Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छडी लागे

अ
अत्रन्गि पाउस
Sun, 03/08/2015 - 17:19
🗣 0 प्रतिसाद
लग्नाच्या भूलथापा देऊन विद्यार्थिनीचे अपहरण Narendra Modi govt wants to curb internet in India आज दोन वेगवेगळ्या बातम्या वाचल्या ... कोणतेही सरसकटीकरण करण्याचा उद्देश नाही तथापि विकसित मानसिकतेकडे प्रवास करायचा तर आहे परंतु त्यासाठी लागणारे आचरण/बंधने स्वेच्छेने स्वीकारायची तयारी नाही अशी परिस्थिती दिसते ... गेल्या कित्येक वर्षातील स्वातंत्र्य ह्या शब्दाचा बहुतांश (च्यायला हा शब्द वापरायची आता भीती वाटते) भारतीय लोकांनी भारतात लावलेला आणि अमलात आणलेला अर्थ हा "जबाबदारी पासून कोसो दूर असलेला स्वैराचार" असा दिसतो ... आणीबाणी पर्व आमच्या पिढीने फक्त ऐकलेले ..अनुभवलेले नाही ...अनेक अनेक बाबतीत नकारात्मक असलेले ते पर्व शिस्तीच्या बाबतीत उपयुक्त होते असे आणीबाणीचे विरोधकसुद्धा मान्य करतात (हेही ऐकीवच)... वरच्या २ बातम्यांवरून आणीबाणी आठवावी अशी परिस्थिती नाही ..परंतु छडीचा धाक असला कि आपले देशवासीय लायनीवर राहतात आणि ते अंतिमत: सगळ्यांच्याच हिताचे ठरते हे सत्य सरकारने स्वीकारून पावले उचलायला सुरुवात केली आहे कि काय ? ..प्रसंगी थोडासा जोर लावून का होईना पण आवश्यक ती शिस्त बाणवणे आवश्यक आहे इतकी अवस्था आहे ... परंतु त्याचवेळी ती शिस्त समाजातील सर्वच थरांना लागते आहे हे पाहणे आवश्यक आहे ...कारण पैश्याच्या जोरावर कुठलाही अनियमित कारभार नियमित करता येतो हा अनुभव ताबडतोब बंद झाला पाहिजे ...

प्रतिक्रिया द्या
2436 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा