सोनुलं
कायं झालं कसं झालं
नाई काईचं कयलं,
उभ्या पिकाचं वावरं
यकायकी उलंगलं १
आता लोकं डोयापुळे
होतं चांदनं खेयतं,
यकायकी कुठूनं हा
आला अंधार पयतं २
रेती थापटूनं खोपे
किती पायावरं केले,
पायं काळतां भाईरं
सारे खचूनचं गेले ३
मनातले मांडे सारे
मनातचं रायले ,
पोटरकी धांडे नाई
ते नाईचं निसयले ४
झाळं पळलं वार्यातं
आता कुठची सावली,
गेला उळूनं सोनुला
रडं रडली माऊली ५
💬 प्रतिसाद
(6)
प
प्रचेतस
Mon, 03/16/2015 - 04:40
नवीन
आपण फ्यान झालोत राव तुमच्या वर्हाडी बोलीतील कवितांचे.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Tue, 03/17/2015 - 03:36
नवीन
+१ असेच म्हणतो
- Log in or register to post comments
र
रुपी
Mon, 03/16/2015 - 23:20
नवीन
आवडली..
- Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे
गुरुवार, 03/19/2015 - 19:27
नवीन
खूप खूप धन्यवाद,वल्ली, रुपी, यसवायजी
प्रतिसादा बद्दल,आभार आपला युकेजी
युकेजी= ऊध्दव काशीराव गावंडे
मिसळपाव, संमं, तसेच मिपा करांना खूप खूप धन्यवाद!
- Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे
गुरुवार, 03/19/2015 - 19:33
नवीन
आवडली. लिहीत राहा.
- Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे
Fri, 03/20/2015 - 05:05
नवीन
आभारी आहे.
- Log in or register to post comments