Welcome to misalpav.com
लेखक: विनित राजाराम … | प्रसिद्ध:
" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . , " बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो ..... हो … आहे , बोल बोल , मला वाटलं भास झाला मला .", "अरे माझ्या फोन चा problem आहे रे म्हणून कट् झाला." , " अरे तू काही तरी सांगत होतास ना.. ", "अरे ...... आपली सुची भेटली होती पुण्याला... ", "कोण ? " , " अरे ' सुची ' .... आपली .... तुझी ' सुची '. " पुन्हा एकदा वीज कडाडली ..... आणि शांतात ... सगळं शांत झालेलं ,..... " Hello ..... Hello ..... ." विनू फोन पकडून तसाच उभा होता . कूठेतरी हरवून गेलेला , " Hello ..... Hello ..... .विनू ... विन्या " , " खरंच भेटली होती का रे ती ?" विनू पुन्हा भानावर आला . " कशी आहे रे ती ? ", " छान आहे पहिल्यासारखीच , विचारात होती सगळ्यांना .... आणि तूलाही विचारला तिने , विनू कसा आहे म्हणून ." टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यात," अजूनही लक्षात आहे मी तिच्या ." विनू मनातल्या मनात बोलला. " जास्त काही बोलली नाही , घाईत होती , मी तूझा फोन नंबर दिला आहे , करेल बोलली फोन तुला . " आणि फोन पुन्हा कट्ट झाला. " सुची भेटली होती ,माझी सुची " विनूला विश्वासच बसत नव्हता, पण सुची कधी फोन करणार हे तो बोललाच नाही . मग विनू त्याला फोन करायला लागला. त्याचा फोन तर बंदच होता , खूप वेळा "try " केला पण व्यर्थ. थोडयावेळाने विनू शांत बसला, रात्री चे १२. ३० वाजले होते. इतक्यात फोन वाजला " बर झाले , याने call केला परत." पण अनोळखी नंबर होता . " Hello .... Hello .... अरे बोल ना .... " पलिकडून काही आवाज आला नाही . फोन तर चालू होता . " Hello .... विनू " हळूच आवाज आला फोन मधून , तो आवाज ऐकून विनू स्तब्ध झाला . सहा वर्षानंतर त्याने तो आवाज ऐकला होता. "Hello .... विनू ... आहेस ना रे ... ओळखलंस का मला ?", " तूला कसं विसरणार " , " कसा आहेस ? ", " ठीक आहे , तू कशी आहेस ?" , " बरी आहे . " आणि दोघेही गप्प . खूप वेळ दोघेही काहीही बोलले नाहीत . एकदम विनू बोलला ," मला तुला भेटायचं आहे , कधी भेटशील ?" , " मलाही भेटायचं आहे तुला, मी सध्या पुण्यात आहे , येशील का पुण्याला ?", " येईन ना , कधी आणि कुठे ते सांग ?", " पुणे स्टेशनलाच भेटूया . उदया येशील स्टेशनला , सकाळी ११ वाजता .", " आणि १ नंबर platform च्या शेवटला एक लाकडी बाक आहे, तिथे भेटूया " असे बोलून तिने फोन ठेवून दिला. विनूला तर आपण सुची बरोबर बोललो हे खरंच वाटत नव्हता. तेवढयात त्याला आठवलं उदया पुण्याला जायचे आहे , गाडीची वेळ बघितली पाहिजे, Net वर त्याने वेळ बघितली .सकाळी ६ ची गाडी होती , मुंबईवरून. " बस्स , हीच गाडी पकडायची आणि सुची ला भेटायला जायचं ." खूप खुश होता तो. कूठलातरी मोठा खजिनाच हाती लागला होता जणू काही. उदया सकाळी ६ वाजता जायचे होते , पण त्याला झोप येईल तर शप्पत. ' सूची' ला भेटणार या आनंदात त्याला झोपच लागत नव्हती. झोप येत नाही म्हणून त्याने त्याची जुनी bag उघडली. त्यात सर्व जुन्या गोष्टी होत्या त्यात,आठवणीच त्याच्या. college च्या वस्तू, सुचीने दिलेल्या. तो त्या बघत बसला. त्याची जुनी डायरी सुद्धा होती, त्यात तो दिवसाच्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचा. डायरी उघडून वाचू लागला तो , खूप काही गोष्टी होत्या त्यात, मोगऱ्याचं एक सुकलेलं फूलही होतं त्यात. " सुचीला मोगरा खूप आवडायचा ना ..... " एकदा तिच्या डोक्यातील फूल विनूने गुपचूप काढून त्याच्या डायरीत ठेवलं होतं. तिला तर ते कळलचं नव्हता, किती मज्जा करायचो आम्ही college मध्ये , विनू रमून गेला आठवणीत. एका पानावर सुचीने गाणं लिहून ठेवलं होतं, किती छान अक्षर होतं तिचं. गाण्यावरून त्याला आठवलं. त्याचा group सर्वात आधी वर्गात येऊन बसायचा. अगदी एक तास अगोदर,मग यांची गाणी सुरु व्हायची. Group ने प्रत्येकाला एक गाणं ठरवलं होतं. मग तो किवा ती उशिरा आली कि ते गाणं सगळा group म्हणायचे. तसं विनू आणि सुचीला सुद्धा गाणं ठरलं होतं पण ती दोघं एकमेकांसाठीच गाणी म्हणायचे," तुम आये तो आया मुझे याद , गली मे आज चांद निकाला " हे गाणं विनू म्हणायचा सुची साठी आणि " ये लडका हे दिवाना दिवाना " गाण विनू साठी निवडलं होतं सुची ने. सुचीला ते गाणं आवडायचं , त्याही पेक्षा ते गाणं विनू तिच्यासाठी म्हणतो आहे हे जास्त आवडायचे. म्हणून कधी कधी ती मुद्दाम उशिरा यायची वर्गात. अर्थात विनूलाही ते माहित होतं , Infact , सगळ्या group ला माहित होतं. विनूला हसायला आलं, किती दिवसानंतर तो हसला होता मनापासून. पुढे पान उलटच गेला तर त्याला एक फोटो सापडला , group फोटो . केवढा group होता त्यांचा ४० जणांचा, नाही ३९ जणांचा. एक जण नंतर सोडून गेलेला. ते सुद्धा त्याला आठवलं, " जगदीश नाव होतं त्याचं , हो ...... आम्ही सगळे त्याला ' जग्गू ' म्हणायचो " तसा तो चांगला होता, पण त्याला एक वाईट सवय होती. कोणाचीही मस्करी करायचा तो , त्याला विनूने खूप वेळा समजावलं होतं, तो काही ऐकलं नाही. त्याने एकदा सुचीची मस्करी केली. ते काही विनूला आवडला नव्हता, परंतु मित्र असल्याने तो काही बोलला नव्हता. पुन्हा एकदा त्याने सुचीची मस्करी केली तेव्हा विनूला राग आला, रागाच्या भरातच तो जगदीशला बोलला,"उद्यापासून तू आमच्यात राहणार नाहीस. समजलं .... ?", " अरे, एका मुलीवरून तू मला group बाहेर काढतोस? काय मोठ्ठी शहाणी लागून गेली वाटते ती ." असं तो बोलला आणि ''खाड्....... " कसली थोबाडीत मारली विनूने त्याच्या. इतका जोर होता त्यात की त्याचा ओठ फुटून रक्त आलं , एक दातही पडला. विनूचा तो पवित्र बघून जगदीश पळून गेला. तो नंतर काही त्यांच्या समोर कधीच आला नाही. विनूच्या अंगात किती ताकद आहे हे सगळ्यांनी पाहिलं, सुचीने सुद्धा. हा आपल्यासाठी काहीही करू शकतो , हे तिला कळल, पण तिला हे बरोबर नाही असं वाटलं. तिने विनूला शप्पत घेण्यास सांगितली , " आज पासून मी कोणावर हात उगारणार नाही, कोणावर रागावणार नाही,राग मनातल्या मनात ठेवीन , कोणालाही त्या बद्दल सांगणार नाही " असे मोठ्ठे वचन विनूने सुचीला दिले आणि अजूनही तो ते वचन पाळत होता. आठवणीतून बाहेर आल्यावर विनूला कळल की सकाळचे ५ वाजले आहेत,झोपालाच नाही तो . गेली ६ वर्ष विनू 'शांत ' असा कधी झोपलाच नव्हता, रात्री अधून मधून त्याला जाग यायची, मग तसाच तो विचार करत राहायचा. त्याने पटापट तयारी केली आणि ६ ची गाडी पकडली. गाडी सुद्धा वेळेवर निघाली,त्यात त्याला आठवलं, आपण काही " Gift " नाही घेतलं सुची साठी. तरीही तिला कूठे " Gift " आवडायची . मुंबईवरून गाडी निघाली तेव्हा आभाळ मोकळेच होते, जेव्हा गाडी पुण्याला पोहचत होती तेव्हा मात्र आभाळ जरा कांडवळलेला होतं, विनूला जरा भीतीच वाटली ," पुन्हा पाऊस . आज तरी नको यायला हवं तू ? " . विनू वेळेच्या आधीच पोहोचला ठरल्या जागी. " अरे आपण तिचा mobile no घ्यायला पाहिजे होता. तिला फोन लावला असता आता ? " १० . ३० वाजत होते सकाळचे. पाऊस धरलेला. सुट्टीचा दिवस असल्याने स्टेशन वर सुद्धा गर्दी नव्हती, मग विनू आजुबाजूच न्याहाळत बसला. अगदी platform संपतो तिकडचा बाक,तिथे फारसं कोणी नसायचं तरीही जागा स्वच्छ होती. पावसाळा सुरु झालेलाच होता, त्यामुळे सगळीकडे रानटी झाडं उगवली होती आणि त्यावर रानटी फुलं ..... नावं नव्हतं त्यांना ,निव्वळ रानटी फुलं . वाऱ्याने डोलत होती , वर आभाळ कांडवळलेला सकाळपासून . थंड बोचरा वारा . आसपास कोणीच नाही . मन अस्वस्थ करणार वातावरण अगदी. ( पुढे वाचा. http://vinitdhanawade.blogspot.in/2013/11/original-love-story-part-2.html आवडली तर नक्की share करा. )
प्रकार:
विषय: