भाषांतराचे हक्क !
The Nuclear Jihadist नावाची एक कादंबरी वाचनात आली होती. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर अब्दुल कादीर खान यांच्या आयुष्यावर आणि कार्यावर ही कादंबरी आहे. कादंबरीत सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर धक्कादायक आहेत.
मला कादंबरी आवडल्यामुळे त्याचे भाषांतर करण्याचा विचार सहज डोक्यात आला. मी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामाला सुरवात केली. काही दिवसांनी मी पुण्यातल्या मेहता प्रकाशन संस्थे कडे गेलो आणि माझे भाषांतराचे काम त्यांना दाखवले. पण या पुस्तकाचे भाषांतर आधीच झाले असून ते पुढील २-३ महिन्यात विक्रीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. भाषांतराचे हक्क मेहता प्रकाशन सन्स्थेनॆच घेतलेले आहेत. आणि भाषांतरीत पुस्तक सध्या विक्री साठी बाजारात आलेले आहे .
माझ्याजवळ हक्क नसल्यामुळे मी माझे भाषांतर कोठेही प्रकाशित केले नाही. फक्त माझ्या कुटुंबियांनी ते वाचले आहे. मी ते भाषांतर मिपावर किंवा माझ्या ब्लोग वर प्रकाशित करू शकतो का ?
हक्क मिळालेले नसताना भाषांतर करणे म्हणजे हौसखातर दुसऱ्याच्या बागेतले गवत उपटायला जाणे.हा, हा, हा !!!