Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दुर्गदुर्गेश्वर रायगड बद्दल माहिती हवी

ज
जगप्रवासी
Tue, 03/10/2015 - 08:23
💬 16
नमस्कार मिपाकर हो , मला रायगड ला जायचं आहे पण तिथे राहण्याची जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलात तर खूप मदत होईल. मिपा वर त्याबद्दल दोन लेख सापडले वेल्लाभट यांचा - आणि मिपाकरांचा पण त्यात राहण्यासाठी काय सोय होईल याची माहिती नाही मिळाली. गुगल वर शोधाशोध करून जास्त काही माहिती मिळाली नाही. तिथल्या एमटीडीसी च्या रिसोर्ट वर फोन करून बघितलं पण फोन कोणीच उचलत नाही. तरी कृपया मला मदत करवी. जाण्याची तारीख : सकाळी १४ मार्च २०१५ ते १५ मार्च २०१५ व्यक्ती : ४ (मी, बायको , मित्र आणि त्याची बायको ) धन्यवाद जगप्रवासी

प्रतिक्रिया द्या
5680 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
वेल्लाभट Tue, 03/10/2015 - 10:41 नवीन
एमटीडीसीत आनंद आहे. पण ट्राय करा. त्यांच्या मुख्य कार्यालयात फोन करून बघा. बाकी वरती देशमुखांची रहायची सोय आहे. यथातथा स्वच्छता असलेल्या खोल्या आहेत. तिथे राहू शकता. पण एमटीडीसी जरा बरं आहे त्यापेक्षा.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 03/10/2015 - 10:43 नवीन
९४ २२ ६८ ९८ ९७
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/10/2015 - 12:02 नवीन
रायगडरोपवे कंपनीच्या खोल्या अप्पर स्टेशनजवळ आहेत. त्यांचा फोन नं वरील दुव्यात मिळेल.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Tue, 03/10/2015 - 16:01 नवीन
९६०४१६१७१८
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/10/2015 - 16:11 नवीन
१)माझ्यामते रायगड पाहून येणे राहाण्यापेक्षा बरे- वैयक्तिक मत२)महाडात राहावे . ३)रोपवेचे रिटर्न तिकिट असते ते त्याच दिवशी वापरावे लागते का याबद्दल कोणी प्रकाश टाकावा कारण आम्हाला विनाकारण पुन्हा तिकीट काढावे लागले होते .४)रायगड +श्रीवर्धन अशी ट्रीप करणे बरे. फक्त रायगड कंटाळवाणा आहे. इतिहास कितीही सांगितला तरी फक्त उरलेल्या बांधकामाकडे पाहून कल्पना करणे मला तरी जमले नाही.५)रोपवे जिथे वर जाते तिकडे एमटिडिसी आहे -पायी चढून दरवाजे पार करत वर येतो त्याच्या विरुदध टोकाला ६)रोपवेनेच जाणार असाल तर तो स्टॉप अगोदर येतो आणि करंजोळ/रागडफाटा/महाडातृनच अगोदर फोन करून रोपवे चालू असण्याची चौकशी करावी अन्यथा छत्तीस किमी वाया.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/10/2015 - 16:33 नवीन
फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>> ह्याच्याशी असहमत. बरेच अवशेष आहेत, बरीच बांधकामे आहेत. कधी पूर्वेकडच्या भवानी टोकावर जावे आणि नुसतेच पल्याडचा लिंगाणा निरखत बसावे तर कधी टकमकावर जावे आणि पायातळीचे लुकलुकणारे दिवे बघत बसावे. कधी नुसतेच होळीच्या माळावर फेऱ्या मारत बसावे तर कधी थेट समाधीपाशी जाऊन काहीच न करता शांत बसावे. कधी वाघदरवाजा पाहून यावा तर कधी नेहमीच निर्जन असणाऱ्या कुशावर्ताच्या काठावर बसावे. कधी शिबंदीची घरटी पाहून यावी तर कधी टकमकावरचे दारुकोठार पाहून यावे. कधी पालखी दरवाजातून जाऊन मेणा दरवाजातून बाहेर पडावे तर कधी राणीवशात फेऱ्या मारून याव्यात. कधी द्वारांवरील शरभ निरखावेत तर कधी दरबारातील भला मोठा पत्थर तसाच का ठेवलाय याचा विचार करत बसावे. कधी राजमहालाजवळ जवळ असलेल्या स्तंभांत बसून जगदीश्वराचे शिखर निरखावे तर कधी अवकीरकरांच्या झापावर जाऊन मावळी जेवण ओरपावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
वेल्लाभट Wed, 03/11/2015 - 05:12 नवीन
येस! म्हटलं तर सगळंच कंटाळवाणं होऊ शकतं; म्हटलं तर काहीही रोचक होऊ शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
य
यशोधरा Tue, 03/10/2015 - 23:32 नवीन
रायगड कंटाळवाणा आहे.... ???? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
स्वच्छंदी_मनोज Wed, 03/11/2015 - 17:19 नवीन
फक्त रायगड कंटाळवाणा आहे>>> माफ करा.. पण ह्याच्याशी जोरदार असहमत आहे.. आतापर्यंत अनेक वेळा रायगडला गेलोय (रोपवे नव्हता त्याच्याही आधीपासून) पण कधीही रायगड कंटाळवाणा वाटला नाही उलट दरवेळी काहीतरी नवीनच मनाला भावून गेलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 03/10/2015 - 16:51 नवीन
पोटल्याच्या डोंगरावरून उडालेला तोफगोळा बरोब्बर गडावर पडला की काय ?
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Wed, 03/11/2015 - 13:28 नवीन
रायगड बघायचा आहे. वल्लींच्या लेखाची प्रिंट घेऊन ठेवली आहे, बघू वल्लीना जे दिसत ते आपल्या सारख्या सामान्य माणसाला दिसत का ते
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 03/12/2015 - 09:32 नवीन
बघाच.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जगप्रवासी
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/12/2015 - 14:27 नवीन
काय राव, फक्त रायगड कंटाळवाणा आहे?????????? असोच. यावर काय बोलणार आता??????????????????? राहिलं.
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Mon, 03/30/2015 - 18:44 नवीन
एमटीडीसी फोन नम्बर ९४२२७८७७७६
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 03/30/2015 - 19:52 नवीन
माझं मत. फक्त रायगड सहल करू नये रायगड अधिक श्रीवर्धन करावे.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 04/01/2015 - 17:20 नवीन
आपले प्रवासवर्णन लिहा कि जरा, कुठे थांबला होतात ? राहण्याची व्यवस्था कशी होती ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा