२० कोटी जनते मधे १२ जरी बलात्कार झाले तरी माझ्या मते त्याची संपूर्ण जबाबदारी १२० कोटी जनतेवर येतेच येते. त्यापासून ते पलायन करू शकत नाही. टक्केवारीमधे गोष्टी अगदी छोट्या दाखवल्या जाऊ शकतात किंवा मोठ्याही. पैलवान यांच्या विधानाला दुजोरा देत म्हणू इच्छितो की टक्के बघण्यापेक्षा लोकांकडे बघा. घाणीत उतरायला आवडत नाही म्हणून घाणीपासून डोळे फिरवणे योग्य नाही. कुणी घाणीकडे बोट दा़खवते त्यालाच घाणेरडा म्हणणे तर अत्यंत हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संदीप डांगे Sun, 03/08/2015 - 15:59 नवीन
http://ncrb.gov.in/CD-CII2013/Chapters/5-Crime%20against%20Women.pdf Image removed. लोकसंख्या: S.No. Census Year Population % Change 6 2001 1,028,737,436 21.5 7 2011 1,210,726,932 17.7 Age structure 0–14 years 31.2% (male 190,075,426/female 172,799,553) (2009 est.) 15–64 years 63.6% (male 381,446,079/female 359,802,209) (2009 est.) 65 and over 5.3% (male 29,364,920/female 32,591,030) (2009 est.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ज
जेपी गुरुवार, 03/05/2015 - 14:11 नवीन
incest प्रकार गुगलुन बघा.लै काय सापडल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वगिश Sat, 03/07/2015 - 18:09 नवीन
पॉर्न जगता मधे आई-मुलगा,बहिन-भाऊ यांच्या विषयीचे विडीओ आनी कथा यांना जास्त मागनी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खटपट्या Sun, 03/08/2015 - 09:28 नवीन
वगिश, मिपावर आपले स्वागत आहे. आपल्या या विधानाला वर उत्तर दिलेलेच आहे. पोर्न पहाणारे कीतीजण त्यातील कथेसाठी पॉर्न पहातात ? आणि आपण म्हणता तसे जर आई-मुलगा, बहीण-भाउ यांच्या विषयीच्या कथांना जर मागणी असेल तर, अशी मागणी करणारे विक्रुतच म्हणायला हवेत. धन्य ते पॉर्न पहाणारे आणि अश्या मागण्या करणारे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
अ
अभिजित - १ गुरुवार, 03/05/2015 - 14:09 नवीन
हे तुमचे वाक्य चुकीचे आहे. हे असे कोणी ठरवले ? कि हे तुमचे मत आहे ? "बलात्कारास विरोध होत नाही तो फक्त त्यातल्या अमानुषपणास होत आहे हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 14:15 नवीन
माझे मत आहे. समाजाचे दोन पातळ्यांवर वेगवेगळे वागणे यांतून ते झाले आहे. बलात्कार-पिडीतांकडे बघण्याची समाजाची दृष्टी तेच सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
अभिजित - १ Fri, 03/06/2015 - 16:49 नवीन
चूक वाटले तर उडवून टाका .. पण यांचे मत किती खराब आहे हे त्यांना समजावे अशी इच्छा ... परदुख शीतल असते .. कारण त्यांच्या मते बलात्काराला काही तितका विरोध नाही. माझे मत असे आहे कि ५०० / १००० बलात्कारी लोकांना एकाच दिवशी फाशी द्यावे. हाल करून .. जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी. जसे कि निर्भया प्रकरण .. आणि संदीप डांगे यांचे मत अतिशय धक्कादायक आहे. निदान मला तरी वाटले. मग मी पण तितकीच धक्कादायक प्रतिक्रिया दिली ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
स
संदीप डांगे Fri, 03/06/2015 - 20:19 नवीन
वरची तुमची मुक्ताफळे तुम्ही माझ्या तोंडी घालू पाहताय ते माझ्या प्रतिसादात कुठेतरी ध्वनित होत आहे काय? ३३ ओळींच्या माझ्या प्रतिसादात तुम्हाला माझे एकमेव वाक्य खटकले? बलात्कारास विरोध झाला असता तर तुमच्या दिव्य आकलनशक्तीला तो समाजात दिसून आला असता. स्त्रियांना समाज देत असलेल्या वागणुकीत बदल दिसला असता. एकट्या फिरू नका, चाकू-मिरची पावडर बाळगा, कराटे-कुंगफू शिका हे सर्व स्त्रियांनाच करायला लावणारा समाज अजूनही स्त्रीलाच कारण समजतो हे तुमच्या लक्षात येत नाही काय? ९५% बलात्कारी ओळखीचेच असतात. त्यांच्या विरूद्ध स्त्रियांनी कुठे कुठे आणि कसा कसा विरोध व प्रतिकार करावा? त्यांना प्रतिकार करण्याची शिकवण देणारा तुमचा समाज पहिलेछूट पुरूषांनी बलात्कारच करू नये म्हणून नेमके काय करत आहे? बलात्कार नक्की काय असतो हे तुम्हाला तरी नीट समजले आहे काय? समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे. त्यातून 'माझा बलात्कारास विरोध नाही' हा चमत्कारिक आणि आश्चर्यजनक निष्कर्ष आपल्या ज्या दिव्य मेंदूने काढला आहे त्यास राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवले पाहिजे. तुम्ही 'तोड-मरोड-पेश-कर' चॅनेलवरचे टीनपाट पत्रकार दिसता. चला आता तुमचे स्वतःचे वाक्य घेऊ: माझे मत असे आहे कि ५०० / १००० बलात्कारी लोकांना एकाच दिवशी फाशी द्यावे. हाल करून .. जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी. जसे कि निर्भया प्रकरण .. ५०० / १००० बलात्कारी लोकांना: 'बलात्कारी लोक' ही काय कुठली जमात, जात, वंश आहे का गोळा करून आणायला? चोर-दरोडेखोर यांच्या काही जाती असतात असे पोलिस मानतात. तुम्हीही तसेच मानता काय? बलात्कारी असे कुणाच्या कपाळावर किंवा कुठल्याही अवयवावर लिहीले असते काय? मानसशास्त्रिय चाचण्यांमधे एखादा पुरूष बलात्कारी होता, आहे, किंवा होऊ शकतो असे सिद्ध करता येते का? सांगायचा मुद्दा असा की बलात्कारी पुरूष कुठेही, कुणीही होऊ शकतो. त्याला जात, धर्म, वंश, शिक्षण, संपत्ती, पुर्वेतिहास असा कुठलाही निकष लावता येत नाही. एकाच दिवशी फाशी द्यावे: फाशी द्यावे अशी मागणी करणार्‍याच्या भावनेमागे 'ती शिक्षा सर्वोच्च असून गुन्हेगाराला न्याय्य अशी आहे' असे त्याचे वाटणे असते. फाशी देऊन आपला राग तत्सम कृत्यावर तेवढ्याच प्रखरतेने प्रदर्शीत करायचा आहे असे त्याला दाखवायचे असते. पण न्यायव्यवस्था फाशी ही दुर्मिळात दुर्मिळ गुन्ह्यांमधे द्यावी असे मानते. असे गुन्हे करणारांना समाजात राहू देणे घातक असते. फाशी किंवा तत्सम अघोरी शिक्षा देऊन गुन्हेगार संपेल, गुन्हा नाही संपणार. फाशी देऊन पिडीतेस न्याय मिळाला असा आपला ग्रह करून देण्यात सरकार, न्यायव्यवस्था यशस्वी झाली म्हणजे त्यापुढे कुणी बलात्कार करणारच नाही असा होत नाही. याचा ढळढळीत पुरावा निर्भया प्रकरणानंतरही होणारे बलात्कार आहेत. बलात्कारी आणि बलात्कार निर्माणच होऊ नये म्हणून काहीही न करणारा समाज फाशीच्या शिक्षेची मागणी करतो हे तितकेच मुर्खपणाचे आहे जितके एखादा शेतकरी तण उगवूच नये म्हणून काहीच प्रयत्न न करता वाढलेले तण उपटायला महागडी यंत्रे कशी विकत घेता येतील याचा विचार करतो आणि या तणानी आपले कसे नुकसान केले आहे असे ज्याला त्याला सांगत बसतो. तुमच्या वाक्यातून मी असाही अर्थ काढू शकतो की बलात्कार झाल्यास तुम्हाला काही फरक पडत नाही फक्त बलात्कार्‍यास फाशी होणे महत्वाचे. समाजाचा सगळा फोकस फाशी होण्यावर आहे, गुन्हाच घडू नये यावर नाही. अत्यंत अमानुष शिक्षा देऊनही सौदी अरबमधील बलात्कार थांबलेले नाही. त्यामुळे फाशी ही शिक्षा बलात्कार थांबवेल अशी अपेक्षा धरणार्‍यांनी जरा जमिनीवर उतरावे. शिक्षेच्या भीतीपेक्षा योग्य शिक्षण, संस्कार आणि सद्विचार गुन्हा घडण्यापासून रोखण्यास समर्थ आहेत. दुर्दैवाने संस्कार आणि सद्विचार यांना आपला समाज काय किंमत देतो हे आपणास माहित नाही का? जिथे गुन्हा सिद्ध झाल्या तिथे तरी: गुन्हा सिद्ध होणे ही एक महाप्रचंड किचकट प्रक्रिया आहे हे आपणास माहित नसावे. आपण जरा न्यायव्यवस्थेचा अभ्यास करा, बलात्काराच्या प्रकरणात गुन्हा सिद्ध होणे हे किती कठीण आणि फिर्यादीस मानसिकरित्या बलात्कारापेक्षाही त्रासदायक आहे हे लक्षात येइल. इकडून नाणं टाकलं की तिकडून कोकच्या बाटलीसारखा न्याय बाहेर येत नाही साहेब. त्यात गुन्हेगार श्रीमंत, राजकारणी, वजनदार आणि मान्यवर असेल तर विसराच. सगळी व्यवस्था पुरुषांच्या मानसिकतेची आणि कायदे स्त्री-धार्जिणे असतांना अशा विचित्र परिस्थितीत नि:पक्षपाती न्याय होइलच याची काय खात्री. तसेही न्यायालयात फक्त निर्णय सुनावले जातात, न्याय मिळत नाही. जे मिळतं त्याला न्याय म्हणण्याची जगरीत आहे. पुराव्याअभावी नराधम बलात्कारी सुटतात. खोट्या केसेस झाल्याने आयुष्यातून उठलेले असंख्य पुरुष आहेत. त्यांचे कुठे नाव येत नाही की कुणी त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवत नाही. स्त्रीने आरोप केला की तो खराच मानून प्रत्येक पुरूषाला नराधम समजून फासावर लटकवायला लागले तर समाजात माजणार्‍या अराजकाचा तुम्ही काहीतरी विचार केला आहे काय? एक आदर्श(?) म्हणून निर्भयाच्या केसचे उदाहरण पाहू. यात बलात्कार झाल्याचे भक्कम पुरावे आणि साक्षीदार होते. त्यामुळे पोलिसांना सबळ आरोपपत्र दाखल करता आले. सर्व स्पष्ट आणि धडधडीत समोर असतांना आरोपींच्या वकिलांचे युक्तिवाद तोकडे पडले. त्यात आरोपीचे वकिलही काय दर्जाचे होते हे डॉक्युमेंटरीत दिसून आले. त्याच केसमधे राहूल गांधी आरोपी आणि कपिल सिब्बल वकिल असते व विरूद्ध कितीही सबळ पुरावे असते तर हाच निकाल आला असता याची तुम्ही छातीवर हात ठेवून खात्री देऊ शकता काय? प्रत्येक बलात्कार हा याच प्रकारे होतो काय? हजारो स्त्रिया रोज विविध दडपणाखाली, दहशतीखाली, गैरसमजूतीखाली दबून बलात्कार सहन करत आहेत. त्या बलात्कार कसा सिद्ध करणार आहेत? सगळीकडे स्त्रीया अनामिक भयाखाली वावरत आहेत. फाशीच्या फँटसीमधे धुंद असलेला तुमचा समाज त्यांना दहशतमुक्त करण्यासाठी नक्की काय करत आहे? असो. कायदे सक्षम आहेत. ते पाळण्याची मानसिकता समाजात नाही. त्यामुळे कितीही कठोर कायदे केले तरी ते न्यायालयाचे सुविचार यापलिकडे त्यांना काडीचेही महत्त्व नाही. सुजाण नागरिकत्व म्हणजे काय याची कपर्दिकही ओळख नसलेल्या समाजाला गर्दीच्या मानसशास्त्राप्रमाणे वागायला आवडते. विचारपुर्वक आणि योग्य दुरगामी परिणाम करणारे निर्णय घेणे, ते सक्षमपणे राबवणे यात प्रचंड हिंमत व धैर्य लागते. समाजाला असा खरोखर कामाला लावणारा विचार नको असतो, झुंडीच्या बेधुंद मानसिकतेत रमायला कष्ट पडत नाहीत. तुम्हीही तेच करत आहात. आज बरेच जण नागालँडमधे झालेल्या प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. असेच झाले पाहिजे, हेच योग्य आहे असे सगळ्यांना वाटत आहे. पण एक समाज म्हणून आपण हिंस्त्र होत चाललो आहोत हे लक्षात आले काय कुणाच्या? गुन्हा सिद्धही न होता मारलेला माणूस हा बलात्कारी म्हणून मारला की दुसर्‍या धर्माचा, दुसर्‍या देशाचा आमच्या गावात येऊन 'आमच्या बायकांवर' अत्याचार करतो म्हणून वर्गसंघर्षातून मारल्या गेला हे कोण तपासणार? नागा लोकांमधे बलात्कार कधी झालेच नाहीत काय? किंवा आता अजिबात होणार नाहीत काय? आपल्या हिंस्त्र कृतीतून नुसता राग व्यक्त करून खरंच स्त्रियांना समाज एक दहशतमुक्त आकाश देऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतीलच कारण तुम्ही तेवढा विचार करण्याच्या कुवतीचे दिसत नाही. त्यामुळे सुखी राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
अ
असंका Sat, 03/07/2015 - 06:22 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
असंका Sat, 03/07/2015 - 06:23 नवीन
फारच योग्य....धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चिगो Sat, 03/07/2015 - 12:45 नवीन
उत्तम प्रतिसाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुधीर Sat, 03/07/2015 - 17:22 नवीन
प्रतिसाद आवडला. समाजाचा बलात्कारास विरोध नाही त्यातल्या अमानुषपणास आहे हा माझा निष्कर्ष आहे. बलात्कार, विनयभंग अमानुष असोत नसोत समाजाचा विरोध असायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
हाडक्या Sun, 03/08/2015 - 12:39 नवीन
उत्तम प्रतिसाद.. खूप कमी वेळा तुम्ही तुम्हाला काय म्हणायचेय ते तुम्ही मांडू शकलाय.. :) याचा उत्तम लेख बनू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा