Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

व — विदेश, Wed, 03/04/2015 - 17:30
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी .. 'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला 'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. .

प्रतिक्रिया द्या
1746 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्राची अश्विनी Wed, 03/04/2015 - 17:32 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 03/04/2015 - 17:40 नवीन
बाकी सगळं ठीक आहे. पण राधेला सारखं पळायला सांगता आहात ते कसं तरीच वाटतय. तिला काय मॅरेथॉन मधे भाग घ्यायचा आहे का?
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Sat, 03/07/2015 - 08:02 नवीन
सहमत. प्रत्येक ओळी मधे "ग" सुद्धा खटकतो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा आहेतच. लय सांभाळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
व
विदेश गुरुवार, 03/05/2015 - 08:50 नवीन
प्राची- प्रतिसादासाठी आभार. मनीषा- राधाकृष्ण-लीला सगळ्या पळापळी लपाछपीत असणार ! प्रतिसादासाठी आभार.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 03/07/2015 - 03:52 नवीन
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी एकदम छान. बाकी पावा पिचकारी रंग सारे काही आले.
  • Log in or register to post comments
व
विदेश Sat, 03/07/2015 - 14:22 नवीन
सांजसंध्या, पाषाणभेद - आपल्या प्रतिसादाबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा