सावल्यांनी पोळलो आहे इथे मी ...
खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो
सावल्यांनी पोळलो आहे कधी मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो
बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो
मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो
तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ये, तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो
डॉ.सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(13)
ए
एक एकटा एकटाच
गुरुवार, 03/05/2015 - 07:45
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
गुरुवार, 03/05/2015 - 15:45
नवीन
कविता छान, फक्त शेवटच्या दोन ओळींचा भावानुवाद समजावलात तर बरे.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 03/05/2015 - 17:08
नवीन
मस्त गझल. एकदम कडक....आवडली
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 03/05/2015 - 18:53
नवीन
एकदम कातिल शेर.
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Fri, 03/06/2015 - 10:02
नवीन
+ १
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Sat, 03/07/2015 - 07:33
नवीन
अनुमोदन
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 03/05/2015 - 19:24
नवीन
सुरेख.
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
गुरुवार, 03/05/2015 - 19:27
नवीन
चांगलाच प्रयत्न आहे.
सावल्यांनी पोळलो आहे कधी
ऊनही आता जरा फुंकून घेतो
या शेरातली पहिली ओळ "इथे सावल्यांनी पोळलो" यात कल्पनाचमत्कृती विरोधाभास अलंकार दर्शवते. पण मग दुस-या ओळीला त्या अपेक्षेने ऊन फुंकून पिणे यात तो कंटीन्यू नाही होत.
गालगागा सांभाळून
उन्हाने पोळलो म्हणून सावली फुंकून पितो असं जमलं असतं.
- Log in or register to post comments
त
तिमा
Fri, 03/06/2015 - 06:10
नवीन
सहमत. +१
- Log in or register to post comments
र
रुपी
गुरुवार, 03/05/2015 - 21:38
नवीन
छान!
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/05/2015 - 23:33
नवीन
एकाहून एक सरस कविता येऊ लागल्यात!!
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 03/06/2015 - 11:23
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Fri, 03/06/2015 - 13:34
नवीन
@अमोल परब,सौंदर्य,चाणक्य, कानडाऊ योगेशु,चुकलामाकला,यशोधरा,खटासिखट,तिमा,रुपी.शब्दबम्बाळ,मिसळलेला काव्यप्रेमी
सर्व मित्रांचे मनापासून आभार !
आदरणीय खटासिखट, मी आपाल्या मताशी सहमत आहे. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद.
- Log in or register to post comments