Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृगजळ...

ए — एक एकटा एकटाच, Sat, 03/14/2015 - 02:19
दूरदेशी फिरताना जेव्हा नवलाईची हौस फिटलेली असते कर्तृत्वाच्या अश्व्मेधावर पळताना घरचे अंगण दूरावलेले असते कमावले काय,गमावले काय आयुष्याचे सगळे गणितच चुकलेले असते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते इथल्या माझ्या राजवाड्यात आता माझ्याशिवाय कुणीच बोलत नाही उशिरा उठल्याबद्दलचा आईचा ओरडा आता दूरुनही ऐकू येत नाही मिळवलेल्या यशाबद्दलची बाबांची शाबासकी आता पाठीवर पडत नसते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते रस्त्यावरच्या गर्दीतुन मिसळताना,मन मात्र एकाकी होउन जाईल तेव्हाच समोरुन आपल्या मित्रांची छबी हलकेस ओझरून जाईल वळुन पाहिले तर ती अनोळखी गर्दी आपापल्या वाटेला लागलेली असते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते काल पाहिले होते तिला खिडकीत आपले ओले केस वाळवत असताना माझ्या गोंधळलेल्या चेहरयावर खास ठेवणीतले खट्याळ हसु फेकताना तिच्या आठवणीने डोळ्यांसोबत आता मन ही भरुन आलेले असते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते आता क्षणभर ही थांबू नये, तडक घरी निघावे ही इच्छा जोर धरु लागली असते पण जबाबदारीच्या सबबीखाली नियतीने परतीची तारिखच गायब केलेली असते दूद्रैवाने कॅलेंडरची पानं पलटण्याशिवाय आता आपल्या हातात तरी काय असते तेव्हा कळते कि, ज्याच्यामागे धावत होतो ते एक फक्त मृगजळ असते....... ................................ते एक फक्त मृगजळ असते

प्रतिक्रिया द्या
819 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ज
ज्योति अळवणी Sat, 03/14/2015 - 02:44 नवीन
खरय. 'उत्तम' आणि सुखी (?) आयुष्याच्या मागे धावताना आपण खूप काही मागे सोडून देतो... आणि ते कळे पर्यंत उशीर झालेला असतो
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा