Welcome to misalpav.com
लेखक: हेमन्त वाघे | प्रसिद्ध:
मागील दोन्ही भाग इकडे वाचा. भाग १ http://www.misalpav.com/node/30677 भाग २ http://www.misalpav.com/node/30702 “ वोडका???” .............” रम ???!!!” ............. “दारु ???????/!!” ती भयानक किंचाळली ! काही सेकंद सगळे सुन्न न्न न्न न्न ......................... ( हा स्पेशल इफेक्ट ......) मग तो कॅप्टन मराठीत म्हणाला “ mam ते cocktail आहे ना त्यात आम्ही गेस्ट च्या पसंतीचे ड्रिंक देतो .म्हणून तुमचा choice विचारला. “ तो विलक्षण शांत पणे म्हणाला. मला त्याचे कौतुक वाटले. “ ड्रिंक ..... दारू ............ नाही हो मी अजिबात पीत नाही ...” मुलगी अजून थरथरत होती . इतक्यात मी समयसूचकपणे म्हटले कि फ्रेश लाईम सोडा घेणार का? त्यावर तिने फक्त लिंबू सरबत ( नो... लाईम ज्यूस )मागवला. वेटर आणि कॅप्टन दोघेही गेले .मला जाणवले कि कॅप्टन माझ्याकडे मिस्कील नजरेने आणि वेटर विचित्र नजरेने बघत गेला. “ तुम्हाला माहित होते कि ऑर्डेर मध्ये दारू आहे ?” मुलीने मला वेगळ्याच आवाजात विचारले ..” होय “ –मी मी सर्व मुलीना मला तुम्ही ऐवजी तू म्हणायला सांगायचो .. हे आताच कोठे तू वर आलो होतो आणि आता तुम्ही ! “ तुम्ही पिता ? नाही बरोबर तुम्ही बायो डाटा त लिहलेच आहे “ तिला मी बहुतेक पिऊन पडणारा वाटायला लागलो होतो. “ मग दारू तुम्ही का मागवली नाही ?” ती .” मला वाटले कि तुला शो ऑफ करायचा आहे ..मी अंदाज घेत होतो आणि खरेच ठीक झाले असते तर मागवणारच होतो. “ मी “ नाही नाही नाही . मी पीत नाही . कधीच प्याले नाही . घरात कोणीही पीत नाही. कोणालाच आवडत नाही. “ ती व्याकूळ होऊन म्हणली. इतक्यात ऑर्डर आली. फारच झटपट . मला एक अंदाज आला कि वेटर ने कॅप्टन स सांगितल्यावर त्यांना गडबड कळली असणार – लग्नासाठी भेटीचा प्रसंग सहज ओळखता येतो आणि त्यात बहुदा प्रथमच cocktail मागितल्याचे बघितले असेल. आणि त्यात सरळ दिसणारी मुलगी मागवते आणि मुलगा फक्त फ्रेश लिंबू सोडा ( परत तो तर “तयारीचा” दिसतोय. ) त्यामुळे त्यांनी हे ड्रिंक्स च्या choice चे नाटक केले आसनार. मला कॅप्टन च्या प्रसंग हाताळण्या च्या कौशल्याचे आजही कौतुक वाटते. “ समजा , आणि समजा मी पिणारी असते तर .. हा? चालले असते का तुम्हाला? काय केले असते ? नाही आणि मी पीत नाही हा ...” तिच्यातली स्त्री मुक्ती वाली जागी होऊन विचारत होती. आणि मी ते लाईटली घेतले. “ आग मी खूष झालो असतो. इन fact तेच पाहिजे होते. मला वाटले होते कि तू काय तयारीची मुलगी आहेस. आणि लग्नानंतर कंपनी झाली असती कि .” मी मिस्कीलपणे म्हणालो. पण काही जागा sense of humour दाखवायच्या नसतात. “ नाही नाहीहो नाही , मी पीत नाही.” मी हताशपणे ,वैतागून हे बहुदा विसाव्या वेळी सांगत होती. मग चर्चा हि नकारात्मक आणि दारू याच विषया भोवतीच झाली . ती पीत नाही हे अजून २५ वेळा झाले. आणि इतर कोणत्याही विषयांवर चर्चा झाली नाही. बिल मागवतच लगेच आले ( ते तयारच होते जणू) आणि माझ्या खिशाला चाट बसला. तिलाही जायची घाई झाली होति ... जसा कि काही मी drunken molestar च होतो. बाहे आल्यावर वाटले कि मुलगी ठीक आहे ; थोडी भोळी आहे. अजून एकदा भेटले किंवा घरी भेटले तर गैरसमज दूर होतील . बघूया. घरी गेलो. आईच्या “ कसा झाला programme “ ला ठीक म्हणून , फ्रेश होऊन laptop आणि नेत चालू केले आणि मैल्बोक्ष मध्ये एक मेल वात बघत होते – तिचे - “ Mr. Waghe sorry to say that we cannot pursue it further . ---- xxxxxxxx” Dear नाही, thanks नाही ....direct ... हा मला सगळ्यात झटपट आलेला नकार होता! उपसंहार – आणि सुखांत का? सुखांत शब्द बघून अपेखा काही वेगळ्याच असतील आणि इथे तर मुलीने नकार दिला . पार्टी तर झालीच नाही .. मग का ? ती सुखी झाली –असावी बहुतेक -- ती एक तिच्या दृष्टीने वाईट मुलाशी लग्न कराय पासून वाचली. तिचा आऊटलूक............ मी समजा लग्न केले असते तर जिला पिण्याचा त्रास होतो अशा मुलीबरोबर खुश राहिलो असतो का?? नाही ... मी freedom , responsibility , fun and live and let live – we all can co-exist वर विश्वास ठेवतो. मला यथावकाश अशी बायको मिळाली ( नाही ती पण कटकट करते .आणि माझी छोटी पण .. पण त्यांनी आणि मी हे स्वीकारले आहे. ) मी हि सुखी झालो. फक्त मी आणि ती मुलगी एक मेकांबरोबर सुखी झालो नाही. ( they live happily ever after …. Not together ! ) जाता जाता नवीन मुलांना पण सांगावेसे वाटते कि जशी कॉर्पोरेट जगात cultural fitment असते ( मराठीत काय म्हणतात?) त्या पेक्षा हि जास्त ती लग्नात असते . अनेकदा कंपन्याची एक संस्कृती बनते आणि त्या मग त्या प्रकारचेच उमेदवार बघतात. जसे कि मेडिया कंपन्या , ad – agencies ,विदेशी बँक वगैरे. त्यातही citibank आणि HSBC आणि Standard Chartered च्या संस्कृतीत फरक आहे. पण कॉर्पोरेट संस्कृती जमली नाही तर नोकरी बदलू शकता .. नवरा किंवा बायको बदलणे तेवढे सोपे नसते. माझे घर बर्यापैकी स्वतंत्र वृत्तीचे , मातृसत्ताक आणि देव धर्मास फारसे न मानणारे , फारसे गंभीर नसलेले होते. हि मुलगी त्याच्या विरुद्ध होती. आज दहा पेक्षा अधिक वर्षे उलटून गेल्यावर मी स्वताशीच हसतो आणि म्हणतो –चीअर्स !!!!! ता. क. – आता नवी पिढी फारच पुढे गेली आहे.तर कोणी वधू / वर परीक्षा ड्रिंक्स सोबत केली आहे का ? अनुभव सांगावेत ...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अपेक्षीत शेवट. पण तरी सुध्दा मस्त मजा आली वाचताना. मधल्या मधल्या स्वगतांनी वाचायची उत्सुकता वाढवत नेली. पैजारबुवा,

+१ अंदाज आलाच होता पण एकंदरित कशा अपेक्षा असतात आणि किती सेन्सिटिव्ह मॅटर्स असतात काही गोष्टी हे पाहून गंमत वाटली.

तुमचा गमतीदार अनुभव आवडला. ड्रींक्स, चकणा ठेवून बघणे कार्यक्रम करत नसावेत असा माझा अंदाज आहे -ज्या कुटुंबात समुदायात वगैरे पाहुणे आल्यावर एक छोटा पेग घेणे सामान्य आणि आवश्यक आहे त्यांचापण आग्रह नसावा.सोयरिक जमल्यावर दोन बरण्या(आवडीचा ब्रांड टाकून घ्या ) उघडत असतील ते अलाहिदा. हे ललित लेखन नसून खराच अनुभव आहे असं धरून लिहितोय. मी सायनला शाळेत असतांना कोळीवाड्यातल्या मित्रांकडे गेल्यावर गमती होत असत. {पहिले}लग्न ठरताना काहीच स्मरणिय घटना घडल्या नाहीत तर एका मोठ्या अनुभवास मुकतो.

माझा एक अनुभव. आई, माझ लग्न करण्यासाठी मागे लागली होती. तिने माझे नाव वधु-वर संशोधन मंडळात नोंदवलं होत. माझा काही जाण्याचा मूड नव्हता. पण आई खूपच मागे लागली म्हणून तिच्याबरोबर एका मेळाव्याला हजर झालो. विवाहोच्छुक तरुण तरुणी स्टेजवर जाऊन आपली माहिती आणि वधू/वर बद्दलच्या अपेक्षा यांची जंत्री वाचून दाखवायला लागले. भावी नवरा/नवरी समजून घेणारा/घेणारी, मनमिळाऊ वगैरे धोपट अपेक्षाच होत्या सगळ्यांच्या. माझा नंबर येईपर्यंत मी सुद्धा मनातल्या मनात माझ्या अपेक्षांची यादी तयार केली. माझा नंबर आल्यावर मी सुद्धा स्टेज जाउन उभा राहिलो. स्वतःबद्दल माहिती सांगता सांगता, मी दारू पीत असल्याबद्दल हि सांगितले आणि सगळीकडे हशा पिकला. कारण माझ्या आधी पन्नास एक उमेदवारांनी ते बिनव्यसनी असल्याचंच सांगितलं होत. भले तोंडावरून 'दारूचा गुटगुटीतपणा' दिसत असला तरी. काही समदुःखी माझ्याकडे एखाद्या विजयी वीराप्रमाणे पाहायाला लागले. जे त्याना सांगता आले नाही ते विचार माझ्या तोंडून बाहेर पडल्यावर त्यांना एक मानसिक समाधान देऊन गेले. कार्यक्रम संपल्यावर काही लोकांनी माझ्या या बेधडक वृत्तीची प्रशंसाही केली. कदाचित एक उमेदवार आपोआपच कमी झाला हि जाणिव झाली असेल, म्हणून प्रशंसा केली असेल. पण लग्नाच्या बाजारात हि बेधडक वृत्ती कामाची नव्हतीच. तेव्हढ्यात आमची जगदंबा प्रेक्षकातून कडाडली! मायझया ह्येच्यासाठी तुका आणललय काय रे.……. आईने भर मेळाव्यात मालवणीमध्ये घाल घाल शिव्या घातल्या. लोकांचे तर पुरेपूर मनोरंजन झाल होत. कार्यक्रम संपल्यावर अल्पोपहारच्या वेळी लोक येऊन उगीचच चौकशी करीत होते. ज्याच्या त्याच्या नजरा माझ्याचकडे. काही सुंदर चेहरे नजरेस पडले , मनात म्हटलं या आधी दिसल्या असत्या तर हा आगाउपणा केला नसता. :-)

हा हा हा किस्सा आवडला. खोटं बोलणार्‍या लोकांची दुटप्पी वृत्ती दिसते यातून. शिवाय लग्नाच्यावेळी निर्व्यसनी मुलगा शोधला तरी त्याला पुढे व्यसन न लागण्याची कोणतीही खात्री नसते हे लोकांना कळत कसं नाही? त्यापेक्षा प्रामाणिक मुलगा बरा.

पण बरं झालं. लपून छपून रेग्युलरली पिणारे पण अशा वेळी तुमच्याकडे "जगातला सर्वात महापापी" किंवा "वाया गेलेला मुलगा" अशा अर्थानं बघून घेतात.

लेखन आवडले. लग्नाच्या बाजारात ही लपवाछपवी फक्त दारूबद्दल असते का सिगरेट, पान, काऊ स्टॅम्प वगैरे बद्दलही असते? उपवर मुलगा/मुलगी "तीनशे किवाम खुशबू बनारस हरी पत्ती" असं अगदी मेळाव्याच्या ष्टेज वरून नाही तरी प्रत्यक्ष भेटीत सांगू शकतात का?

गाय छाप. एक मित्र याला "कायम चूर्ण" म्हणतो. कारण तो कायम हे चूर्ण दाढेपाशी धरून असतो.

त्या मुलीने screwdriver मागवण्याचे कारण कळले नाही. तिने आधी कुठेतरी हा शब्द ऐकला होता परंतु त्यात अल्कोहोल असते असे तिला माहित नसेल आणि थोडा शो ऑफ करावा म्हणून मागवले असे झाले असेल का?

बहुदा तिला टेबलावरील एखादा स्क्रु / खिळा टोचत असावा आणि तो बसविण्यासाठी तिने स्क्रुड्रायव्हर मागितला असावा असा आमचा बालिश अंदाज.

आणखी एक एकदा माझ्या काकीच्या नात्यामध्ये मुलगी पाहण्यासाठी गेलो. माझ्याबरोबर फक्त काका होता. मला रविवार म्हटलं कि रेल्वेचा प्रवास नकोसा वाटतो. नाखुशीनेच गेलो. आम्ही दोघे एका बाजूला आणि विरुद्ध बाजूला दहा लोक तरी असतील. ये अन्याय है! सुरुवातीला ओळखदेख झाल्यावर मुलीच्या आईने स्वतःच्या मुलाचा कौतुक सोहळा सुरु केला. मला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. मला हे लोक 'तसा' तर समजत नाहीत ना? इकडे येता येता माझ्या मध्ये काही शारीरिक बदल तर झाले नाहीत ना? अशी शंका येऊ लागली. म्हणून मी चाचपडायला लागलो. अचानक माझा हात छातीकडे गेला आणि दचकलो. तेव्हढ्यात माझ्यातल्या 'मी' ने मला आवाज दिला "हगऱ्या तू व्यायामशाळेत जातोस म्हणून ते तसे आहेत". या पुष्टी नंतर भानावर आलो. मनात म्हणालो रविवार वाया जाणार नाही. भरपूर मनोरंजन होणार तर. मुलाचा कौतुकसोहळा खूपच लांबत चालला होता, मला वाटलं मुलीला नटायला वेळ लागत असेल. थोड्या वेळानंतर कंबरेवर ठेवलेला टायर घेऊन एक मुलगी समोरच्या रिकाम्या खुर्चीवर येउन बसली. झोपेतून उठ्ल्यासारखी आली होती. कोणी पाहायला आलंय याच कसलच औस्तुक्य चेहऱ्यावर आणि देह्बोली वरून वाटत नव्हत. च्यायला घातलेल्या कपड्यांवर स्वतः बसली असती तरी छान पैकी इस्त्री झाली असती. त्यांच्या बाजूने असलेल्या महिला वर्गात कुजबुज सुरु होती, जी एकीने ऐकवून पण दाखवली. दोघंही अंगाने सारखीच आहेत ना, छान दिसेल जोडा. तिच्या गुटगुटीत पणाची तुलना माझ्या कमावलेल्या शरीराशी केल्यावर मला खरतर राग आलेला. 'ओ, तुम्हाला पोट सुटलेला व्यक्ती आणि मी सारखाच वाटतो का?' अस सुनवायच मन झाल होत. तेव्हढ्यात काकाने काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार अस सांगितलं. मी ते ध्यान पाहून प्रश्नच काय सगळच विसरलो होतो. आता आलोच आहोत तर काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. मी: नाव काय आपल? आई: XXX XXX XXX मी: शिक्षण किती? भाऊ: पदवी मी: काही छंद आहेत का? आई: नाही ती कुठे घराबाहेर जातच नाही. मुलीनी घराबाहेर पडलेल नाही आवडत आम्हाला. मी: नोकरी वगैरे करण्याचा काही विचार? भाऊ: त्याची गरज नाही आम्हाला. नुसतीच घरात बसून काय करणार, म्हणून आम्ही आपल तिला कॉलेजला पाठवलं. च्यायला, प्रश्न मुलीला आणि उत्तर आई आणि भाऊ देत होते. मुकी आहे कि काय. मी काकाकडे संशयास्पद नजरेने पाहिलं. त्याने मुलगी बोलते कि नाही अस विचारलं. 'नाही, ती लाजते म्हणून बोलत नाही' अस उत्तर आल. लाजण आणि घुम्या सारखं बसण, काही फरक आहे कि नाही. माझाही खूप टाईमपास झाला होता तेंव्हा आता गुगली टाकूया म्हणून एक प्रश्न टाकला. मी दारू पितो, दारू पिण हा माझा कामाचाच एक भाग आहे. तुम्हाला चालेल का? प्रश्न टाकल्यावर टेबलावर उरलेली बिस्कीट परत घरात. माझा काका रागात, मी जोमात.

हि गोष्ट खरी आहे .. हि ऑगस्ट - सप्टेंबर २००४ च्या आस पास घडली असावी . मला काही बारीक गोष्टी आठवत नाहीत .. त्यात म्हणजे तिने नक्की कोठले cocktail मागवले. तिने असे cocktail मागवले होते कि जे व्होडका ,सफेद रम ,जीन बरोबर चालते आणि ज्याचे जीच्कडे mocktails मिळतात तिकडे दारू विरहीत ( non- alcoholic ) version पण मिळते. मी स्वत: cocktails चा पंख नाही कारण भरमसाठ किमतीत फारच कमी दारू मिळते. जेव्हा कॉर्पोरते पार्टीत फुकट मिळाली तेवाच घेतली .. तरीपण अनेकदा मला महागड्या व्हीस्की चा पर्याय बारा वाटतो. मी असे सर्व समावेशक cocktail – mocktail शोधायचा प्रयत्न केला. मला वाटते कि ते मोहितो (( Mojito ) ( http://en.wikipedia.org/wiki/Mojito ) असावे किंवा अजून काही. त्यावेळी मला अशी काही cocktails माहित होती. आणि त्या मुलीच्या सांगण्याप्रमाणे ती त्या हॉटेल मध्ये २-३ वेळा आली होती आणि तिकडे हि सराइतासारखी वावरत होती. मेनू हि तुकड्यात होता ( tabbed ) तिने बहुदा cocktails चे पण फटकन काढले आसवे आणि mocktails समजून cocktail मागितले असावे. मी Screw Driver लिहिले कारण मला ते नाव फारच गमतीदार आणि दवर्थी वाटले. अजून कोणी होल्स म्हणजे कक़ि विचारले आहे. ते म्हणजे हॉल्स ( Halles ) च्या गोळ्या. ह्य त्यावर मी १२ वर्षे निभावून नेली .नंतर फारशी गरज लागली नाही . पण सर्वोत्तम म्हजे टूथ पेस्ट ने चूल भरून मग माउथ वोष करणे ....

व्यतास असाही आहे की अगदी निर्व्यसनी (पानसुपारीचेही व्य्सन नसणे)+शुद्ध शाकाहारी हा एकूणच लग्नबाजारात हेटाळणीचा/कुचेष्टेचा विषय (?) झालेला पाहिला आहे. जाणू ही एक उणीवच आहे त्या बाप्यात!!!

मजेशीर अनुभव. मी तुमच्य जागी असलो असतो तर "पिण्यासाठी हा प्रसंग योग्य नाही" असे उत्तर दिले असते. त्यातुन माणुस तारतम्य बाळगुन पितो असे प्रतित झाले असते.

मृत्युन्जय हा योग्य प्रसंग का नवता? काही दुखद तर घडले नवते आणि ड्रिंक्स तर मुली ने मागवली होती . पिणार्यांसाठी सर्वच योग्य प्रसंग.