डाॅक्टरांची फी
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
💬 प्रतिसाद
(429)
म
मार्मिक गोडसे
Wed, 03/11/2015 - 11:15
नवीन
माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले
कसले ऑपरेशन होते ?
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 19:29
नवीन
तळहातावर केलाॅईड झाले होते. तिथला काही भाग काढून तिथे मांडीची त्वचा लावली गेली. केलाॅईड हे जखम झाल्यावर तिथली त्वचा जाड होते, वाढतच राहते, त्या व्याधीचे नांव अाहे. करतानाच सांगितले गेले होते, की पुन्हा तिथेच केलाॅइड न होण्याची गॅरंटी नाही.
- स्वधर्म
- Log in or register to post comments
म
मराठीप्रेमी
Wed, 03/11/2015 - 11:31
नवीन
यावर पुढे चर्चा करण्याआधी तुमच्यामते हा आकडा किती असावा ते सांगू शकाल का?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/11/2015 - 11:43
नवीन
या बातमीत एम्सची २०१४ ची थोडी आकडेवारी आहे. अर्थात ते सरकारी हॉस्पिटल आहे. (उदा. ससून) २००४च्या तुलनेत २०१४मध्ये खर्च कमी झालाय हे आश्चर्यकारक आहे. खाजगी हॉस्पिटलांमध्ये याच्या तिपटीपेक्षा जास्त खर्च यावा. त्यामुळे दीड लाखाच्या आसपास किमान खर्च आहे. त्यात तुम्ही स्पेशल रुम घेता का जनरल वार्डमध्ये राहण्यास तयार असता यानुसार पन्नासएक हजार रुपये सहज वाढतात. ऑपरेशननंतर रिकवरीसाठी एखादा दिवस आयसीयूमध्ये त्याचे वीसहजार.
त्यामुळे अडीचलाख मार्केटदराच्या जवळपासच दिसते आहे. आता हॉस्पिटलने त्याचे आयटमायझेशन चुकीचे केले असावे. उदा डॉक्टरांची फी आठहजार दाखवली किंवा आणि इतर खर्च अडीचलाख दाखवला तरी आपल्याला त्यातलं काही कळणार नाही. किंवा डॉक्टरांची फी २ लाख एकोणपन्नास हजार आणि उरलेले ८ हजार इतर खर्च, असे दाखवले तरी नक्की काय फरक पडतो.
http://archive.indianexpress.com/news/aiims-slashes-cardiac-surgery-cost-by-a-fifth/1156594/
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Wed, 03/11/2015 - 19:37
नवीन
धागा काढण्याचं तेच कारण होतं! ८०,००० अनरिझनेबल वाटतात, एवढंच सांगतो.
- स्वधर्म
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/11/2015 - 11:31
नवीन
वैद्यकीय व्यवसाय हा काही प्राईस रेग्युलेटेड व्यवसाय नाही. डॉक्टरांनी अमुकतमुक उपचारासाठी इतकेच पैसे घेतले पाहिजे असा कुठेही चार्ट नाही. घरातल्या व्यक्तीला तातडीच्या उपचाराची गरज असताना हॉस्पिटलमध्ये जितके पैसे सांगतात तितके द्यावेच लागतात. त्यासाठी आजकाल हेल्थ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. उपचाराच्या प्रसंगी पैशाच्या अडचणीमुळे चांगल्या उपचाराची संधी गमावू नये. डॉक्टर आणि न्याय्य फी वगैरेंचा काय संबंध आहे? डॉक्टर सांगतात तितके पैसे निमूटपणे द्यायचे नाहीतर दुसरा डॉक्टर बघायचा असा साधा नियम आहे. ही परिस्थिती का आहे यावर चर्चा करण्यापेक्षा ती हाताळता कशी येईल त्याचा विचार करा.
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 11:56
नवीन
पण हि गोष्ट बदलली जाणे तितकेच महत्वाचे नाही का???? आपण प्रत्तेक वस्तू विकत घेताना तिची MRP बघून विकत घेतो म्हणजेच तिचा रेट ठरलेला आहे मग तुम्ही ती शहरातून घ्या वा गावातून.... अशी काहीतरी पध्दत वैद्यकीय व्यवसायाला हि असली पाहिजे नाहीतर असेच लोक उपचाराविना मारत राहणार.....
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 11:31
नवीन
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/11/2015 - 14:26
नवीन
एक टब मला पण द्या हो!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 14:31
नवीन
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/11/2015 - 15:56
नवीन
अश्लिल कशाने!! धन्यवाद. आता चर्चा किती का चालेना!! ;)
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 03/11/2015 - 17:07
नवीन
नै ते ठिके, पण टबातच बसा, कडेला नको हो. ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/11/2015 - 18:55
नवीन
निश्चिंत असा हो तुम्ही!! आम्ही दोघं जरासं सरकून तुम्हाला तिसरी सीट देऊ का? नै येवढं टबातच बसायचं सांगायला आलात म्हणून म्हटलं हो.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 03/11/2015 - 21:01
नवीन
ट्बातून अजीबात उठू नका....
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/12/2015 - 07:21
नवीन
हे हाड्क्यारावांना सांगताय का मला?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 03/12/2015 - 07:31
नवीन
चित्रातल्या दोघांना !!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 18:59
नवीन
चर्चेवर लक्ष ठिवा. नाहीतर पॉप्कॉर्न लवकरात लवकर संपवण्याकडेच ध्यान आसंल... :-)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 03/12/2015 - 08:16
नवीन
अरे, किती सांडून ठेवल्यात लाह्या टबमधे.. कचरा करतात नुसते.. कोण आहे रे तिकडे, जरा व्हॅक्यूम क्लीनर आणा बघू झटपट..
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/11/2015 - 15:26
नवीन
बर्याच दिवसात खाल्ले नव्हते या विषयावर पाॅपकाॅर्न.चालु द्या बरं का चर्चा.डाॅक्टर जाम लबाड,पैसेकाढु असतात हे मान्य आहे!!
आय फोन बनवायला किती खर्च येत असेल? आणि कितीला पडतो,काही माहिती आहे का? तो महाग असुन लोक तो का घेतात का मिरवतात?साधे मोबाईल अस्ताना?(एक निरागस प्रश्न)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 03/11/2015 - 15:46
नवीन
आयफोनबाबतची माहिती इथे पाहा.
http://www.techinsights.com/teardown.com/apple-iphone-6/
लोक तो नक्की का घेतात याबाबत कल्पना नाही.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Wed, 03/11/2015 - 11:33
नवीन
सर्वप्रथम आपल्या मित्राच्या एका नातेवाइकाची तब्ब्येत कशी आहे?
देवकृपेने ते सुखरूप घरी पोचलेत आणि स्वस्थ असावेत अशीच ईश्वराकडे प्रार्थना करतो.
बायपास सर्जरी ची मेडीकली १% एक टक्का सुद्धा गरज नाही, आणि गरज नसतांना ती सर्रास राजरोसपणे केली जाते, हे त्याहून मोठी गोष्ट. पण अमक्या हॉस्पिटल मध्ये तमक्याने बायपास केली आहे असे अभिमानाने मात्र सांगितले जाते ते वेगळे.
त्यामुळे बायपास केल्यावर फी घेणे हे डॉक्टरांचे परम कर्तव्यच आहे, नव्हे ते तर त्यासाठीच जगतात व राबतात.
शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली आणि फी फक्त ८००००/- म्हणजे फार स्वस्तात सोडले आपल्याला.
नाहीतर आजकाल चोर सुद्धा फक्त १/२ मिनिटात ५००००/- ची गळ्यातली चेन काढून नेतात.
त्यामानाने फार कमी पैसे घेतले त्यामुळे आपल्या मित्राचे मनापासून अभिनंदन.
ता.क.: बायपास सर्जरी हे एक मोठे फॅड आहे!
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Wed, 03/11/2015 - 11:35
नवीन
माझ्या अल्पमाहितीप्रमाणे हैद्राबाद येथे अल्पमुल्यात उपचार होतात. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनानीही हा विषय धसास लावला पाहिजे.
- Log in or register to post comments
आ
आकाश खोत
Wed, 03/11/2015 - 11:36
नवीन
योगायोगाने आज तुमचा हा लेख वाचला, आणि मी सध्या डॉक्टरांवरच एक कादंबरी वाचतोय.
एरिक सेगल ची "डॉक्टर्स".
अमेरिकेतल्या ५०-६० च्या दशकातली गोष्ट आहे यात. (आपल्याकडे पण परिस्थिती तशीच असावी असं वाटतं.)
डॉक्टर्स बद्दल राग, कुतूहल, आकस, आदर असं काहीही असणाऱ्या सर्वांसाठी हि कादंबरी वाचण्याजोगी आहे.
डॉक्टर्स बद्दल एक नवा दृष्टीकोन मिळतो. त्यांच्या मेडिकल कॉलेज पासून सगळा प्रवास समजतो.
आपल्याला माहित असतंच त्याप्रमाणे एक साधा डॉक्टर बनायलाच किती तरी वर्षे लागतात. (काही लोकांना मेडिकल आधीच रिपीट करावं लागतं.)
त्यानंतर दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून जम बसवणे.
कुठल्या खास प्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी आणखी काही वर्षे आणि पुन्हा प्रशिक्षण.
असे त्यांना स्थिरावायला खूप उशीर होतो. आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अत्युच्च कौशल्य जोखीम तर असतेच.
त्यांची वकिली मी करत नाहीये. खिशाला चाट बसते तेव्हा आपल्याला आवडत नाहीच.
पण या पुस्तकामुळे दुसरी बाजू समजून घेता आली.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 03/11/2015 - 11:43
नवीन
हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे यातच सर्व काही आले. शिवाय यात ऑटोमेशन फारसं नाही, पण एकदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले रोबॉट डॉक्टर आले की मानवी डॉक्टरचे काम फक्त निदान करण्यापुरते उरेल.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 03/11/2015 - 11:47
नवीन
शिवाय माणसांची शरीरं जितकी स्टॅन्डर्ड असतील तेवढा उपचारावरचा खर्च कमी होईल. त्यामुळे सहज बदलता येण्याजोगे कृत्रिम, स्वस्त अवयवही बाजारात यायला लागतील. दर काही वर्षांनी बदलले की झाले.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 11:44
नवीन
असं आहे
- Log in or register to post comments
प
प्रशांत हेबारे
Wed, 03/11/2015 - 11:46
नवीन
Skill, Brand & Technology चे पैसे मोजावे लागतात . तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता पण खात्री नसते. हे सगयालाच यवासायला लागू होते. तेव्हा त्रागा करून उपयोग नाही.
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 03/11/2015 - 11:49
नवीन
डॉक्टरांनी किती फी आकारावी हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. ते त्यांच्या कौशल्याचे मानधन घेतात.
माझे बजेट ५,००० रुपये असेल तर माझ्या सिनेमात लता मंगेशकर ह्यांनी गाणे म्हणावे हा आग्रह मी धरू शकत नाही.
तसेच इतकी फी आकारणारे बहुतांश डॉक्टरही त्या क्षमतेचे असतात. सगळेच डॉक्टर अथवा गायक खोर्याने पैसा ओढत नाहीत.
काही जण आजन्म २० रुपयात तापाचे औषध देत राहतात, काही जण आजन्म कोरस मधले गायक बनून राहतात.
जे मेहनत घेऊन पुढे जातात ते नाव आणि पैसा कमावतात. पुढे जाण्यासाठी आणि राहण्यासाठी श्रम घ्यावेच लागतात.
त्यामुळे, मेडिक्लेम काढा आणि असले प्रश्न पडू देऊ नका.
त. टि.: ह्या पेशातला गैरप्रकारांबद्दल चीड आहेच. गैरसमज करून घेऊ नये.
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 11:50
नवीन
दोन वर्षांपूर्वी माझ्या घरातील एका व्यक्तीला गावाकडे असताना हृदयविकाराचा झटका आला होता. गावाकडे असल्यामुळे इलाजही तेथेच करावे लागले. माझ्या गावाजवळ माढा येथे उपचार झाले. अगदी अन्जिओप्लास्ती पण झाली. आणि ८ दिवस ICU मध्ये भरती होती हे वेगळेच. एवढे सगळे होऊनही बिल किती आले माहिती आहे??? फक्त १५००० सर्व औषधांचा खर्च धरून. आणि हॉस्पिटल खासगी होते बर का!!!! मी नंतर माझ्या एका मित्राच्या वडिलांची सेम केस शहरात हाताळली गेली होती त्याला खर्च विचारला तर त्याचा खर्च होता १,५०,०००. मग हि तफावत कश्यामुळे??? ह्याचाच अर्थ शहरात अत्यंत लुटालूट चालते असा नक्कीच काढता येऊ शकतो.....
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 11:59
नवीन
प्लीज तुम्ही त्या हॉस्पिटलचा नाव आणि पत्ता , डॉक्टरचे नाव सर्वांना द्या !
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 12:22
नवीन
माढा येथील पाटील हॉस्पिटल, डॉक्टर चे नाव नीटसे आठवत नाही पाहिजे असल्यास घरी रिपोर्ट बघून बाकी माहिती देतो....
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
Wed, 03/11/2015 - 12:09
नवीन
अँजिओप्लॅस्टी, ८ दिवस ICU आणि सगळी औषधं मिळून १५,००० भागवणारे ते गाव आणि हॉस्पिटल ह्यांचं नाव सांगितलं तर बरं होईल.
पहिली शंका ही आली की खरंच अँजिओप्लॅस्टी केली का. असो.
१ कोटी रुपयांमधे गावात मिळणारे घर आणि शहरात मिळणारे घर ह्यांच्यातला फरक पहा. साध्या गाळ्याचे भाडे बोरिवलीमधे ३५-४० हजार रुपये आहे. मार्केट परिसरात गेलात तर हीच किंमत कोटींमधे पोचते. तेच गावात वाडीसकट वाड्याचेही तितके पैसे होत नाहीत. त्यामुळे शहरात अत्यंत लुटालूट चालते असा काढणार का?
गावातल्या मेडिकल कॉलेजची फी आणि शहरातल्या मेडिकल कॉलेजची फी, डॉक्टर झाल्यावर जम बसायला लागेपर्यंत येणारा खर्च, स्टाफचा पगार, इत्यादि गोष्टीही लक्षात घ्यायला हव्या.
काही प्रमाणात भाव जास्त आहेतच. पण 'अत्यंत लुटालूट' ह्या सदराखाली ते मोडतील की नाही ह्याबद्दल शंका आहे.
ज्या गोष्टी साच्यातून बनवल्या जातात त्यांना अधिकतम किरकोळ किंमत असणे बरोबरच आहे. पण अशा व्यवसायांना ते लागू होऊ शकत नाही. गाडीची एक्स शोरूम प्राइस मुंबई आणि ठाण्यात जवळपास सारखीच असते. ती रस्त्यावर आणायची असेल तर किंमत बदलते. आणि ती किंमत मुंबईच्या रस्त्यावर गाडी उतरवण्याची असते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 12:15
नवीन
तरीपण १५००० मधे अँजिओप्लॅस्टी पटत नाही.
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 12:23
नवीन
अहो आता बिल पाठवू का फोटो काढून????
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/11/2015 - 12:25
नवीन
अगदीच पटत नाही .... स्टेंटचीच किंमत त्याच्यापेक्षा जास्त असेल.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 12:27
नवीन
नाहीच पटत... काहीतरी झोल आहे हे नक्की.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/11/2015 - 12:30
नवीन
कदाचित त्यांना अँजियोग्राफी म्हणायचं असेल?
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 12:35
नवीन
आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी केली कि नाही हे मी कसे सांगू शकतो परंतु ती केली नसली तरी अँजियोग्राफी अधिक बाकी दिलेले खर्च ह्याची बेरीजही १५००० म्हणजे कमीच आहे शहराच्या तुलनेत नाही का???
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 03/11/2015 - 12:40
नवीन
अहो आत्ता तर मी आपण बिल इथे देतो म्हणाला होतात तेव्हा त्याची वाट बघत होतो. त्यात कळेल की अँजियोग्राफी आहे का अँजियोप्लास्टी ते...?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 03/11/2015 - 12:42
नवीन
खात्री असल्याशिवाय सांगू नका . मिपाकर लै हार्ड हैत
- Log in or register to post comments
न
निनाद जोशी
Wed, 03/11/2015 - 13:19
नवीन
अहो माझ्या घरी बिल आहे त्यावर अँजिओप्लॅस्टी चा खर्च लिहिला आहे पण नुसता खर्च लिहिला का केली पण हे मला कसा कळणार म्हणून म्हंटल . बिल मी आज रात्री पर्यंत घरनं मागवून टाकतो काळजी नसावी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/13/2015 - 10:58
नवीन
बिल अजून आलं नाही का?
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 03/13/2015 - 11:06
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 03/13/2015 - 13:43
नवीन
ते १५००० नसुन १,५०,००० आहेत हे लक्षात आले असेल.
- Log in or register to post comments
अ
असंका
Fri, 03/13/2015 - 13:52
नवीन
मग तसं सांगु दे. आम्ही आपले आशेला आलो होतो....
अवांतरः बाकी माढ्यासारख्या ठिकाणी आता अशा सोयी आहेत म्हणल्यावर "कुठे नेऊन ठेवलाय.." वगैरे प्रश्न वेडगळच म्हणायचे. मी पाच वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा साधं हॉटेल नव्हतं गावात....शेजारी कुर्डुवाडीत रहावं लागलं होतं.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/13/2015 - 13:58
नवीन
प्रसाद साहेब
मोदक रावांच्या दुव्यावर मी म्हटलेले होते कि ऐन्जीयोग्राफिसाठी लागणाऱ्या डिसपोजेबल गोष्टी ( क्याथेटर,शीथ,गाईड वायर इ पूर्ण संचाची) किंमत नउ हजार पर्यंत येते कारण ते आयात करायला लागतात.आणि त्याची किंमत १५० डॉलर आहे. जर कोणी हा पूर्ण नवा संच वापरून ऐन्जीयोग्राफि करत असेल तर त्याची किंमत कमीत कमी १०००० दहा हजार होईल.यास्तव जे जे किंवा नायर रुग्णालयात याची किमत १२ हजार आहे (जेथे कोणीही डॉक्टर लुबाडायला बसलेला नाही). असे असताना एन्जीयोप्लास्तीची(ऐन्जीयोग्राफि नव्हे) किंमत माढा सारख्या तालुक्याच्या गावी पंधरा हजार असेल हि शक्यता फारच कमी वाटते. जर कोणी दानशूर माणूस याला पंधरा हजाराची सबसिडी देत असेल तरच हे शक्य आहे याचे कारण ऐन्जीयोग्राफिनंतर अरुंद झालेली रक्तवाहिनी परत पूर्ववत करायला लागणारा फुगा सुद्धा १२५ डॉलर ला येतो.( हा फुगा फुगवून ती अरुंद रक्तवाहिनी रुंद करण्यात येते). या रक्त वाहिनीची परत अरुंद होण्याची शक्यता ५०% असते म्हणून त्यात स्टेंट बसवावा लागतो आणि तो नुसता धातूचा स्टेंट तीस हजारापेक्षा जास्त किंमतीला येतो. त्यातून (drug elluting stent) रक्ताची गुठळी न होणारी औषधी सोडणारा स्टेंट जर असेल तर त्याची किंमत ५०,००० ते एक लाख यामध्ये येते. तेंव्हा निनाद राव यांनी लिहिलेल्या गोष्टीत काहीतरी फार महत्त्वाचं राहून गेलेलं आहे. मी या धाग्यावर वाचन मात्र झालो होतो परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या होत्या त्या लिहायच्या आहेत.
क्रमशः .
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/13/2015 - 15:56
नवीन
वर लिहिलेल्या किमती सरकारी रुग्णालयातील आहेत. तेंव्हा आपण मुंबईतील नायर किंवा जे जे रुग्णालयात एन्जीयोप्लास्टी केलीत आणि एक स्टेंट बसवला तर त्याचा खर्च ५० ते ७५ हजार इतका येतो. यात डॉक्टरांची लुटालूट, रुग्णालयात अधिक दिवस ठेवून घेतल्याने फुगवलेले बिल असा प्रश्न येत नाही. तेंव्हा १५,०००/- रुपयात एन्जीयोप्लास्टी तर सोडाच ऐन्जीयोग्राफि सुद्धा खाजगी रुग्णालयाला परवडेल काय याची मला शंका वाटते.
यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे कि ऐन्जीयोग्राफि करताना जर हृदयाच्या रक्त वाहिनीतील कोलेस्टीरोलचा प्लाक क्याथेटरमुळे सुटा झाला आणि रक्तवाहिनीत पुढे गेला तर टेबलवरच रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊ शकतो अशा वेळेस तुम्हाला तातडीने( ६ तासात) बायपास शल्यक्रिया करावी लागते. याच कारणासाठी ऐन्जीयोग्राफि करताना हृदय शल्यक्रिया तज्ञ आणि शल्यक्रिया गृह राखीव( backup) असणे आवश्यक आहे. हि शक्यता १ % पेक्षा कमी असते तरीही हि काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यत १% हून कमी असेल तरीही ज्याच्या नातेवाईकाच्या बाबतीत असे होते त्याच्या दृष्टीने टक्केवारीला काहीहि अर्थ उरत नाही.
याकारणास्तव मुंबईत इतकी मोठी रुग्णालये असूनही प्रत्येक रुग्णालय ऐन्जीयोग्राफि करत नाही आणि ज्यांच्याकडे अशी सोय नाही त्यांचे अशी शल्यक्रिया करणाऱ्या रुग्णालयांबरोबर करार असतो आणि प्रत्येक ऐन्जीयोग्राफि पूर्वी त्या रुग्णालयाला तयार राहण्यासाठी कळवलेले असते.
माढा सारख्या ठिकाणी (बायपास शल्यक्रिया) अशी सोय असेल असे वाटत नाही.
याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि श्री निनाद यांनी अज्ञान जनक अशी माहिती पुरवलेली आहे. या माहितीमुळे एखादा मिपाकर किंवा हे वाचणारा ज्याला तातडीने ऐन्जीयोग्राफि/एन्जीयोप्लास्टी ची गरज आहे तो माणूस नुसत्या ऐन्जीयोग्राफिचे १५- २० हजार रुपये होतील हे ऐकून रानोमाळ १५ हजार रुपयात एन्जीयोप्लास्टी करणारे रुग्णालय शोधत फिरेल आणि महत्वाचा वेळ वाया घालवू शकेल.
आपण येथे माहिती देताना अत्यंत काळजीपूर्वक वागावे. आपल्या चुकीच्या माहितीमुळे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते
- Log in or register to post comments
र
रुस्तम
Fri, 03/13/2015 - 16:47
नवीन
डॉक्टर ज्ञानात भर टाकल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 03/11/2015 - 12:02
नवीन
हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय खर्च वाढला आहे.
- Log in or register to post comments
आ
आयुर्हित
Wed, 03/11/2015 - 12:09
नवीन
हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय खर्च नव्हे तर वैद्यकीय लुट वाढली आहे!
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »