तरीसुद्धा ...
सारं तसं ठीक आहे संथ जीवन चालले आहे
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
दूर तू गेलीस त्याला एक तप उलटून गेले
पाण्यासारखे क्षण सुद्धा इकडे तिकडे वहात गेले
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
लग्न संसार मुलं-बाळं दोघं गुंतून गेलो आहोत
रुळलेल्या वाटेवरुन खड्डे टाळत चालत आहोत
तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे ।
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
मेघ कधी बरसत नाही , दूर ही निघून जात नाही
सावली देणं टाळत नाही, साथ देणं विसरत नाही
मनाच्या आभाळात होतीस तिथेच तू आहेस
तुझ्या आठवणींचा मेघ अजून आकाशात आहे …।
💬 प्रतिसाद
(3)
प
पैसा
Fri, 03/13/2015 - 17:15
नवीन
सुरेख रचना!
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 03/13/2015 - 20:15
नवीन
अप्रतिम कविता. खरच मनाला भिडली
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Fri, 03/13/2015 - 20:20
नवीन
सुरेख रचना, पण तरीसुद्धा मन म्हणतं काहीतरी कमी आहे :-) .
- Log in or register to post comments