एनआरआयची भारतभेट..
मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..
अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.
वर्षा-दोन वर्षांतून, अन कधीकधी पाचदहा वर्षांनी एन आर आय लोक भारतात सुट्टी काढून येतात. महिना, पंधरा दिवस. त्या काळात येणार्या काही अनुभवांचं वर्णन "फॉर हिअर ऑर टु गो" या पुस्तकात थोडंसं वाचलं होतं.
माहेरी चार दिवस, सासरी चार दिवस, मित्रांसाठी पुण्यामुंबईत दोन दिवस, घरच्या इतर कौटुंबिक अन सरकारी भानगडी निस्तरण्यात आठवडा. वेगवेगळ्या प्रकारची जेवणं. तिथे सहज न मिळणारी घरगुती चव शोधायला जाणं अन इथेही तिकडच्याच पदार्थांची इंडियनाइज्ड व्हर्शन मिळणं. अनेक प्रतिमाभंग. असं बरंच काही असावं असं ऐकून अन वाचून वाटलं.
प्रत्यक्ष अनुभव मात्र फार थोडे लोक सांगतात. फारच थोडे. कडवटपणा नको म्हणून टाळत असतील.
भारतीय लोकांचेही अशा फ्लाईंग व्हिजिटवर आलेल्या परदेशी पाहुण्यांबद्दल ग्रह असतात. अॅटिट्यूड असतात.
परदेशात राहणार्या अन इथल्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे काय अनुभव आहेत? खरंच असे गिफ्टवसुली करणारे, फेवर्स मागणारे लोक प्रातिनिधिक म्हणता येतील का?
काही प्रश्न, टु बिगिन विथः
-ते तिकडे मजा करत आहेत आणि आपण इकडे देशाची अन घराची जबाबदारी घेत आहोत असा भारतातल्या नातेवाईकांचा /मित्रांचा अॅटिट्यूड भासतो का?
-मत्सर हेवा दिसतो का?
-भारतात आता आर्थिक चित्र बदललं आहे त्याने काही फरक पडला आहे का? अप्रूप कमी झालंय का?
-इम्पोर्टेड चॉकलेट्स, खेळणी, गिफ्ट्स यांसाठी लोक आवर्जून भेटतात का? परदेशी मित्राकडून, अंकल-आंटींकडून गिफ्ट मिळणे ही इच्छा भेटीचा एक मुख्य भाग असतो का?
-तिकडच्या श्रीमंतीचं प्रदर्शन इकडे केलं जातं का?
-तिकडची समृद्धता इथल्या भाऊबंदांना कळावी अशी (स्वाभाविक?!) इच्छा असते का? ती दाखवण्यासाठी ताण घेऊन भेटवस्तू आणल्या जातात का?
-भेटवस्तू न आणल्यास नाराजी दिसते का भारतात?
-नातेवाईक स्थळ यादृष्टीने किंवा तिकडे सेटल होण्यासाठी मार्गदर्शन, मदत अशा कार॑णांनी मागे लागतात का? ते तेवढ्यासाठीच तुम्हाला भेटताहेत अशी भावना येते का? त्यांना मदत करायला आवडतं का?
-चुटपुट लागल्याने नकोच ती भारतभेट असं वाटतं का?
-परदेशात सेटल झाल्यावर अनेक वर्षांनी प्रथम मुलं आणि मग जनरली पत्नी भारतात आठवडाभरही यायला साफ नकार देते अन एकटा पुरुषमाणूस येऊन झेंडावंदन (फॉर्मॅलिटीज) करुन जातो असं उगीचच मला तरी वाटत आलेलं आहे. हे कॉमन आहे का?
अनेक प्रश्न मनात येतात अधुनमधून, पण या कथेच्या निमित्ताने ते विचारावेसे वाटले इतकंच.
परदेश म्हणजे या ठिकाणी प्रगत देश असं समजलेलं आहे. तिथे समृद्धी आहे असं गृहीत धरुन. अमेरिका, युरोपातले काही देश, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे.
बाकी एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते की मला इतक्या वर्षांत माझ्या नातेवाईक वा मित्रमंडळींकडून कधीच वाईट अनुभव आलेले नाहियेत. सर्व मंडळी अगदी अगत्याने वागवत आली आहेत. अतिशय समर्थपणे माझं आदरातिथ्य करत आली आहेत.याला तर +१००...राहिली गोष्ट लोकांची सगळ्या रस्त्यांना भरपूर फाटे कशाला आहेत? लोकांनी चांगले म्हणावे म्हणून काही कष्ट करण्याची माझी मुळातच तयारी नाही.जर माझ्या येण्याने कोणाला आनंद असेल आणि माझ्या जाण्याने मला आनंद असेल तरच त्या भेटीत मजा आहे. नाहीतर घरी मजेत लोळत रहावे किंवा दुसरीकडे कुठे फिरायला जावे. दोघांपैकी कोणा एकाला किंवा दोघानाही मनस्ताप हवा कशाला ?!