रवा केक
Primary tabs
साहित्य:
१ वाटी रवा
३/४ वाटी दूध
३/४ वाटी ताक (आंबट नको)
३/४ वाटी साखर
१/२ वाटी पातळ तूप
१ tbsp बेसन
१/४ tsp बेकिंग सोडा
२ थेंब vanilla essence
कृती:
१) प्रथम एका पातेल्यात तूप घेऊन त्यात रवा आणि बेसन घालावे.
२) आता यामध्ये साखर,दूध आणि ताक घालून सर्व जिन्नस छान एकत्र करावेत. हे मिश्रण कमीतकमी ४ तास झाकून ठेवावे. केक सकाळी करायचा असल्यास रात्रभर मिश्रण ठेवले तरी चालेल.
३) केक करायच्या वेळी non stick भांड्याला ला तुपाचा हात लावावा. साधारण झाकण असणारे पसरट पण खोलगट भांडे यासाठी वापरावे.
४) केक च्या मिश्रणात सोडा आणि vanilla essence घालून ते नीट फेटावे. हे मिश्रण तूप लावलेल्या pan मध्ये ओतावे व कमी आचेवर शिजण्यास ठेवावे.
५) त्यावर झाकण म्हणून तापलेला तवा उलटा ठेवावा म्हणजे केक ला वरून देखील आच मिळेल. साधारण १०-१५ मिनिटांनी तवा काढून बघावे. केक वरून शिजला असल्यास आच बंद करावी आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे भांडे तव्यावर उपडे करावे. जेणेकरून केक चा खालचा भाग वर येईल. गार झाल्यावर त्याचे सुरीने तुकडे करावेत.
काही महत्वाचे:
१) आच कमी ठेवावी. तसेच भांड्याचा तळ जाड असावा.
२) हवे असल्यास मिश्रणात काजू बदाम बेदाणे घालू शकता.
३) हा केक २ दिवस सहज fridge शिवाय बाहेर राहतो.

छान दिसतोय. १ टेस्पू बेसन घालतात हे नवीन समजले.
खूप दिवसात/ वर्षात रवा केक केला नाहीये असे लक्षात आले.
पूर्वी गरम वाळूवर डबा ठेवून केक बेक केला जात असे ते आठवले.
फोटो दिसंना झाल्यात.
खाल्लाय असा केक... मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!
मस्त !!!
मस्त झालाय केक!
मी बेसन नाही घातलं अजून कधी.
आता लगेच करणे आले.
फार फार आवडीचा आहे हा केक.
छान केक, लहानपणीची आठवण झाली.
स्वाती
बेसन घालुन मी पण कधी केक केला नाही. पण बेसन घालण्याचे काही कारण आहे का?
करून पहाते.बेसन घातल पाहिजे का?
पाहीला जाइल. अगदी सोपी पाकक्रुती!
मस्त
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
बेसन घातल्यामुळे केक मिळून यायला मदत होते. नाहीतर रवा वेगवेगळा राहतो.
अंडे न घालता केल्यामुळे विशेष पसंत पडली.
१००+
मी आधी साहित्याची लिस्ट वाचून खात्री केली अंडे नाहीये तेव्हाच
पुढे कृती वाचली .
लवकरच करून पाहीन .
माप्रो चे आंबा सिरप आणि आंबा कलर टाकून केला होता .
एकदम छान झाला होता . (कारण वानिल्ला इसेन्स नव्हते )
रव्यावर काही पूर्व संस्कार करणे अपेक्षित आहे का?
वाह्ह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
घरी लोखंडी तव्यावर वाळू पसरुन्त्यावर अल्युमिनियमचे भांडे ठेवुन त्यात भाजला जायचा केक.
रात्रभर जर भिजत थेव्ले तर दुध अनि ताकाचे दाहि लगेल ना????
आजच नेमका घरी रवा केक बनवण्याचा विषयनिघाला होता.
तो कसा बनवायचा ह्यावर चर्चा झाली.
आणि नेमकी ही रेसिपी समोर आली
कुणीतरी सांगितलंच आहे
मस्त आवडली. सौ.ला करायला सांगेल.