Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ढ

व — वेल्लाभट, गुरुवार, 03/12/2015 - 10:43
ढ आळस देत मान वर काढता आली असती जग म्हणजे काय ते बघता आलं असतं हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ|| पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१|| शाळेपुरतीच नसते हुशारपणाची जोखड नोकरीमध्ये सुद्धा होत रहाते धडपड डिग्र्या हव्या, पोझिशन हवी, पैसे हवे नाही का! हुशार असून वाया गेला लागायला नको शिक्का तेंव्हा वाटत असून बरंच काही करता येत नसतं ||२|| ढ असणं कधी कधी वरदानच मुळी असतं तुमच्याकडे कुणीच जास्त लक्ष देत नसतं नाहीच केलंत काही तर विशेष बिघडत नाही पण केलंतच काही तर त्याचं कौतुक विशेष असतं आणि हुशार असून केलं तर ते अपेक्षितच असतं ||३|| ढ असून ढ असण्याचा फायदा कळत नाही हुशार असून हुशारपणाचा तोटा कळत नाही लहानपणी हे कळण्याचा काळ आलेला नसतो मोठं होऊन कळतं तेंव्हा उशीर झालेला असतो जर-तर च्या बाता सोडून काहीच हातात नसतं ||४|| -अपूर्व ओक टीपः कविता संपूर्णपणे काल्पनिक असून कवितेतील कुठल्याही गोष्टीचा कवीच्या वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नाही. क्लियर्र केलेलं बरं :)

प्रतिक्रिया द्या
1603 वाचन

💬 प्रतिसाद (7)
अ
अजया गुरुवार, 03/12/2015 - 12:05 नवीन
कविता आवडली.माझ्या सध्या दहावीत असलेल्या मुलाचं नेमकं काल हेच बोलणं चाललं होतं.त्याला वाचुन दाखवल्यावर त्याला स्वतःच कविता केल्यासारखी वाटली!अगदी तंतोतंत भावना उतरल्या आहेत कवितेत!
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 03/12/2015 - 12:45 नवीन
झक्कास! शहाणपण उशिरा येते हेच्च खरे!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/12/2015 - 16:58 नवीन
अगदी बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 03/12/2015 - 16:58 नवीन
अगदी मस्त लिहिलय
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/13/2015 - 06:05 नवीन
कविता आवडली , पण खाली दिलेल्या अनावश्यक टिपेने घाण केली
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/13/2015 - 06:27 नवीन
घाण केली ना.... तेच अपेक्षित होतं :) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ज
ज्योति अळवणी Sat, 03/14/2015 - 02:40 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा