Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कागाळी

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 03/05/2015 - 06:38
यशोदे कसा गं बाई श्याम तुझा मातला ओलेती तनु कोमल माझी अन द्वाडाने रंग टाकला अंग अंग माझे जाळी होळीच्या रंगेल ज्वाला अंगांगाची होय काहिली कान्ह्याने गं डाव साधला गोपाळांचा जमवून मेळा चहाटळ अडवी पांदणीला लोण्याची त्यां लाच हवी अन रंगाचा तो हाती बुधला नंदाचा पोर्‍या गाली हसला मैय्या, मी गं अगदीच भोळा गोपी सार्‍या एक होवूनी उगाच करती बघ कागाळ्या माय यशोदा त्रासुन गेली बांधुन घातला सावळा धास्तावल्या गौळणी सार्‍या बंधन कृष्णा अन आम्हां कळा ! विशाल

प्रतिक्रिया द्या
2747 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/05/2015 - 07:47 नवीन
नेहमीप्रमाणेच उत्तम विशालदा........ :-)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 03/05/2015 - 10:09 नवीन
मस्तच..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/05/2015 - 10:40 नवीन
@धास्तावल्या गौळणी सार्‍या बंधन कृष्णा अन आम्हां कळा !>>> ह्हे ह्हे ह्हे! मस्तच!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 03/05/2015 - 11:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
र
रुपी Fri, 03/06/2015 - 00:50 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 03/06/2015 - 13:46 नवीन
'पांदणीला' म्हणजे काय? ऎकला नाही कधी हा शब्द.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 03/09/2015 - 06:30 नवीन
'पांदण' म्हणजे लहानशी वाट, पायवाट किंवा पाऊलवाट म्हणतो आपण. पांदण हा शब्द बहुदा मालवणी भाषेत /गोव्यात वापरला जातो. (रच्च्याक केळुसकरांची 'झिनझिनाट ऐकलीय का? त्यात पांदणीचा उल्लेख आहे ;) ) धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Mon, 03/09/2015 - 12:59 नवीन
नाही झिनझिनाट नाही वाचली / ऎकली. वाचतो मिळवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
व
विशाल कुलकर्णी Wed, 03/11/2015 - 12:43 नवीन
'पांदणीत'भेटलस अंगाक खेटलस काळोख किनाट खसकन हात हातात घेतलस, झालो झिनझिनाट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चुकलामाकला गुरुवार, 03/12/2015 - 12:56 नवीन
क्या बाात! जुन्या आठवणी जाग्या झाल्या हो , च्च च्च च्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
स
सौन्दर्य Fri, 03/06/2015 - 15:37 नवीन
क्या बात है ! मस्तच.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 03/09/2015 - 07:34 नवीन
खूप सुंदर
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या Wed, 03/11/2015 - 13:16 नवीन
खासच. विकु टच आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 03/11/2015 - 16:40 नवीन
अरे व्वा , तू आहेस काय इथे? किती दिवसांनी दिसत्येयस... धन्स बादवे _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा