रूसली ही पोर ..
ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
- संध्या
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
- संध्या
💬 प्रतिसाद
(14)
व
विवेकपटाईत
Sat, 03/07/2015 - 07:52
नवीन
पोर = कविता. बाकी हरवलेल्या कवितेला दाद तरी कशी देणार ?????
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 03/07/2015 - 07:58
नवीन
सुंदर कविता
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Sat, 03/07/2015 - 08:28
नवीन
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
मस्त
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 03/07/2015 - 08:53
नवीन
कविता आवडली.
'याद' सारखा हिंदी शब्द खटकला.
बाकी वृत्त 'आनंदकंद' का?
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Sun, 03/08/2015 - 18:46
नवीन
आनंदकंद नाही.
अष्टाक्षरी आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 03/07/2015 - 09:10
नवीन
:)
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 03/07/2015 - 11:33
नवीन
वाहवा!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 03/07/2015 - 12:05
नवीन
जबरदस्त भाव आणि गेयता आहे. सहज चालीत गुणगुणून पाहिले, गोड वाटले.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 03/07/2015 - 12:15
नवीन
कवितेच्या उदगमाने
गेल्या दिसांची सय ग आली
मधुकरांच्या गुंजारवाने
आसमंता लय ग आली
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Sat, 03/07/2015 - 15:59
नवीन
व्हॉट डू यू मीन ? भुंगे ऑन फूल्स ? *shok*
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Sat, 03/07/2015 - 12:19
नवीन
सुंदर कविता
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Sun, 03/08/2015 - 15:11
नवीन
'आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही'
शब्दांचा खेळ एकदम मस्त. कविता आणि चित्र दोन्हीही सुंदर.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Sun, 03/08/2015 - 17:48
नवीन
कविता. ब-याच दिवसांनी लिहीलंत? खरंच पोर रूसली होती की काय?
- Log in or register to post comments
स
सांजसंध्या
Sun, 03/08/2015 - 18:47
नवीन
सर्वांचे मनापासून आभार.
@चाणक्य - ही पोर सगळं रूटीनमधे चालू असेल तर रूसते, जगावेगळं आहे सगळं हिचं..
- Log in or register to post comments