Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः मदत हवी आहे...!

अ
अदि
Sun, 03/08/2015 - 13:28
💬 6
आमचा येत्या गुरुवार-शुक्रवार-शनिवार मशारनिल्हे (जुन्या लेखकांची पुस्तके वाचल्याचा परिणाम :D )ठिकाणी जायचा प्लॅन आहे. विचार पक्का झाला आणि सल्लागार म्हणुन मिपाकरचं नजरेसमोर आले. मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला मदत होऊ शकेल. १) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स २) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे ३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.

प्रतिक्रिया द्या
4703 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कंजूस Sun, 03/08/2015 - 14:12 नवीन
दोन्ही धार्मिकस्थळे आहेत आणि येणार कुठून आणि जाणार कुठे यावर वेळ वाढत जाईल आणि वाहन करून येणार असाल तर आणखी सोपे होईल .
  • Log in or register to post comments
व
विजयकुमार भवारि Sun, 03/08/2015 - 17:22 नवीन
गणपती पुळे ला घरगुती राहण्याच्या चांगल्या सोयी आहेत ... फक्त मंदीरा च्या जवळ राहणे नको !...
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 03/08/2015 - 18:40 नवीन
चिपळूणवरून जातांना डेरवण(श्री शिव समर्थ गड), वेळणेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी(थिबा प्यालेस), पावस करून अंबा घाट मार्गे परतता येईल. वेळ असेल तर (नाहीतर पुढील खेपेस)कोल्हापूर,पन्हाळा,ज्योतिबा,दाजीपुर अभयारण्यही पाहता येईल. गणपतीपुळे येथे MTDC किंवा श्री गणेश कृपा हॉटेल मधल्या रस्त्यात अंबा घाटात दि जंगल रिसोर्ट हे एक चांगले ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Fri, 03/13/2015 - 18:10 नवीन
गणपतीपूळेचा समुद्र किनारा अप्रतिम आहे.हाँटेल अनेक पण लुटण्याचे प्रकार, येथे प्राचीन कोकण हा प्रकल्प पाहण्या सारखा जवळ केशवसुतांचे गाव मालगुंड येथे त्यांचे स्मारक आहे. समुद्र किनारा .जेवणाच्या सोयी उत्तम, पावसला स्वरुपानंद समाधी ,मार्लेश्वर,रत्नागिरी,आरेवारे बीच पाहू शकाल
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Fri, 03/13/2015 - 18:10 नवीन
गणपतीपूळेचा समुद्र किनारा अप्रतिम आहे.हाँटेल अनेक पण लुटण्याचे प्रकार, येथे प्राचीन कोकण हा प्रकल्प पाहण्या सारखा जवळ केशवसुतांचे गाव मालगुंड येथे त्यांचे स्मारक आहे. समुद्र किनारा .जेवणाच्या सोयी उत्तम, पावसला स्वरुपानंद समाधी ,मार्लेश्वर,रत्नागिरी,आरेवारे बीच पाहू शकाल
  • Log in or register to post comments
ज
जयराज Sat, 03/14/2015 - 13:30 नवीन
गणपतीपुळे मधुन कोल्हापूर ला येताना रत्नागीरीतुन या. गणपतीपुळेहुन निघाल्यावर आरे वारे बीच आहे अगदीच सुंदर. शिवाय रत्नागिरीत बघण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.जसे थिबा पॅलेस,मांडवी व भाटे बीच,टेबल पॉइंट इ. रत्नागिरीतुन आंबा घाट मार्गे कोल्हापूर,आंबा घाट बघनेबल. बाकी कोल्हापुरात येतानाच पन्हाळा बघुन येता येईल
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा