गर्भपातल्या रानी .....!
गर्भपातल्या रानी .....!
गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी
एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी
हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी
ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी
शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले
गेले दाणापाणी
- गंगाधर मुटे ‘अभय’
==0=^=0=^=0=^=0=^=0==
गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी
एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी
हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी
ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी
शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया
अन्नदात्याचे ‘अभय’ गेले
गेले दाणापाणी
- गंगाधर मुटे ‘अभय’
==0=^=0=^=0=^=0=^=0==
💬 प्रतिसाद
(16)
म
मितान
Mon, 03/16/2015 - 05:02
नवीन
परवाच्या गारपिटीनं खरोखर हवालदिल झालाय शेतकरी !
कविता चांगली तरी कसं म्हणू ! :(
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 03/18/2015 - 05:20
नवीन
++११ :-(
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Mon, 03/16/2015 - 05:07
नवीन
पोचली.. :(
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Mon, 03/16/2015 - 05:20
नवीन
... आता निसर्ग पण कोपला... :(
- Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच
Mon, 03/16/2015 - 06:12
नवीन
खरच ज्याच्यावर विसंबून सगळा जगण्याचा प्रपंच मांडायचा तोच जर का जीवावर उठला तर दाद तरी कुणाकडे मागायची?
- Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे
Mon, 03/16/2015 - 09:20
नवीन
वर्ष भर पाऊस असा आला जेणेकरुन
नुकसान कसं होईल .त्यामुळे पीक नाही .
जे थोडं बहुत पीकलं त्याला भाव नाही .
माय बाप सरकार असं आलं ज्याला शेती मातीशी काही घेणं देणं नाही .
शेतकऱ्याने कोणा कडे पाहावे ?
- Log in or register to post comments
अ
अजया
Mon, 03/16/2015 - 09:32
नवीन
:(
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 03/16/2015 - 10:28
नवीन
कविता पोहोचली.
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Wed, 03/18/2015 - 00:09
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
- Log in or register to post comments
च
चुकलामाकला
Wed, 03/18/2015 - 09:21
नवीन
नेहमीप्रमाणेच व्यथा नेमकी मांडलीत .
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Wed, 03/18/2015 - 14:28
नवीन
कविता आवडली!
पण ज्या ठिकाणी आज शेतं आहेत तिथेच कधीकाळी एका जंगलाचा गर्भ पाडला गेला असेल; त्याचाच शाप आहे हा आपल्या सगळ्यांना असं वाटल्याशिवाय राहात नाही.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Wed, 03/18/2015 - 15:23
नवीन
गारपिटीचे फोटो
मेलेल्या पक्ष्यांचे फोटो
झोपलेल्या शेतांचे फोटो
सर्वच काही फेसबुक वर
मित्रांसोबत शेयर केले
सांयकाळी टीवी वर
घूँट घूँट पीत चहा
शेकऱ्यांच्या व्यथा
गटकण्या शिवाय
मी काहीही केले नाही.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 03/18/2015 - 18:08
नवीन
सून्न
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 03/31/2015 - 11:18
नवीन
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Tue, 07/19/2016 - 19:07
नवीन
छान कविता! आवडली!
- Log in or register to post comments
श
शि बि आय
Tue, 07/19/2016 - 20:21
नवीन
अंगावर काटा आला..
- Log in or register to post comments