Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहेरपण.....

च — चुकलामाकला, Mon, 03/09/2015 - 06:56
जेव्हा दु:खच परतून येते मायेने ते कवेत घ्यावे, मालिश करुनी तळपायाला हलके त्याला शांत करावे. येणारच ते पुन्हा पुन्हा घरी हक्कच त्याचा आपुलकीचा सासुरवाशीण लेकीसाठी माहेराने सज्ज रहावे. कितीही आले ओठावर तरी प्रश्न विचारू नये तयाला, नशीब असते एकेकाचे अपुले आपण मानून घ्यावे. जाईल निघुनी उद्या सकाळी नवीन क्षितिजे क्रांत कराया , करू नये पण उगीच त्रागा तळहातावर दही वाढावे. (लिहिल्यावर जाणवले कवी अनिल यांच्या उशिरा आलेला पाऊस या कवितेशी साम्य आहे.)

प्रतिक्रिया द्या
2650 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
ज्योति अळवणी Mon, 03/09/2015 - 07:30 नवीन
विषय असा आहे की सुंदर म्हणणे विरोधाभास आहे... तरीही... उत्तम कविता..
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 03/09/2015 - 08:01 नवीन
छान लिहिलीय
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Mon, 03/09/2015 - 08:26 नवीन
आत्ता एकदम लक्षात आले, इथे दु:खाला माहेरवाशिणीची उपमा दिली आहे, माहेरवाशिणीला दु:खाची नव्हे. चु.भू.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 03/09/2015 - 08:46 नवीन
रूपक अगदी बरोबर आहे तुमच्या लिखानातुन दु:ख आणि माहेरवाशिण यांची योग्य सांगड लागतेय काळजी नसावी. पुढिल लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
स
सस्नेह Mon, 03/09/2015 - 08:35 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 03/09/2015 - 11:10 नवीन
जरा वेगळी, पण सुंदर!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/09/2015 - 11:35 नवीन
ठिक.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 03/12/2015 - 12:51 नवीन
गुर्जी, लोभ असावा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अजब Tue, 03/10/2015 - 04:42 नवीन
फारच वेगळा विचार ! आवडली .
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 03/10/2015 - 13:31 नवीन
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 03/12/2015 - 12:50 नवीन
धन्यवाद मंडळी!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा