पासवर्ड कसे सांभाळावेत
इमेल -पासवर्ड
इमेल आणि इतर नेटवर्क साइटस यांचे पासवर्ड तसेच काहींचे सिक्यूअरटी क्वेश्चन वगैरे कुठे साठवायचे? कसे लक्षात ठेवायचे? लिहून ठेवणे योग्य होईल काय? कृपया माहितगारांनी आपले उपाय सुचवावेत. मी हे सर्व एका वेगळ्या इमेलमध्येच पोस्ट केलेत आणि लिहूनही ठेवले आहेत परंतू काहीच सुरक्षित वाटत नाही.आमच्या इमेलातून काही घबाडवगैरे मेलचोरांना मिळणार नाहीयै परंतू इतर धोके संभवतात.दुसऱ्या एखाद्या ठिकाणाहून/डिवाइस/कंप्युटरातून जीमेल लॉगिन केले की वेरिफाइ करायला लावतात नेमके त्याचवेळी फोनमध्ये कोड आला नाही अथवा वेरिफाइ नाही झाले की जुन्या ठिकाणी पुन्हा "अमुक ठिकाणाहून लॉगिनचा प्रयत्न झालाय तरी पासवर्ड बदला" मेसेज झळकतो.पुन्हा नवा पासवर्ड लक्षात ठेवणे आले. [चारोळी धागा काढायचा उद्देश नाहीये. अगोदर कोणी असा धागा काढला असल्यास संपादक मंडळाने तिकडे प्रतिसाद म्हणून ढकलावा.]
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracy