Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनरीयल इस्टेट

प
पॉइंट ब्लँक
Mon, 03/09/2015 - 17:09
🗣 10 प्रतिसाद
डिस्क्लेमर : इकोनोमिक्स आणि फायनान्सशी क्षेत्रातील कोणतीहि पदवी लेखकाकडे नाहि. काहि चूक झालि असेल तर दुरुस्ती सुचवावी. मी एक आकडेमोड केली आहे. बेंगलोरच्या जागेची किंमत ठरवण्यासठी. आकडेमोड सोपी जावी म्हणून थोडे अ‍ॅप्रोक्झिमेशन केले आहे. क्षेत्रफळ = ७४१ स्केवर किमी = ७४१ *१०००*१००० स्केअर मी. = ७४१*१०००*१०००*१० स्केवर फूट. हा जुना नंबर असावा. बीडीए वाले १२९१ सांगतात. http://www.bdabangalore.org/townplanning.html. असो आपण जुनाच नंबर वापरू. जागेची सरासरी किंमत = ५००० रू/स्केवर फूट (ही यशवंतपूर मध्ये आहे. बाकि़कडे अजून जास्त असेल.) डॉलरची किमत = ६० रुपये ( सध्या ६२ आहे.) बेंगलोरची किंमत = ६१७.५ बिलियन डॉलर . भरतातील इतर महानगरे जवळ्पास इतकिच किंवा ह्यापेक्षा मोठि आहेत. उदा दिल्ली दुप्पट मोठी आहे. मुंबई अजून किति पट महाग आहे देव जाणे. तर महत्त्वाचा मुद्दा असा : जर ह्या सगळ्या शहरांच्या जागेची किंमत केली तर ती भारताच्या जीडीपी किंवा पीपीपी( ६००० बिलीयन डॉलर) पेक्षा किती तरी पटीने जास्त आहे. एव्हढी जागा विकत घेण्याइतका पैसा देशात नाहि असा ह्याचा अर्थ होतो का?. वर जीडीपी शी केलेली तुलना बरोबर आहे का? अर्थात एवढी सगळी जागा बाजरात एकाच वेळी विक्रिला येणार नाहि. पण रीयल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे का? किंवा कर्ज काढून घर घेने हे बरोबर आहे का?

प्रतिक्रिया द्या
5260 वाचन

💬 प्रतिसाद (10)
आ
आदूबाळ Mon, 03/09/2015 - 17:31 नवीन
? हे गणितच गैरलागू आहे, कारण यात डिमांड-सप्लायचा नियम विचारात घेतलेला नाही. यावरून रियल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे की नाही हे कसं ठरवणार?
अर्थात एवढी सगळी जागा बाजरात एकाच वेळी विक्रिला येणार नाहि.
हे सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/09/2015 - 17:45 नवीन
हो सांगायचा राहून गेल. एक वर्षाहूनची अधिक इन्वेंटरी शिल्लक आहे बर्याच शहारांमध्ये. त्यामुळे, सप्लाय कमी आहे अस म्हणता येणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ख
खंडेराव Tue, 03/10/2015 - 07:18 नवीन
घर घेतले पुण्यात, आता EMI साठी नोकरी बदलुन बाहेर पळावे लागले :-(
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 03/12/2015 - 02:50 नवीन
हे बर्याच जणांच्या बाबतीत पाहिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
च
चौकटराजा Wed, 03/11/2015 - 00:35 नवीन
स्थूलमानाने रिअल इस्टेट मधील गुंतवणूक की सर्वात फायदेशीर हे खरे पण " नो इन्वेस्टमेंट इज गूड फॉर एव्हर ! " हे अर्थ शास्त्रातील मूल वचन आहे. जगाची लोकसंख्या वाढते आहे पण तो वाढण्याचा दर कमी होत जाईल हे नक्की. त्या मानाने बहुमजली इमारतींचे प्रमाण वाढत राहील. सबब अशी एक वेळ येउ शकते ज्यावेळी घरांचा पुरवठा जास्त पण मागणी कमी .अशावेळी रिअल इस्टेट मधून मोठा फायदा मिळविण्याचे स्वप्न भंग पावू शकते. हे पटण्यासाठी एक उदाहरण देतो. १९७० च्या आसपास रिक्षाचा धंदा जोरात होता. आता दुचाकीचा पर्याय सुलभ झाल्याने रिक्षा थांव्यांवर वीस वीस रिक्षा चालक प्रवाशाची वाट पहात असतात. एक दिवस असा येईल की रिक्षात बसणारा माणूस केवळ अतिवृद्ध असेल. सार्वजनिक वहातुक स्वस्त व जलद उपलब्ध झाल्यास दुचाकी कारखान्याना कारभार गुंडाळावा लागेल.पेट्रोलच्या टंचाईने मानवाचा गळा आवळावयास सुरूवात केल्यावर दुचाकी व चारचाकी उत्पादकानाही गाशा गुंडाळावा लागेल.हे लगेच घडणार नाही पण ते अटळ आहे.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 03/12/2015 - 02:52 नवीन
आणि हे करेक्शन जितके लवकर होईल तितके चांगले आहे. नाहीतर फार मोठे आर्थिक नुकसान होईल -विषेशतः कर्ज देणार्या बँकांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/12/2015 - 04:47 नवीन
" नो इन्वेस्टमेंट इज गूड फॉर एव्हर ! " सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
न
नगरीनिरंजन Wed, 03/11/2015 - 04:51 नवीन
वरील सर्व प्रतिसादांशी सहमत पण 'द ओन्ली रियल इस्टेट इज युवर बॉडी'.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 03/12/2015 - 02:56 नवीन
क्या बात है. सॉलिड लॉजिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
पिवळा डांबिस गुरुवार, 03/12/2015 - 04:57 नवीन
एव्हढी जागा विकत घेण्याइतका पैसा देशात नाहि असा ह्याचा अर्थ होतो का?. वर जीडीपी शी केलेली तुलना बरोबर आहे का?
नाही. नाही.
पण रीयल इस्टेट ही सुरक्षित गुंतवणूक आहे का?
होय/ नाही. इट डिपेंडस....
किंवा कर्ज काढून घर घेने हे बरोबर आहे का?
खरं तर नाही. पण पहिले घर असल्यास कधीकधी माणसाला पर्याय नसतो. दुसरे घर असल्यास त्याचा काय उपयोग केला आहे (रेन्ट वा व्हेकेशन हाऊस)यावर अवलंबून... :) तुम्हाला नक्की काय करायचंय हे सांगितलंत तर अजून पुढे बोलता येईल.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा