Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नक्षीची दुसरी बाजू..

स — सूड, Wed, 03/18/2015 - 06:33
नक्षीची दुसरी बाजू. महिला दिन विशेषांकातली नक्षी ही सर्वात आवडलेली कथा!! पण कुठेतरी एकांगी वाटली. बाई दिवसभर राबत असते मान्य, पण पुरुषही हातावर हात ठेवून बसलेले नसतात. त्यांनीही स्वत:च्या आवडीनिवडी मागे टाकलेल्या असतात. खरंतर दोन्हीकडचा विचार व्हायची गरज आहे. त्यानिमित्ताने, नक्षीची दुसरी.....फारशी न दिसणारी बाजू मांडायचा छोटासा प्रयत्न!! आज फार दिवसांनी नीट पाहिला आरसा होता तिशीतच तरी दिसे थोराड जरासा आठ्या आल्या भाळावरी अन खुंट वाढलेले काया रापली जराशी, जरा गाल आत गेले मागे माघारीण उभी, होती उगा त्रासलेली प्रेयसीच की पूर्वीची आता जरा सुटलेली एक शाळेला गेलेले, एक घेई कडेवरी हाती कामांची घे यादी, झाली कावरीबावरी संपे भांड्यांचा रगाडा फोटोफ्रेम पुसू लागे गप्पा सप्ताहभराच्या सांगे, फिरे मागे मागे फ्रेम पाहुनिया एक जरा मनी थबकला होता तोच की पूर्वीचा, आता पार हरवला उभा संसार ओढता कसे नाकी नऊ आले जरा स्थिर होतो तोच तीन दोनाचे की झाले भूतकाळ आठवूनि खिन्न हसला मनाशी घाव लपवून सारे, रेखे संसाराची नक्षी

प्रतिक्रिया द्या
13318 वाचन

💬 प्रतिसाद (91)
स
सौंदाळा Wed, 03/18/2015 - 06:39 नवीन
अप्रतिम सुडराव कविता भावली तुझे प्रतिसाद आणि कविता पाहिल्या की तुझी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असे वाटते ;)
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 03/18/2015 - 07:34 नवीन
तुझे प्रतिसाद आणि कविता पाहिल्या की तुझी स्प्लिट पर्सनॅलिटी आहे असे वाटते
येप, येईच बोलता हे बाकी आता अनाहीतांचा मारा झेलायला तयार रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
ब
बॅटमॅन Wed, 03/18/2015 - 12:51 नवीन
दोन्हींशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ल
लॉरी टांगटूंगकर गुरुवार, 03/19/2015 - 05:24 नवीन
मी पण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Wed, 03/18/2015 - 06:40 नवीन
तिशीतच एवढा घाईला आला ? बाकी, 'नक्षी' मधे दिलेलाच प्रतिसाद इथेही द्यावासा वाटतो..चित्रण निगेटिव्ह वाटते आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 03/18/2015 - 06:50 नवीन
नक्षी मधला पुरुषसुद्धा दमलेला, अनिच्छेने उठणारा दाखवला आहे. बाकी विषय अन कविता, दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/18/2015 - 07:07 नवीन
कविता आवडली. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. पण एक सांगू का, नक्षी ही फक्त संसार ओढून दमलेल्या बाईची कथा नाही. वय वाढत गेलं तरी प्रत्येकाच्या मनात एक जगाकडे कुतुहलाने, आनंदाने बघणारं १६ वर्षांचं कुणीतरी लपलेलं असतं. कधीतरी आपल्याला त्याची जाणीव होते, कधीतरी आपण पुन्हा एकदा त्या वयात शिरून आजूबाजूचं जग बघायला लागतो. कधीतरी तेव्हा खरं काय आणि मनाने चितारलेली नक्षी कोणती कळेनासं होतं. हे सगळं 'नक्षी'मधे आहे. नक्षी ही प्रत्येकाचीच प्रातिनिधिक कथा म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 03/18/2015 - 08:42 नवीन
+१ कथा ....सापेक्ष वाचली नाही तर समजतं. बाकी पुरुष दिनाला कुणी तरी 'नक्षा' अशी 'अशीच' कथा लिहू शकेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर Wed, 03/18/2015 - 13:59 नवीन
हेच्च.. नक्षी ही संसाराच्या रगाड्यामागे हरवुन गेलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे.. इनिच्या कथेतही स्त्री विरुद्ध पुरुष असा रोख नव्हताच.. एकाच माणसाच्या दोन रुपांबद्दल तिने लिहीलय.. ह्यात उगाच अनाहिता विरुद्ध इतर असा सुर कशाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सूड Wed, 03/18/2015 - 14:11 नवीन
>>अनाहिता विरुद्ध इतर असा सुर कशाला
एक मिनीट!! ह्यात कुठेही अनाहिता विरुद्ध इतर मांडण्याचा प्रयत्न नाहीये. एकूणच आपल्याकडे लग्नानंतर बाईला कसा सर्व त्याग करावा लागतो, तीच कसं सगळं सोडून येते असा जो काही सूर दिसतो त्यावर लिहीण्याचा छोटासा प्रयत्न आहे, आता हे सुचताना नक्षी निमित्तमात्र झाली हेही खरं. वर पैसातैंनी म्हटल्याप्रमाणे कथा पुन्हा वाचली. माझा दृष्टिकोन चुकलाही असेल तो आधी लेख वाचताना!! आक्षेपार्ह वाटत असेल तर नक्षीची लिंक कृपया संपादक मंडळाने काढून टाकावी. मला नक्षी वाचल्यानंतर जे काही सुचलं ते उतरवलंय, माझंच बरोबर आहे हे मांडण्याचा अजिबात अट्टाहास नाही. आणि अनाहिता विरुद्ध इतर असं तर नाहीच नाही!! इति लेखनसीमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 03/18/2015 - 14:37 नवीन
अहो तुम्हाला नाही हो.. इथे लोक उगाच अनाहिता वर घसरत आहेत त्याबद्दल बोलतेय मी.. तुमची कविता चांगलीच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पैसा Wed, 03/18/2015 - 15:28 नवीन
चूक बरोबर असं काही नाही. एका कलाकृतीचे खूप वेगवेगळे अर्थ, कोपरे प्रत्येकाला दिसू शकतात. किंबहुना असे सर्वस्वी वेगळे विचार ज्या कलाकृतीमुळे वाचणार्‍यांना अनुभवाला येतील ती यशस्वी कलाकृती म्हटली पाहिजे. तू लावलास तो अर्थही चुकीचा नाहीच. संसाराचा गाडा ओढून थकलेले स्त्री आणि पुरुष या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्त मी कथेतल्या 'नेली'कडे एक माणूस म्हणून पाहिले, आणि हा अनुभव कोणालाही येऊ शकतो असं मला वाटलं तर तुला नेली ही स्त्री आहे ही गोष्ट पटकन लक्षात आली. त्यात वाईट काही नाही. स्त्रियांच्या प्रश्नावर तुझं अतिशय संवेदनाशील लिखाण पूर्वी वाचलेलं आहे. त्यामुळे तुझ्या लिखाणाबद्दल कोणतेही गैरसमज नाहीत. हे सगळं तिथे प्रतिक्रिया देतानाही मी उतरवू शकले नव्हते, मात्र तीच कथा वाचून तुला एवढी सुरेख कविता सुचली, याबद्दल कौतुकच वाटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आनन्दिता Wed, 03/18/2015 - 14:13 नवीन
मलातरी कवीला "अनाहिताविरोध" अभिप्रेत आहे असं दिसत नाहीये, उलट या कवितेने पुरुषांच्या नजरेतुन 'नक्षी' अगदी व्यवस्थित मांडली आहे. ही पण एक बाजु नक्कीच असणार आहे. पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 03/18/2015 - 14:39 नवीन
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत.
. ह्याच्याच बद्दल बोलतेय.. लेखकाबद्दल नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/18/2015 - 15:11 नवीन
पण काही प्रतिसादकर्ते मात्र उगाच खुष झालेत. खरंय ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/18/2015 - 07:19 नवीन
वा वा सूडराव... संसाराचा शुन्य अनुभव असतांना सुद्धा इतकं सुंदर लिहू शकताय तुम्ही. लिहीत जा नियमितपणे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/18/2015 - 07:39 नवीन
मिकाशेठ, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मधे वापरलेल्या उपमा आठवा, त्यांना पण संसाराचा काहीच अनुभव नव्हता. (येथे सुडरावांची तुलना ज्ञानेश्वर माउलींशी करण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये याची समस्त वाचकांनी कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/18/2015 - 12:28 नवीन
हा हा हा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ए
एक एकटा एकटाच Wed, 03/18/2015 - 07:40 नवीन
कविता आवडली फार छान मांडलीय
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 03/18/2015 - 07:49 नवीन
या बात!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 03/18/2015 - 11:55 नवीन
छान. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 03/18/2015 - 12:46 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/18/2015 - 12:51 नवीन
हाण्ण तेजायला.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 03/18/2015 - 13:05 नवीन
कविता चांगली आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 03/18/2015 - 13:09 नवीन
" खिन्न हसला मनाशी
यात जिंकलंस मित्रा ! कड्डक! एकांगी विचार होतो हे खरं आहेच बहुतांशी. दोनही बाजू बघायला हव्यात. ऑलवेज. असो वेगळा धागाच निघायचा खरा यावर. पण राहुदे. कविता भनाट. फुल लाईक.
  • Log in or register to post comments
म
मितान Wed, 03/18/2015 - 14:55 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 03/19/2015 - 18:14 नवीन
कविता आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
म
मधुरा देशपांडे Wed, 03/18/2015 - 14:57 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 03/18/2015 - 15:42 नवीन
केवळ सूड रावांची आहे म्हणून कविता वाचली. ( मला कविता कळत नाहीत आणि मी त्यांच्या वाटेसहि जात नाही) आणि मग नक्षी हि कथाही वाचली. दोन्ही तितक्याच आवडल्या. पण सूड रावांनी दुसरी बाजूपण तितकीच समर्थपणे मांडली आहे हे कौतुकाने नमूद करावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 03/18/2015 - 15:57 नवीन
केवळ सूड रावांची आहे म्हणून कविता वाचली.
ह्याला कंपूबाजी म्हणावे कां डॉक? ;) ह. घ्या. उगा थोडी गंमत केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 03/19/2015 - 05:01 नवीन
सूड रावांकडे पहिले तर ते अशा संवेदनशील कविता करीत असावेत हे वाटत नाही. ते एखाद्या क्रांतिकारी संघटनेचे नेते असावेत असे वाटते. म्हणून त्यांची कविता वाचली. कंपूबाजी साठी कोणत्या कंपूत मला सामावून घेणार आहेत तेथे यायची माझी तयारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 03/19/2015 - 06:46 नवीन
सूड रावांकडे पहिले तर ते अशा संवेदनशील कविता करीत असावेत हे वाटत नाही. ते एखाद्या क्रांतिकारी संघटनेचे नेते असावेत असे वाटते.
हो खरय. ते क्रांती घडवून आणतील यावर माझा देखिल विश्वास आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खटपट्या गुरुवार, 03/19/2015 - 18:22 नवीन
कोणती क्रांती ?? (रेडकरांची ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
प
प्रीत-मोहर Wed, 03/18/2015 - 15:43 नवीन
कविता खूप आवडली सूड.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/18/2015 - 15:52 नवीन
छ्या: फारच शीरीयस !! कविता आवडली पण टोन आवडला नाही ...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 03/18/2015 - 16:19 नवीन
जल्ला काय कल्ला नाय.. अवांतर -मुळ लेख वाचला आहे. बहुतेक वशाडी आली
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Wed, 03/18/2015 - 19:24 नवीन
एकदम क्वुल.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 03/18/2015 - 21:17 नवीन
खूप छान कविथा !!मुळ लेख अजुन वाचला नाहीये.
  • Log in or register to post comments
स
सांजसंध्या गुरुवार, 03/19/2015 - 01:53 नवीन
संदर्भ दिला नसता तरी चालले असते. स्वतंत्र रित्या एक विचार म्हणून ही कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/20/2015 - 18:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या
स
सविता००१ गुरुवार, 03/19/2015 - 06:28 नवीन
मस्त आहे कविता. खूप आवडली
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली गुरुवार, 03/19/2015 - 06:35 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/19/2015 - 07:16 नवीन
दुसर्‍या बाजुची नक्षी...हम्म्म्म, बरीच परिणामकारक झालीय.
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 03/19/2015 - 09:16 नवीन
नक्षी चांगली आहे . नक्षी ही अनेक आकार आणि रंगांनी बनलेली असते. त्या पैकी काही कमी जास्तं झाले, की अपूर्णता जाणवते.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 03/19/2015 - 09:38 नवीन
नक्षी या कथेला इतकी छान दाद दिल्याबद्दल आभार सूड. वर उल्लेख आल्याप्रमाणे नेली स्त्री असणं आणि त्यामुळे तिचं आयुष्य असं होणं हे अभिप्रेत नाहीच. ती कोणत्याही व्यक्तीची गोष्ट असू शकतेय. आणि तुझ्या कवितेत तू ते नेमकं आणलंस. फारच छान! बाकी माझ्या या प्रतिसादात म्हटलं तसं बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/19/2015 - 15:59 नवीन
बाकी माझ्या या प्रतिसादात म्हटलं तसं बाई अाणि पुरुष यापलीकडे आपण सगळे माणूसही आहोत, हे प्रत्येकाच्या लक्षात राहिल तो सुदिन.
त्या सुदिनी अनाहिताचे नामकरण "माणुस" असे करुयात काय ;) माणुस दिन विशेषांक २११५ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय
आ
आनन्दिता गुरुवार, 03/19/2015 - 16:50 नवीन
माणुस दिन विशेषांक २११५
ते अनाहिता च्या नावाबद्दल सोडा हो, पण लोकांची भिकार मानसिकता बदलायला अजुन १०० वर्ष तरी लागतील याची कबुली म्हणायची का ही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
स्रुजा गुरुवार, 03/19/2015 - 16:56 नवीन
अगं हो, त्याचीच कबुली आहे. प्रामाणिकपणाचं कौतुक हो तुमच्या. आणि अनाहिताचा अर्थ कसलाही डंख नसलेली, स्वछ्छ , नितळ. अनाहिता चं याहून चांगलं बारसं करायचं असेल तर निदान अर्थाला तरी चिकटून करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
म
मितान गुरुवार, 03/19/2015 - 17:22 नवीन
@ प्रगो, अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद !!! यातून काय सिद्ध होतंय ते वेगळं सांगायला नको !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 03/19/2015 - 17:25 नवीन
@ प्रगो, अत्यंत हीन दर्जाचा प्रतिसाद - अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा